शाळेची घंटा बोलू लागते... (आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध)

 शाळेची घंटा बोलू लागते...
आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध



मुद्दे : शाळेतील घंटा - विद्यार्थ्यांच्या जीवनातील तिचे स्थान - विशिष्ट कार्य - विद्यार्थी नसताना सोसावा लागणारा एकटेपणा - कर्तव्य - विद्यार्थ्यांच्या मनातील आदराचे स्थान...


     मे महिन्याचे दिवस होते. विद्यार्थ्यांना मोठी सुट्टी होती. शाळा रिकामी, ओस पडली होती. फक्त शाळेच्या कचेरीतील मंडळी आपल्या कामात मग्न होती आणि अचानक घंटा घणघणू लागली 'घण् घण् घण् घण्.' त्यामुळे कचेरीतील माणसे बाहेर आली. शाळेचे सर्व शिपाई पण घंटेजवळ जमा झाले. त्यामध्ये नेहमी घंटा वाजवणारा रघूही होता. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता कोणीही घंटा वाजवत नव्हते, पण घंटा वाजत होती आणि पुढचे नवल म्हणजे वाजणारी घंटा अचानकपणे बोलू लागली -


     "लोकहो, मला अगदी कंटाळा आला आहे या एकाकीपणाचा. किती दिवस झाले माझी मुले मला भेटली नाहीत. कधी संपणार ही सुट्टी! कधी जाणार हा जीव घेणारा करोना! शाळा चालू असली की माझा हा परिसर गजबजलेला असतो. तुम्ही ज्याला गोंगाट गोंधळ म्हणून नावे ठेवता, ती मुलांची गडबड मला खूपच आवडते. त्याआवाजाने माझे शरीर रोमांचित होते. तोच गोंधळ मला नेहमी शक्तिवर्धक ठरतो."


     "शाळेच्या बरोबर मध्यावर, सर्वांना ऐकू येईल अशा ठिकाणी मला स्थान मिळाले आहे. मला आठवतेय, ही शाळा सुरू झाली, तेव्हा मुले येण्यापूर्वीच माझी स्थापना करण्यात आली आणि तेही पूजा-अर्चा करून. त्यामुळे शाळेत होत घडत असलेल्या प्रत्येक घटनांची मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. माझी निवड एका शाळेसाठी झाली, हाही माझा मी मोठा गौरव समजते."


     "खाणीमधून काढलेला धातू, स्वच्छ करून एका कारखान्यात पाठवला गेला. तेथे इतर काही धातूंचे त्यात मिश्रण करण्यात आले. हेतू हा की माझे काठिण्य वाढावे. मी काटक व्हावे. मग एका विशिष्ट साच्यातून मी घडले. माझ्यासोबतच तयार झालेल्या माझ्या इतर काही लहान मोठ्या भगिनी होत्या. नंतर हा लंबकाचा दांडा माझ्या गळ्यात घातला गेला व  मग मला चकचकीत पॉलिश करण्यात आले. आम्हाला घंटेचे रूप प्राप्त झाल्यानंतर आमचा वेगवेगळ्या मार्गांनी प्रवास सुरू झाला."


     "माझ्या काही बहिणी देवळात गेल्या, काही आग विझवणाऱ्या बंबावर स्थानापन्न झाल्या, तर काही रुग्णवाहिकांत जाऊन बसल्या. काही छोट्या छोट्या बहिणी 'आईस फ्रूट' च्या गाडी वर चढल्या, तर कुणाची कचरा गोळा करण्याच्या गाडीवर नेमणूक झाली. तेथून कारखान्यातून मी सरळ या सरस्वती मंदिरात आले, हे माझे फार मोठे भाग्यच."


     "शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात मला फार महत्व असते. ती एकमेकांना सांगत असतात. 'चल, अरे लवकर. घंटा चुकायला नको.' म्हणजे मी त्यांना वेळेची शिस्त लावते. एखाद्या कंटाळवाण्या तासातून त्यांची सुटका करते. त्यांची आवडती 'मधली सुट्टी' झाली हे त्यांना कळवते आणि शाळा सुटण्याच्या वेळी तर गजर करून माझ्या कोकरांना कळवते - 'चला, शाळा सुटली आता घराकडे पळा.'  असे विद्यार्थ्यांच्या जीवनात मला मोठे स्थान आहे."


     "या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी होते. शाळेत गणपती बसतो. तेव्हा आरतीच्या वेळी रघु मला हि वाजवतो. शाळेतील एखाद्या संघाने यश मिळवले की तो आनंदही मी जाहीर करते. पण एखाद्या दुःखद प्रसंगी मी मौन धारण करते."


     "अशी मी शाळेशी एकजीव झाले आहे. मुलांच्या विरहाने व्याकूळ होऊनच मी गजर केला. जरा चुकलेच माझे. माफ करा. असो....." बोलणारी घंटा गप्प झाली.


The school bell rings ...
 Autobiographical Essay / Essay on Autobiography


 Points : The school bell - its place in the life of the student - the specific task - the loneliness to be borne in the absence of the student - the duty - the place of respect in the mind of the student ...


 It was May.  The students had a big holiday.  The school was empty, dewy.  Only the congregation in the school office was busy with their work and suddenly the bell started ringing.  So the men in the office came out.  All the soldiers of the school gathered around the clock.  There was also Raghu who always rang the bell.  Everyone was shocked.  Now no one was ringing the bell, but the bell was ringing and the next surprise was that the bell suddenly started ringing -


 "People, I'm so tired of this loneliness. How many days have my children not met me. When will this holiday end! When will this life-giving Karona go! When school is on, this area of ​​mine is crowded. What you call noisy mess,"  I love the noise of the children. My body is thrilled by the sound. That confusion always strengthens me. "


 "Right in the middle of the school, in a place where everyone can hear. I remember, when the school started, I was established before the children came, and that too with pooja-archa. So I am a direct witness of everything that happens in the school.  The choice was made for a school, and I am very proud of that. "


 "The metal from the mine was cleaned and sent to a factory. Some of the other metals were mixed there. The purpose was to increase my hardness. I had to be sharpened.  Then this pendulum was put around my neck and then I was polished. After we got the shape of the bell, we started our journey in different ways. "


 "Some of my sisters went to the temple, some got on the fire extinguisher, some got into the ambulance.  This is my great fortune. "


 "I am very important in the life of school children. They keep telling each other, 'Come on, hurry up. Don't miss the bell.'  I mean, I discipline them with time, relieve them of a boring hour, let them know that their favorite 'middle break' is over, and alarm my lambs when they leave school - 'Come on, run home now.'  That's the decent thing to do, and it should end there. "


 "I used to participate in every program of this school. Ganpati sits in the school. Then Raghu plays me during Aarti. I also express my happiness when a team in the school succeeds. But on a sad occasion, I remain silent."


 "That's how I got along with the school. I was alarmed by the loss of the children. I made a mistake. I'm sorry. Anyway ..."