राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी ( चरित्रात्मक निबंध ) Father of the Nation Bapuji - a great role model or my favorite leader

राष्ट्रपिता बापूजी - एक थोर आदर्श किंवा माझा आवडता पुढारी

Father of the Nation Bapuji - A Great Role Model or My Favorite Leader

           महात्मा गांधी हे माझे आवडते पुढारी आहेत. सत्याग्रह व असहकार या जगावेगळ्या अहिंसक शास्त्रांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. बापूजी मी 'महात्मा' कसा झालो. याची पडताळणी केली की त्यांच्या चारित्रातील दिव्यत्व आपणास दिसते. आपल्या जीवनातील विविध गोष्टी सांगताना बापूजी तिचा उल्लेख 'सत्याचे प्रयोग' म्हणून करतात. आपल्या जीवन कहाणीमधील सर्व चुकांची त्यांनी समर्थपणे कबुली दिली आहे. गांधीजींनी लोकांना सत्य बोलण्याचे नुसते धडेच दिले नाहीत, तर स्वतःच्या जीवनामध्ये सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष करून सर्वांना दाखवले.

          महात्माजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख नेता म्हणजे गांधीजी. संपूर्ण भारत देशामध्ये गांधीजींनी अहिंसात्मक अहसकार आंदोलन सुरू करून देशाला स्वातंत्र्य प्राप्त करीन दिले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसात्मक मार्गाचा वापर करण्यासाठी सर्व जनतेला त्यांनी प्रेरित केले. बापूजींना टागोर यांनी सर्वप्रथम महात्मा ही उपाधी दिली. महात्मा म्हणजेच महान आत्मा. सर्व जनता त्यांना प्रेमाने बापू संबोधत असत. 'राष्ट्रपित' हि उपाधी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना १९४४ मध्ये बहाल केली. बांपूजींचा जन्मदिवस २ ऑक्टोबर संपूर्ण देशात गांधी जयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.  बापूजींनी त्यांच्या जीवनात सत्य आणिअहिंसा याचे व्रजाप्रमाणे पालन केले, त्यांच्याकडे असामान्य धाडस होते. आपल्या देशातील लोकांची गरिबी पाहून बापूजी केवळ धोतर नेसूनच सर्वत्र वावरू लागले.

          बापूजींनी आपला देश, भारतीय संस्कृती, भारतातील सर्वसामान्य माणूस यांचा प्रथम विचार केला. म्हणूनच सशस्त्र चळवळीच्या हिंसक मार्गाचा त्यांनी अवलंब केला नाही. सशस्त्र सरकारला त्यांनी आव्हान दिले ते निःशस्त्र हातांनी. 'सत्याग्रह' या नवीन अस्त्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिका या देशात आणि नंतर आपल्या भारतात केला. चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व वतनदार, जमीनदार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी एकत्र केले. भारतातील गरीबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, सर्व धर्म समभाव, स्त्रीयांना समान हक्क, अस्पृश्यता निवारण त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सुत्रे संभाळताना केली.  १९२० ची बापूजींची असहकार चळवळ, १९३० ची दांडी यात्रा व १९४२ चा चले जाव लढा हे साऱ्या विश्वातील स्वातंत्र्यआंदोलनांमधील सोनेरी क्षण होते.

          बापूजींच्या मोठेपणाचे रहस्य त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात होते. बापूजींजवळ विलक्षण 'संयम' होता. आजच्या विद्यार्थ्यांत कोणत्याही तऱ्हेचा 'मनोनिग्रह' आढळत नाही. मनोनिग्रहाचे महत्त्व त्यांना बापूजींच्या जीवनचरित्रातून कळून येईल. एकदा डॉक्टरांनी  त्यांच्या पत्नी कस्तुरबां यांना आजारी असताना मीठ सोडायला सांगितले होते, परंतु त्या तयार नव्हत्या. तेव्हा बापूजींनी स्वतःचे मन खंबीर  तयार करण्यासाठी स्वतःच मीठ वर्ज केले. खजूर व शेळीचे दूध या साध्या पदार्थावर ते अखेरपर्यंत राहिले. बापूजींनी संपूर्ण आयुष्यामध्ये सत्य आणि अहिंसा या तत्वांचा नेहमी पुरस्कार केला. आयुष्यातला प्रत्येक क्षण ते तत्याला अनुसरुनच जगले. त्यांनी भारतातील खेडेगावांना भारताचे खरे मुळ समजले. त्यांनी त्यांच्या जीवनात आत्मशुध्दीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी उत्तम साधन म्हणून कठोर उपवास केले.

          सत्ता, संपत्ती यांच्या जीवघेण्या स्पर्धांमध्ये बापूजी केव्हाच अडकले नाहीत. आफ्रिका हा देश  सोडताना स्वतःला मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशहितासाठी देऊन टाकल्या. त्यांनी स्वतःच्या जीवनात अकरा व्रतांचा स्वीकार केला होता. त्यामध्ये सत्य, अहिंसा, ब्रम्हचर्य, अस्तेय, शरीरश्नम, अपरिग्रह, निर्भयता, आस्वाद, सर्वधर्म समभाव, स्पर्शभावना, त्याग इत्यादी व्रतांचा समावेश होता. त्यांच्या मते मानवाची खरी लढाई हि स्वतःमधील वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांवर मात करणे ही आहे. तसेच त्यांच्या मते अंहिंसा हि भित्रेपणाला झाकण्यासाठी वापरत असाल तर प्रत्येकाने अहिंसेचे पालन करणे आवश्यक नाही. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर ही सत्तेच्या कोणत्याही पदासाठी हाव केली नाही, ते दीनदलितांच्या सेवेला धावून गेले. अशा प्रकारे सामान्यापासून असामान्यत्वापर्यंत यशस्वी वाटचाल कशी करता येते, याचे एक महान उदाहरण म्हणजे आमचे राष्ट्रपिता बापूजी! प्रख्यात तत्त्वज्ञ आईनस्टाईनने महात्माजींविषयी असे म्हटले आहे की, "आणखी काही वर्षानंतर असा एक मनुष्य झाला होता, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही."


English translation :


Father of the Nation Bapuji - A great Role Model or My Favorite Leader

Mahatma Gandhi is my favorite leader.  He brought freedom to India through non-violent scriptures like Satyagraha and non-cooperation.  Bapuji, how did I become a 'Mahatma'?  Verified that you see the divinity in their character.  Telling various stories of his life, Bapuji refers to it as an 'experiment of truth'.  He has powerfully confessed all the mistakes in his life story.  Gandhiji not only taught people to speak the truth, but also showed them the truth by experimenting with the truth in his own life.


 Mahatmaji's full name is Mohandas Karamchand Gandhi.  Gandhiji was one of the leading leaders of India's freedom struggle.  Gandhiji started a non-violent non-violent movement all over India and gave freedom to the country.  He urged all masses to use non-violent means to achieve freedom.  Tagore was the first to give the title of Mahatma to Bapuji.  Mahatma means great soul.  All the people affectionately called him Bapu.  He was conferred the title of 'President' by Subhash Chandra Bose in 1944.  Bampuji's birthday on 2nd October is celebrated all over the country as Gandhi Jayanti with great enthusiasm.  Bapuji followed truth and non-violence in his life like Vraja, he had extraordinary courage.  Seeing the poverty of the people of his country, Bapuji started wearing dhoti everywhere.


 Bapuji first thought of his country, Indian culture, the common man in India.  That is why they did not resort to violent means of armed struggle.  He challenged the armed government with unarmed hands.  He used the new weapon 'Satyagraha' first in Africa and then in India.  He rallied the farmers of Champaran to fight against oppressive taxes and vatandars, zamindars.  Poverty alleviation in India, economic self-reliance, equality of all religions, equal rights for women, elimination of untouchability, he did while leading the Indian National Congress.  Bapuji's non-cooperation movement of 1920, Dandi Yatra of 1930 and Chale Jao Ladha of 1942 were the golden moments in the freedom movements all over the world.


 The secret of Bapuji's greatness lies in his immaculate character.  Bapuji had a wonderful 'Samyam'.  There is no such thing as 'discipline' in today's students.  He will understand the importance of restraint from Bapuji's biography.  Doctors once told his wife, Kasturba, to give up salt when she was sick, but she was not ready.  Then Bapuji himself forbade salt to make his mind strong.  It remained on the simplest of dates and goat's milk till the end.  Throughout his life, Bapuji always upheld the principles of truth and non-violence.  He lived every moment of his life according to that.  He considered the villages of India to be the true roots of India.  He fasted hard in his life as a great tool for self-purification and political movement.


 Bapuji never got involved in life-threatening competitions for power and wealth.  He gave all the gifts he received when he left Africa for the good of the country.  He had accepted eleven vows in his own life.  These included vows of truth, non-violence, celibacy, asteya, sharirasnam, aparigraha, fearlessness, enjoyment, interfaith harmony, touch, renunciation, etc.  According to him, the real battle of human beings is to overcome their evil tendencies, fears and insecurities.  Also, if non-violence is used to cover cowardice, then not everyone needs to follow non-violence.  When India gained independence, it did not aspire for any position of power, it ran for the service of the poor.  Our Father of the Nation Bapuji is a great example of how to make a successful journey from ordinary to extraordinary in this way!  The famous philosopher Einstein said of Mahatmaji, "No one would believe that such a man was born a few years later."