जाहिरातीचे युग किंवा जाहिरातीची कला
The age of advertising or the art of advertising
आज संपूर्ण विश्व हे जाहिरातीचे युग बनले आहे. असे म्हटले जाते की, ओरडणाऱ्याची माती सुध्दा विकली जाते आणि न ओरडणाऱ्याचे शुध्द सोने सुध्दा विकले जात नाही. एवढा आपल्या भारतीयांच्या मनावर या जाहिरात विश्वाचा पगडा ठसलेला आहे.
आजच्या प्रगत विज्ञान युगात प्रसार माध्यमे सहज उपलब्ध असल्याने माणसांना त्याचे अनेक फायदे झाले आहेत. त्याबद्दल विज्ञानाचे आपण खूप आभार मानले पाहिजेत. भारतासारख्या देशामध्ये शिक्षणाचा जेमतेम प्रसार झालेला असताना एखाद्या वस्तूची जाहिरात विविध प्रकारे वारंवार केली जाते. अशा जाहिराती करण्यासाठी कंपन्या कोट्यावधी रुपयांचा खर्च करतात.
राजरोसपणे जनतेच्या अज्ञानाचा फायदा या कंपन्या घेतात. आपल्या देशामध्ये हे सर्रास चालू आहे. विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने, शांपू, साबण, केशतेल ह्या आपल्या नित्याच्या उपयोगातील वस्तू आहेत. भारतातील घराघरात दूरचित्रवाणीच्या माध्यमातून या वस्तूंच्या जाहिराती पाहिल्या जातात. विविध प्रकारचे पर्याय प्रत्येक वस्तूसाठी उपलब्ध असल्याने त्या वस्तूची सत्यता न तपासता हि उत्पादने मोठ्या किंमतीत विकत घेतल्या जातात.
इंग्लंड, जपान, अमेरिका या प्रगत राष्ट्रांमध्ये सुध्दा विविध उत्पादनाच्या जाहिराती केल्या जातात. पण याबाबतीत तेथील लोक खूप जागृत असल्याने जाहिरात ज्या पद्धतीने दाखवली जाते तशी तिची सत्यता त्या उत्पादनात आढळली नाही तर त्या वस्तूवर संपूर्ण देशात सार्वत्रिक बहिष्कार टाकला जातो. परंतू हाच प्रकार आपल्या देशात अजून शेकडो वर्षे तरी लागतील असे वाटते.
विविध वस्तूंमध्ये चढाओढीच्या स्पर्धा चालू आहेत. जागतिक पातळीवर खुली मुक्त बाजारपेठ या धोरणाचा स्विकार केल्याने जगातील सर्व वस्तू भारतीय बाजारपेठेमध्ये येऊ लागल्या आहेत. याच वेळी आपल्या देशातील विविध वस्तू परकीय बाजारपेठेत जाऊ लागल्या आहेत. जर आपली भारतीय उत्पादने परकीय उत्यादनांच्या तुलनेत टिकून राहिली नाहीत तर परदेशी वस्तू भारतीय बाजारपेठा नक्कीच गिळंकृत करतील, यात शंकाच नाही.
रजनी फेम प्रिया तेंडुलकर यांनी जाहिरातीमधील खोटारडेपणाबाबत स्वतःचा अनुभव कथन करताना सांगितले आहे की, भारतामधील जाहिरात क्षेत्रामध्ये सर्वच खोटे चालते. कपडे धुण्यासाठी फेस न येणारे साबण जाहिराती मध्ये दाखवले जातात. लज्जतदार चवीच्या जाहिरातीत त्या चहाला लज्जतदार चवच येत नाही.
सध्याचे युग हे फार गतिमान युग आहे. आजकाल लोकांना कसलाही विचार करायला वेळ नाही. या कारणामुळेच जाहिरात व्यवसाय नक्कीच आवश्यक आहे. परंतू लोकांच्या अज्ञानाचा, साधेभोळेपणाचा फायदा घेऊन जाहिरात कंपन्यांनी जाहिरातीच्या जोरावर लोकांची फसवणूक नक्कीच करू नये. कारण हिच जनता त्यांची ग्राहक आहेत. काही वेळा जनता एखाद्याला डोक्यावर घेऊन उदोउदो करते तिच जनता कोणत्याही क्षणी त्याला पायदळी तुडवेल याचा नेम नाही याचा विचार जाहिरात कंपन्यांनी जरूर केला पाहिजे. 'ग्राहक देवो भव:' हे सत्य विधान त्यांनी विसरता कामा नये.
आपल्याकडे पासष्टावी कला ही जाहिरात मानली गेली आहे. चौसष्ट कला आणि चौदा विद्या आपण सर्वांना ज्ञात आहेत. आपल्याकडे जाहिरात जेवढी उत्तम दर्जाची, आकर्षक असेल, तितकाच त्या उत्पादनाचा दर्जा उत्कृष्ट समजला जातो.
जाहिरात म्हणजे माणसांचा मनामध्ये निर्माण केलेला कल्पनेचा विलास आहे. त्यासाठी या कंपन्यांकडे त्याबाबत विचार करणारी सुसज्ज यंत्रणा कार्यरत असते. आपल्या ग्राहकांची नस पकडून ते आपल्या विविध उत्पादनांची सर्वप्रथम मनपसंद जाहिरात करतात. जाहिरात ही उत्पादन आणि ग्राहक यांच्यामधील मुख्य दुवा आहे.
दुरदर्शन, रेडिओ, वर्तमानपत्रे, सोशल मिडिया ही जाहिरातीची मुख्य प्रसार माध्यमे आहेत. त्याचबरोबर विविध कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा घराघरात उत्यादने घेऊन फिरणारे हेही जाहिरातीचे उत्तम प्रचारकाचे माध्यम आहेत.
जाहिरात केल्याने बाजारात आलेल्या विविध उत्पादनांची माहिती सामान्य ग्राहकांना ज्ञात होते. यामुळेच जाहिरातीचे महत्त्व खुप अनन्यसाधारण आहे. जाहिराती माणसाचा साध्याभोळ्या मनाला चटकन भुरळ घालतात. आपल्या देशातील प्रत्येक स्त्रीची आपले सुध्दा केस लांबडसडक असावेत अशी हौस असते. जाहिरातीमधील हा शांपू किंवा अमुक -अमुक केशतेल वापरले आणि केस लांब झाले असे दृश्य स्त्रीने पाहिले की, ते ती उत्पादन विकत घेणारच यात तिळमात्र शंका नाही. तसेच आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या, घाई गर्दीच्या जमान्यात अमुक अमुक सौंदर्य प्रसाधने वापरली तर लगेच ताजेतवाने, टवटवीत वाटते असे जाहिरातीमध्ये दाखविले गेले तर ग्राहक ते उत्पादन नक्कीच घेणार, इतके हे जाहिरात क्षेत्र जनतेला भुलविणारे आहे. खरतर ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहचवण्याचा जाहिरात हा महामार्ग आहे.
जाहिरात हे प्रगत तंत्रज्ञानामधील एक उत्तम तंत्र आहे. मोजक्या, आकर्षक भाषेमध्ये आणि क्षणार्धात ग्राहकांवर पक्की छाप पाडणारे जाहिरात हे एक प्रभावी माध्यम आहे.
English translation
The age of advertising or the art of advertising
Today the whole world has become an age of advertising. It is said that the soil of the one who shouts is also sold and the pure gold of the one who does not shout is not sold. This advertisement is so entrenched in the minds of our Indians.
In today's age of advanced science, the availability of media has brought many benefits to mankind. We have to thank science for that. In a country like India, when education is so widespread, an item is often advertised in various ways. Companies spend crores of rupees on such advertisements.
These companies take advantage of the ignorance of the people. This is rampant in our country. A variety of cosmetics, shampoos, soaps, hair oils are our daily use items. Advertisements for these items are seen on television in homes across India. Since there are different types of options available for each item, these products are bought at a higher price without checking the authenticity of the item.
Various products are also advertised in developed countries like England, Japan, USA. But since the people there are very aware of this, the way the advertisement is shown does not find its authenticity in the product, but the product is boycotted all over the country. But it seems like the same thing will take hundreds of years in our country.
Climbing competitions are going on in various items. With the adoption of the global open market policy, all the goods in the world have started entering the Indian market. At the same time, various goods in our country are going to foreign markets. If our Indian products do not compete with foreign products, then foreign goods will surely engulf the Indian market, no doubt.
Rajini fame Priya Tendulkar, while narrating her own experience about the falsity in advertising, said that in the advertising sector in India, everything is false. Foamless soaps for washing clothes are shown in advertisements. That tea does not have a delicious taste in the advertisement of delicious taste.
The present age is a very dynamic age. Nowadays people don’t have time to think about anything. This is why the advertising business is definitely needed. But taking advantage of people's ignorance, naivety, advertising companies should not deceive people on the strength of advertising. Because these people are their customers. Advertising companies must keep in mind that sometimes the public will take someone by the head and make fun of him. They should not forget the true statement 'Grahak Devo Bhav:'.
We have sixty-five arts considered advertising. Sixty-four arts and fourteen sciences are known to all of us. The better the quality, the more attractive the ad, the better the quality of the product.
Advertising is the luxury of ideas created in the minds of men. For this, these companies have a well-equipped mechanism to think about it. They capture the nerves of their customers and are the first to advertise their various products. Advertising is the main link between the product and the consumer.
Television, radio, newspapers, social media are the main means of advertisement. At the same time, representatives of various companies are also the best means of advertising.
Advertising makes the various products available in the market known to the general consumers. This is why the importance of advertising is so unique. Advertisements can easily seduce a person. Every woman in our country wants her hair to be long. There is no doubt that the woman used this shampoo or some hair oil in the advertisement and saw that the hair was long, that she would buy the product. Also, in today's fast-paced, hectic, crowded world, advertising can be a daunting task when it comes to using cosmetics that are so fresh and refreshing. In fact, advertising is the highway to delivering products to consumers.
Advertising is one of the best techniques in advanced technology. Advertising is an effective medium to impress customers in a few, attractive language and in a matter of moments.