भाजीविक्रेत्याचे मनोगत (आत्मवृत्तात्मक किंवा आत्मनिवेदनपर निबंध)

 भाजीविक्रेत्याचे मनोगत

( आत्मवृत्तात्मक किंवा आत्मनिवेदनपर निबंध)


मुद्दे : घरची परिस्थिती - अर्धवट शिक्षण - बेकारी - स्वीकारलेला व्यवसाय - मंडईतून भाजी आणणे व विकणे - बरे -वाईट अनुभव - समाजाकडून अपेक्षा - भविष्यातील वेत - समारोप...


     दररोज सकाळी सकाळी ठरलेल्या वेळेवर एक आरोळी कानावर नक्की येते ती म्हणजे, 'बाई, भाजी' सदानंद नावाचा रेखीव नाकाडोळ्यांचा थोडा काळा - सावळा पंधरा ते सोळा वर्षांचा मुलगा आमच्या सोसायटी मध्ये रोज भाजीची गाडी घेऊन येत असे. सदानंद याची वर्तणूक आदबशीर व नम्र होती. त्याच्या गुणामुळे तो सोसायटी मधील सर्वांचा आवडता झाला होता. एकदा या सदानंदला मी बोलत केलं. त्याला काही न सांगताच एक दिवस संध्याकाळच्या वेळी सदानंदाला घरी बोलावून घेतले आणि त्याची माहिती विचारली.


     "मावशी, मी नववी नापास आहे," सदानंद सांगत होता. "नववीमध्ये नापास झालो आणि कायमची शाळा सोडली. तेव्हाच माझे वडील वारले आणि घर चालवण्यासाठी काम करण्याची नितांत गरज निर्माण झाली. या अगोदर हिच भाजीची गाडी माझे वडील फिरवत असत. त्यावेळेला गंमत म्हणून मी त्यांच्यासोबत फिरत असत, त्यामुळेच मला या कामाची माहिती आहे."


     "जवळच्या मोठ्या भाजी मंडईमध्ये पहाटे जाऊन भाजी आणतो. भाजी घेऊन आलो की मी माझी गाडी लावतो. आदल्या दिवशीच काही ग्राहकांनी काही खास भाज्या आणायला सांगितलेल्या असतात. त्या मी न विसरता प्रथम घेतो आणि मग माझा शहराकडे पुढील प्रवास सुरू होतो. गावापासून मोठी मंडई जरा खूपच लांब आहे. त्यामुळे दररोजचे चालण्याचे श्रम जास्तच होतात. अशा वेळी मनात एकच शंका घोळत असते. 'एवढी भाजी आज विकली जाईल ना?' कारण भाजी हा मालच नाशिवंत आहे. पण बहुधा दररोज सगळ्या भाज्या संपतात.


     "हा धंदा करताना खूप पायपीट करावी लागते. पण बऱ्याच गिऱ्हाईकांशी माझे इतके प्रेमाचे नाते निर्माण झाले आहे की, या दररोजच्या पायपिटीचे मला काहीच वाटत नाही. अनेक सोसायट्यामधील वयस्कर आजींना मी त्यांच्या घरात भाजी पोचवतो. मग कधीकधी अनेक आजीबाई मला प्रेमाने चहा, नाश्ता देतात. संक्रांतीच्या सणाला न विसरता तिळगूळ देणाऱ्या अनेक ताई - माई आहेत. कोणाकडे मंगलकार्य असेल तर भलीमोठी भाजीची यादी देतात."


     "भाजी विकत असताना दररोज त्रासदायक, कटकट करणारे अनेक ग्राहक ही भेटतात. असे असले तरी मी मात्र कोणाशी वाद घालत नाही. त्यामुळे अजिबात खटके उडत नाहीत. माझ्यासाठी संध्याकाळचा थोडा वेळच मोकळा मिळतो. या मोकळ्या वेळेमध्ये मी वाचन करतो. रोजची वर्तमानपत्रे वाचून काढतो. वि. स. खांडेकर या लेखकाची पुस्तके मला खूप आवडतात. आमचे कुटूंब व्यवस्थित चालेल एवढी मिळकत या भाजीच्या धंद्यातून मिळते. पण खरचं मी यामध्ये समाधानी नाही."


     "जीवनामध्ये एकच इच्छा आहे, काही दिवसात जमल्यास आपल्या येथे एक छोटेसे दुकान किंवा गाळ विकत घेणार आहे. यामुळे दुपारच्या मोकळ्या वेळेमध्ये मी तेथे भाजी विकू शकेन. परंतू काहीही झाले तरी सकाळची माझी फेरी मी कधीच सोडणार नाही, कारण यामुळेच मला खुप स्नेहीसोबती मिळतात." सदानंदाने मनातून व्यक्त केलेले विचार ऐकून मला मनोमन खूप आनंद झाला." 


The mind of the vegetable seller

 (Autobiographical or self-explanatory essay)

 Points : Home Condition - Partial Education - Unemployment - Accepted Occupation - Bringing and Selling Vegetables from the Market - Good - Bad Experience - Expectations from the Society - Future Wages - Concluding ...

 Every morning at the appointed time, a shout is heard, 'Bai, bhaji'.  Sadananda's behavior was polite and humble.  His virtues made him a favorite of everyone in the society.  I once spoke to this Sadananda.  Without telling him anything, one evening he called Sadananda home and asked for his information.

 "Auntie, I'm the ninth loser," Sadanand was saying.  "I failed in the ninth grade and dropped out of school forever. That's when my father died and I needed to work to run the house. Before that, my father used to drive the same vegetable cart. At that time, I used to ride with him for fun, that's why I know this job."

 "I go to the nearest big vegetable market in the morning and fetch vegetables. When I bring vegetables, I park my car. Earlier in the day, some customers asked me to bring some special vegetables.  It is a long time, so the daily workload is more. At such a time, there is only one doubt in my mind.  Because vegetables are perishable, but most of the time, every vegetable runs out.

 "I have to do a lot of pipetting while doing this business. But I have developed such a love affair with many shopkeepers that I don't care about this daily pipetti. I serve vegetables to the elderly grandmothers in many societies.  There are many tai-mais who give sesame seeds without forgetting the Sankranti festival. If anyone has a good deed, they give a list of good vegetables.

 "I meet a lot of annoying, annoying customers every day while selling vegetables. However, I don't argue with anyone. So it doesn't bother me at all. I get a little free time in the evenings.  I really like the books of S. Khandekar. Our family gets enough income from this vegetable business. But really I am not satisfied with this. "

 "There is only one wish in life, to buy a small shop or sludge here in a few days. This will allow me to sell vegetables there in my free time in the afternoon. But no matter what happens, I will never leave my morning round, because that is why I get so many friends."  I was very happy to hear Sadananda's thoughts. "