पहाटेची अमर्याद ताकद
'SAVERS' चे आयुष्य घडवण्यातील महत्त्वाचे स्थान
The boundless power of dawn
The important place in shaping the life of 'SAVERS'
तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
झोपायला कितीही उशीर झाला तरी, तरी रोज मी पाच वाजता उठतो!
मोठी माणसं सांगायची,
“लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे !”
आणि ते खरं आहे,
हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायीक होते, मोठ्या जिद्दीने त्यांनी एका अपघातामुळे आलेल्या शारिरीक विकलांगतेवर मात केली होती.
परंतू २००८ साली आलेल महामंदीत त्यांचे प्रचंड नुकसान झाले, अब्जोपती हेल कर्जबाजारी झाला.
परंतू त्यांनी कधीच हार मानली नाही, यातुन सर्व संकटातून बाहेर कसं पडावं, हे विचारण्यासाठी ते आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला, मित्राने त्यांना काय उपदेश दिला असेल बरं?
“हेल, तु सकाळी सकाळी लवकर उठ जा!” “बाकी सगळं आपोआप होईल”
या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाले, त्यांना काहीतरी आगळावेगळा उपाय अपेक्षित होते,
काही दिवस त्याने कसेबसे पुढे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली,
आणि हेल सांगतात, त्याचं आयुष्यच बदलुन गेलं!
पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?
इतक्या सकाळी उठुन काय करावं? या प्रश्नावर हेल यांनी एक कोडवर्ड सांगितलाय.
*‘SAVERS’*
ह्या आयुष्य बदलुन टाकणार्या सहा सवयी आहेत.
१) Silence – ध्यान :
- शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे, म्हणजे ध्यान!
- स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!
- मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!
- मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!
- माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!
- अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान!
२) Affirmations – सकरात्मक स्वयंसुचना :
- अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!
- स्वतः स्वतःला सुचना देणं,
- प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!
- येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसुचना!
- स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात.
- आपल्या आतील मनाची ताकद प्रचंड असल्यामुळे तिथे वसलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, तो नेहमी खराच होतो.
- आपले पुर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरे
- या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे.
- एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?
- वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!...
३) Visualize – म्हणजेच चांगल्या कल्पना मनात घोळवणे.
स्वतःची तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी स्वतःच्या मनातुन कल्पना करणं, ती पुर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि आपल्याच मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!
- कल्पनाशक्ती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली अनोखी भेट आहे.
- या अनोख्या कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण व्यक्तीच यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं.
- दररोज सकाळी उठल्या बरोबर आपण आपले ध्येयं पुर्ण झाले आहे, असं मनात घोळवलं पाहीजे.
- जलतरण स्पर्धेत सुवर्णपदकांचा डोंगर उभा करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे जीवनात नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात पाहण्याचा मी प्रयत्न करतो.
- ऑलंपिकमध्ये विजय प्राप्त केलेली एथलिट लेन बीचले म्हणाली होती, पाठीमागील चार वर्ष मी एकाच स्पर्धचा निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी माझ्या हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर चारी बाजूने शॅंपेनचा वर्षाव होत आहे.
- मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला माझ्या जीवनात जे हवे आहे त्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल दैनंदिन टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो.
- प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “आयुष्यात यश दोनदा मिळते, एकदा आपल्या स्वतःच्या मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात जगताना!”
४) Exercise – व्यायाम :
- शरीरातील आळसाला दूरवर पळवुन लावण्यासाठी, शरीरातील शक्ती, ताकद आणि ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!
- आपले शरीर आळसावलं की आतील मन भ्रष्ट झालंच समजा!
- व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातुन उर्जेला, शक्तीला, मनाला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते, आणि माणुस वासनांचा गुलाम बनतो.
- जीवनामध्ये वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातील चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला स्वतः एकटा एकटा असल्याची जाणीव अस्वस्थ करते.
- त्यामुळे तो कोणत्याच गोष्टीत एकाग्र होवु शकत नाही, आणि म्हणुन तो आनंदी होवु शकत नाही, त्याच्या मनात एक अनामिक भिती तयार होते.
- ह्या सगळ्या वाईट मालिकेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सुर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,
- शरीरातले चैतन्य जिवित ठेवा.
५) Reading – वाचन :
- नेहमी पुस्तकांचे वाचन करणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.
- पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या म्हणीप्रमाणे दुसर्यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात.
- वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सर्व आठवड्याला किमान दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.
६) Scribing – लिहिणे :
- माझे ठाम मत आहे, की माझ्या आयुष्यातल्या निराशाजनक काळात मी जर लिहीत राहीलो नसतो तर मी आज खरचं जिवंत राहीलो नसतो.
- आयुष्यात महत्वाच्या गोष्टींचे लेखन केल्याने तुमची तुमच्याशी नव्याने ओळख होते.
- लिहिल्याने आंतर मन रिकामे होते, जीवनातील दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.
- लिहल्याने नवनवीन जीवनातील रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा स्पष्ट होत जातात.
- म्हणुन महान योगी, संतानी सांगून ठेवले आहे, दिवसाला काहीतरी लिहीत जावे.
- लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी आणि उत्कृष्ट साधन आहे.
- लिहिल्याने स्वतःचे आचार, विचार पक्के होतात.
- सकाळी उठल्याबरोबर आज संपूर्ण दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहून काढाव.
- एखादी समस्येचा त्रास होत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत,
- आंतर मनाला स्वप्नांच्या आकाशात स्वच्छंदी पणे पाठवुन कागदावर स्वप्ने रेखाटावीत.
- ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, मी काय काय केल पाहिजे. त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं,
- आणि रोज स्वतःला स्वतःची कामे नेमुन घ्यावीत, आणि पुर्ण झाली की स्वतःलाच स्वतः विजयी घोषित करावं.
- लिहिल्यानं भरलेल मन मोकळं होतं, चिंतांचं, विविध काळजीच ओझं हलकं हलकं होतं!
- जवळच्या व्यक्तीला, नातेवाईकांना, मित्रांना पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.
- अशाने स्वतःमधील अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत कसा खळखळ झऱ्याप्रमाणे वाहतो.
ह्या वरील दिलेल्या सवयींपैकी प्रत्येक सवय जीवन बदलुन टाकणारी आहे.
वरील सहा चांगल्या सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावुन घेतल्या आहेत. याचा विचार करा.
मला माझ्या वैयक्तिक जीवनात ह्या सगळ्या सवयींचा खूप खूप फायदा झाला .
तुम्हालाही ह्या सवयी उपयुक्त ठरतील.
चांगल्या कर्माने म्हणा म्हणा अथवा वाईट कर्माने म्हणा, पण आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे बराच रिकामा वेळ आहे, फुकटचा वेळ आहे... तो वेळ नकारात्मक, वाईट, घातक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे... कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो...आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत..तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू....
अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.....
वेळ आहे स्वतःवर काम करण्याची....स्वतःसाठी जगण्याची.....आलेल्या परिस्थीचा फायदा करून घेण्याची.....
उगीचच मनात भीती उत्पन्न करणारे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात आणि वाचण्यात वेळ वाया घालवू नका....
काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाही.
English translation :
The boundless power of dawn
The important place in shaping the life of 'SAVERS'
What time do you get up in the morning
No matter how late I go to bed, I get up at five every day!
The big man used to say,
"Go to bed early, get up early, get life and health!"
And that's true,
There is a world famous personality named Hale Errold, he was a hugely successful businessman, with great perseverance he overcame a physical disability caused by an accident.
But the Great Depression of 2008 caused huge losses, and billionaire Hale went into debt.
But he never gave up, he went to a successful friend to ask him how to get out of all the trouble, what advice would that friend have given him?
"Hell, you get up early in the morning!" "Everything else will happen automatically"
Hale was disappointed with this miraculous advice, he was expecting something out of the ordinary,
For a few days he somehow pushed on, but day by day despair was gripping him, then as a cure he began to get up at four in the morning,
And Hale says, his life has changed!
Are dawn and sunrise so magical?
What to do after getting up so early in the morning? Hale has given a codeword to this question.
‘SAVERS’
Here are six life-changing habits.
1) Silence - Meditation:
- Sit quietly and peek inside yourself, that is meditation!
- Touching one's inner consciousness is meditation!
- Removing the virus by formatting the computer of the mind is meditation!
- Meditation is necessary to make the mind happy and refreshed!
- Meditation is the realization of how low one's needs are, and how vain all worries are!
- Meditation is the act of connecting oneself with the vast, wonderful and blissful universe, and enlivening one's own mind and body!
2) Affirmations - Positive Self-Information:
- Offerings are self-talk!
- Informing yourself,
- Build a goal that you have set on a very powerful intuition!
- In the next five years, in the next one year, in the next one month, in the next one week, and all day today, it is self-suggestion to revise my mind again and again!
- Spontaneous ideas penetrate deep into the mind, and dramatically come true.
- Since the power of our inner mind is huge, every thought that sits there, whether it is good or bad, is always true.
- Our ancestors used to say, Shubh Bol Narya! .. or Saraswati is on the tongue, it happens as we speak, the deity on the tongue says Tathastu, etc. etc.
- It wasn't all superstition, it's psychology.
- If something is said thousands of times, it is projected inwardly, then why speak inauspicious?
- Instead of inviting destruction by saying bad things, 'Ya sukhanno ya'! ...
3) Visualize - means to mix good ideas in the mind.
Visualization is to imagine in one's mind that one's intense desire has been fulfilled, to express the joy of its fulfillment and to embody it in one's own mind in a subtle way!
- Imagination is one of the most precious and influential gifts God has given to human beings.
- If this unique imagination is used properly, only an ordinary person is transformed into a successful person.
- As soon as you wake up every morning, you should keep in mind that your goals have been achieved.
- says Michael Phelps, a gold medalist in the swimming competition. When I start to fall asleep, I try to see in my mind exactly what I want to do in life.
- Olympic-winning athlete Lane Beechley said, "For the last four years I've been looking at the results of the same competition, that is, I'm standing with the winning medal in my hand, and I'm being showered with champagne all around."
- Mikees Smith said, I draw a dream on a piece of paper about what I want in my life, write a daily note about the dream, and put it in front of my eyes in different ways.
- When famous businessman Azim Premji was asked about the secret of his success, he said, "Success in life comes twice, once in your own mind and another time in the real world!"
4) Exercise:
- Exercise is necessary to drive away laziness in the body, to keep the energy, strength and energy flowing in the body, to stay strong and happy in the mind!
- Suppose your body becomes lazy or your inner mind becomes corrupt!
- Through exercise, yoga, pranayama, if energy, strength, mind is not diverted, it turns to extra sex, and man becomes a slave to lusts.
- A person who is enslaved to bad habits in life loses consciousness, makes such a person uncomfortable to realize that he is alone.
- So he can't concentrate on anything, and so he can't be happy, an anonymous fear forms in his mind.
- The only way to break all this bad series is to exercise, do dips, sunbathe, do pullups, sweat on the treadmill,
- Keep the consciousness in the body alive.
5) Reading - Reading:
- People who always read books live many lives in one life.
- People who become wise by the experience of others rule the world as the saying goes.
- Warren Buffett, Bill Gates, Mark Zuckerberg all read at least two books a week.
6) Scribing - Writing:
I Im convinced that if I had not written during the depressing period of my life, I would not have survived today.
- Writing important things in life introduces you to a new person.
- Writing empties the inner mind, the sorrows of life disappear, new energy is transmitted to the mind.
- Writing opens the way to a new life, the share of new progress becomes clear.
- So the great yogi, Santani has said, should write something during the day.
- Writing is also an effective and excellent tool for self-communication.
- Writing strengthens one's own conduct and thoughts.
- Get up in the morning and write down what I'm going to do all day today.
- If there is a problem, it should be written down and the solution,
- Dreams should be drawn on paper by sending the inner mind to the sky of dreams.
- What am I going to do to fulfill those dreams, what should I do. Its planning, planning should also be written,
- And set yourself up every day, and when it is done, declare yourself victorious.
- The mind filled with writing was free, the burden of worries and various worries was lightened!
- Write letters to close people, relatives, friends, sometimes write inspiring stories.
- This is how the inner self blossoms, how the source of energy flows like a noisy spring.
Each of the above habits is life changing.
How many of the above six good habits have you inculcated in yourself? Think about it.
I have benefited a lot from all these habits in my personal life.
These habits will be useful to you too.
Say good deeds or say bad deeds, but now each of us has a lot of free time, free time ... that time should be wasted on reading negative, bad, dangerous posts and meditating on it to implement any one of the above It's up to you to decide ... it takes at least 21 days of practice to get used to anything ... and you will probably have more than 21 days left now ... so let's make good use of this time to build a strong mind and a strong body for future life. ...
Such a time and opportunity will not come again and it should not come .....
It is time to work on yourself .... to live for yourself ..... to take advantage of the situation .....
Also, don't waste time forwarding and reading scary messages ....
Want to worry, don't worry.