D M GHORPADE ACADEMY
इयत्ता : दहावी
विषय : मराठी कुमारभारती
नमुना कृतिपत्रिका क्रमांक : ०१
वेळ : ३ तास एकूण गुण : १००
सूचना :
१) आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या सूचनेप्रमाणे काढा.
२) आकृत्या काढण्यासाठी पेनाचाच उपयोग करा.
३) उपयोजित लेखनातील कृतींसाठी ( सूचना, निवेदन ) आकृतीची किंवा कृती लिहून घेण्याची आवश्यकता नाही.
४) लेखन नियमांनुसार लिहावे तसेच नीटनेटके लिहावे.
विभाग एक : गद्य विभाग
कृ. १ (अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ( गुण - २ )
१. खालील आकृती पूर्ण करा.
लेखकाच्या आजीचा पेहराव : १) ..................
२) ..................
३) ..................
४) ..................
उतारा - माझी आजी. जवळपास साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची. नवर्या मागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणार्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरुकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण. ताठ कणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वहणा. अंगात चोळी आणि हिरव व लाल अशी दोन रंगांची नऊवारी इरकल लुगडी. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते.
आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिला म्हणायचो. एकाआड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीची बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाली, की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईने पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न् चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली, की पुन्हा वासरू सोडायचं न् ग्लास घेऊन लायनीत उभे राहायचं. तिथंच मंग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पित राहायचं. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढळजंतनं सोप्यात अवतरायची. तिथं बसून राहायचं. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राह्यची, कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलती ने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. चार घरच्या चार सुना नांदायला आल्या. त्यांच्या कुणाचा भरोसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही. म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली होती. आपण बसून जावा ना काम लावायची.
२) कोण ते लिहा . (गुण - २ )
१) कपाळावर गोंदण दिसू नये म्हणून त्यावर बुक्का लावणारी
२) वर्षा- दीड वर्षाला दोन वेत देणारी
३) स्वतः बसून आपल्या जावांना कामाला लावू पाहणारी
४) गाईची धार काढणारे
३) व्याकरण. ( गुण - १ )
१) खालील कोष्टक पूर्ण करा.
शब्द : रंगाने
विभक्ती प्रत्यय : ने
विभक्ती : .................
शब्द : त्वचेची
विभक्ती प्रत्यय : .................
विभक्ती : षष्ठी
२) सूचनेनुसार कृती करा. ( गुण - १ )
अ) खालील वाक्यातील अव्यये ओळखून त्यांचा प्रकार लिहा.
दावणीला कायम कपिलीची बैलं असायची.
ब) खालील वाक्याचा काळ ओळखा.
आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते.
४) स्वमत. ( गुण - २ )
एकत्र कुटुंबपद्धतीचे कोणते फायदे आहेत असे तुम्हांला वाटते?
कृ. १ (आ) १) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. ( गुण -१ )
आपल्या काळ्या केसांची तारीफ ऐकल्यानंतर लेखकाची दरवेळची प्रतिक्रिया : १).............. २) .......
२) असत्य विधान ओळखा. ( गुण - १ )
अ) तुमचे केस अजून काळे कसे राहिले? हा प्रश्न ऐकून लेखकाला आश्चर्य वाटत नाही.
ब) सुती, निंदेची पर्वा न करणाऱ्या लेखकाला केसांची केलेली तारीफ आवडत नाही.
क) सुख - दुःखांच्या माणिक मोत्यांकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो.
ड) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तराची अपेक्षा असतेच असे नाही.
उतारा - "तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत?"
मला भेटावयास आलेल्या त्या गुस्तान चा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. या प्रश्नांची मला आता सवय झालेली आहे. कुठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो, की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्या बरोबर असलेली व आता त्या गावी रहात असलेली जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात. जुन्या आठवणी निघतात. आता आपला तो हा कुठे असतो, अमका तो हा काय करतो, असल्या प्रश्नांची व उत्तरांची देवघेव होते. घड्याळाचे काटे मागे फिरूवून कित्येक वर्षापूर्वीचे दिवस उकरले जातात. मातीच्या ढिगात सुख दुखांचे माणिक मोती आढळतात. त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. अशा गप्पा रंगात आल्या, की परस्परांच्या वयाचे ही अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो, " तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहे?"
त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. सुती - निंदे ची परवा न करणारा मी, पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटते. मी हसतो व गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवं असतं असंही नाही. तुमचे केस अजून काळे आहे ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे, एवढंच त्याला म्हणायचं असतं. तुमचं हे बोलणे ऐकून मला आनंद झाला एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो. त्याचा हेतू साधलेला असतो. माझं कर्तव्य मी केलेलं असतं. मी विषय बदलला तरी त्याची हरकत नसते.
२) कारण शोधून लिहा. ( गुण - २ )
' तुमचे केस अजुन काळे कसे आहेत?' या भेटीला आलेल्या गृहस्थांच्या प्रश्नाचे लेखकाला आश्चर्य वाटले नाही.
३) व्याकरण. ( गुण - २ )
१) खालील शब्दांतील भाववाचक नामे शोधून लिहा.
आनंद, शाळा, दुःख, गृहस्थ, केस, माती, मोती
२) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्याचा प्रकार लिहा.
मला भेटावयास आलेल्या गृहस्थांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही.
कृ. १) - (इ) - खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृती पूर्ण करा. ( गुण - २ )
१) .............. (वाळक्या पानांनी भरून जाणारे ) २) .............
२) वसंताचा नव्या पालवीनं झगमगून उठणारी झाडे
१)........... २) वरूण ३).............
उतारा - हवामानातला बदल जाणवायला लागला आहे. थंडी निरोप घेता घेता उत्तर रात्रीपूरती सोबत करते आहे आणि दिवसा उन्हाळ्याची ललकारी देणारी उन्हाची तीव्रता चटके देऊ लागली आहे. एकीकडे पतझड सुरू आहे. अंगण, रस्ते पिवळ्याधम्मक, पण वाळक्या पानांनी जाताहेत. दुसरीकडे अशोकाची, वरुणाची, शिरीषाची अशी किती झाझं तेजस्वी पालवीनं झगमगून उठताहेत. आंब्याचा मोहोर, कोकिळाचा लकेरी, ऊसाची गुऱ्हाळ, कलिंगडाचे ढीग, द्राक्षांचे घोस - ही सगळीच वसंत ऋतूच्या स्वागताची चाहूल, खरोखरच मला मोहरून टाकते आहे. वारासुद्धा बदलल्या सारखा वाटतो आहे. निसर्गानं घेतलेलं हे वळण आहे. या ऋतु बदलाला साजेसे काही सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम याच दिवसांत साजरे होतात. माझं मन या ऋतु मधल्या नव्या वाळणाबरोबर धुमारल्यासारखं चैतन्यमय झालं आहे, पण या चैतन्याला नकोसे धार्मिक, सांस्कृतिक रंग चढवले जात आहेत या जाणिवेने मी अस्वस्थ होत आहे.
२) आकृती पूर्ण करा. ( गुण - २ )
वसंत ऋतूच्या स्वागताची चाहूल देणारे बदल
१)..... २)..... ३) उसाची गुऱ्हाळ दिसू लागली ४)..... ५) .....
३) व्याकरण. ( गुण - २ )
१) खालील नामासाठी परिच्छेदात आलेले प्रत्येकी एक विशेषण लिहा.
अ) पाने ब) पालवी
२) खालील शब्दांची विभक्ती ओळखा.
अ) स्वागताची ब) दिवसांत
४) स्वमत. (गुण - २ )
निसर्गातील वेगवेगळ्या चमत्कारांनी तुम्ही कधी मोहीत झाला आहात का?
विभाग : २ - पद्य विभाग
कृ. २ (अ) - खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
१) i) - रिकामी जागा पूर्ण करा. ( गुण - १ )
अ) मनाला सदा घडावी अशी गोष्ट : ..........
ब) सतत कानावर पडावी अशी गोष्ट :........
ii) खालील गोष्टींच्या संदर्भात कवीने परमेश्वरकडे मागितलेली मागणे ( गुण - १ )
गोष्टी विनंती
अ) विषय : ......................................
ब) मती : ......................................
कविता : सुसंगती सदा घडो . सुजन वाक्य कानी पडो,
कलंक मतिचा झडो, विषय सर्वांचा नावडो,
सदंघ्रीकमळी दडो, मुरडितां हटाणे अडो,
वियोग घडतां रडो, मन भवच्चरित्री जडो ॥
न निश्चय कधीं ढळो, कुजनविघ्नबाधा टळो,
न चित्त भजनीं चळो, मति सदुक्तमार्गी वळो।
स्वतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो,
पुन्हां न मन हें मळो, दुरित आत्मबोधें जळो॥
मुखीं हरी! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली I
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रीतजनां सदा सांवरी ॥
२) i) असत्य विधान ओळखा. ( गुण - २ )
१) मनाने या गोष्टी कराव्या.
अ) विषयांचा सर्वस्वी स्वीकार करावा.
ब) संत संगाचा वियोग घडता रडावे.
क) भगवंताच्या स्मरणात रमावे.
ड) आत्मज्ञान करून घ्यावे.
ii) 'दुरित' हे उत्तर येईल तयार करा.
३) काव्यसौंदर्य ( गुण - २ )
'स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो' या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा.
४) काव्यसौंदर्य ( गुण - २ )
' कृपा करिशी तू जगत्रयनिवास दासावरी, तशी प्रगट हे नीजाश्रीतजनां सदा सांवरी' या काव्यपंक्तीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा.
कृ. २ (आ) - खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतीबंध पूर्ण करा. ( गुण - २ )
i) मुलगा हळूहळू हे शिकेल : १) ..............
२) ...............
ii) मुलगा मुलगी भातुकलीतून
वास्तवात प्रवेशताना त्यांच्या
हातावर जोडीने हे विसावेल
१)....................... २).....................
तापलेल्या उन्हाचा आडोशाला बसून
खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
मी पहात राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.
ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधान भाताचं
भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर.
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
मुलगी पहात राहते कौतुकानं त्याच्याकडे
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
' तु भाजी बनव छान पैकी पाल्याची.' ती म्हणते
'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?'
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.
उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
मुलगा पहात राहतो आश्चर्यचकित.
तशी हसून म्हणते ती, ' आत्ता तू.'
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर.
दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम,
मग शोधतो पातेल भाजीसाठी...
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांच्याही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.
२) i) चौकट पूर्ण करा. ( गुण - १ )
कवयित्रीला झरोक्यातून दिसणारे आश्वासक चित्र : ............
ii) कवितेतील खालील घटनेतून व्यक्त होणारी मानसिकता. ( गुण - १ )
मांडी घालून गाव बसतो गॅस वर
३) ' ती म्हणते, ' मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?' या ओळीतील विचार स्पष्ट करा. (गुण - २)
४) ' स्त्री पुरुष समानता' या विषयावरील तुमचे विचार मांडा. ( गुण - २ )
कृ. २ (इ) - खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. ( गुण - ४ )
' खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी'
विभाग ३ : स्थूलवाचन
कृ. ३ - खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. ( गुण - ६)
१) 'मधु' या मुलाची संवेदनशीलता दर्शवणाऱ्या प्रसंगाविषयी लिहा.
२) माणुसकीचे बीज पेरणी याची गरज निर्माण झाली आहे तुम्हाला वाटते का? सकारण लिहा.
३) 'विरांगणा स्वाती महाडिक' यांच्यावर टीप लिहा.
विभाग ४ : भाषाभ्यास
कृ. ४ (अ) - व्याकरण घटकावर आधारित कृती (गुण -२ )
१) समास
खालील तक्ता पूर्ण करा.
सामासिक शब्द : यथाविधी
विग्रह : ........................
समास :........................
सामासिक शब्द : नवरत्न
विग्रह : ........................
समास :........................
२) अलंकार. ( गुण - २ )
खालील उदाहरण वाचून तक्ता पूर्ण करा.
उपमेय उपमान अलंकाराचे नाव अलंकाराची वैशिष्टये
३) वृत्त ( गुण - १ )
खालील काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा.
मना सज्जना भक्ती पंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
४) शब्दसिद्धी ( गुण - २ )
१) 'भर' उपसर्ग लावून तयार होणारे दोन शब्द लिहा.
अ) ............... ब) ...............
२) खालील शब्दांना आई प्रत्यय लावून शब्द तयार करा.
अ) खोद ब ) लढ
५) सामान्यरूप ( गुण - १ )
खालील तक्ता पूर्ण करा.
शब्द सामान्य रूप
१) बंगल्याचे .............................
२) आजोबांना .............................
६) वाक्प्रचार ( गुण - २ )
खालील वाक्प्रचार त्यांच्या अर्थांच्या योग्य जोड्या लावा. ( गुण - २ )
वाक्प्रचार अर्थ
१) डोळ्यात भरणे अ) भराभर उगवणे
२) पेव फुटणे. ब) आश्चर्याने डोळे मोठे करून बघणे.
३) डोळे विस्फारून बघणे. क) खूप आवडणे.
४) आनंद गगनात न मावणे. ड) खूप आनंद होणे.
कृ. ४ (आ) - भाषासौदर्य.
१) शब्दसंपत्ती
i) खालील विरूदधार्था शब्दांच्या जोडया जुळवा. ( गुण - १ )
'अ' 'ब'
i) कुजन अ) अवकृपा
ii) दास. ब) सुजन
क) स्वामी
ii) गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा. ( गुण -१ )
अ) मन, कर्ण, मानस, चित्त
ब) गगन, नभ, भुवन, आकाश
iii) खालील शब्द समुहाबद्दल एक शब्द लिहा. ( गुण - १ )
अ) पांढरे केस काळे करण्यासाठी लावण्यात येणारा
ब) ज्याचे आकलन होत नाही असे.
iv) खालील शब्दांचे दोन अर्थ लिहा. ( गुण - १ )
चित्र : १) .............. २) ...............
२) लेखन नियमानुसार लेखन.
i) अचूक शब्द ओळखा. ( गुण - १ )
अ) चिरंजिव / चीरंजिव / चिरंजीव / चीरंजीव
ब) आरजव / आर्जव / आजर्व / आज्रव
ii) खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. ( गुण - १ )
स्वता चांगले जगावे व इतरांना सुखी ठेवावे.
३) विरामचिन्हे.
i) खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे ओळखून वाक्य पुन्हा लिहा. ( गुण - १ )
वा वा? मला हे चित्र आवडले,
ii) पुढील विराम चिन्हांपैकी कोणतीही दोन चिन्हे वापरून एक वाक्य तयार करा. , / ? / ; / . ( गुण - १)
४) पारिभाषिक शब्द
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. (गुण - १)
i) Verbal. i) Translator
५) आकारविल्हे.
खालील शब्द अकारविल्हयांनुसार लिहा. (गुण -१)
शेवट, शेरा, शांत, शतदा
विभाग : ५ - उपयोजित लेखन
कृ. ५ (अ) - खालील कृती सोडवा. ( गुण - ५ )
१) पत्रलेखन
खालील निवेदन वाचा व त्या खालील कृती सोडवा.
विहंगदर्शन
पक्षीप्रेमींचा हक्काचा सोबती
पक्षी निरीक्षण सहलीसाठीची खास बॅगपॅक आकर्षण दरात उपलब्ध
वैशिष्ट्ये :
पक्षी निरीक्षण सहलीचे उत्तम नियोजन.
सहली पूर्वी दृकश्राव्य माध्यमातून माहितीपट.
प्रत्येक सहलीला किमान पंचवीस पक्ष्यांचे दर्शन. पूर्णवेळ संस्थेचा मार्गदर्शक सोबती उपलब्ध.
छायाचित्रणासाठी विशेष मार्गदर्शन.
देश-विदेशांतील पक्षांशी संबंधित मनोरंजक माहितीपर पुस्तकांचा खजिना सवलतीत उपलब्ध.
आगामी तीस पक्षी निरीक्षण सहलींची नोंदणी सुरू. त्वरा करा!
अधिक माहितीसाठी संपर्क : ३३५१३१७२
कृती १ - तुमच्या निवासी सदनातील पक्षीप्रेमी मित्र मैत्रिणींसाठी पक्षीनिरीक्षण सहलीच्या नोंदणीची विनंती करणारे पत्र लिहा.
किंवा
कृती २ - पक्षीनिरीक्षण सहलीमध्ये तुमच्या दादाच्या माहितीपर पुस्तकाचे खूप कौतुक झाले. याबद्दल दादा चे कौतुक करणारे पत्र लिहा.
२) सारांश लेखन (गुण - ५ )
दुर्बळाला काही करता येत नाही. एक बलवान येतो व शेकडो लोकांना नमवितो. बळ नसेल, तर शारीरिक हालचाली नाहीत. ज्ञानानुभव मिळणार नाही व गुरु सेवाही होणार नाही. दूर्बळाला हास्य आणि दुःख सदैव ठरलेले. शरीर सर्व गोष्टींचा पाया आहे. या शरीराकडे दुर्लक्ष करणे पाप आहे. तू देशाचा व समाजाचा घोर अपराध आहे.
बळ मिळवण्यासाठी शरीराला व्यायाम हवा. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. लाठी, दांडपट्टा यांसारखे नाना प्रकारचे सुट्टीत सांघिक खेळ भारतात आहेत. खेळासारखी पवित्र वस्तू नाही. खेळात आपण अनेक गोष्टी शिकतो. खेळ म्हणजे निष्ठा, खेळ म्हणजे सत्यता, खेळ म्हणजे स्वतःचा विसर. आसनांनीही शरीराचे आरोग्य सुधारते. काम करताना मिळणारा व्यायाम हा सर्वोत्कृष्ट व्यायाम होय. व्यायाम हा सुद्धा काहीतरी निर्माण करणारा हवा.
जुने लोक पाहिले, तर त्यांची शरीर निरोगी दिसतात, परंतु हल्ली शरीरे तक्लुबी झाली आहेत. पांढरपेशींची अशी दैना आहे. तर श्रमजीवी लोकांचीही शरीरे विसावा व अन्ना यांच्या अभावी कृश आहे. श्रमहीनांस श्रम करावयास लावल्याशिवाय व श्रमिकांस भरपूर अन्न व विश्रांती दिल्याशिवाय दृढ होणार नाहीत. ( साने गुरुजी )
कृ. ५. (आ) - खालील कृती सोडवा.
१) जाहिरात लेखन ( गुण - ६ )
खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. ( शब्दमर्यादा ५० ते ६० शब्द )
कोल्हापुरी वहाणा, चरणस्पर्श स्टोअर्स.
चपलांचे व्यापारी, ब्रँडेड चपला, फॅन्सी शूज,
ग्राहकांचे हित, ऑनलाईन सेवा.
२) कथालेखन ( गुण - ६ )
खालील शब्दांच्या आधारे कथा तयार करा.
मुलगा - काजू - अधाशीपणा - पोटदुखी
कृ. ५ (इ) - लेखनकौशल्य.
खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. ( शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द)
१) प्रसंग लेखन ( गुण - ८ )
नववीच्या विद्यार्थ्यांकडून तुमच्या निरोप
शाळेचा निरोप समारंभ-
सर्व विद्यार्थी सजून-धजून उपस्थित -
समारंभाचे - विद्यार्थी भाऊक -
शिक्षक - विद्यार्थी स्नेहमेळावा -
शिक्षक शाळेविषयी कृतज्ञता -
शिक्षकांकडून सदिच्छा.
२) आत्मकथन
पृथ्वीचे चित्र पहा. त्यातील घटक तुमच्याशी बोलत आहेत अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहा. - मी पृथ्वी बोलते आहे.