कवी नसते तर...
कल्पनाविलासात्मक निबंध / कल्पनाप्रधान निबंध
मुद्दे : कवितांची आवड - पाठांतर - वकृत्व सभा गाजवण्यास मदत - विश्वातील सुंदरता कोणी दाखवली असती? -धोंड्यांमधूनी दिसते कवीला - सुखदुःखाच्या क्षणी काव्य मदतीला - बाळाला अंगाईगीत - गाण्यामुळे श्रम हलके वाटतात - स्वानंदासाठी काव्य - पण प्रसिद्धीनंतर हे काव्य सर्वांची - काव्य भारताचे अनमोल भांडार - कवी नसते तर मानवी जीवन कवडीमोल.
लहानपणापासून मला कविता खूप आवडतात. कविवर्य केशवसुत, तांबे, यशवंत, कुसुमाग्रज, माधव जूलियन, कवयित्री इंदिरा संत आणि पद्मा गोळे यांच्या कितीतरी कविता मला पाठ आहेत. लहानपणापासून वकृत्व सभांतून भाषणे करण्याची मला आवड आहे. अशा प्रसंगी या कवितांतील पंक्ती अनेकदा माझ्या मदतीला येतात. एकदा वकृत्व स्पर्धेत मी 'सामाजिक विषमता' या विषयावर भाषण केले. अनेक उदाहरणे देत शेवटी मी केशवसुतांच्या कवितेतील ओळ म्हटली, "पूजितसे मी कवणाला? तर मी पूजि आपल्याला. आपल्यामध्ये विश्व पाहूनी पूजितसे मी विश्वाला.' टाळ्यांचा कडकडाट झाला. कवी केशवसुतांच्या या काव्यपंक्ती माझ्या मदतीस आल्या नसत्या तर?
कवी नसते तर विश्वातील सुंदरतेला आपण मुकलो असतो. 'काचेमधूनी दिसते जगाला! धोंड्यामधूनी दिसते कवीला.' कवीचा 'पाणिस्पर्श' च कोणत्याही गोष्टीला अनुपम सौंदर्य प्राप्त करून देतो. पारध्याने क्रौंच पक्ष्यावर रोखलेल्या बाणाकडे पाहून कवी वाल्मिकींच्या हृदयाला वेदना झाल्या व भावनोत्कट उद्रेकातून एका अमर काव्याचा जन्म झाला. तेव्हापासून प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी काव्य माणसाच्या मदतीला येते. कवी नसते तर हे 'काव्य' कसे निर्माण झाले असते?
बाळाला झोपवण्यासाठी आई अंगाईगीत गाते. जात्यावर बसलेली स्त्री ओव्या गाते. मोठी ओझी उचलणारे मजूर, मोटेवरचा शेतकरी, सैन्यात कूच करणारे सैनिक 'गाणे' गातात. कारण 'गाण्याने श्रम हलके वाटतात.' कवी नसते तर त्यांच्या ओजस्वी गीतांतून उत्साह प्रेरित करणाऱ्या या मोठ्या वैभवाला आपण मुकलो असतो.
कवी काव्य करतो ते स्वानंदासाठी, पण कवीचे प्रसिद्ध झालेले काव्य सर्वजणांचे होते. मग ते रामदासांनी लिहिलेले असो वा नरसी मेहतांने रचलेली असो. संतांनी रचलेली आरती सर्व भक्तांची होते. नामदेवांचा अभंग गात हजारो भक्त ईश्वर चिंतनात दंग होतात.
वाल्मिकींचे रामायण, व्यासांचे महाभारत हा साऱ्या भारतीयांचा अनमोल ठेवा आहे. कालिदासाचे काव्य, रवींद्रनाथांची कविता भाषांची बंधने तोडून, दिक्कालांच्या मर्यादा ओलांडून विश्वाच्या होतात. मानवाच्या जीवनात प्रत्येक क्षणाशी काव्य निगडीत आहे. काव्य मनाला फुलवते, प्रेरणा देते. हळुवार बनवते. जोश निर्माण करते. म्हणून केशवसुतांच्याच बंडखोर शब्दात सांगावे लागते की, कवी नसते तर हे जीवन कवडीमोल ठरले असते.
If there is no poet ... Imaginative Essay / Imaginary Essay
Points : Love of Poems - Recitation - Eloquence Helping to Hold Meetings - Who would have shown the beauty of the universe? -Poetry is seen from the rocks - Poetry to help in moments of happiness and sorrow - Baby lullabies - Singing makes labor feel light - Poem for Swananda - But after publicity, this poem belongs to everyone - Poetry is India's precious treasure - If not a poet, human life is worthless.
I have loved poetry since childhood. I have read many poems by poets like Keshavsut, Tambe, Yashwant, Kusumagraj, Madhav Julian, Indira Sant and Padma Gole. Ever since I was a child, I have loved to give speeches in public meetings. On such occasions the lines in these poems often come to my aid. I once gave a talk on 'Social Inequality' in a speech contest. Giving many examples, at the end I would say the line in Keshavsuta's poem, "I worship you as I worship you, but I worship you. I worship the world by seeing the world in you." There was a round of applause. What if these verses of poet Keshavsut had not come to my aid?
If it were not for the poet, we would have lost the beauty of the universe. 'The world looks through glass! The poet is seen through the rocks. ' The poet's 'touch of water' alone gives a unique beauty to anything. Poet Valmiki's heart ached when he saw the arrow resting on the crouching bird by Pardhya and an immortal poem was born out of an emotional outburst. Since then, in every moment of happiness and sorrow, poetry comes to the aid of man. How could this 'poetry' have been created without a poet?
The mother sings the lullaby to put the baby to sleep. The woman sitting on the caste sings ova. Laborers carrying heavy loads, fat farmers, marching soldiers sing 'songs'. Because 'singing makes labor feel light.' If it were not for the poet, we would have missed out on this great glory that inspires excitement through his energetic songs.
The poet writes poetry for Swananda, but when the poet became famous, the poetry belonged to everyone. Whether it was written by Ramdas or composed by Narsi Mehta. The Aarti composed by the saints belonged to all the devotees. Thousands of devotees are stunned by Ishwar Chintan while singing Namdev's Abhang.
Valmiki's Ramayana, Vyas's Mahabharata is a precious treasure of all Indians. Kalidasa's poetry, Rabindranath's poetry breaks the bonds of language, transcends the boundaries of Dikkala and becomes universal. Poetry deals with every moment of human life. Poetry infuses the mind, inspires. Makes it smooth. Creates passion. Therefore, in Keshavsutan's rebellious words, it has to be said that without the poet, this life would have been worthless.