चैत्र पौर्णिमा
On Chaitra Pournima
सुजाताचे तथागत भगवान बुद्धांना खीरदान
'चैत्र पौर्णिमा' ही बौद्ध समूहाचा सण व मंगलदिन आहे. चैत्र पौर्णिमा / Chaitra Purnima - मराठी महिन्यांप्रमाणे ही वर्षारंभीची पहिली पौर्णिमा होय. या पौर्णिमेला बौद्ध धम्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीच्याकाळी रोहणी नावाची एक विशाल नदी होती. या नदीच्या पाणी वाटपाच्या भांडणावरून शाक्य जमात आणि कोलीय जमात यांच्यात सारखे भांडण होऊ लागले. शाक्य संघाने कोलीयांबरोबर युद्ध करण्याचे ठरविले. परंतू संघाच्या निर्णयाविरुद्ध सिद्धार्थ गेला. एकमताने युद्ध करण्याचे ठरले होते. परंतु सिद्धार्थ गौतमाने युद्धाला विरोध केला. मात्र त्याच्या मताला कोणीही सहमत झाले नाही आणि संघाने सिध्दार्थ गौतमाला शिक्षा केल्यावरुन वयाच्या २९ व्या वर्षी आषाढी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाने आपल्या सर्व ऐश्वर्याचा, परिवाराचा त्याग करून प्रवज्जा घेतली. वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमात ज्ञान संपादन करीत असताना सहा वर्षे लोटून गेली. मिळालेल्या ज्ञानाने त्याचे समाधान झाले नाही. शेवटी उरवेला येथे खडतर तपस्या करायची ठरवून ते डोंगर दरीत, झाडीत उपास तापास करू लागले. चार-चार सहा-सहा दिवस अन्न खात नव्हते. शरीर अस्थीपंजर झाले होते. असे करीत असता डुंगेश्वरी नावाच्या पर्वताच्या एका गुहेत (कपारीत) बसून घोर तपाचरण करू लागले. शरीर क्षीण, अशक्त झाले होते. चालता येत नव्हते. एक दिवस उठून चालले असता चक्कर येऊन पडले व शुद्धीवर आल्यावर त्यांनी ठरविले की, आपण अन्न ग्रहण केले तरच शरीर टिकेल, नाहीतर मृत्यू आपल्याला गाठेल. म्हणून त्यांनी ठरविले की, अन्न ग्रहण करावे. जवळच नदीच्या काठी एक वटवृक्ष होता, त्याखाली ते बसले.
या नैरंजना नदीच्या काठी सिद्धार्थ बसलेले असतांना एक विशेष अशी घटना घडून आली. या भागात सेनानी नावाचे गांव होते. त्या नगरीत सेनानी नावाचा एक श्रीमंत होता. त्याला सुजाता नावाची एक मुलगी होती. तिचे लग्न झाले होते. परंतु बराच काळ लोटला तरी तिला पुत्र प्राप्ती झाली नव्हती. परिवारात निराशा होती. सुजाताचे सासू-सासरे आपल्या मुलाचे दुसरे लग्न करण्याच्या बेतात होते. त्यामुळे सुजाता फार दुःखी होती. एक दिवस सुजाता आपल्या महालात रडत असतांना तिची दासी 'पुर्णा' महालात येते तर आपली मालकीण रडते आहे! ते पाहून ती विचारते, 'बाईसाहेब! आपण रडत आहात, कारण काय? तेव्हा सुजाता म्हणाली, 'मला पुत्र प्राप्ती होत नाही म्हणून माझे सासू-सासरे माझ्या पतीचा दुसरा विवाह करणार आहेत. मग माझे काय होणार?' तेव्हा पुर्णा म्हणते, 'बाईसाहेब! नैरंजना नदीकाठी एक वटवृक्ष आहे. त्यावर एक वनदेवता वास करते असे म्हणतात. त्या वनदेवतेला आपण नवस करावा, मागणे मागावे, पाहू तरी काय होते ते.' हे ऐकून सुजाताच्या मनात नवीन आशा उत्पन्न झाली. तिने तिथे जाऊन त्या वटवृक्षाला नवस केला की, मला जर पुत्र प्राप्ती झाली तर, मी गाईच्या दुधाची खीर दान करीन आणि पुत्र प्राप्तीची आशा मनी धरुन महालात परतली.
याठिकाणी वाचकांनी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, नवसाने, उपासाने किंवा देवपूजेने पुत्र प्राप्ती होत नाही. संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे, नवसे पोरे होती तर का करणे लागे पती|| हे ध्यानात ठेवावे. परंतु त्यावेळच्या प्रचलित रुढी प्रमाणे सुजाताने नवस केला. निसर्ग नियमाप्रमाणे तिला मुलगा झाला. तिच्या परिवारात फार आनंद झाला. तिने आपल्या परिवारासह सुवर्णपात्रात स्वादिष्ट खीर घेऊन जाण्याचे ठरविले होते. तिने आपली दासी पुर्णाला त्या वटवृक्षाखाली साफसफाई करण्यास पाठविले. पुर्णा ही दासी नदीकाठी आली असता सिद्धार्थ गौतम डुंगेश्वरी पर्वत उतरुन त्या वडाच्या झाडाखाली येवून शरीर क्षीण झालेल्या, थकलेले अशा अवस्थेत वडाच्या झाडाला टेकून बसलेले तिने पाहिले. पुर्णाला वाटले आपल्या मालकीणीचा नैवेद्य स्वीकारण्यास वनदेवता एक आजारी, अशक्त रुपात अवतरली आहे. ही आनंदाची बातमी तिने येऊन आपली मालकीण सुजातास सांगितली. 'बाईसाहेब, आपला नैवेद्य स्वीकारण्यास वृक्ष-वन देवता आज तिथे एका माणसाच्या रुपात अवतरली आहे. ही बातमी ऐकून सुजाताला फार आनंद झाला. ती म्हणाली, हे खरे असेल तर मी आजपासून तुला दास्यत्वातून मुक्त करते आणि तुला मुलीसारखे सांभाळीन. सुजाताने तिला खूप बक्षीस दिले. बाळास बरोबर घेऊन ती आपल्या परिवारासह नैरंजना नदीकाठी आली, तर खरोखर वटवृक्षाखाली बोधीसत्व सिद्धार्थ हाडांचा सापळा झालेल्या अवस्थेत बसले होते. तिने बोधीसत्वास पाहिले आणि खरोखरच वनदेवताच आहे असे तिला मनोमन वाटले. तिने प्रथम वंदन केले. बरेच दिवस अन्न न घेतल्यामुळे बोधीसत्वाचे मन स्थिर नव्हते. आपण जर अन्न घेतलेच नाही तर मृत्यूचे संकट येईल. आपण जगण्यासाठी अन्नग्रहण केलेच पाहिजे असे मनी ठरविले होते. त्याच दिवशी सुजाता आपला नवस पुरा करण्यासाठी आली होती. ती बोधीसत्वासमोर आपण आणलेल्या खीरीचे सुवर्ण पात्र घेऊन बसली आणि म्हणाली - 'हे वनदेवते, माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. मला आपल्या कृपेने पुत्र प्राप्ती झाली आहे. त्यामुळे माझे जीवन सार्थकी लागले आहे. ही सारी तुझी कृपा आहे. तेव्हा आपणांस मी बोलल्याप्रमाणे गाईच्या दुधाची खीर नैवेद्य म्हणू आणली आहे. आपण तिचा स्वीकार करावा. अशी विनंती करते.' हे सुजाताचे शब्द ऐकून तथागत म्हणाले -
"माते, मी कोणी देव नाही. देवाचा दूत नाही. तुझ्यासारखाच मानवाचा राजा शुद्धोदन आणि महामाया यांचा पुत्र आहे. मी सत्याचा शोध घेण्यासाठी, दुःखाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी, वैरभावाचा शोध घेण्यासाठी हे तपाचरण करीत आहे. माते, खरोखरच मला ज्ञानप्राप्ती व्हावी अशी शुभेच्छा व आशिर्वाद दे आणि तुझे खीरीचे भोजन सुखदायक ठरो अशी मला अपेक्षा आहे. तुझे कल्याण होवो. मंगल होवो, अशी अपेक्षा करतो." सुजाताने हातातील खीरीचे पात्र बोधीसत्वाच्या हाती दिले आणि म्हणाली - 'माझे मनोरथ जसे पूर्ण झाले, तसे आपलेही मनोरथ पूर्ण होवोत. आपण शोध घेत आहात त्या ज्ञानाची आपणांस प्राप्ती होवो.' अशी शुभकामना व्यक्त केली. सिद्धार्थ गौतम सुजातास म्हणाले - "माते, मला सत्याचा शोध घेण्यामध्ये तुझी खीर लाभदायक ठरो." असे शुभचिंतन करून त्या खीरीचा स्वीकार केला. नैरंजना नदीकाठी जाऊन स्नान केले आणि सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर बसून त्या खीरीचे सेवन केले. तो दिवस चैत्र पौर्णिमेचा होता. या स्थळी आपणांस भगवान बुद्धांची मूर्ती बसविलेली पाहण्यास मिळते. सुजाता खीरीचे पात्र हातात घेऊन समोर बसलेली आहे अशी ही मुर्ती आहे. या गावाला सुजाताचे गांव किंवा 'बकरोल' असे म्हणतात.
सुजाताची खीर सेवन केल्यावर सिद्धार्थ गौतम नदीतून गया प्रांतात जात असताना स्वाथिय नावाच्या शेतक-याने गवताची पेंढी दिली. त्या प्रसंगाचे पुतळे नदीकाठी आहेत. बोधीसत्व गयेत येतात आणि पिंपळाच्या झाडाखाली पूर्वेला मुख करून ध्यानसाधना करण्यास बसतात. तिथे एक संकल्प करतात की, माझे रक्त आटले, शरीर सुकले तरी मी ज्ञान प्राप्ती झाल्याशिवाय या आसनावरुन उठणार नाही. चार आठवड्यांनी, म्हणजे वैशाखी पौर्णिमेला त्यांना संबोधी प्राप्त झाली. असे या चैत्र पौर्णिमेचे महत्व आहे. या चैत्र पौर्णिमेला बौद्ध धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभ कामना.
English translation
On Chaitra Pournima
Sujata's Tathagata to Lord Buddha
'Chaitra Pournima' is a Buddhist festival and Tuesday. Chaitra Purnima - Like Marathi months, this is the first full moon of the year. This full moon has a unique significance in the Buddhist Dhamma. In the past, there was a huge river called Rohini. The dispute over the distribution of water in this river led to similar quarrels between the Shakya tribe and the Koliya tribe. The Shakya team decided to go to war with the Koliyas. But Siddharth went against the decision of the team. It was decided to go to war by consensus. But Siddhartha Gautama opposed the war. However, no one agreed with his opinion and after the team punished Siddharth Gautama, at the age of 29, on the Ashadi full moon day, Siddharth Gautama gave up all his wealth and family and took Pravajja. Six years passed while acquiring knowledge in the ashrams of different sages. He was not satisfied with the knowledge he gained. Eventually, they decided to do hard penance at Urvela and started fasting in the bushes in the mountain valley. He did not eat for four or six days. The body had become a skeleton. While doing so, he sat in a cave (kapari) of a mountain called Dungeshwari and began to do great penance. The body was emaciated. Could not walk. One day when he woke up, he felt dizzy and when he regained consciousness, he decided that only if he ate, his body would survive, otherwise death would overtake him. So they decided to eat. Nearby was a banyan tree by the river, under which they sat.
A special incident took place while Siddhartha was sitting on the banks of the river Naranjana. There was a village called Senani in this area. In that city there was a rich man named Senani. He had a daughter named Sujata. She was married. But after a long time, she did not have a son. There was frustration in the family. Sujata's in-laws were planning to remarry their son. So Sujata was very sad. One day while Sujata is crying in her palace, her maid 'Purna' comes to the palace and her mistress is crying! Seeing that, she asks, 'Baisaheb! You are crying, because what? Then Sujata said, 'I am not having a son so my in-laws are going to marry my husband again. What will happen to me then? ' Then Purna says, 'Baisaheb! There is a banyan tree on the banks of the river Naranjana. It is said that a forest deity smells on it. We should make a vow to that forest deity, ask for it, let's see what happens. ' Hearing this, new hope arose in Sujata's mind. She went there and vowed to the banyan tree that if I had a son, I would donate cow's milk pudding and returned to the palace hoping to have a son.
The important thing the reader should keep in mind here is that a son is not obtained through Navsa, fasting or worship of God. According to Saint Tukaram's Abhanga, if Navse was young, then why should a husband || Keep this in mind. But according to the prevailing norms of the time, Sujata vowed. She gave birth to a son according to the laws of nature. Her family was very happy. She had decided to take delicious kheer with her family in a gold bowl. She sent her maid Purna to clean under the banyan tree. When Purna Dasi came to the river bank, she saw Siddhartha Gautam descending the Dungeshwari mountain and coming under the Vada tree, leaning on the Vada tree in a state of exhaustion and exhaustion. Purna felt that the forest deity had come down in a sick, weak form to accept the offerings of his mistress. She came and told this good news to her mistress Sujata. Baisaheb, the tree-forest deity has come down there today as a man to accept your offering. Sujata was very happy to hear this news. She said, "If this is true, I will free you from slavery and treat you like a girl from today." Sujata gave her a lot of rewards. Taking the baby with her, she came to the Naranjana river with her family, while Bodhisattva Siddhartha was sitting under a banyan tree in a trap of bones. She saw Bodhisattva and thought to herself that it was really a forest deity. She saluted first. The Bodhisattva's mind was not stable because he had not eaten for many days. If we don't eat, we will die. Money had decided that we must eat to survive. On the same day, Sujata came to fulfill her vow. She sat down in front of the Bodhisattva with the golden bowl of kheeri she had brought and said - 'O forest deity, my wish has come true. I have a son by your grace. So my life has become meaningful. This is all your grace. So, as I said, cow's milk kheer has been brought to you as an offering. You should accept her. Makes such a request. ' Hearing these words of Sujata, Tathagata said -
"Mother, I am not a god. I am not an angel of God. A human king like you is the son of Shuddhodana and Mahamaya. I am doing this to find the truth, to find the cause of sorrow, to find enmity. I hope your meal will be pleasant. I wish you well. I wish you well. " Sujata handed over the kheeri in her hand to the Bodhisattva and said - 'May my desires be fulfilled as well as yours. May you have the knowledge you are looking for. ' Expressed such good wishes. Siddhartha Gautam said to Sujatas - "Mother, may your kheer be useful to me in seeking the truth." With such good wishes, he accepted that kheeri. Naranjana went to the river and took a bath and sat on a ghat called Suppatitha and drank the kheeri. That day was Chaitra full moon. In this place you can see the idols of Lord Buddha. This idol is sitting in front with Sujata Khiri's character in her hand. This village is called Sujata's village or 'Bakrol'.
After consuming Sujata's kheer, Siddhartha was on his way to Gaya from Gautam river when a farmer named Swathiya gave him straw. Statues of that occasion are by the river. The Bodhisattvas come to Gaya and sit under the Pimpal tree facing east, meditating. There is a resolution that even if my blood is dried and my body is dry, I will not get up from this seat until I have attained knowledge. Four weeks later, on the full moon day of Vaishakhi, he received an address. Such is the significance of this Chaitra full moon. This Chaitra Pournima has a unique significance in Buddhism.
On the occasion of Chaitra Pournima, best wishes to all.