एकेकाचे स्वभाव (वर्णनात्मक निबंध) The nature of the individual (Descriptive Essay)

 एकेकाचे स्वभाव (वर्णनात्मक निबंध)


मुद्दे : व्यक्ती तितक्या प्रकृती - मूळ स्वभाव बदलत नाही - एकाच्या स्वभावाचा दुसऱ्याला त्रास - प्रश्न निर्माण करणारी शंकेखोर माणसे - जगाच्या पाठीमागे पडलेली - वितंडवाद घालणारी - स्वतःच्या जगात रमणारी - एकमेकांच्या विचारात भिन्नता असल्याने नाराज होणारी माणसे - त्रास करून घेण्यापेक्षा विविधतेतील गंमत जाणावी...


     ' स्वभावो दुरतिक्रम:' आपल्या पूर्वजांनी हा धोक्याचा कंदील आपल्याला दाखवून ठेवला आहे. त्यामुळे अगदी विविध स्वभावाची माणसे आपल्या भोवती वावरत असतात आणि कितीही त्रास झाला तरी आपण त्यांना खपवून घेत असतो. इतकेच काय! पण काही दिवसांनी आपल्याला त्यांची इतकी सवय होते आणि ती भेटली नाही तर चुकल्या चुकल्या सारखे वाटते.


      आता हेच पाहा ना! आमचे कपले काका. आयुष्य सरत आले तरी त्यांनी गावाची वेस ओलांडली नाही. पण नेहमी कोणत्य ना कोणत्या काळजीमध्ये ते बुडालेले असतात. दोन दिवसांनी शिळे झालेले वृत्तपत्र कपले काकापर्यंत पोहोचते. त्यामुळे कपले काका काळजी करत असलेला हा प्रश्न सुटलेला ही असतो आणि कपले काकांना मात्र ते दोन दिवसांनी समजते. आजचे वृत्तपत्र कपले काकांना उद्या मिळते. तरी त्यांची चिंता काही संपलेली नसते. रोज नित्य नवे विषय त्यांना सापडत असतात आणि मनातील प्रश्नांचा भडिमार करून ते जवळच्यांना हैराण करतात.


      प्रभाकरराव आणि कुंदाताई हे एक दांपत्य पाहा. तसं पाहिलं तर दोघेही बुद्धिवान, पदवीधर. सुखी चौकोनी कुटुंब आहे त्यांचे. पण 'तुझं माझं जमेना! आणि तुझ्या वाचून करमेना' अशी अवस्था आहे त्यांची. प्रत्येक गोष्टीबाबत वाद घालण्याची दोघांचीही प्रवृत्ती पाहिल्यावर असे वाटते की, दोघेही थोडे समजूतदारपणे वागले असते, तर वितंडवाद ठळला नसता का?


      आमच्या घरात आई आणि बाबा यांच्या स्वभावातही असेच गमतीदार अंतर आहे. सांगितलेली गोष्ट बाबा थोड्याच वेळात विसरून जातात. कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन करणे, त्यांना रुचत नाही. आईला मात्र प्रत्येक कामाचे वेळापत्रक असावे आणि ते प्रत्येकाने कटाक्षाने पाळावे, असे वाटते. त्यासाठी ती जिवाचा आटापिटा करते. त्यातल्या त्यात कोणी पाहुणे येणार असले, तर त्यांच्या स्वागताची पूर्वतयारी करण्यासाठी तिची कोण धावपळ चालते आणि बाबा मात्र एकदम थंड!


      ताई आईला सांगते, ' अगं स्वभाव कधी बदलतो का?' तू कशाला स्वतःला त्रास करुन घेतेस? पण उभयतांच्या या भिन्न स्वभावांचा मी मात्र पुरेपूर फायदा उठवतो. कसा म्हणून विचारता? अहो, असतो एकेकाचा स्वभाव!



The nature of the individual (Descriptive Essay)


 Points : As much as a person's nature - the original nature does not change - one's temperament bothers another - questioning people - skeptics - lying behind the world - slandering - enjoying their own world - people who are annoyed by differences in each other's thinking -


 'Swabhavo Duratikram:' Our ancestors have shown us this dangerous lantern.  So there are people of different temperaments around us, and no matter how much we suffer, we endure them.  That's all!  But after a few days you get so used to them and if you don't meet them, it feels like a mistake.


 Now look at this!  Our Kaple uncle.  Though life started, they did not cross the village gate.  But they are always overwhelmed by worries.  After two days, the stale newspaper reaches Kapale Kaka.  So the problem that Kapale Kaka is taking care of is solved and Kapale Kaka understands it after two days.  Uncle Kapale gets today's newspaper tomorrow.  However, their worries are not over.  Every day they find new topics and they bother their loved ones by bombarding them with questions.


 See Prabhakarrao and Kundatai, a couple.  If you look at it, both are intelligent, graduates.  He has a happy family.  But 'yours is mine!  And they don't read it. '  Looking at the tendency of both of them to argue about everything, it seems that if both of them had behaved a little more sensibly, wouldn't the controversy have taken place?


 There is such a funny gap in the nature of mother and father in our house.  Baba soon forgets what he said.  They don't like planning any event.  The mother, however, thinks that everyone should have a schedule of work and that everyone should follow it carefully.  For that, she struggles with her life.  If there is a guest in it, then who rushes to prepare for their reception and Baba is very cold!


 Tai says to the mother, 'Oh, does nature ever change?'  Why are you bothering yourself?  But I take full advantage of these different natures.  How do you ask?  Ah, that is the nature of each one!