आजची स्त्री (वैचारिक निबंध) Today's woman

 आजची स्त्री

Today's woman

          भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासूनच आपल्या समाजामध्ये स्त्रीयांच्या स्थानाचा विचार केला जातो. खरतर ज्या घरात स्त्रियांचा आदर होतो. त्यांची पुजा केली जाते, त्या घरात देवता सदैव प्रसन्न असते. या विश्वामध्ये आधीपासून कंटुबव्यवस्था ही मातृसत्ताक होती. नदी किंवा पाण्याचा ठिकाणी शेती करण्याची सुरुवात आणि एकत्र येऊन जगण्याची सुरूवात स्त्रीनेच केली होती. या सर्व कारणामुळे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये सभ्यता आणि संस्कृतीच्या सुरूवातीस स्त्रियांचा मान आहे.  

          तेव्हा काही वर्षापूर्वी अगदी बालवयात मुलींची लग्न व्हायची आणि तीही त्यांच्यापेक्षा वयाने चौपट, पाचपट असलेल्या पुरुषांशी. त्यामुळेच लहानपणीच येणारे विधवापण, केशवपन, सतीप्रथा या साऱ्यामुळे स्त्रीचे जीवन भयावह बनले होते. स्वतःचे अस्तित्व नसलेल्या या विधवा स्त्रीकडे पाहण्याची समाजाची दृष्टीच निर्दयी आणि अन्याय्य होती. समाजात अशा स्त्रीयांना स्थान नव्हते, कोणत्याही कार्यक्रमामध्ये, सण समारंभामध्ये मान नाव्हता., अशा स्त्रीयांना कुठली ओळख नव्हती, शिक्षण घेण्याची मुभा नव्हती, माणूस म्हणून कुठलेच अधिकार नाहीत अशी त्यांची स्थिती.
'बंदिवान मी या जन्माची
नारी बनूनी जन्म भूवरी'

          स्त्रीच्या समाजाकडून  शोषणाची ही स्थिती फार जुनी नव्हे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे असेच सारे सुरू होते, परंतु क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महत्मा फुलेंनी शिक्षणाची दोरी स्त्रीच्या हाती दिली आणि काही काळातच स्त्रीने आश्चर्यकारक प्रगतीचा टप्पा गाठला. अगदी प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने संघर्ष करत, बुरसटलेल्या समाजाच्या विचारांचा सामना करत, जुन्या, विघातक  विचारांना टक्कर देत सावित्रीबाई, रमाबाई रानडे, आनंदीबाई, पंडिता रमाबाई अशा स्त्रियांनी स्त्रीचा माणूस म्हणून जगाला परिचय करून दिला. स्त्रीहक्कांसाठी अनेक पुरुष विचारवंतही तत्कालीन समाजव्यवस्थेशी झुंजले. स्त्रीची वारंवार गळचेपी करणाऱ्या रूढी-परंपरा धुडकावण्याचे, समाजाच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस या सुधारकांनी केले. त्याची परिणीती म्हणून आजची आधुनिक स्त्री पुरुषांइतकीच किंबहुना त्यांपेक्षा अधिक समर्थपणे प्रत्येक क्षेत्रात कार्य करताना दिसत आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्त्रीया अनेक क्षेत्रामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

          आजची प्रत्येक स्त्री वैचारिक, आर्थिक, मानसिकदृष्टया स्वतंत्र आहे. ती शिक्षणातही अव्वल स्थानी आहे. आज स्त्रीची कार्यक्षम क्षमता जाणून देशामील विविध क्षेत्रे तिच्यासाठी खुली झाली आहेत. आजच्या स्त्रीला आत्मभान आहे. स्वतःचा स्वाभिमान आहे. स्वतःवर होणाऱ्या अन्यायाची जाणीवही तिला आहे आणि त्याविरुद्ध लढण्याची ताकदही तिच्याकडे आहे. आज विश्वपातळीवर  खास पुरुषांची मक्तेदारी समजली जाणारी अनेक क्षेत्रे स्त्रिया समर्थपणे आपल्य कर्तृत्वाने सांभाळताना दिसतात. त्या क्षेत्रांना प्रगतीपथावर पोहचवत आहेत. शिक्षणाची सारी कवाडं स्त्रियांसाठी खुली झाल्याने त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या कार्यशक्तीला, त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला आहे. आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, शास्त्रज्ञ, अधिकारी, राजकीय नेता, न्यायमूर्ती म्हणून अनेक स्त्रिया कार्यरत आहेत. सानिया मिर्झा, सायना नेहवाल, गीता, बबिता फोगट, पी. टी. उषा अशा एक ना अनेक जणींनी क्रीडाक्षेत्रही काबीज केले आहे. अनेक वर्ष क्रीडाक्षेत्रामध्ये स्त्रीयांची भरीव कामगिरी नव्हती. परंतू या स्त्रीयांनी क्रीडाक्षेत्रामध्ये ही भरीय कामगिरी करुन दाखवली आहे. कल्पना चावला, सुनिता विल्यम यांनी तर अंतरिक्षातही झेप घेतली. आज महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील जबाबदारीच्या पदांवर स्त्री कुशलपणे काय करत आहे. कुटुंबाची अन् कामाची संपूर्ण जबाबदारी ती अथकपणे पार पाडत आहे. म्हणूनच, तिला 'अष्टभुजा' अशी उपमा दिली जाते.

          आजची स्त्री प्रगतीच्या शिखरावर असली तरीही अनेक ठिकाणी आजही कौटुंबिक अत्याचार, हुंडाबळी, सामाजिक हिंसाचार, लैंगिक शोषण, बलात्कार अशा हजारो समस्यांना तिला सामोरे जावे लागत आहे. आजही स्त्रीभ्रूण हत्येसारखे घातक घडताना दिसते. 'निर्भया' सारखी अनेक प्रकरणे सातत्याने घडताना दिसतात. विनयभंग, एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले हे विकृत पुरुषी मानसिकतेचा चेहरा आजही दाखवताना दिसतात. समाजात अशा घटना जरी घडत असल्या तरीही स्त्री लपून बसणाऱ्यातील नाही हे तिने दाखवून दिले आहे. आत्मसंरक्षणाचे धडे गिरवत आज स्त्री या नराधमांशी लढण्याची तयारी करत आहे. अधिक आत्मविश्वासाने ती प्रगतीपथावर चालत आहे. आपल्या कष्टाने तिने समाजात एक स्वतंत्र अस्तित्व तयार केले आहे. आता ती सज्ज आहे नव्या आव्हानांसाठी.

English translation :

Today's woman

The place of women in our society has been considered since ancient times in the ancient culture of India.  In fact, in a home where women are respected.  They are worshiped, the deity is always pleased in that house.  The family system was already matriarchal in this universe.  It was women who started farming and living together in rivers or water bodies.  For all these reasons, women are respected in our society at the beginning of civilization and culture.



 A few years ago, girls used to get married at a very young age and they also got married to men who were four to five times their age.  That is why the widowhood, haircut, and sati practices that come from childhood had made the life of a woman frightening.  The society's view of this non-existent widow was cruel and unjust.  Such women had no place in the society, they were not respected in any event, festival, such women had no identity, they were not allowed to get education, they had no rights as human beings.

 'Prisoner, I was born this way

 Nari Banuni Janma Bhuvari '


 This state of exploitation by women's society is not very old.  It all started like this a few years back, but Krantijyoti Savitribai Phule and Mahatma Phule handed over the reins of education to women and in no time the woman reached the stage of amazing progress.  Women like Savitribai, Ramabai Ranade, Anandibai, Pandita Ramabai introduced the woman as a man to the world by constantly struggling in adverse conditions, confronting the thoughts of the rusty society, fighting against the old, destructive thoughts.  Many male thinkers for women's rights also struggled with the then society.  These reformers dared to break the tradition of repeatedly strangling women and to stand up against the society.  As a result, today's modern woman is seen working in every field as much as men, or even more competently.  Today, many women are working in high positions in many fields, shoulder to shoulder with men.


 Every woman today is ideologically, financially, mentally independent.  She is also at the forefront of education.  Today, knowing the efficiency of a woman, various areas of the country are open to her.  Today's woman is self-conscious.  Has self-esteem.  She is aware of the injustice that is being done to her and has the strength to fight against it.  Today, in many areas of the world, which are considered to be exclusively male-dominated, women are seen to be able to manage them competently.  Those areas are making progress.  All the doors of education have been opened for women, which has given scope to their intellect, their work force, their accomplishments.  Today many women are working as doctors, engineers, lawyers, scientists, officials, political leaders, judges.  Sania Mirza, Saina Nehwal, Geeta, Babita Fogat, p.  T.  One or more women like Usha have also taken over the sports field.  For many years, women did not perform well in sports.  But these women have done a great job in the field of sports.  Kalpana Chawla and Sunita Williams also took a leap into space.  What a woman is skillfully doing in positions of responsibility in every field that is considered important today.  She is tirelessly carrying out the entire responsibility of the family's work.  Hence, it is nicknamed the 'Octagon'.


 Even though today's woman is at the peak of her progress, she is still facing thousands of problems such as domestic violence, dowry, social violence, sexual abuse and rape in many places.  Even today, feticide seems to be on the rise.  Many cases like 'Nirbhaya' seem to be happening continuously.  Immorality, one-sided love attacks are still seen as the face of a perverted male mentality.  Even though such incidents are happening in the society, she has shown that women are not hidden.  Taking lessons in self-defense, today the woman is preparing to fight these men.  With more confidence, she is making progress.  Through her hard work she has created an independent existence in the society.  Now she is ready for new challenges.