नवरात्रउत्सवाचे नऊ रंग आणि त्या रंगांचे महत्त्व
या वर्षी नवरात्रउत्सव ७ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होत आहे. या नऊ दिवसातील नऊ रंग पिवळ, हिरवा, राखाडी, नारंगी, पांढरा, लाल, शाही निळा, गुलाबी आणि जांभळे हे आहेत.
दर वर्षी जरी रंग सारखे असले तरी त्यांची क्रमवारी नवरात्री कोणत्या दिवशी असते यावर अवलंबून असतात.. नवरात्रउत्सव २०२१ च्या रंगांचा क्रम खालीलप्रमाणे आहे.
या उत्सवामधील प्रत्येक दिवस माता दुर्गा आईच्याच्या एक एका तेजस्वी स्वरूपाला समर्पित आहे. नवरात्र उत्सवातील हे विविध नऊ रंग मातेच्या विविध गुणांचे प्रतिनिधित्व करतात.
१. पिवळा रंग (पहिला दिवस)
नवरात्रीचा पहिला दिवस देवीच्या शैलपुत्री स्वरूपाचा आहे, डोंगराची मुलगी ती निसर्गाच्या रूपात आईचे प्रकटीकरण या ठिकाणी दर्शवीत आहे, जे शक्तीचे लक्षण आहे. या ठिकाणी पिवळा रंग हा तेजाचे आनंदाचे आणि उत्साहाच भव्य प्रतिक मानला जातो. हा नऊ दिवसांचा उत्सव खुप उत्साहात सुरू करण्यास तो खुप छान आहे.
२. हिरवा रंग (दुसरा दिवस)
नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणीचा आहे, ब्रह्मभावात वसलेल्या माता देवीचे दुसरे रूप आहे. दुर्गा माँ किंवा माता पार्वती उंच पर्वतांमध्ये तप करण्यासाठी या स्वरूपात जातात. जिथे तिचा भावी पती भगवान शिव आहे. त्याला तेथे तपस्या करताना पाहून, ती त्याच्यासह तपस्यामध्ये लीन होते. येथे हिरवा रंग वाढ, विकास, निसर्ग आणि ऊर्जा दर्शवतो.
३. राखाडी रंग (तिसरा दिवस)
देवीचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा. तिने कपाळावर राखाडी रंगाचा चंद्र धारण केला आहे. राखाडी रंग आईच्या आत्म्याचे प्रतीक आहे, ती नेहमी तिच्या भक्तांच्या शत्रूंच्या नाशासाठी लढण्यासाठी सज्ज असते.
४. नारंगी / केशरी रंग (चोथा दिवस)
आईचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा. आईचा प्रकाश आणि तेज, तिचे दिव्य स्मित सूर्य प्रकाशित करते. ती प्रखर सुर्यामध्ये राहू शकते, तिच्या शक्तीला कोणतीही मर्यादा नाही. केशरी रंग हा आनंद आणि ऊर्जा याचे प्रतिक दर्शवतो.
५. पांढरा रंग (पाचवा दिवस)
पाचव्या तेजस्वी स्वरूपातील मातेला स्कंदमाता किंवा कार्तिकेयाची आई म्हणून संबोधले जाते. बाळाला तिच्या मांडीवर धरून देवी आईचे पवित्र प्रेम दर्शवते. हा पांढरा रंग भक्तांच्या अंतःकरणात देवीची पूजा केल्याने मिळणारी शांती, शुद्धता आणि प्रेम दर्शवते.
६. लाल रंग (सहावा दिवस)
आई कात्यायनी हे देवीचे सहावे रूप आहे. हे दुर्गा देवीचे भयानक रूप आहे, जे देवांच्या क्रोधातून उद्भवले आहे. म्हणूनच लाल रंग त्यांच्याशी संबंधित आहे. लाल रंग उत्साह आणि क्रियाकलाप दर्शवतो.
७. शाही निळा रंग (सातवा दिवस)
माता देवीचे सातवे रूप कालरात्रीचे आहे, हे आईचे विध्वंसक रूप आहे, ज्याला काली असेही म्हणतात. त्याची दैवी शक्ती निळ्या रंगामध्ये सामावलेली आहे.
८. गुलाबी रंग (आठवा दिवस)
महागौरी हे मातेचे आठवे रूप आहे. ती आमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी माता आहे. गुलाबी रंग जीवनात आशा आणि नवकल्पना यांचे प्रतीक आहे.
९. जांभळा रंग (नववा दिवस)
माता देवीचे नववे रूप सिद्धिदात्रीचे आहे. ती ज्ञान देणारी आणि आपल्या इच्छा पूर्ण करणारी आहे. जांभळरंग महत्वाकांक्षा आणि शक्तीचे प्रतीक आहे.
देवीमातेची अनेकविध नामे आणि अनेकविध रूपे किती रहस्यमय आणि मोहक आहेत ना! म्हणून यावेळी जेव्हा आपण या नवरात्रीच्या उत्सवाला जावू तेव्हा हे रंग लक्षात ठेवा आणि या रंगांचे कपडे आणि शृंगार परिधान करू यात. नवरात्रीच्या रंगांच्या ज्ञानाबरोबरच आपण आपले वेगवेगळ्या रूपात वेगवेगळे भावही व्यक्त केले पाहिजेत.
सर्वांना येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
The nine colors of Navratri and the importance of those colors
This year Navratri festival is starting from 7th October 2021. The nine colors of these nine days are yellow, green, gray, orange, white, red, royal blue, pink and purple.
Although the colors are the same every year, their order depends on the day of Navratri. The order of colors of Navratri Utsav 2021 is as follows.
Each day of this festival is dedicated to a radiant form of Mother Durga Mother. These nine different colors in Navratri festival represent different qualities of mother.
1. Yellow (first day)
The first day of Navratri is in the form of the goddess Shailaputri. In this place, yellow is considered to be the grand symbol of radiance, joy and excitement. It’s great to start this nine-day celebration with so much excitement.
2. Green (second day)
The second day of Navratri is Brahmacharyani, another form of the Mother Goddess situated in Brahmabhava. Durga Maa or Mata Parvati go in this form to perform penance in the high mountains. Where her future husband is Lord Shiva. Seeing him doing penance there, she was absorbed in penance with him. The color green here represents growth, development, nature and energy.
3. Gray color (Day 3)
The third form of the goddess is the lunar bell. She is wearing a gray moon on her forehead. The color gray symbolizes the soul of the mother, she is always ready to fight for the destruction of the enemies of her devotees.
4. Orange / Orange (Fourth Day)
The fourth form of mother is Kushmanda. Mother's light and radiance, her divine smile illuminates the sun. She can stay in the intense sun, her strength has no limits. The color orange symbolizes happiness and energy.
5. White color (fifth day)
The mother of the fifth radiant form is called Skandamata or the mother of Kartikeya. Holding the baby on her lap shows the sacred love of the mother goddess. This white color symbolizes the peace, purity and love that comes from worshiping the Goddess in the hearts of the devotees.
6. Red (Day 6)
Mother Katyayani is the sixth form of the Goddess. This is the terrifying form of Goddess Durga, which has arisen out of the wrath of the gods. That is why red is associated with them. Red indicates enthusiasm and activity.
7. Royal blue (seventh day)
The seventh form of the mother goddess is Kalaratri, the destructive form of the mother, also called Kali. His divine power is contained in blue.
8. Pink (eighth day)
Mahagauri is the eighth form of mother. She is the mother who fulfills all our desires. The color pink symbolizes hope and innovation in life.
9. Purple (Ninth Day)
The ninth form of Mother Goddess is Siddhidatri. She is the giver of knowledge and fulfills your desires. Purple is a symbol of ambition and power.
How mysterious and enchanting are the many names and many forms of Goddess Mata! So this time when we go to this Navratri festival, remember these colors and wear clothes and decorations of these colors. Along with the knowledge of the colors of Navratri, we should also express our different emotions in different forms.
Happy Navratri to all!