नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन ( आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मनिवेदनपर निबंथ ) Autobiography of a failed student

 नापास झालेल्या विद्यार्थ्याचे आत्मकथन 

Autobiography of a failed student

          आजच्या परीक्षार्थी, मार्कांची गुणवत्ता या दुनियेतील मी एक नापास विद्यार्थीनी. छाया माझे नाव. परंतु मी नापास झाल्यामुळे माझ्या आजवरच्या हुशारीवरचा माझ्या आई- वडीलांचा विश्वासच लयाला गेला. त्यांच्या मतानुसार सर्व सुविधा - ट्युशन वर्ग, अपेक्षित, गाईड असूनही मी नापास झाले. एखाद्या खड्यासारखी मी माझ्या सर्व मित्रांमधून बाजूला फेकली गेले. आजवरच्या आमच्या घराण्यातील मी पहिलीच नापास, समाजात तोंड वर काढायला जागाच ठेवली नाही इ. ... अशाप्रकारचे बरेच शेरे माझ्या कानावर उठता - बसता पडतात. त्यामुळे खरचं काय करावे ते सुचेनासे झाले आहे.


          वास्तविक पाहता मूल्यांकनाची पूर्वीपार चालत आलेली पध्दती म्हणजे परीक्षा. वर्षभर विविध विषयांचा अभ्यास करून फक्त तीन तासांमध्ये सगळे स्मरणात आणून लेखन करायचे. आपण नसताना म्हणजेच आपल्या पाठीमागे कोणीतरी ते लेखन तपासायचे आणि चूक, बरोबर देऊन मोकळे व्हायचे. पास किंवा नापास क्लास, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन अशाप्रकारे शेरे मिळवायचे. एखादा विषय आपल्याला आवडत नसला तरी त्याचाही सक्तीने अभ्यास करायचा.


          शिक्षणाच्या मुख्य तीन शाखांपैकी विज्ञान शाखेत मी माझ्या पालकांच्या इच्छेखातर प्रवेश घेतला. माझ्या वडीलांना अभियांत्रिकी व्हायचे होते. परंतू आमच्या घरच्या परिस्थितीमुळे त्यांना होता आले नाही. त्यामुळे माझ्या वतीने किंवा माझ्या रूपात त्यांनी त्यांची पूर्ण न झालेला इच्छा, मुलीस इंजिनिअर बनवण्याची ठाम भूमिका घेतली आणि मीही आज्ञाधारक मुलीप्रमाणे विज्ञानाच्या वर्गात दररोज जाऊ लागले.


          विज्ञान शाखेत तर मी प्रवेश घेतला. विज्ञान हा विषय मला आवडायचा पण गणिताशी माझे सूत मात्र काही जमेना. वडीलांना माझी अडचण सांगितली. त्यांनी लगेचच आमच्या येथील नामवंत टयुशन क्लास मध्ये नाव टाकले. कर्ज काढून क्लासची भरमसाठ फी एकरकमी भरली. माझ्या नित्याच्या जीवनातीला चोवीस तासापैकी साडेपाच ते साडेसहा मॅथ्सच्या क्लाससाठी लागू लागले. या विषयाचा मी रात्री बारापर्यंत सक्तीने अभ्यास करायचे. पहाटे सोडचारला उठून तयारी करायचे. लगेच मॅथ्सच्या क्लासला जायचे. त्यानंतर साडेसात ते साडेदहा प्रॅक्टिकल्स्. नंतर साडे अकरा ते साडे चार माझ्या कॉलेजचे नित्याचे तास. नंतर इंजिनिअरींगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी रोजचा एक तास. या सगळ्या दैनंदिन धावपळीत, धकाधकीत सगळा अत्साह संपून जायचा. अनेक क्रिया यंत्रवत होत असत. खरतर शरीर वर्गात असायचे परंतु मन... अशा या आमच्या सतत अभ्यासात व्यस्त असणाऱ्या मन:स्थितीचा कोणी अन् कोणीच विचार करत नसत. घरी आल्यावर थोडा विसावा म्हणून जरा कुठे टिव्ही लावला की आई पुन्हा एकदा बारावीच्या वर्षाची आठवण करून द्यायची. सगळी व्यवस्थाच गुंतागुंतीची. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार न करणारी. सक्तीने आमच्यावर अनेक गोष्टी लादणारी. या सर्वांचा एकच परिणाम, नापास. नापासाचे लागलेले ठळकदार लेबल पास झाल्याशिवाय निघत नाही.


          हो, मी नापास झाले. माझ्या नावडत्या गणित विषयात मी नापास झाले. आजच्या वेगवान स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी इतरांच्या दृष्टीने 'मूर्ख', बेअक्कल ठरले. सर्वांचे उपरोधिक बोलणे, खोचक टोमणे निमूटपणे ऐकायचे हा रोजचाच एक भाग झाला. पराभवाच्या या ओझ्याने मी फार खचून गेले. अनेकदा उशीत तोंड खुपसून ढसढसा रडले. आपली कुवतच नाही अशी स्वतःच्या मनाची पक्की समजूत झाली. यामुळे निराश, वेड झालेल मन कधी कधी आत्महत्येच्या विचारांकडे धाव घ्यायचे. याच वेळी कवी मुबारक शेख यांची कविता माझ्या वाचनात आली.
"यशाची पहिली ही अपयश असते.
जीवनाच्या अनुभवांची ती एक डायरी असते.
यामधूनच प्रत्येकाचे घडत जाते भविष्य
मग उमजून येते किती छान आहे आयुष्य...
नापास होणं म्हणजे नाही आकाश कोसळणं
जीवन म्हणजेच असतं निरंतर शिक्षण"


          आयुष्यात अनेक चढ-उतार येतच राहणार. परीक्षा म्हटलं की कुणीतरी पास तर कुणीतरी नापास होणार. अशा क्षणी पुन्हा एकदा नव्या जोमाने सज्ज होऊन 'हाती आलेल्या अपयशाशी युद्ध करण्याची, सुरू कर तू तयारी."  तेव्हापासून नव्याने तयारी सुरू केली. अपयशाने नाराज न होता, पुन्हा अभ्यासाच्या प्रयत्नांना जोमाने सुरुवात केली. 'मी उत्तीर्ण होणारच, या सकारात्मक विचारातून अभ्यासास लागले. 'बघू आता' या परीक्षेमध्ये काय होते ते? 'हिंमत न हारता, राही तू चलता चल' अभ्यासाचा अतोनात, अथक प्रयत्नामधून तू नक्कीच उत्तीर्ण होणार आहेस.

English translation

Autobiography of a failed student

Today's candidates, a good-off student of marketing, or the world of my clothes. Shadow My Name. But I was believed to be my mother's father on my smartness, because of my offspring. I have already been invested by all the facilities - tuition classes, expected, guiding. I have been thrown out of all my friends like a lower. I have not been the first place of our family in the house, but the place was not placed in the society. ... Lots of the same sheep get up on my ear - sit down. So what is true is to be true. 

Real views approach to the estimated approval means that the examination is. Studies all the various subjects throughout the year and write everything in three hours. If you are not, you want to check it and write the wrong with someone else, and the mistakes. Passed or off-class Classes, second class, first class, displays, resurrected this way. If you do not like a subject, you should also persuade him. 

I took my parents's will in the science branch of the main three branches of education. My father wanted to be engineering. But there was no one to have the house of our house. So, on my behalf or in my behalf, he desired to have an alleged person, and the child took a sticker to make engineer, and I also went every day as a obedient girl in science.

 In the science branch, I took access. I was able to celebrate the subject of science but my hypothesis of mathematics. The father had my difficulty. He immediately named the name in the noun typing class. The labor of the class is full of accused fee. It took part of the twenty-four hours of my etc. to the class of the twenty-four hours. I want to study for the top of the top for the top of the top. Get up and get ready to leave the solution. Immediately the matters of matthers were to go to. Then it is three-third-for-practice. Then a four-hour elderly four hours of my college. After an hour to prepare the engineeration entrance examination later. In this every daily routing, the stressfulness of the stress. Many actions were meant to be mechanically. In fact, there is no idea in the body, but the mind is not someone who is busy thinking about the continuous study of our continuous study. When you arrived, a little bit of respect, where the mother has taken a memory again, Mother again reminds the years of the twelve years. All the system is complicated. Do not consider the mentality of students who teach. Forced by many things that are forced. The same results of all these, nasses. The disorderly boundary label does not leave without passing. 

Yes, I was not in the face. I was not in the subject of my named mathematics. 'Fools', biask for the sight of the other to be in the fast-competitive age. All the partnership was a daily basis, to listen to the loss of the capitalist, the capitalized. I have been very fatally with the obese of defeat. Often crushed the pillar of the pillar of the soil. Your understanding of his own mind was not understood. This is why the disappointed, the mad -ish mind is sometimes taken to the thoughts of suicide. At the same time, poetry of Poet Mubarak Sheikh came into my reading. "The first thing is successful. It is a diary of life experiences. Everyone comes from happening. It is better that the future is so far ... life is not to be the first to be aware of the life of the sky," continuous learning will continue to have many fluctuations. 

The exam said that somebody else would pass the problem. At that moment, the new joint and ready to battle, and you prepare for the failure of the failure. "Then the newly started preparations. Even when the implementation was not upset, Jatam started to start again. 'I was going to study," What is the' now 'in the examination?' You will not be able to pass, 'I will not be able to pass, and the passion of the study will be passed by the endlessness.