वास्तवात कोविडचा कहर - त्याविषयी आपला अडाणीपणा, अज्ञान, आणि बँकिंग व्यवहार व इतर
अतिशय उपयोगी माहिती
In fact, Covid's havoc - his ignorance, ignorance, and banking transactions and others
Very useful information
बऱ्याच वेळा घरातील स्त्रियांना बँकांचे आर्थिक व्यवहार माहिती नसतात किंवा असलेली माहिती सुद्धा अर्धवट माहिती असते, पण या सर्वाचा कंट्रोल नवऱ्याकडे असतो. आमचे हे सगळं बघतात', 'हा'च करतो अगं सगळं, माझ्यावर वेळच आली नाही कधी', 'मला त्यातलं काही कळत नाही, देव काय ते बघून घेईल' या आणि अशा excuses अगदी शिकल्या सवरल्या, उच्चशिक्षित बायकांच्या बाबतीत सुद्धा ऐकलेल्या आहेत. अनेक घरांमध्य बायकोला स्वतःचइ च्छा असते पण नवरदेव म्हणतात, 'तू कशाला, मी बघतोय सगळं', 'तुला काही कळणार नाही' असे शिक्के मारून स्वतःकडे कंट्रोल ठेवतात आणि बायकाही ऐकून घेतात. याचबाबतीत, नवरोबांबाबत बोलायचे तर घरातील बारीकसारीक सामान आणणे, घरातील कामगारांना मॅनेज करणे आणि एकूणच किचन मॅनेजमेंटच्या बाबतीत अनभिज्ञता /आळशीपणा असू शकतो. अर्थात, याला अपवाद सापडतील, पण सद्य परिस्थितीत दोघानाही रोल रिव्हर्सल जमायला हवे आणि 'कमी तिथे आम्ही' अशी भूमिका घेऊन जबाबदारी खंबीरपणे पेलता यायलाच हवी, हे खरे. त्या दृष्टीने आधीच काही तयारी करून ठेवली तर?
हे काही महत्त्वाचे मुद्दे : -
१) घरातील दोघा उभयतांनी एकमेकात ठरवून मोबाईल बँकिंग पिन, नेट बँकिंग पिन / पासवर्ड, एकमेकांच्या फोनला फिंगर प्रिंट ऍक्सेस या गोष्टी एकमेकांना सांगाव्यात. जेणेकरून दवाखान्यामध्ये होणारा खर्च किंवा टेस्ट्स, बाकी इतर खर्च करणे दुसऱ्याला सोपे जाईल. इथे माझी प्रायव्हसी ओपन होईल हा इतर वेळी अतिजास्त अधोरेखित केलेला मुद्दा आणू नये, फिंगर प्रिंट रजिस्टर केले म्हणजे लगेच एकमेकांचे फोन चेक करून पाळतच ठेवली जाणार असा अर्थ होत नाही. ह्याला क्रायसिस मॅनेजमेंटसाठीची पूर्वतयारी म्हणतात.
२) हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ आल्यास आणि मोठी रक्कम उभारायची वेळ आल्यास कुठले फिक्स्ड डिपॉझिट मोडावे, कुठले सेविंग्स खाते प्रामुख्याने वापरावे याबाबत एकमत करून घ्यावे. जे बँक खाते अशा वेळी वापरायचे ठरले असेल त्याचे दोन ते तीन चेक्स अगोदरच सही करून ठेवावे. तसेच म्युच्यअल फंड मोडावा लागला / शेयर्स विकावे लागले तर कुठले, काय हे आपल्या advisor शी बोलून त्याचे लेटेस्ट स्टेटमेंट काढून ठेवाव, डिलिव्हरी स्लिप्स सही करून ठेवाव्यात. यावरून नंतर वाद झालेले बघितले आहेत. हॉस्पीटल मध्ये भरती असलेल्या माणसांसाठी जी व्यक्ती स्वतःची तब्येत, घरातील सर्वांचे स्वास्थ्य सांभाळून धावपळ करणार आहे, तिचा विचार इथे होणे अभिप्रेत आहे.
३) एका प्लॅस्टिक टाईप मिळाऱ्या बॉक्स मध्ये सगळ्या कुटुंबियांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो, सध्या चालू असलेली औषधे लिहिलेला कागद, नुकत्याच केलेल्या टेस्ट्स असतील तर त्याचे स्कॅन / रिपोर्ट्स, साधारण हिस्ट्री, फॅमिली डॉक्टर, स्पेशालिस्ट यांचे कॉन्टॅक्ट नंबर, मेडिक्लेम पॉलिसीज हे लिहून / लावून ठेवावे.
४) संगणकावर एक एक्सेल फाईलचा फोल्डर तयार करून त्यामध्ये आपणास आवश्यक बिले - प्रॉपर्टी टॅक्स, प्रत्येक घराची वीजबिल, फोनबिल, गॅस नोंदणी, घराचे हफ्ते, भाजी / किराणा / लॉंड्री, मेडिकल, पेपर, दूध, सुतार, प्लम्बर, इतर मशीन रिपेअर, ओटीटी सब्स्क्रिप्शन, वगैरे साठीचे कॉन्टॅक्ट लिस्ट करून ती फाईल दोघांनाही मिळेल अशा ठिकाणी ठेवावी किंवा सरळ प्रिंट काढून वरच्या फाईलमध्ये लावावी.
५) सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिथे नवरा - बायको यांचे जॉईंट अकॉउंट नाही, तिथे त्यांनी स्वतःचे खाते जॉईंट करून घ्यावे किंवा किमानपक्षी नॉमिनेशन तरी करावे. वर्तमान स्थितीमध्ये सर्वच व्यवहार डिजिटल झाले आहेत. त्यामुळे धनादेश म्हणजेच चेकबूक, (असल्यास) पासबुक कुठे ठेवले आहे आयत्यावेळी आठवत नाही. नेमकं याचवेळी बँकेचे पोर्टल डाउन असते. त्यामुळे घरातील मुख्य माणसाबरोबरच सर्व स्त्रियांना, मुला मुलींना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग बरोबरच, चेकबुक, पासबुक वगैरे गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
६) घरातल्या टीनएजर मुलांशीसुद्धा काही प्रमाणात आर्थिक बाबी माहिती असणे, हॉस्पिटलला जावे लागल्यास त्याला /तिला घरी काय बघावे लागेल याबाबत चर्चा करावी. घरातील मुले - मुलीं हे सर्व जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे सांभाळतात, त्यांच्यावर विश्वास दाखवावा. अगदी दहा - बारा वर्षाच्या मुला- मुलींना सुद्धा घरात अशी परिस्थिती सुरू असल्याने तर आज आपण कपडे घडी करून कपाटात ठेऊ, भांडी घासून मांडणीत लावू आणि कामाला हातभार लावू हे कळते आणि जमते, त्यात गैर काहीच नाही, मुले जितकी स्वयंपूर्ण , स्वावलंबी असतील तितकी कठीण प्रसंगात पटकन उभी राहतील आणि निर्णयक्षम होतात.
७) सध्याच्या काळात मागील व्यक्तींना कोणतीच अडचण निर्माण होऊ नये म्हणून गरज भासत असेल तर स्वतःची विल' करणे हा दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आता प्रायॉरिटीवर आणायला हरकत नाही, त्या दृष्टीने सगळ्या नोंदी एके ठिकाणी राहतात आणि त्यांचे वाटप आधीच क्लिअर राहते. सघपरिस्थितीमध्ये सर्व ऑब्जेक्टिव्हली विचार करावा. न जाणो आपले काही बरे वाईट झाले तर किमान मागच्या आपल्या वारसांना कागदपत्रांचा कमीत कमी त्रास व्हावा. ही प्राथमिकता आता प्रत्येकाने जपलीच पाहिजे.
८) घरातील सर्व माणसं कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास जेवणाचे डबे कुठे लावायचे, घरातील कोणत्या खोलीत कुणी आयसोलेट व्हायचे, भांडी-कपडे वगैरे कामांची वाटणी कशी असावी याचा एक ढोबळ प्लॅन असावा. दुपार - रात्री वेगळे जेवण लागते, सकाळचे जेवण संध्याकाळी नको, अमुकच भाजी तमुकच प्रकाराने लागते हे करायला कोरोना काळात आपण 'ग्रेट इंडियन किचन' नाही, हे लक्षात ठेवायचे आहे.
९) ही अतिशयोक्ती वाटेल, परंतु अजूनही काही लोकांना डिजिटल व्यवहार सुरक्षित वाटत नाहीत आणि त्यामुळे बहुतांशी फिजिकल व्यवहारांवर भर दिला जातो. आता घराच्या बाहेर महत्वाचे काम असेल तर पडायचे आहे. या वेळी सर्वात महत्वाचे काम म्हणजे स्वतःचा जीव वाचवायचा आहे तर डिजिटल साक्षरता फार फार महत्वाची आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी सध्याची डिजिटल पध्दती म्हणज गुगल पे, पेटीएम, भीम यु पी आय यांचा वापरता करता येणे, ऑनलाइन फंड ट्रान्स्फर जमणे, घरातील सर्व बिले ऑनलाईन भरता येणे, कॅब बुकिंग, फूड किंवा पार्सल डिलिव्हरी ऍप्स , ग्रोसरी ऍप्स हे सगळे नीट जमणे अत्यावश्यक झाले आहे. त्यादृष्टीने स्वतःला अपडेट ठेवलेच पाहिजे.
१०) या सर्व बाबतीत घरामध्ये आधी बोलून झाले असले किंवा चर्चा करून झाली असली तरी ऐनवेळी काही घोळ, गडबड, उशीर होणार आहेच. हे गृहीत धरून चालायचे आहे. आपण मनूष्य प्राणी आहोत आणि त्यामुळे आपल्याला सगळे सदासर्वदा आलेच पाहिजे असे नाही. परंतु आपण या सर्वांची अगोदरच संपूर्ण तयारी केलेली असेल तर आपण प्रथम स्वतःला आणि जवळच्या सर्व प्रिय माणसांना यातून निभावून नेणार आहोत, हा आत्मविश्वास नक्की येतो!
काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.
In fact, Covid's havoc - his ignorance, ignorance, and banking transactions and others
Very useful information
Just remember last year's lockdown. It shows how we were washing our own clothes, washing dishes after a meal, eating different foods four times and coming live on Facebook, WhatsApp. Not only this, with the help of fire you can do welding. We are all going through a volatile environment right now. Home covid positives are coming out. Many people have to find a hospital for their loved one, there are no beds in the hospital, there are not enough medicines and they have to grieve for themselves. Relatives, neighbors, and friends may not be able to reach out immediately. No matter how much I decided to stay calm, I had to go into panic mode to see the person closest to me. Especially if there is a doer in the house, earning hand and the rest of the people do not know much about the transaction, even more (here the issue of doer female / male / both is secondary). In all of this, everyone in the house was in a hurry and many had to go through a lot of paperwork and bank transactions.
Often the housewives do not know the financial transactions of the banks or even the information they have is partial but the control is with the husband. We see all this', 'Yes, he does everything, time has never come for me', 'I don't know anything about it, God will take care of it' and such excuses have been heard even in the case of well-educated women. In many houses, the wife wants to be herself, but the bridegroom says, 'Why you, I see everything', 'You don't know anything', they control themselves by stamping and the wife listens. In this case, there can be ignorance / laziness in bringing in the finer things in the house, managing the house workers and overall kitchen management. Of course, there will be exceptions, but in the current scenario, both of them have to reverse the role and take on the role of 'less is more'. What if we have already prepared for that?
Here are some important points: -
1) The two partners in the house should decide each other and tell each other about mobile banking PIN, net banking PIN / password, fingerprint access to each other's phone. So that the expenses incurred in the hospital or tests, the rest of the expenses will be easier for the other. My privacy will be open here, not to mention the over-highlighted point at other times, registering a fingerprint does not mean that we will immediately check and monitor each other's phones. This is called Crisis Management Prep.
2) If it is time to be admitted to the hospital and it is time to raise a large amount of money, you should agree on which fixed deposit to break, which savings account to use. Two to three checks of the bank account to be used at such a time should be signed in advance. Also, if you have to break up a mutual fund / sell shares, you should talk to your advisor about his latest statement, remove his latest statement, sign delivery slips. This has led to disputes since then. For people admitted to the hospital, the person who is going to take care of his own health, the health of everyone in the house, is meant to be here.
3) In a plastic type box, all the family members have Aadhaar card, PAN card, photo, current medicine prescription paper, recent tests, scans / reports, general history, contact number of family doctor, specialist, Mediclaim policies. To keep.
4) Create a folder of Excel file on the computer and in it you need bills - property tax, electricity bill of each house, phone bill, gas registration, house week, vegetable / grocery / laundry, medical, paper, milk, carpenter, plumber, other machine repair, OTT Make a list of contacts for subscriptions, etc., and keep the file in a place where both of them can get it, or print it straight and put it in the file above.
5) The most important point is that where the husband and wife do not have a joint account, they should make their own account joint or at least nominate. In the current situation, all transactions have gone digital. So I don't remember where the checkbook (if any) passbook is kept. This is exactly when the bank's portal is down. Therefore, along with the head of the household, all the women, boys and girls need to know about credit card, debit card, net banking, check book, passbook etc.
6) Have some financial information with the teenage children at home, discuss what he / she needs to see at home if he / she has to go to the hospital. The boys and girls in the house handle all these responsibilities perfectly, they should be trusted. Even ten- to twelve-year-old boys and girls have such a situation at home, so today we know how to fold clothes and put them in the closet, clean the utensils and help with the work, there is nothing wrong with that, children are more self-sufficient Quickly stand up and become decisive.
7) In the present times, if there is a need for the previous persons not to create any problem, then there is no problem in making the issue of making one's own will a priority, from that point of view, all the records remain in one place and their distribution is already clear. In all cases, all should be considered objectively. If something bad happens to you unknowingly, at least your heirs should be bothered with the documents at least. This priority must now be upheld by everyone.
8) If all the people in the house are positive about corona, there should be a rough plan of where to put the lunch boxes, which room in the house should be isolated, utensils etc. should be distributed. It is important to keep in mind that you do not have a 'Great Indian Kitchen' in the Corona period to make sure that you have a separate meal at night, not in the evening, but in the same way.
9) This may sound like an exaggeration, but some people still don't think digital transactions are safe and therefore most of the emphasis is on physical transactions. Now if there is important work outside the house, it is to fall. While the most important task at this time is to save one's own life, digital literacy is very, very important. The current digital system for financial transactions has made it possible to use Google Pay, Paytm, Bhim UPI, online fund transfer, pay all household bills online, cab booking, food or parcel delivery apps, grocery apps. Is. You have to keep yourself updated in that regard.
10) In all these cases, even if we have talked or discussed in the house before, there will be some confusion, confusion and delay. This is to be assumed. We are human beings and we do not have to come all the time. But if we have already prepared all of this, then we are going to get rid of ourselves and all our loved ones first, this confidence is sure to come!
Be careful and stay safe.