छत्रपती शिवाजी महाराज अवतरले तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध)

 छत्रपती शिवाजी महाराज अवतरले तर.... (कल्पनाविलासात्मक निबंध)

If Chhatrapati Shivaji Maharaj incarnated .... (Imaginary Essay)

 
          खरोखरच आज छत्रपती शिवाजी महाराज अवतरले तर ते आनंदी होतील की दुःखी? भारत देशामध्ये वर्तमान स्थितीमध्ये परकीयांचे राज्य नसून, जनतेचे स्वतःचे स्वराज्य आहे, हे कळल्यामुळे मात्र ते खूप आनंदी होतील. आपले स्वराज्याचे स्वप्न, जनतेचे स्वतःचे राज्य, श्रींचे राज्य साकार झाले आहे म्हणून ते सुखावतील. आपण जे मराठ्यांचे साम्राज्य निर्माण केले ते आपल्या जनतेने आपल्या पाठीमागे अबादित ठेवले आहे, हे पाहून त्यांना मनोमन हर्ष होईल. त्यांनी स्वतःच्या शिस्तबध्द लष्काराच्या .बळावर आणि संघटितशिर प्रशासकीय यंत्रणेवा हे स्वराज्य स्थापन केले होते. विविध गनिमी काव्यांचा वापर करून बलाढ्य शत्रूंना त्यांनी नेस्ताभूत केले होते. शहाजी राजे यांच्याकडून मिळालेल्या मोजक्याच सैन्य तुकडी मध्ये वाढ करून त्यांनी मोठे लष्कर उभे केले होते. त्यांनी सागरी किल्ल्यांसोबतच अनेक डोंगरी किल्ल्यांची निर्मिती केली होती. 
          आपण निमार्ण केलेल्या स्वराज्यामध्ये फेरफटका मारावा, या विचाराने छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आवडत्या घोडीची मागणी करतील, तेव्हा त्यांच्या समोर हेलिकॉप्टर उभे केले जाईल. शिवाजी महाराज स्वतःच्या स्वराज्याची पाहणी करायला बाहेर पडतील आणि आजूबाजूची सर्व परिस्थिती पाहून मात्र ते खूप संतप्त होतील. ज्या स्वराज्या मध्ये त्यांनी कधीही जातीभेद केला नाही, धर्म भेद मानला नाही, सर्व भाषांचा सन्मान केला त्याच स्वराज्यामध्ये जागोजागी जाती, धर्म, भाषा अशा निमित्ताने चाललेले संघर्ष पाहून त्यांना त्यांच्या शिस्तबध्द शासन पध्दतीचे स्मरण होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत धैर्यशील व उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे राजे होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा महारात्ट्रातील सर्व जाती बांधवांचा एक गट तयार केला केला होता. आपल्या निर्वाणानंतर तीनशे वर्षानंतर ही भारतातील मागासलेपणा व अंतर्गत कलह पाहून त्यांच्या मनाला खूप यातना होतील.
          हे सर्व पाहत असताना महाराजांचे लक्ष एकविसाव्या शतकातील वृतपत्रांकडे जाईल. दैनिकांची ही कल्पना त्यांना खूप आवडेल. आपण सुध्दा अशी वृतपत्रे काढली असती, भविष्यात 'बखरी' लिहून घेणे अगदी सहज सोपे झाले असते. असे त्यांच्या मनात येईल. परंतू महाराजांनी याच वर्तमान पत्रावरून सहज नजर फिरवली तर ते खूप व्यथित होतील. कारण त्यांना त्यामध्ये स्त्रीयांवरील अत्याचाराच्या बातम्या दिसतील, अनेक स्त्रीयांना हुंडा दिला नाही म्हणून स्वतःच्या जीव गमवावा लागला याविषयी वाचायला मिळेल. देशातील अनेक क्षेत्रे भष्टाचारांनी भरबटलेली आहेत याची त्यांना माहिती मिळेल. सर्वत्र अंधाधुंदी माजली आहे. हे चित्र त्यांच्या समोर उभे होईल. हे सर्व पाहून ते गरजतील, "असे करणाऱ्या सर्व अपराध्यांचे हात कलम केले पाहिजेत. अरे, प्रत्येक स्त्री ही मातेसमान असते".
          याचवेळी भारत देशाचा वैज्ञानिक क्षेत्रातील त्याचबरोबर भौतिक विकास पाहून महारांना आनंद होईल. परंतू त्याच वेळी महाराष्टातील ऐतिहासिक स्थळांची आणि किल्ल्यांची झालेली दुरवस्था पाहून त्यांना विलक्षण दुःख होईल. ज्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपतींचा जन्म झाला, त्या शिवनेरी किल्ल्याला भेट देताच त्यांना स्वतःचे बालपण आणि त्यांच्या मातोश्री जिजामाता यांचे स्मरण होईल. काही काळ ते त्याठिकाणी नतमस्तक होऊन उभे राहतील. सिंहगडावर जाताच त्यांच्या पूर्वस्मृतींना उजाळा मिळेल. देशकार्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या तानाजी मालुसरे यांची आठवण होईल. प्रतापगडावर जाताच अफजलखानाच्या भेटीचा आणि वधाचा प्रसंग त्यांच्या नजरेसमोर उभा राहिल. तुळजापूरच्या आई अंबाभवानीचे दर्शन घेताच त्यांच्या भावना अनावर होतील आणि भक्तिभावाने ते आई अंबादेवीचे दर्शन घेऊन वंदन करतील.
          अचानकेपणे माझी लागलेली विचारतंद्री भंगली, कारण त्याच वेळी माझी छोटी भाची म्हणत होती, 'मामा, छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट सांग ना!'

English translation :

If Chhatrapati Shivaji Maharaj incarnated .... (Imaginary Essay)

 If Chhatrapati Shivaji Maharaj really appeared today, would he be happy or sad?  They will be very happy to know that in the present situation in India, the people have their own self-government and not the state of foreigners.  They will rejoice as their dream of Swarajya, the people's own kingdom, Shri's kingdom has come true.  They will be happy to see that the people have built the Maratha empire behind them.  He had established this self-government on the strength of his own disciplined army and organized administrative system.  He used various guerrilla poems to annihilate the formidable enemies.  He had raised a large army by augmenting the few troops he had received from Shahaji Raje.  He had built many hill forts along with sea forts.

 When Chhatrapati Shivaji Maharaj asks for his favorite horse with the idea that he should take a tour of the Swarajya he has created, a helicopter will be parked in front of him.  Shivaji Maharaj will go out to inspect his own Swarajya and he will be very angry seeing all the conditions around him.  He will be reminded of his disciplined system of governance in the same Swarajya in which he has never discriminated against caste, religion or language, respecting all languages.  Chhatrapati Shivaji Maharaj was a king who was very patient and had excellent leadership qualities.  He had formed a group of brothers from all castes in Maharashtra who were fighting hard for Swarajya.  Three hundred years after his Nirvana, he will be tormented by the backwardness and internal strife in India.

 Seeing all this, Maharaj's attention will turn to the newspapers of the 21st century.  They will love this idea of ​​dailies.  If you had published such newsletters too, it would have been much easier to write 'Bakhari' in the future.  That will come to their mind.  But if Maharaj simply looks away from this present letter, he will be very distressed.  Because they will see news of atrocities against women in it, they will get to read about how many women lost their lives because they did not give dowry.  They will come to know that many areas of the country are rife with corruption.  There is chaos everywhere.  This picture will stand in front of them.  Seeing all this, they will need to say, "The hands of all criminals who do this should be cut off. Oh, every woman is like a mother."

 At the same time, Mahars will be happy to see the scientific as well as physical development of India.  But at the same time, they will be saddened by the deteriorating condition of historical places and forts in Maharashtra.  As soon as he visits the Shivneri fort on which Chhatrapati was born, he will remember his own childhood and his mother Jijamata.  For a while, they will bow down and stand there.  His memories will be revived as soon as he goes to Sinhagad.  Tanaji Malusare will be remembered for risking her life for the cause of the country.  As soon as they go to Pratapgad, the incident of Afzal Khan's visit and murder will come before their eyes.  As soon as he takes darshan of mother Ambabhavani of Tuljapur, his feelings will be aroused and he will pay homage to mother Ambadevi with devotion.

 Suddenly my thinking was shattered, because at the same time my little niece was saying, 'Mama, do tell the story of Chhatrapati Shivaji Maharaj!'