माझी कारखान्याला भेट
Visit my factory
आमचे चालू शैक्षणिक वर्ष असल्यामुळे आमच्या सरांनी पुण्याच्या परिसरातच एक स्थानिक शैक्षणिक सहल आयोजित करण्याचे ठरवले त्यानुसार पुण्याजवळील आकुर्डी येथील एका स्कूटर्सच्या कारखान्याला भेट देण्याचे ठरले. स्कूटर्सच्या कारखान्याला भेट दयायची, ही स्कूटर कशी तयार होते ते हे पाहायचे, या विचाराने आम्ही सर्वजण अगदी रोमांचित झालो होतो.
कारखान्याला भेट दयायची म्हणून आमच्या सरांनी वरीष्ठांची पूर्व अनुमतीने कारखान्याच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. त्यांनी कारखान्याचे मालक आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी सरांशी भेट घालून दिली. शालेय विद्यार्थी कारखाना पाहू इच्छितात, या कल्पनेचे त्यांनी आनंदाने स्वागत केले आणि पुण्याहून आकुर्डीला आम्हांला येण्या-जाण्यासाठी कंपनीची बस देण्याचे कबूल केले. शिवाय ते आमच्या सरांना म्हणाले, "तुमचे विद्यार्थी त्या दिवशी आमचे पाहुणे आहेत, त्यांना आमच्या मेसमध्ये भोजन दिले जाईल." हे ऐकून आमचा आनंदा दुणावला.
सकाळी आठ वाजता आम्ही सर्वजण शाळेत जमलो. कारखान्यातील धोक्यांची कल्पना देऊन सरांनी आम्हांला शिस्तीने वागायला सांगितले. ठीक साडेआठ वाजता कंपनीची बस शाळेच्या दारासमोर उभी राहिली आणि काही वेळातच आम्ही कारखान्यापाशी पोचलो. कारखान्याच्या 'आस्थापनाप्रमुख' नी आमचे स्वागत केले आणि स्वागतकक्षात बसवून आम्हांला कारखान्याची थोडक्यात माहिती दिली.
कारखान्याभोवती भलेमोठे आवार होते. त्यात सुंदर बगीचा व हिरवळ होती. आम्ही कारखान्याचे वेगवेगळे विभाग पाहायला छोटे छोटे गट करून निघालो. उत्पादन विभाग, वितरण विभाग आणि पणन म्हणजेच मार्केटिंग विभाग असे तीन स्वतंत्र विभाग आम्ही पाहिले. सुरूवातीला एका छोट्याशा कचेरीत कामगारांच्या हजेरीची नोंद करणारे यंत्र होते. कारखान्यातील सर्व यंत्रसामुग्री अगदी अद्ययावत होती आणि उत्पादनाच्या सर्व आधुनिक सोयी तेथे उपलब्ध होत्या.
कारखान्यात सर्वत्र स्वच्छता आणि सफाई होती. वेगवेगळ्या विभागांत अगदी लहान लहान स्क्रूपासून मोठमोठ्या व अवजड गोष्टी तयार होत होत्या. स्कूटरचे इंजिन, मडगार्ड, पिस्टन, क्लच, हँडल, दिवे सर्व गोष्टी यंत्रांवर होत होत्या. साध्या कामगारापासून तज्ज्ञ इंजिनीअरपर्यंत सर्वजण गणवेशात होते. सर्वांच्या चेहऱ्यावर कर्तृत्वाचे समाधान झळकत होते. निर्मितीपूर्वी स्कूटर किती अवस्थांमधून जाते, हे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो.
कारखान्यामध्ये विविध वस्तूंचे उत्यादान कशाप्रकारे होते हे आज मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. कारखाना जरी बाहेरून लहान वाटत असला तरी त्यामध्ये अनेक इमारती असतात याची कल्पना आली. कारखान्यामध्ये फक्त वस्तूंचे उत्पादन होते असे नाही तर कच्च्या मालाचे विविध स्वरूपात रुपांतर होते हे पाहून ज्ञानामध्ये खूप महत्त्वाची भर पडली. तेथील व्यवस्थापकांनी कारखान्याची मालकी ही एका माणसाकडे, दोन किंवा अनेक व्यक्तींकडे भागिदारी मध्ये अथवा सरकाकडे असू शकते ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्याचबरोबर सर्वात महत्वाची माहिती म्हणजे कारखान्याची निर्मिती करताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी याविषयी दिली. कच्चा माल, विद्युत पुरवठा, वाहतुकीची व्यवस्था, पाण्याचा पुरवठा आणि कामगार यांचा विचार करूनच कारखान्याची निर्मिती करावी लागते. हि महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. याचबरोबर विविध बाजारपेठांचा सुध्दा विचार करावा लागतो याविषयी अवर्जून सांगितले.
या कारखान्याचे व्यवस्थापक खूपच चांगले होते. ते स्वतः पुढे होऊन कारखान्याच्या कानाकोपऱ्याची माहिती आम्हाला देत होते. त्यांनी कामगारांविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती दिली. कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगांचे तांत्रिक ज्ञान वाढवण्यासाठी व त्यांना वरचा वरचा दर्जा मिळत जावा यासाठी व्यवस्थापना मार्फत अनेक शिक्षणक्रम राबवून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर देशामध्ये विविध ठिकाणी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कारखान्यातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा या करिता विविध मोठ मोठ्या कारखान्यात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्याची सोय केली जाते. याविषयी माहिती त्यांनी आम्हाला स्कूटरचे विविध भाग दाखवत असताना दिली.
मित्रांनो. आज माझ्या ज्ञानात खूप भर पडली. कारखान्याची व्यवस्थापन पध्दती कशी असते. त्यामधील कार्यप्रणाली कशी सुरू असते याविषय प्रत्यक्ष माहिती मिळाली. पुढे जाऊन आपण सुध्दा खूप अभ्यास करून अभियांत्रिकी वर्गाकरिता तयारी करावी अशी मनोमन इच्छा निर्माण झाली.
कारखाना पाहून झाल्यावर आम्ही भोजनाचा आस्वाद घेतला. परतताना व्यवस्थापकीय संचालकांच्या खोलीत डोकावलो. आम्ही त्यांचे आभार मानले आणि निरोप घेतला.
English translation :
Visit my factory
Due to our current educational year, our plans were set to visit a scooters of Akurdi, Phase, according to the decision to organize a local academic trip to Pune area. We were all thrilled to see how the scooters was ready to see how to score the schemeter, how to see what scooters was ready.
Our advises met the managers of the constituency's pre-apprenticeships to the factories. He met the complaint of the factory and the main managerial director. School students want to see the factory, they welcomed the idea of this idea and confessed to the government to go to Aurcuardi to the armor. And they said to our men, "Your students are our guests on that day, they will be given food in our messenger." Our joy to hear this.
At 8 o'clock we were all together at school. Therapies asked us to be disciplined by the idea of the factory. At the same time, the bus at the same stood was set up at the school door and in some time we arrived at the factor. The factor of 'factorship' has been welcomed and we in the welcome seem by the information of the factory.
There was a Bhilidhwarwar around the factory. It had beautiful gardens and greens. We went to small groups of different factors of the factory. We saw the three separate divisions such as the Production Department, Delivery Department and Marketing. At the beginning, there is a small-related worker's historian. All the machines in the factory was updated and all the modern conveniences of the product were available there.
There was a cleaning and cleaning in the factory. Large and heavy things were created from the small small screw in different departments. Scooter's engine, Madgard, Piston, Clutch, handle, lights were happening on all the machines. Everyone was in uniform from the simple worker to the expert engineer. All the face of the scarest of the whole of the duty. We were surprised to see how many scoops went out of the formation. I saw the real eye today, how far the different things of the factory were in the factory. Although the factory is small, even though there was many buildings in that.
In the factory, only the material was not produced in the knowledge that was considered to be a variety of materials, but the vocal figures were very important. The managers of the manufacturers have given important information to the factory that one person can be done to two people, two or many individuals or in the field. In the same way, the most important information is to say what the factory production is to do with what to do. Considering the raw materials, electrical supply, transportation, water supply and workers, the factory has to be produced. This got the information about the important information. In addition, the various marketplacements have to think about it.
The manager of this factory was very good. They were going to be ahead of them and gave us information about the factory. He also gave important information about workers. They are trained by multiplied by many management through management, to increase the technical knowledge of working workers and to get top upper quality. In addition, students who have educating engineering in various places in the country are facing work as a learner candidate in various big factory experiences. Information about this, they gave us various parts of the scooter. Friends. Today I was very stressed in my knowledge. How does the factory management method practice? It has got real information about how the functionality is in. Going forward and the desire to make you prepare for a very engineer to study very much.
After seeing the factory, we took the meal. Return to the managerial directory of the movement. We thankhered and kissed them.