...आणि अंदमानचा तुरुंग बोलू लागला!
आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध
मुद्दे : पर्यटकांच्या सोबत अंदमानला भेट - समुद्रकिनारी भव्य ऐतिहासिक वास्तू - पूर्वेतिहास - पोर्ट ब्लेअर - अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्यलढा - वाईट हवामान - स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याचे पुनीत - चिरंजीव - सावरकरांचे स्मारक - शहीद द्वीप...
गेल्या वर्षी काही पर्यटकांसमवेत आमच्या कुटुंबाने ऐतिहासिक वास्तू असलेल्या अंदमानच्या तुरुंगाला भेट दिली. प्रवाशांना आपले माहात्म्य माहीत नव्हते म्हणून अंदमानचे ते कारागृह अस्वस्थ झाले होते आणि अचानक कडकडाट झाला. सगळेजण, चमकून पाहू लागले, कारण अंदमानचा तुरुंग बोलू लागला होता...
"अहो पर्यटकहो, माझी जीवन कहाणी तुम्हाला माहीत नाही. एक काळ असा होता की येते चाव्यांचे वर्चस्व होते. त्यांनी इंग्रजांच्या नौका लुटण्याचे सत्र आरंभले होते. तेव्हा १७८९ मध्ये कॅ. ब्लेअर आपल्या आरमारी तुकडीसह येथील बंदरात उतरला. त्याच्या कर्तुत्वाचे स्मारक म्हणून या बंदराला नाव दिले गेले 'पोर्ट ब्लेअर.'
"पर्यटकहो, मी - अंदमानचा तुरुंग तेव्हा 'पोर्ट ब्लेअरचा तुरुंग' म्हणून प्रसिद्ध होतो. अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्या शेकडो देशभक्तांना माझ्या ठायी बंदिस्त केले गेले होते. आधीच येथील हवामान विलक्षण उष्ण, दमट, डास, जळवा यांचा विलक्षण त्रास. त्यात राजबंद्यांना मिळणारी वागणूक अमानुष व अंगावर शहारे आणणारी. त्यामुळे कैद्याला अंदमानला पाठवणे म्हणजे 'काळ्या पाण्यावर पाठवणे' असेच बोलले जाई."
"खरं तर माझा आत्मा खूप समाधानी आणि प्रसन्न झाला तो येथील वीर सावरकरांच्या वास्तव्याने. १९११ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन जन्मठेपांची सजा होऊन त्यांना माझ्याकडे सुपूर्द केले गेले. या घटनेच्या दोन वर्ष अगोदर म्हणजेच १९०९ मध्ये त्यांचे बंधू बाबाराव यांनाही माझ्याच कोठडीत टाकण्यात आले होते. तुरुंगाधिकारी बारी या देशप्रेमींना अतिशय छळत असे. स्वातंत्र्यवीरांच्या हातात बेड्या तसेच पायात साखळदंड घातलेले असत. त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात आल्या. अगदी तळपत्या उन्हात सावरकरांना कोलू फिरवावा लागला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी येथील सर्व बंद्यांच्या मनात स्वातंत्र्याच्या विचारांचे लोण पसरवले. शेवटी १९२१ साली सरकारने 'सावरकर बंधूं' ना येथून हलवले. पण त्यांच्या वास्तव्याने मी चिरंजीव झालो. माझ्या या पाषाणकायेवर त्या स्वातंत्र्यवीराने आपली कविता लिहिली."
"मुसाफिरांनो, माझ्या ठिकाणी या महान स्वातंत्र्य सेनानीचे स्मारक उभारण्यात आली आहे. ते अवश्य पहा. या प्रांगणात आज रुग्णालय उभारण्यात आले आहे. माझे अंदमान हे नाव बदलून 'शहीद द्वीप' असे करण्याचा विचारही आहे. तेव्हा येते आला आहात तर हा पवित्र इतिहास समजून घ्या." अचानक आवाज बंद झाला. कारागृहाचे मनोगत ऐकून सारे पर्यटक स्तिमित झाले होते.
... and the Andaman prison began to speak! Autobiographical Essay / Essay on Autobiography
Points : Visit to Andaman with Tourists - Beach Historic Monuments - Prehistory - Port Blair - Eighteen Hundred and Fifty-seven Freedom Fight - Bad Weather - Swatantryaveer Savarkar's Residence Puneet - Chiranjeev - Savarkar's Memorial - Shaheed Island ...
Last year, our family, along with some tourists, visited the historic Andaman prison. The Andaman prisons were in turmoil as the passengers did not know his majesty. Everyone started glaring, because the Andaman prison was talking ...
"Tourists, you don't know my life story. There was a time when keys were predominant. They had begun the British looting season. When Blair landed at the port in 1789 with his armored personnel carrier, the port was named after him. Gone to 'Port Blair.'
"Tourists, I - Andaman Prison was then known as 'Port Blair Prison'. Hundreds of patriots who participated in the War of Independence of 1857 were detained at my place. The treatment was inhumane and brought the city to its knees. Therefore, sending a prisoner to the Andamans was tantamount to 'sending him on black water'.
In fact, my soul was very satisfied and pleased with the presence of Veer Savarkar here. In 1911, Swatantryaveer Savarkar was sentenced to two life sentences and handed over to me. These patriots were severely persecuted. Freedom fighters were handcuffed and chained to their feet. They were given the most severe punishment. Na moved from here. But I was immortalized by their existence. That freedom fighter wrote his poem on this rock of mine. "
"Travelers, a monument to this great freedom fighter has been erected in my place. You must see it. A hospital has been erected in this precinct today. I am also planning to change the name of Andaman to 'Martyr's Island'. . " Suddenly the sound stopped. All the tourists were stunned to hear the thoughts of the prison.