समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार (चिंतनात्मक निबंध) The responsibility of the youth in shaping the society or the able youth - Samarth Bharat or we are the sculptors of Navbharata

 समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी किंवा समर्थ तरूण - समर्थ भारत किंवा आम्ही नवभारताचे शिल्पकार 

The responsibility of the youth in shaping the society or the able youth - Samarth Bharat or we are the sculptors of Navbharata


          भारत देशाच्या स्वातंत्र्याला सत्तरहून अधिक वर्षे होऊन गेली, असे असूनही भारताच्या समस्या संपल्या नाहीत. भारताच्या कंठाशी निरक्षरता, भ्रष्टाचार, बेकारी, भरमसाट लोकसंख्या, गोरगरिबी आणि दारिद्रय या गोष्टींचा घट्ट विळखा बसला आहे. या सर्व कारणामुळे आजसुध्दा भारत देश जगाच्या नकाशावर एक 'समर्थ राष्ट्र' म्हणून स्थान मिळवू शकला नाही. हे उच्च स्थान कसे प्राप्त करता येईल? समर्थ भारत घडवण्यासाठी समर्थ समाज घडवणे सुध्दा अनिवार्य आहे. समर्थ समाज घडवण्यासाठी त्या समाजतील तरुण वर्ग, युवापिढी सक्षम, साक्षर आणि निरोगी असणे महत्त्वाचे आहे. कारण आजचा युवक, तरूण पिढी हिच उद्याचा भावी, सुजाण नागरिक आहे. युवाअवस्थेमध्ये प्रत्येक तरूणाने स्वतःच्या अवतीभोवती असलेल्या  समाज जीवनातील वास्तवास समजून घेण्याची आवश्यकता आहे. समाज घडवताना नानाविध प्रश्न उभे राहणार आहेत. ते प्रत्येक युवकाने, तरुणाने समजून घेतले पाहिजे. त्या प्रश्नांची अचूक उत्तरे शोधली पाहिजेत. ते प्रश्न प्रत्येक युवकाने सोडवावे लागतील. त्यासाठी अनेक गोष्टींचा पाठपुरवठा त्यांना करावा लागणार आहे.


          गेल्या सत्तर वर्षामध्ये भारत देशाने खरतर औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. आपला भारत देश स्वातंत्र्योत्तर काळात पहिली काही वर्षे यंत्र आणि तंत्र याबाबत संपूर्णपणे परावलंबी होता. परंतु आजच्या वर्तमान संगणक युगातील 'सॉफ्टवेअर' क्षेत्रात भारताने संपूर्ण जगाला आश्चर्यकारक प्रगती करून दाखवली आहे. परंतु याच वेळी समाज सुधारण्यासाठी अनेक आव्हांनांवर मात करण्याची वृत्ती, कष्ट सोसणे, सायास आणि संकल्प ही महत्त्वाची त्रिसूत्री प्रत्येक तरूणाची जबाबदारी आहे. सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी प्रत्येक तरूणाने आत्मकेंदिपणा म्हणजेच 'मला काय त्याचे?' ही वृत्ती सोडून देणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक युवक वर्गाने समाजाच्या हिताचा सतत विचार केला पाहिजे. या समाजाप्रती, माझ्या देशाप्रती माझी काही तरी बांधिलकी आहे. याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे.


          स्वातंत्र्य मिळूनही अनेक वर्षे विभाजनाच्या गोंधळातच गेली. त्या काळात भारतामध्ये खुप मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा आदळला होता. त्यानंतर वादळ, दुष्काळ आणि भूकंप अशा नानाविध नैसर्गिक आपत्ती, कोळश्याच्या खाणीतील अपघात, भोपाळमधील दुर्घटना अशी मानवनिर्मित संकटे आणि शेजारील राष्ट्रांची आक्रमणे या सर्वामध्ये भारताच्या खूप मोठ्या शक्तीचा व्यय झाला. या सर्व संकटांवर समर्थपणे मात करून भारत देश प्रगतीपथावर जात आहे. सामर्थ्यवान होत आहे. असे असताना प्रत्येक तरूणाने समाज घडविण्यासाठी विविध उपक्रमात उत्साहाने सहभागी होणे गरजेचे आहे. प्रत्येकामध्ये एकमेकांविषयी सदाचाराचा संस्कार निर्माण होणे गरजेचा आहे. स्वतःच्या समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती, उत्साह, चैतन्य, परिश्रम, आशावाद आणि जग बदलून टाकण्याची इच्छा प्रत्येक तरूणाची असायला हवी.


          देशातील तरूण पिढीने जाणले आहे. 'बलोपासना करणे' हा आपला पूर्वीपार चालत आलेला आदर्श आहे. त्यामुळे प्रत्येक तरूणाने स्वतःच्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. देशाविषयी निस्सीम देशनिष्ठा, तत्पर कार्यनिष्ठा आज या युवकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. या सर्वकारणामुळे आपल्या देशावरील परकीयांची आक्रमणे परतवून लावण्यासाठी देशात शूर सैनिकांची, सेनाधिकाऱ्यांची वाण नाही. या सर्व तरूणांसमोर शिवरायांच्या मावळ्यांचा प्रेरणादायी आदर्श आहे. देशातील लोकसंख्येचा विस्फोट, भस्मासूर देशातील तरूणांनी ओळखला आहे म्हणून मर्यादित कुटुंब हा त्यांचा आदर्श आहे.


          निरक्षरतेच्या राक्षसाला खोलवर गाडून साक्षर, समर्थ आणि जबाबदार आदर्श नागरिक निर्माण करण्याचे प्रयत्न आम्ही तरूणवर्ग करत आहे. त्यामुळे प्रत्येक तरूणामध्ये स्वावलंबन हा मंत्र रूजू लागला आहे. त्याचे कारण म्हणजे जितके आपण तरूण स्वावलंबी होऊ तितकाच आपला देश अधिक बलवान होणार आहे. आज जगातील अनेक क्षेत्रे तरूण वर्गाने पादाक्रांत केला आहे. वर्तमान स्थितीमध्ये भारतामधील लाखो भारतीय युवक परदेशात शिक्षण, नोकरी वा अन्य व्यवसायांत गुंतलेली आहेत. असे असून सुद्धा या सर्वांचे चित्त स्वदेशाकडेच आहे. कारण या सर्वांना समर्थ समाजाबरोबरच समर्थ भारत घडवायचा आहे. आपल्या भारत देशातील लाखो - करोडो तरूण नव भारताचे शिल्पकार ठरणार आहेत!

English translation

The responsibility of the youth in shaping the society or the able youth - Samarth Bharat or we are the sculptors of Navbharata


 More than seventy years have passed since India's independence, but India's problems are not over.  India is plagued by illiteracy, corruption, unemployment, overpopulation, poverty and destitution.  For all these reasons, even today, India has not been able to find a place on the world map as a 'strong nation'.  How can this high position be achieved?  Creating a strong society is also essential for building a strong India.  In order to build a strong society, it is important for the youth, the youth to be capable, literate and healthy.  Because today's youth, the younger generation is tomorrow's future, intelligent citizens.  In adolescence, every young person needs to understand the realities of the social life around him.  Various questions will arise while shaping the society.  It should be understood by every youth.  The exact answers to those questions must be found.  Those questions have to be solved by every youth.  For that, they will have to pursue many things.



 In the last seventy years, India has made remarkable progress in the field of industry and agriculture.  In the first few years of our post-independence India, our country was completely dependent on machinery and technology.  But in today's computer age, India has made amazing progress in the field of software.  But at the same time, it is the responsibility of every youth to overcome many challenges, to endure hardships, perseverance and determination.  To build a civilized society, every young person has to be self-centered.  It is important to give up this attitude.  Every youth should constantly consider the interest of the society.  I have some commitment to this society, to my country.  Everyone needs to think about this.



 Even after independence, many years went by in the midst of division.  At that time, there was a huge influx of refugees in India.  This was followed by various natural calamities such as storms, droughts and earthquakes, coal mine accidents, man-made disasters in Bhopal and invasions by neighboring nations.  Overcoming all these crises, India is moving forward.  Is becoming powerful.  At the same time, every youth needs to enthusiastically participate in various activities to build a society.  Everyone needs to develop a culture of morality towards each other.  Every young person should have the attitude, enthusiasm, consciousness, hard work, optimism and desire to change the world to do something for their own society.



 The younger generation in the country knows.  'Worshiping the force' is our past ideal.  Therefore, every young person should pay attention to his own body, health.  Today, unwavering patriotism and zeal for the country is beginning to take root in these youth.  For all these reasons, there is no shortage of brave soldiers and army officers in the country to repel the attacks of foreigners on our country.  In front of all these youngsters, there is an inspiring role model of Shivaraya.  The explosion of the country's population, Bhasmasur has been recognized by the youth of the country so the limited family is their ideal.



 We are trying to create a literate, capable and responsible ideal citizen by burying the monster of illiteracy deep.  Therefore, the mantra of self-reliance has started in every youth.  This is because the younger we become, the stronger our country will become.  Today, many areas of the world have been overrun by young people.  At present, millions of Indian youth in India are engaged in education, employment or other occupations abroad.  Despite this, all of them are focused on their homeland.  Because all of them want to build a strong India with a strong society.  Millions of young people in our country India are going to be the architects of New India!