ऋतुराज वसंत ( वर्णनात्मक निबंध ) Rituraj Vasant

 ऋतुराज वसंत 

Rituraj Vasant

          थंडीचे दिवस संपले की, ऋतुराज वसंताचे आगमन होते. फाल्गुनातील होळी रंगांची उधळण करून जाते न जाते, तोच वसंत ऋतूची चाहूल लागते. शिशिराच्या थंडीने गारठून गेलेली सृष्टी नव्या उमेदीने पुन्हा एकदा जादूगार वसंताचा रंगबहार शेला अंगावर पांघरायला तयार होते. फेबुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्ये वसंत ऋतूचे मनमोहक सौंदर्य सर्वत्र पसरते. आपल्या भारतीय वर्षाची सुरूवात आणि शेवट म्हणजे हा वसंत ऋतू होय. वसंत ऋतूच्या चाऊलीनंतर हळूहळू हिवाळा कमी होतो. सर्वत्र हवामान अल्हाददायक बनत जाते.  या ऋतूमध्ये सृष्टी हिरवेगार पांघरूण पांघरायला सुरुवात करते. आंब्यांना मोहर फुटतो, सर्वत्र मोहरीच्या फुलांच्या पिवळ्या रंगांची उधळण होते. हाच एक असा ऋतू आहे ज्यामध्ये तापमान अल्हाददायक, आनंददायक असते.

          ऋतुराजाच्या आगमनाने अवघ्या सृष्टीचा कायापालट होतो. धरती आणि आकाशही नवनव्या रंगांची उधळण करतात. आंब्यांच्या झाडांवर फुललेल्या मोहराचा सुगंध हळूच कुजबुजतो. 'शिशिर संपला, उठा आणि वसंताचे स्वागत करा.' काजू, शेवगा यांवर फुललेली नाजूक फुले फळांच्या आगमनाची सुवार्ता देतात. शिरिषाची झाडे जांभळट गुलाबी व नाजूक फुलांनी नटतात. जाई, जुई, सायली, मोगरा, चाफा ही सारी सुगंधी मंडळी ऋतुराज वसंताला सोनेरी सायंकाळी सुगंधाची उटी लावतात.

          पाहता पाहता सारा परिसर बदलतो. कुणा जादूगाराने जादूची कांडी फिरवली की काय, असे भासते. या किमयेने कविमनाला देखील भुरळ घातलेली असते. 'आला हा वसंत फेरीवाला' म्हणून कुणी कवी ऋतुराजाचे गुणगान करतो, तर कुणाला हा पाहुणा प्रत्यक्ष 'अनंगदेवाचा प्रेषित'च भासतो. वसंताच्या आगमनाने हर्षित झालेला निसर्ग जणू रंग, रूप, गंध यांची आरास मांडतो. निसर्गाच्या अंगप्रत्यंगांतून, वृक्षलतांच्या पानाफुलांतून, नदयानाल्यांच्या संथ नादमय पदन्यासातून, पाखरांच्या मधुर कूजनातून हे चैतन्य दिसायला लागते. आनंद, उत्कटता, काव्य, संगीत आणि सौंदर्य यांचा एक अभूतपूर्व संगम वसंत ऋतूत पाहायला मिळतो.

          वसंत ऋतूमध्येच आपल्या देशामध्ये शिवरात्री, वसंत पंचमी आणि होळी हे सण मोठया उत्साहाने साजरे केले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संगीत साहित्य आणि विविध कलांमध्ये वसंताला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे. संगीताच्या दुनियेतील अनेक रागांपैकी एका रागाचे नावे वसंत असे ठेवण्यात आलेले आहे. या रागावर अनेक चित्रकरांनी विविध रंगीबेरंगी चित्रे सुध्दा रेखाटलेली आहेत. पुरातन काळातील विविध पौराणिक कथांनुसार कामेदवाचा सुपूत्र म्हणजे वसंत असे संबोधले जाते. अनेक कवींनी रूप आणि सौंदर्याची देवता कामदेव याच्या मुलाची आणि मुलीची आनंदवार्ता ऐकून निसर्गदेवता जागृत झाली. सर्व सजीवसृष्टीमधील झाडे त्यासाठी नवीन पल्लवाचे पाळण लावतात. त्यांना रंगीबेरंगी वारा घालतात आणि कोकीळ गोड गाणे गाते. असे वर्णन केले आहे.

          वसंत हा ऋतूंचा राजा खरा, पण काही काळ तो आपला 'राजेपणा' विसरून जातो आणि आपल्या चैतन्यमय खेळात निसर्गदेवतेला सामील करून घेतो. या ऋतूचे वैभव हे अनन्यसाधारण आहे. सर्व ऋतूमध्ये वसंत ऋतूला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या देशाला लाभलेली देणगी म्हणजेच नैसर्गिक सौंदर्य आहे. या ऋतूमध्ये सुरूवातीस तापमान सामान्य असल्याने धरतीवर वास्तव्य करणारी माणसे स्वतःला खूप धन्य समजतात. कारण या सर्व गोष्टीमुळे जीवनामध्ये थोडा का होईना आराम मिळतो. याच काळात फुलांच्या कळ्या अतिशय जोमाने फुलतात आणि तितक्याच उत्साहाने निसर्गाचे स्वागत करतात.  याच हंगामामध्ये सर्व शेते पिकांनी बहरून जातात. सर्व तलावांमधून वेगवेगळी कमळाची फुले उमलतात आणि आपल्या मनातील भाव भावना व्यक्त करतात. त्याच वेळी स्वतःच्या मनातील वेदना, दुःख झाकून ठेवतात.  हा लोभसवाणा सोहळा पाहायला सूर्य आकाशात संध्याकाळी उशिरापर्यंत रेंगाळू लागतो. कोकिळेच्या सुरात सूर मिसळून बुलबुलसारखे इतर पक्षिगण या आनंदसोहळ्यात सामील होतात.

          सरस्वती देवी हि विद्येची देवी मानली जाते. तिचा जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला अशी अख्यायिका आहे. त्यामुळे याच दिवशी सर्वजण मनोभावे सरस्वती देवीचे पुजन करतात. 
          साऱ्या सृष्टीला वैभवाचे अपूर्व लेणे बहाल करणाऱ्या, चराचरातून चैतन्य फुलवणाऱ्या, रस, रूप, रंग, गंध, स्पर्श यांद्वारा धरेवर स्वर्ग निर्माण करणाऱ्या या ऋतुश्रेष्ठाला 'ऋतुराज' हे नामाभिधान किती सार्थ आहे! निसर्ग त्याच्या भावना व्यक्त करत नसला तरी आपले अनेक भाव तो प्रकट करून दाखवत असतो. म्हणूनच निसर्गाच्या प्रत्येक सौंदर्याचा मनमुराद आनंद आपण घेतला पाहिजे. 


English translation :

Rituraj Vasant

When the cold days are over, Rituraj Vasanta arrives.  Whether the Holi in Falguna goes by a splash of colors or not, it is the beginning of spring.  Once again, with the new hope, the magician was ready to cover the colorful shell of spring with a new hope.  In the months of February, March and April, the enchanting beauty of spring spreads everywhere.  The beginning and the end of our Indian year is this spring.  After the spring rice, the winter gradually subsides.  Everywhere the weather is becoming pleasant.  In this season the creation begins to cover the greenery.  The mango blossoms, the yellow color of the mustard flowers is scattered everywhere.  This is a season in which the temperature is pleasant, pleasant.


 With the arrival of Rituraja, only creation is transformed.  The earth and the sky also radiate new colors.  The scent of mohra on the mango trees whispers along  'Winter is over, get up and welcome spring.'  Delicate flowers on cashews and shevaga herald the arrival of fruit.  Shirisha trees bloom with purple, pink and delicate flowers.  Jai, Jui, Sayali, Mogra, Chafa are all fragrant congregations that give Rituraj Vasanta a golden evening fragrance.


 The whole area changes as we watch.  It looks like a sorcerer turned a magic wand.  The poet is also fascinated by this alchemy.  Some people praise the poet Rituraja as 'Aala Ha Vasant Feriwala', while others consider this guest as a real 'Messenger of Anangdev'  Rejoicing with the arrival of spring, nature is like a decoration of color, form, smell.  This consciousness can be seen in the limbs of nature, in the leaves of the trees, in the melodious melody of the rivers, in the sweet chirping of the birds.  An unprecedented confluence of joy, passion, poetry, music and beauty is seen in spring.


 The festivals of Shivratri, Vasant Panchami and Holi are celebrated with great enthusiasm in our country in the spring itself.  Spring has a very important place in our Indian culture in music literature and various arts.  Vasant is one of the many ragas in the world of music.  Many painters have also painted various colorful pictures on this raga.  According to various ancient myths, the son of Cupid is called Vasant.  Many poets awakened the god of nature by hearing the good news of the son and daughter of Cupid, the god of form and beauty.  Plants from all walks of life plant a new Pallava for it.  The colorful wind blows them and the cuckoo sings a sweet song.  It is described as


 Spring is the real king of seasons, but for a while he forgets his 'kingship' and joins the gods of nature in his conscious game.  The splendor of this season is unique.  Of all the seasons, spring has the most important place.  Natural beauty is a gift to our country.  Since the temperature is normal at the beginning of this season, the people living on earth consider themselves very blessed.  Because all of this brings some relief to life.  During this time the flower buds bloom very vigorously and welcome nature with equal enthusiasm.  In this season all the fields are covered with crops.  Different lotus flowers bloom from all the lakes and express our feelings.  At the same time, they cover their own pain and sorrow.  The sun lingers in the sky until late in the evening to watch this alluring ceremony.  Other birds, such as the nightingale, join in the festivities.


 Goddess Saraswati is considered to be the goddess of learning.  Legend has it that she was born on Vasant Panchami.  Therefore, on this day, everyone worships Goddess Saraswati.

 How meaningful is the nickname 'Rituraj' to this Ritushrestha who bestows unparalleled splendor of glory to the entire creation, who infuses consciousness through charachara, who creates heaven on earth through juice, form, color, smell and touch!  Although nature does not express its feelings, it does express many of our feelings.  That is why we should enjoy every beauty of nature.