अकस्मात पडलेला पाऊस ( प्रसंगलेखन / अनुभवलेखन ) Sudden rain

 अकस्मात पडलेला पाऊस

Sudden rain


          नित्यनियमानूसार सर्व कामे उरकून घरातील काही सामान आणण्यासाठी मी घराबाहेर बाहेर पडले होते. सकाळ पासूनच वातावरणात बदल दिसून येत होते. बाहेर अचानकच अंधारून आले होते. मी दुकानात बाहेर उभी होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. सूं सूं करत वारा थैमान घालू लागला. मोठे वादळ येईल की काय अशी शंका मनात येत होती. तितक्यात समोरील घराचे दार जोरात बंद झाल्याचा आवाज झाला. तेथूनच समोर दिसणाऱ्या थोडया अंतरावरच्या मैदानात धुळीचा लोट आकाशात उडालाला, भोवऱ्यासारखा गोलाकार घुमत घुमत खाली आला आणि त्याने आपले अंग भसकन् जमिनीवर लोटून दिले. सर्वत्र पालापाचोळा उडाला. संपूर्ण वातावरणात धुळभरलेपणा भरून राहिला होता. कोणत्याशा अनाम क्षणी आकाशात लख्खक्न बिजली सळसळली आणि टपोऱ्या थेबांचा वर्षाव सुरू झाला.
          सकाळीच अचानकपणे बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच धावपळ झाली. कारण अनेकांनी सोबत कोणत्याही प्रकारची छत्री, रेनकोट घेतले नव्हते. हे साहित्य घेण्यासाठी पावसाळ्याचे वातावरण सुद्धा नव्हते. त्यामुळे अनेकांना दुकानांचा, इमारतींचा, बस स्टॉप चा सहारा घ्यावा लागला. शाळेत चाललेल्या मुलांची तर फरच धांदल उडली होती. अनेक मुले अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे भयभीत झाली होती. तर कोणी आनंदाने उडया मारत होती.
          उघड्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची तारांबळ तर पाहावातच नव्हती. सकाळपासून नियोजन बध्द उभारलेला त्यांचा धंदा पूर्ण विस्कटला होता. अनेकजन आपला विक्रीचा माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धडपडत होता. परंतू अचानक झालेल्या पावसामुळे अनेकांचे नूकसान झाले होते.
            परंतू तापलेल्या धरतीवर सडा शिंपला गेला होता. पहिल्या पावसात जसा घुमावा तसा मातीचा मंत्रमुग्ध सुगंध आसमंतात दरवळला आणि त्या थंडगार सरींचा स्पर्श अनुभवण्यासाठी माझे हात नकळत दुकानाच्या खिडकीबाहेर सरसावले. हातावर पडणारे पावसाच्या थेंबाचे टपोरे मोती झेलत, उधळत किती वेळ दुकानातच राहणार? मग मी बिनधास्तपणे प्रत्यक्ष पाऊस अंगावर घेण्यासाठी बाहेर मोकळ्या वातावरणात आले. 
          छपरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या थेबांनी छान ताल धरला होता. चिखल मातीचा लहान लहान ओघळ भरभर, वाट फुटेल तिथे सरकत होते. मी त्या पावसात अगदी मनसोक्त भिजले. आनंदाने गाणी गायली. चिखलात उड्या मारल्या. माझ्यासोबत आजूबाजूची झाडे झुडपेही अचानक आलेल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत होती. संपूर्ण धरती सचैल स्नान करत होती. ढगांनी आपली सर्व गाठोडी भरभरून धरतीवर लोटून दिली होती जणू! वातावरण चैतन्यमय झाले होते. नवजीवन ल्यायलेली सृष्टी आनंदविभोर बनली होती. अगदी माझ्याप्रमाणेच! थकलेल्या, कंटाळलेल्या, शांत मनात या अवेळी आलेल्या वळवाच्या सरीच्या शिडकाव्याने उल्हासित केले होते. हे अविस्मरणीय क्षण मनात साठवत, पावसाचे मुक्त, बरसणारे रुप अनुभवत माझी पावले घराच्या दिशेने वळली. जणू 'श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा | उलगडला पानांतून अवचित हिरवा मोरपिसारा|' असा प्रत्यय मी आज श्रावण नसतानाही अनुभवला होता.

Sudden rain

I went out of the house to finish all the work as usual and bring some household items.  The change in the weather was visible since morning.  It was suddenly dark outside.  I was standing outside the shop.  Suddenly a gust of wind blew.  The wind began to blow.  I was wondering if there would be a big storm.  Suddenly, the front door slammed shut.  From there, dust flew into the sky in the field a short distance in front of him, came down in a whirlpool, and he threw his limbs on the ground.  The mulch spread everywhere.  The whole atmosphere was filled with dust.  At some unknown moment, lightning flashed in the sky and it started raining.

 The servants who came out suddenly in the morning had a good run.  Because many did not carry any kind of umbrella or raincoat with them.  There wasn’t even a rainy weather to pick up this material.  So many had to resort to shops, buildings, bus stops.  The school children were in a hurry.  Many children were frightened by the rain with a sudden gust of wind.  So someone was jumping for joy.

 The line of vendors sitting in the open was not to be seen.  His business, which had been planned since morning, was in shambles.  Many were struggling to keep their sales safe.  But the sudden downpour caused many to suffer.

 But the rotten mussels were on the heated earth.  The enchanting scent of the soil wafted through the sky like a whirlwind in the first rain, and my hands unknowingly slipped out of the shop window to feel the touch of that cool sari.  How long will the raindrops falling on your hands stay in the shop, picking up pearls and scattering them?  Then I casually came out into the open to take in the actual rain.

 The drops of water flowing from the roof had a nice rhythm.  There were small streams of mud moving all over the place.  I was soaking wet in that rain.  Sang songs with joy.  Jumped into the mud.  The trees and bushes around me were also enjoying the sudden downpour.  The whole earth was bathed.  It was as if the clouds had dropped all their bundles on the ground!  The atmosphere was lively.  The revived creation had become blissful.  Just like me!  The tired, bored, calm mind was elated by the sprinkling of this unseen curve.  Keeping these unforgettable moments in mind, experiencing the free, rainy form of rain, my steps turned towards the house.  As if 'Shravanat Ghannila Barsala Rimjim Silk Dhara |  Unpainted green peacock unfolded through the leaves. '  I had experienced such a suffix even though I was not Shravan today.