सागराचे आत्मवृत्त किंवा सागराचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध)

सागराचे आत्मवृत्त
किंवा
सागराचे मनोगत
आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध 



मुद्दे : कवींनी केलेला सागराचा उल्लेख - धरित्रीचा सहोदर - मानवाचा विचार - अथांगता - सर्वस्वाचा स्वीकार - नद्यांचे पाणी खारट करतो हा माझ्यावर आरोप - मिठाची गरज - निर्माण करण्याची क्षमता - जलचर, मासे - रत्नाकर, इंधन - सजीवांचे जीवन - दुसऱ्यांसाठी जगलास तरच जगलास - भारतमातेच्या तिन्ही बाजूंना मी वेढलेले आहे...


     "मी आहे सागर. 'किनारा तुला पामराला!' असे अधिक्षेपाने कवी कुसुमाग्रज यांनी मला सुनावले. 'सागरा प्राण तळमळला' असे विनवत कवी सावरकरांनी मातृभूमीला नेण्यासाठी माझी आळवणी केली. तरीसुध्दा हे भारतमातेच्या पुत्रांनो, मी कुणी परका का आहे? मी तर धरित्रीचा सहोदर. धरित्री आणि मी बरोबरच अवतरलो. मग मी तुमचा मामा नाही का? मी सदैव तुमचाच विचार करतो. तुमच्या हिताची काळजी वाहतो. तुमच्या यशाने उचंबळून येतो."


     "माझ्या अथांगतेचा तुम्ही उल्लेख करता. माझे मन केवढे अथांग, विशाल आणि विस्तीर्ण आहे, याची तुम्हाला कल्पना आहेच. तुम्हाला मी तुमच्या सर्व गुण-दोषासह व चांगले-वाईट विचारसह पूर्णपणे स्वीकारतो, कारण तुम्ही माझेच आहात. डोंगरावरून वाहणाऱ्या नद्या माझ्यात समर्पित होतात. सरिताचे गोड पाणी मी खारट करतो असा माझ्यावर आरोप केला जातो, पण हे माझे पाणी खारट का होते, याचा कुणी कधी विचार करतो का? आणि मित्रांनो, माझे हे पाणी चवीला खारट नसते तर तुमचे संपूर्ण जीवन अळणीच राहिले असते. मीठ मोठया प्रमाणात तयार करण्याची क्षमता या माझ्या खारट पाण्यातच आहे. महात्मा बापुजी साबरमतीहून माझ्या तीरावर मीठ उचलला आले ना तेव्हा मला धन्य वाटले होते."


     "अरे, तुमच्या जेवणातील चवदारपण, लज्जतदारपणा मी वाढवतो ते माझ्यातील जलचर संपत्तीमुळे! वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचबरोबर नानाविध चवींचे मासे तुमच्यातील काहीजण मोठ्या आवडीने खातात. माझ्या पोटात तन्हेतऱ्हेची रत्ने आहेत, म्हणून तर तुम्ही मला 'रत्नाकर' या नावाने संबोधता."


     "हे आधुनिक युगातील प्रगतशील मानवा, आज तुझे संपूर्ण जीवनच गतीमान अन आयुष्यामध्ये विलक्षण गती आली आहे. या गतीला इंधन हवे असते. ते इंधनही मी मिळवून देतो. इतकेच काय! सर्व सजीवांचे जीवनच माझ्यावर अवलंबून आहे. माझ्या पाण्यापासून बाष्प तयार होते तेव्हाच तुम्हाला पाऊस मिळतो. ते पाणी म्हणजेच तुमचे जीवन!"


     "दोस्तांनो, जो दुसऱ्यासाठी जगला तोच खरोखर जगला. आज माझ्या मदतीने तुम्ही दूरवरच्या खंडातून फिरू शकता तेव्हा मनाला खूप बरे वाटते. नव्या खंडाचा शोधही मी तुम्हाला लावून दिला. भारतमातेच्या तर तिन्ही बाजूंना मीच पसरलेलो आहे. तेव्हा मला तुमचा सहवास द्या, एवढेच माझे सांगणे आहे. त्यात माझी कृतार्थता आहे."


Autobiography of the Sea
 Or
 The mind of the sea
 Autobiographical Essay / Essay on Autobiography


 Points : Mention of the ocean by the poet - Brother of the Earth - Human thought - Infinity - Acceptance of everything - Salt of river water is an accusation against me - Need for salt - Ability to create - Aquatic, fish  I am surrounded on all three sides ...


 "I am the sea. '  The poet Kusumagraj told me this with a sigh of relief. The poet Savarkar begged me to take him back to his motherland.  Why? I always think of you. I care about your interests. I am overwhelmed by your success. "


 "You mention my endlessness. You have no idea how endless, vast and wide my mind is. I accept you with all your merits and demerits and good and bad thoughts, because you are mine. The rivers flowing down the mountain are devoted to me."  I am accused of making salt water salty, but does anyone ever wonder why my water is salty?  It is in my salt water. I was blessed when Mahatma Bapuji brought salt from Sabarmati to my shore. "


 "Oh, I add to the taste and flavor of your food because of my aquatic wealth! Some of you like to eat different kinds of fish of different tastes. I have gems in my stomach, so you call me 'Ratnakar'."


 "O progressive man of the modern age, today your whole life has been moving at a tremendous pace. Life needs fuel for this speed. I get that fuel too. That's all! The life of all living beings depends on me. You get rain only when steam is formed from my water."  That water is your life! "


 "Friends, the one who lived for the other really lived. Today, with my help, you feel better when you can travel across distant continents. I have also given you the invention of a new continent.  That is my success. "