भाजीबाजारातील फेरफटका (वर्णनात्मक निबंध )
मुद्दे : आवडते काम - भाज्यांचे विविध प्रकार - रंग आणि आकार - फळभाज्या, पालेभाज्या - प्रत्येक भाजीचे वैशिष्ट्य - भाज्यांचे सुवास - चैतन्यमय - आगळे वेगळे भाजीविक्रेते - ग्राहकांच्या विविध तऱ्हा - खरेदी विक्रीतील चढाओढ - भोवताली घडणारे जीवनदर्शन....
माझ्या आवडत्या कामातील एक काम आहे, भाजी बाजारातील फेरफटका. माझ्या काही मित्रांना माझ्या या आवडीचे मोठे नवल वाटते. त्यांना मी नेहमी म्हणतो, " एकदा फेरफटका तर मारा भाजीबाजारात! मग तुम्हाला भाज्यांची नवलाईची दुनिया कळेल.
गरगरीत लाल भोपळे, फुगलेली दुधी, लांबसडक पडवळे, तुकतुकीत जांभळ्या रंगाची वांगी, हिरवीगार तोंडली, हिरव्या भोपळी, मिरच्यांप्रमाणे लाल आणि पिवळा पोशाख घातलेल्या भोपळी मिरच्याही हल्ली आपल्या स्वागताला भाज्यांच्या गाळ्यात तयार असतात. पांढऱ्याशुभ्र फ्लावर बरोबर हिरव्या रंगाचा फ्लॉवर ही आजकाल दिसतो. फळांच्या विभागातील ती रंगीबेरंगी तजेलदार मंडळी तर आपले मन नुसत्या दृष्टिक्षेपाने तृप्त करतात.
फळभाज्यांच्या विभागातून बाहेर पडावे, तर पालेभाज्या आपल्या स्वागतासाठी सज्ज! त्यांचा तो हिरवा ताजेपणा माणसाला खुणावत असतो. पालेभाज्यांपुढचे लाल गरगरीत टोमॅटो आपले लक्ष वेधून घेतात. हिरव्या मिरच्यांचा वास नाकात शिरला की कसा जिवंतपणा येतो आणि कोथिंबीर - ती तर प्रत्येक पदार्थाची लज्जत वाढवत असते.
मला भाजीविक्रेत्यांबद्दल ही कुतूहल वाटते. केवढा अभिमान असतो त्यांना आपल्या मालाबद्दल! केवढे सजवत असतात ते आपल्या मालाला... आणि हा अभिमान व्यक्त करण्याची रीतही प्रत्येकाची न्यारी! मटार, शेंगा, आंबे यांच्या हंगामाच्या दिवसांत तर विक्रेत्यांच्या आरोळ्यांनी मंडई गजबजलेली असते. आपण ओरडलो नाही तर आपला माल विकला जाणार नाही, असेच जणू त्यांना वाटत असते. ग्राहकांना आकर्षून घेताना काहीजण 'काव्यात्मक पंती' आळवत असतात.
या विक्रेत्यांप्रमाणे ग्राहकांच्याही अनेक तऱ्हा या भाजी बाजारात नजरेस पडतात. काहीजणांना भाज्या उगाचच चाचपून पाहण्याची, वरखाली करण्याची खोड असते. काही जणू दुरूनच भाज्या न्याहाळतात. काहीजण भाजीच्या भावाबद्दल घासाघीस करतात. काही ग्राहक उगाचच विक्रेत्याशी भावाबद्दल वाद घालतात आणि बराच वेळ घालवून किरकोळ खरेदी करतात. आपण फसवले तर जात नाही ना, हाच भाव त्यांच्या चेहर्यावर असतो. त्याच वेळी कोपऱ्यात टाकून दिलेल्या भाजीतून स्वतःच्या पोटासाठी भाजीपाला निवडणारी - वेचणारी गरीब मुले - बायका दिसल्या की आपल्यालाही पोटात पिळवटून येते. अशाप्रकारे ही भाजी मंडई समाजजीवनाचे एक छोटे चित्ररूप दर्शनच घडवते.
Vegetable Market Tour (Descriptive Essay)
Points : Favorite work - Different types of vegetables - Colors and shapes - Fruits, leafy vegetables - Features of each vegetable - Fragrance of vegetables - Conscious - Different vegetable sellers - Different types of customers - Fluctuations in buying and selling - Philosophy of life arounde
One of my favorite activities is the vegetable market tour. Some of my friends are amazed at my love. I always say to them, "Take a tour of the vegetable market! Then you will know the new world of vegetables.
Red pumpkins, puffed milk, long-stemmed pumpkins, purple eggplant, green tondali, red and yellow dressed pumpkins like green pumpkins are also ready to welcome you these days. A green flower with a white flower appears today. In the fruit section, the colorful and colorful congregations satisfy our minds with mere sight.
Get out of the fruit and vegetable section, and the leafy vegetables are ready to welcome you! Their green freshness marks the man. The red tomatoes in front of the leafy vegetables grab your attention. The smell of green chillies permeates the nose and cilantro - it adds flavor to every dish.
I find this curiosity about vegetable sellers. How proud they are of their goods! How much they decorate their goods ... and this way of expressing pride is also everyone's nyari! During the season of peas, peanuts and mangoes, the market is full of shouts from vendors. If you don't shout, your goods will not be sold, as if they think. While attracting customers, some people are chanting 'poetic lines'.
Like these vendors, consumers are also seen in this vegetable market in many ways. Some people have a hard time trying the vegetables. Some look at the vegetables from a distance. Some people complain about the price of vegetables. Some customers often argue with the seller about the price and spend a lot of time making retail purchases. If you cheat, it doesn't go away, that's the expression on their face. At the same time, when you see poor children and women picking vegetables for their own stomachs from the vegetables thrown in the corner, we also get twisted stomachs. In this way, this vegetable market gives a small picture of social life.