माझे आजोबा (व्यक्तिचित्रणात्मक निबंध / शब्दचित्रणात्मक निबंध ) My grandfather

 माझे आजोबा

My Grandfather

          आज आमच्याकडे एक छोटासा घरगुती समारंभ झाला. माझे सर्व काका-काकी, आत्या, मामा आणि मामी कुटुंबातील लहानथोर सर्व नातलग एकत्र जमली होती. आम्ही आमच्या आजोबांचा ऐंशीवा वाढदिवस साजरा केला. गेले सात-आठ दिवस आमची अगदी गुप्त खलबते चालली होती. आम्हांला आबांना - आजोबांना काही कळू दयायचे नव्हते, पण शेवटी आबांनीच आम्हांला धक्का दिला. जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांसाठी उत्कृष्ट आंबा आइस्क्रीम मागवले होते आणि समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांनी एकेक भेटवस्तू दिली आणि ती भेटवस्तू देताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिचे छंद, तिच्या आवडी लक्षात घेतल्या होत्या. त्यामुळे खूपच मजा आली.

          आपल्या वडीलांचे वडील म्हणजे आपले आजोबा असतात. तसेच आपल्या आईच वडील सुध्दा आपले आजोबाच असतात. नात, नातू यांचे मनोरंजनाचे साधन म्हणजेच त्यांचे आजोबा असतात. आपल्या लहानपणा पासून ते तरूणावस्थेपर्यंत संस्कारशील जडणघडणीमध्ये आई - वडीलांसोबत आजोबांची सुद्धा महत्त्वाची भूमिका असते. दोन हजार चार साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट श्वास आपण पाहिला तर हा संपूर्ण चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो याची जाणीव होते. हा चित्रपट पाहून आजोबांन प्रती मनामध्ये अधिकच आदर निर्माण झाला. या चित्रपटातील आजोबांमध्ये मला माझे आजोबा म्हणजे माझे आबा दिसतात.

          माझे आजोबा - आबा सदा प्रसन्न आणि तृप्त असतात. आबांच्या या आनंदी, आशावादी वृत्तीमागे आहे त्यांची तंदुरुस्ती! त्यांचे वागणे अतिशय नियमबद्ध आहे. काहीही होवो पण त्यांचे सूर्योदया अगोदर फिरायला जाणे कधी चुकत नाही. त्यांनी एक 'पेन्शनरांचा क्लब' स्थापन केला आहे. ही म्हातारी वयोवृद्ध माणस एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात, फिरायला जातात. अशा प्रसंगी आजोबा आपल्या मित्रांसाठी आजीला कुरकुरीत चकल्या, पापड आणि स्वादिष्ट पदार्थ करायला सांगतात.

          आबांना आमच्या मोठ्या आईविषयी, म्हणजेच स्वतःच्या पत्नीविषयी विशेष अभिमान आहे. आबा सरकारी कचेरीत मोठ्या हुद्दयावर होते आणि तेथे अगदी उच्च पदावरून ते सन्मानाने निवृत्त झाले. त्याचे श्रेयही ते आमच्या मोठ्या आईला देतात, कारण त्यांची मते, घराच्या आघाडीवर त्यांना कधीही लक्ष घालावे लागले नाही. आमच्या आजीमुळेच त्यांचे  घर 'खूप छान आणि आदर्श' राहिले, असे ते मानतात.

          आजही आबा घरात असूनही सर्वांपासून अलिप्त राहतात. कुणाच्याही कुठल्याही निर्णयात ते ढवळाढवळ करत नाहीत. पण आम्ही कोणी एखादी शंका किंवा कुशंका विचारली, तर ते त्याचे सविस्तर निरसन करतात.

          घरात आजी - आजोबा असणे आणि त्यांच्याकडून आपले विविध लाड पुरवून घ्यायला सुध्दा नशीबच असाव लागत. वर्तमान स्थितीमध्ये एकमेकातील जनरेशनचा फरका मुळे अनेकांना आजी -आजोबांचे निर्मळ, निस्वार्थी प्रेम मिळत नाही. परंतू या बाबतीत मी फार नशीबवान आहे. कारण मला माझ्या आबांची संगत आणि निर्मळ प्रेम अनुभवायला मिळाल. त्यांचे प्रेम मला जास्त मिळाले आणि अजून त्याचा वर्षाव होतच आहे. माझ्या जीवनात आर्जाचे प्रेम मला फार मिळाले नाही त्यांचे कारण म्हणजे मी लहान असतानाच ती आम्हा सर्वांना सोडून देवा घरी गेली. कारण ती आजारी होती. माझ्या आजोबांनी तिची खूप खूप सेवा केली. माझी आजी विविध पदार्थ खूप रुचकर आणि लज्जतदार बनवत असे. त्याचे कारण म्हणजे आजोबा नोकरी करत असताना विविध ठिकाणी त्यांची बदली होत असे. त्यामुळे तिने विविध ठिकाणाचे लज्जतदार पदार्थ शिकून घेतले होते.

          माझे आबा म्हणजे उत्तम आरोग्य, सत्प्रवृत्त विचारसरणी आणि सतत उद्योगात रमलेले, आबा अगदी ऐंशीच्या वर्षीही तेज:पुंज वाटतात. त्यांचा चेहऱ्यावर आज सुध्दा अनोखे तेज झळकते.  आपल्या एवढया वार्धक्यातही त्यांनी आपल्या 'तरुण' मनाला जपले आहे, आजही कोणतीही गोष्ट मन लावून आणि तितक्याच अत्साहाने करतात. म्हणून ते सदैव आनंदी राहू शकतात. 'सदैव कर्ते व्हा. सतत कार्यरत राहा' हा त्यांचा आम्हांला सदैव उपदेश असतो. शेवटी एवढच म्हणाव वाटत, माझ्या सारखा नशीबावर विश्वास न ठेवणारा नास्तिक माणूस सुध्दा माझ्या नशीबाने मला माझे आजोबा लाभले असे मानतो.


English translation :

My grandfather

Today we had a small household ceremony. All my uncle-cake, aunt, mama and the aunty family were gathered together. We celebrated our grandfather's ethnic birthday. Our only secret purse was turned to the seven-hour east. We did not know the people to know, but in the end, he pushed us. After dinner, he had asked for great mango ice cream for all and gave everyone a gift to everyone at the ceremony and gave them a person's characteristics, her hobby, and her likes. So there was a lot of fun. 

Your father's father is your grandfather. Also, your mother father is also our grandfather. The descendants of the grandson, the grant of entertainment is their grandfather. From the childhood to the weakness, it is also an important role in grandfather in the richest-baldness. If you see the Marathi film breath displayed in two thousand four, then this whole film is aware of the whole family and grandchildren. After watching this movie, more than the grandfather created the same respect. I have my grandfather my grandfather in the grandfather in this film. 

My grandfather - Aab is always happy and satisfied. These are the happy, the optimistic presence of the absolute of the hands! Their behavior is very ruled. Nothing but their sunrise is never to go around. He has established a 'pension club'. These old people are celebrating the birthdays of the other, they are walking. On such occasions, grandfather tells grandmother to make a grassy crisis, pap and yummy food for his friends. 

The special is proud of the absolutely about our big mother, that is, their own wife. The Apologies were largely on the credits and thereby retired with the high position. His creditors also give to our big mother, because they have had to have an eye on the front of the house. Because of our grandmother, they believe that their house 'remains very nice and ideal'. 

Even today, in the house, there are alives from all. They do not interfere with any decision in anybody. But if someone asked us a doubt or a court, they are offered themselves. The house is to be very good at home and to give their various ladies from the house. 

In the current position, the difference of each other generation is not a grandfather, neither the north of the genius, neither a lot of love. But in this case I am very lucky. Because I get my abuse and suffering from the end of my absolute. I love their love and have more than she had yet to be done. My love of energy is not very much in my life, because of the reason I was going to God, and she went to God home. Because she was sick. My grandfather served her very much. My grandmother used to be very interesting and pizzard. His reason why grandfather was replaced by different places while doing his job. So she had learned a lot of disposal of different places. 

My Absa is the best health, the promotional thinking and the constant industry, the Abs also in the year of Eighty, the pants. They faced the unique scarcity today. He also hasted his 'young' in our so-minded vocabulary, even anything that makes the mind and as much as you do. So they can always be happy. Be forever. Keep continuously working, 'we always have preaching them. Finally, it is so thought to be the denial of my neighbor, as I do not believe in my destiny.