लता मंगेशकर - माझा आवडता कलावंत (चरित्रात्मक निबंध)

 लता मंगेशकर - माझा आवडता कलावंत 

(चरित्रात्मक निबंध)



मुद्दे :  लतादीदींच्या स्वरांची जादू - पुरस्कार - गळ्यातील गंधार - चित्रपट गीते - विविधता - स्वरांचा दर्जा - कुटुंबासाठी व समाजासाठी कार्य - अक्षय वैभव...


      ग्रीष्म ऋतुतील ती संध्याकाळ होती. सूर्यदेव अस्ताला गेले होते.  तरीसुध्दा त्यांच्या कठोर कामगिरीची चुणूक अजून जाणवत होती. एक सभा गेले दोन तास रंगली होती. लतादीदी रंगमंचावर उपस्थित होत्या. काहीवळानंतर सभेचा शेवट होत आला तेव्हा सर्वांनी दीदींना गाणे म्हणण्याचा आग्रह केला. लोकग्रहाखातर  दीदींनी सूर लावला, कोणतेही वाद्य साथीला नसताना 'मोगरा फुलला'  हा अभंग लता दीदी गाऊ लागल्या  नि वातावरणातील दाहकता लुप्त झाली. सर्व आजूबाजूचे वातावरण मनाला प्रसन्न, समाधानी करेल असे निर्माण झाले आणि याच वातावरणात सभा संपली. असे उत्कृष्ट सामर्थ्य असलेल्या गायन क्षेत्रातील प्रतिभावंत कलावती, भारतरत्न, गानकोकीळा लता मंगेशकर आज साऱ्या विश्वात विख्यात आहेत. त्याच लतादीदी माझ्या आवडत्या कलावंत आहेत.


      आपल्या भारत देशाच्च सरकारने लतादीदींना 'भारतरत्न' हा पुरस्कार दिला, तेव्हा मनात आले की या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली. लता मंगेशकर यांना आजवर अनेक राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर 'स्वरभारती', 'कलाप्रवीण', 'सूरश्री', 'स्वरलता' व 'डि. लिट्.' असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पण या यशामागे पर्वतासारखे परिश्रम सुद्धा आहेत. यशाचा मार्ग हा काट्याकुट्यातून जातो. अनेक कसोट्यातून उतरल्यावरच सुवर्णाचे तेज झळाळते. आज सर्व दिक्कालाच्या मर्यादा ओलांडून लतादीदी भारतवर्षातील कोट्यावधी लोकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. संगीताच्या विश्वात त्यांचे स्थान अढळ, सर्वोत्कृष्ट व सर्वमान्य आहे.


       दीदींच्या गळ्यात ' गंधार' आहे. याची कल्पना त्यांच्या बाबांना - दीनानाथांना होती. ते दीदीना सांगत, " लता, तुझ्यावर ईश्वराने कृपा केली आहे, गळ्यातला गंधार सांभाळ." दीदींनी सुद्धा आपल्या पित्याचे वचन आयुष्यभर सांभाळले. आज त्यांच्या प्रत्येक मधूर स्वराने आम्हा रसिकांचे जीवनही तृप्त केली आहे. अनेक ख्यातनाम संगीतकारांची १८०० च्या वर चित्रपटातील विविध रंगढंगांची सुमारे २२ भाषातील गाणी लतादिदींनी गायली असून त्यांची संख्या सुमारे २५ ते ३० हजाराच्या घरात सहज जाते.


      लतादीदींच्या स्वर्गीय आवाजाने असंख्य गाणी चिरंजीव झाली आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दीदींच्या आवाजातील ओळी आपल्याला साथ देत असतात.' आनंदघन' या नावाने त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले आहे.  त्यांनी आपल्या स्वमधूर आवाजात ध्वनीमुद्रीत केलेले 'ए मेरे वतन के लोगो' हे गीत आजही भारतीयांचे डोळे ओले करतात.


      अगदी लहान वयातच त्यांना आपल्या वडिलांसोबत एका नाटकात नारदाची भूमिका केली होती. 'सौभद्र', 'भावबंधन', अशा नाटकांतूनही त्यांनी कामे केली. 'गजाभाऊ' तसेच 'पहिली मंगळागौर' अशा काही मराठी गाजलेल्या चित्रपटांतूनही छोट्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. कारण साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच होती.


      लता दीदींच्या स्वमधूर सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी विश्वातील लक्षावधी श्रोत्यांना सुरांची माधुर्य व सौंदर्य प्रत्ययास आणून दिले. त्यांच्या आवाजाच्या उंच खोलीमध्ये, लवचिकतेमुळे, अलौकिक फिरतीमुळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करणे शक्य झाले. 'अवघ्या तीन मिनिटांच्या तबकडीतून लोकांच्या मनापर्यंत संगीत पोचवण्याचे अवघड काम लताने केले,' असा त्यांचा गौरव प्रत्यक्ष कुमार गंधर्वांनी केला आहे.


      आपल्या भावंडांसाठी, आपल्या कुटुंबासाठी लतादीदींनी जे अतोनात श्रम केले, त्याची आठवण आजही त्यांना, त्यांच्या भावंडांना व्यतीत करते. अति उच्च पदावर पोहोचूनही या थोर कलावंताने विनम्रपणा सोडला नाही. आपली सामाजिक जबाबदारी हि ती विसरली नाही. पुण्याचे ' दिनानाथ मंगेशकर रुग्णालय' हे त्याचेच द्योतक आहे. आपल्या एवढ्या मोठ्या यशस्वी आणि सफल जीवनातही शास्त्रीय संगीताला आणि आपल्या इतर छंदांना आपण पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, ही खंत दीदींना आहे. अशीही गानकोकिळा भारत वर्षाचे अक्षय वैभव आहे.



Lata Mangeshkar - My favorite artist

 (Character essay)


 Points : The magic of Latadidi's voice - Awards - Gandhar in the neck - Movie songs - Variety - Quality of voices - Work for family and society - Akshay Vaibhav ...


 It was a summer evening.  The sun god had gone to Astala.  Even so, owning one is still beyond the reach of the average person.  A meeting had been going on for two hours.  Latadidi was present on the stage.  After a while, when the meeting was coming to an end, everyone urged Didi to sing.  Didi sang for the sake of folklore, when there was no musical accompaniment, Abhang Lata Didi started singing 'Mogra Phulala' and the burning in the atmosphere disappeared.  All the surrounding environment was created to make the mind happy and satisfied and the meeting ended in this atmosphere.  Today, Lata Mangeshkar, a talented singer, Bharat Ratna and singer-songwriter, is known all over the world.  The same Latadidi is my favorite artist.


 When the Government of India conferred the Bharat Ratna on Latadidi, it occurred to her that she was so honored with the title that it made her shine.  Lata Mangeshkar has been awarded 'Swarbharati', 'Kalapraveen', 'Surashree', 'Swaralta' and 'D.  Lit. '  Many such honors have been received.  But behind this success is also a mountain of hard work.  The path to success is through thorns.  Gold shines only after passing many tests.  Today, across all the boundaries of Dikkala, Latadidi is dominating the minds of millions of people in India.  His place in the world of music is unwavering, the best and universal.


 Didi has 'Gandhar' around her neck.  This was the idea of ​​his father - Dinanath.  He said to Didina, "Lata, God has been gracious to you, take care of the gandhar around your neck."  Didi also kept her father's word for the rest of her life.  Today, with each of his melodious voices, we have also satisfied the lives of the fans.  Latadidi has sung songs of many famous musicians in various colors from 1800 films in about 22 languages ​​and their number easily reaches around 25,000 to 30,000 households.


 Numerous songs have been immortalized by Latadidi's heavenly voice.  The lines in Didi's voice accompany us at every stage of the life of every Marathi person in Maharashtra. '  He has also directed music under the name 'Anandghan'.  The song 'A Mere Watan Ke Logo' which he recorded in his melodious voice still makes the eyes of Indians wet.


 At a very young age, he had played the role of Narada in a play with his father.  He also acted in plays like 'Saubhadra' and 'Bhavbandhan'.  He has also done small roles in some Marathi hit films like 'Gajabhau' and 'Pahili Mangalagaur'.  Because he was responsible for the whole family.


 Lata Didi's melodious, soft and perfect voice brought the melody and beauty of the melody to millions of listeners all over the world.  The high depth of his voice, the flexibility, the supernatural rotation made it possible for film composers to experiment with new things.  Kumar Gandharva has praised Lata for her difficult work of conveying music to the minds of the people in just three minutes.


 For her siblings, for her family, the memory of the hard work done by Latadidi still haunts her, her siblings.  Despite reaching a very high position, this great artist did not give up humility.  She has not forgotten her social responsibility.  The 'Dinanath Mangeshkar Hospital' in Pune is a testament to that.  Even in our most successful and successful life, we have not been able to devote enough time to classical music and our other hobbies.  Even so, Gankokila Bharat is the inexhaustible glory of the year.