साने गुरुजी - एक आदर्श
(चरित्रात्मक निबंध)
मुद्दे : प्रस्तावना - बालवाड़मय - मुलांचे लेखक - गोड गोष्टी - श्यामची आई - मुलांच्या जीवनातील स्थान - अमळनेर येथे शिक्षकी पेशा - आंतर भारती चळवळ - भारतीय संस्कृतीचा अभिमान - उत्कृष्ट साहित्य - मृत्यूनंतरही पुस्तक रुपाने जिवंत व्यक्तिमत्व...
मी प्राथमिक शिक्षण घेत असताना साने गुरुजींची ' सुंदर पत्रे' वाचली आहेत. एका पत्रात सुधाला धर्माची कल्पना समजावून देताना गुरुजी लिहितात, "आपण पोस्टकार्ड लिहितो, त्यावर स्वच्छ, सुंदर अक्षरात पूर्ण पत्ता लिहिला तर आपण पोस्टमन बाबतचा धर्म पाळला." इतकी सोपी, सुंदर धर्माची कल्पना माझ्या मनावर कायमची ठसली. गुरुजींच्या जीवनातून मिळालेला हा एक अनमोल आदर्श होय. कोणतेही काम करताना प्रथम दुसऱ्याचा विचार करा. साने गुरुजींनी अगदी लंहानशा विचारातून महान सत्य मुलांना सांगितले आहे. 'खरा तो एकचि धर्मI जगाला प्रेम अर्पावे॥' गुरुजी किती सोप्या शब्दांत धर्माची कल्पना मांडतात! गुरुजी हे हाडाचे शिक्षक होते.
साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचे बालपण पालगड या गावी कोकणात गेले. १८९९ साली त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्हातील याच ठिकाणी झाला होता. त्यांच्या साहित्यात कोकणातील हिरवेपणा व आंब्यातील मधुरता भरून राहिली आहे.
गुरुजींनी मुलांसाठी भरपूर लेखन केले आहे, कारण -
'करील जो मनोरंजन मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयांचे.'
अशी त्यांची भावना होती. ' गोड गोष्टी' (दहा खंड), 'धडपडणारी मुले', 'बापूजींच्या गोड गोष्टी' (सहा खंड), 'तीन मुले' असे उत्कृष्ट बालसाहित्य गुरुजींनी निर्माण केले आहे. लहान लहान मुलांना विविध गोष्टी, कथा सांगून त्यामध्ये खेळवायचे, रंगवून टाकायचे हि तर गुरुजींची खासियत होती. गुरूजींचा हा थोर आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या देशातील अनेक मंडळींनी 'साने गुरुजी कथामाला' सुरू केल्या होत्या.
गुरुजींच्या बालमनावर त्यांच्या आईने सुसंस्कार केले होते. आईला ते सर्वस्व मानत. 'श्यामची आई' या पुस्तकात ते अतिशय नम्रपूर्वक म्हणतात, " माझ्यामध्ये जे काही चांगले आहे ते फक्त माझ्या आईमुळेच आहे. कारण आईच माझा गुरु, आई माझी कल्पतरू, तिने मला काय दिले नाही? सारे काही दिली. प्रेमळपणाने बघावयास, प्रेमळपणे बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावरच नव्हे, तर गाई - गुरंवर, फुलपाखरांवर व झाडामाडांवर प्रेम करावयास तिनेच शिकवले." आचार्य अत्रे श्यामची आई या त्यांच्या पुस्तका विषयी अभिमाने सांगतात, 'मातृप्रेमाचे महान मंगल स्त्रोत' असे हे पुस्तक आहे, तर 'श्यामची आई हे एक वाचनीय पुस्तक नसून ते एक अनुभवण्याचे पुस्तक आहे,' असे कविवर्य वसंत बापट सांगतात. ' श्यामची आई' या चित्रपटाला पहिले राष्ट्रीय सुवर्ण सुवर्णकमळ मिळाले होते.
गुरुजींना भारतीय संस्कृती विषयी विशेष आदर होता. आपल्या देशातील पवित्र संस्कृतीची वैशिष्ट्ये त्यांनी आपल्या 'भारतीय संस्कृती' या पुस्तकात सर्वांसाठी सहज टिपली आहेत. भारतातील अनेक भाषांविषयी गुरुजींना विशेष आकर्षण होते. विविध भाषांचा अभ्यास व्हावा व त्या एकमेकांच्या जवळ याव्यात म्हणून त्यांनी 'आंतरभारती चळवळ' सुरू केली होती.
गुरुजी हे स्वातंत्र्य लढ्यातील एक सैनिक होते. सन १९४२ च्या 'चले जाऊ' चळवळीत ते भूमिगत होऊन कार्य करत होते. नंतर त्यांनी तुरुंगवासही सोसला. साने गुरुजींची समाज विषयक जाणीवही सखोल होती. पंढरपूरच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी उपोषण आरंभले होते आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला होता.
आपल्या अवतीभोवती असणारे हिंसक, अविचारी जीवन साने गुरुजींच्या प्रेमळ मनाला सहन झाले नाही, तेव्हा १९५० मध्ये त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली. गुरुजी देहाने गेले, पण त्यांची पुस्तके, त्यांचे लेखन आजही आपल्यापुढे उच्च, उदात्त आदर्श ठेवतात.
Sane Guruji - An Ideal
(Character essay)
Points : Preface - Kindergarten - Children's Writer - Sweet Stories - Shyam's Mother - Place in Children's Life - Teaching Profession at Amalner - Inter-Indian Movement - Pride of Indian Culture - Excellent Literature - Living Personality in Book Form Even After Death ...
I have read Sane Guruji's 'Beautiful Letters' while I was in primary school. Explaining the idea of religion to Sudha in a letter, Guruji writes, "If you write a postcard, if you write the full address in clean, beautiful letters on it, then you follow the religion of the postman." The idea of such a simple, beautiful religion stuck in my mind forever. This is an invaluable example from Guruji's life. When doing any work, think of the other first. Sane Guruji has told the children the great truth even with a small thought. "The only true religion is to offer love to the world." Guruji presents the idea of Dharma in such simple words! Guruji was a teacher of bones.
Sane Guruji's full name is Pandurang Sadashiv Sane. His childhood was spent in the village of Palgad in Konkan. He was born in 1899 in this place in Ratnagiri district. His literature is full of greenery of Konkan and sweetness of mango.
Guruji has written a lot for children, because -
'Who will entertain the children
Their relationship with the Lord will be strong. '
That was his feeling. Guruji has created excellent children's literature such as 'Sweet Stories' (ten volumes), 'Stumbling Children', 'Bapuji's Sweet Stories' (six volumes), 'Three Children'. Guruji's specialty was to tell small stories to children, to play with them, to paint them. Many churches in our country had started 'Sane Guruji Kathamala' keeping in view this great ideal of Guruji.
Guruji's childhood was nurtured by his mother. The mother considered it everything. In the book 'Shyam's Mother', he says very politely, "All that is good in me is because of my mother. Because my mother is my guru, my mother is my imagination, what did she not give me? She gave me everything. She taught me to look lovingly, to speak kindly. She taught me to love not only man, but also cattle, butterflies and trees. " Acharya Atre proudly describes his book, Shyam's Mother, as 'the great source of motherly love', while 'Shyam's Mother is not a readable book, it is a book of experience,' says the poet Vasant Bapat. The film 'Shyam's Mother' won the first National Golden Lotus.
Guruji had a special respect for Indian culture. He has easily captured the features of the sacred culture of our country in his book 'Indian Culture'. Guruji had a special fascination with many languages in India. He had started the 'Antarbharati Movement' to study different languages and bring them closer to each other.
Guruji was a freedom fighter. He was working underground in the 'Leave' movement of 1942. He was later imprisoned. Sane Guruji's social awareness was also profound. He had started a fast to give access to the untouchables in the temple of Pandharpur and had given access to the untouchables.
When Sane Guruji's loving mind could not bear the violent, thoughtless life around him, he ended his life journey in 1950. Guruji passed away, but his books, his writings still set a high, noble ideal before us.