व्यायामाचे जीवनातील महत्त्व
The importance of exercise in life
'आरोग्य ही आयुष्याची गुरूकिल्ली आहे,' असे आपण नेहमीच ऐकतो. 'आरोग्य हे कोणत्याही श्रीमंतीपेक्षा श्रेष्ठ आहे. ' असे मला वाटते. अफाट धनसंपत्तीपेक्षाही शरीर संपत्ती ही सर्वश्रेष्ठ अशी आहे. आयुष्यामध्ये धनसंपत्ती पुनःपुन्हा मिळवता येते. संपादन करता येते. परंतू शारीरिक संपदा मात्र पुन्हा मिळवणे खुप कठीण आणि फार जिकीरीचे आहे. यासाठीच लहानपणापासून व्यायाम करण्याची गरज आहे. श्रीमंती ही अनेकदा वारसाहक्काने आपोआप मिळते. परंतु शरीररूपी संपत्ती, सुदृढ निरोगी जीवन हे स्वतःलाच मिळवावे लागते. यासाठी नित्य नियमित व्यायाम करण्याची गरज असते. आयुष्यातील दिवसाच्या चोवीस तासांपैकी किमान एक तास तरी आपण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी दिला पाहिजे. दैनंदिन व्यस्त जीवनातून हक्काने काही वेळ तरी शरीर कसरतीचे विविध प्रकार केले पाहिजेत. त्यामुळे अकाली येणारा थकवा नाहीसा होतो. प्रत्येक काम उत्साहाने करण्याची इच्छा निर्माण होते. विविध शारीरिक व्याधींमुळे होणारी चिडचिड नाहिशी होते.
आपले शरीर आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी, विविध नियमांनुसार शरीराशी संबंधित सर्व अवयवांची शास्त्रशुध्द हालचाल करण्याच्या क्रियेस 'व्यायाम' म्हणतात. व्यायाम हा वेळच्यावेळी स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी गरजेचा आहे. नित्य नियमितपणे, योग्य प्रकारचा व्यायाम केल्यामुळे आपल्या अवयवांच्या प्रमाणबद्धतेला म्हणजे शरीर सौष्ठवास मदत होते. सुडौल, सुंदर, आकारबद्ध बांधा म्हणजेच सौष्ठव. जाडजूड शरीरयष्टीस आज काहीजण सौष्ठव समजतात आणि फसतात. शरीराची जाडी वाढत जाते. शरीराच्या वेगवेगळ्या भागात चरबी जमा होत जाते आणि मग हीच जाडी कमी करण्याचे नानाविध उपाय शोधले जातात. अनेकदा हे केलेले उपायच काहींच्या बाबतीत अपायकारक ठरतात. हे उपाय करताना अनेकांना जीवघेण्या वेदना होतात. त्यावरती अमाप खर्च होतो.
सुखी आणि निरोगी आयुष्याची 'व्यायाम' ही गुरूकिल्ली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराचा, मनाचा योग्य निभाव लागावा असे प्रत्येकास वाटत असते. व्यायामाची सुरुवात त्यासाठी उत्साहाने केली जाते. परंतु त्याचे नंतर काय होते हे आपल्यालाच कळत नाही. आज नको, उद्या करू नंतर आठवडयाला, नंतर कधीतरी अशी व्यायामाची गाडी पुढे पुढे सरकू लागते . अन् एकदिवस हि गाडी पूर्णपणे थांबते. पुन्हा शरीरात आळस जागा घेतो आणि शरीर विविध व्याधींना आमंत्रण द्यायला सुरूवात करते.
आजच्या प्रगत यंत्रयुगाने मानवाला खूप सुखासिन बनवले आहे. यंत्रे माणसाच्या सेवेला आली. यामुळे त्याचे श्रम कमी होत गेले आणि ते कमी झाल्याने आपले शरीर नवनवीन रोगांना बळी पडू लागले. यामुळे प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्तीच हळूहळू कमी होऊ लागली आहे. उत्तम आरोग्य असलेल्या माणसांजवळ कोणताही रोग कधीच फिरकत नाही. यामुळे उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी थोडासा वेळ काढून व्यायाम करणे आज गरजेचे झाले आहे. त्यामुळे दररोज किमान अर्धा तास तरी प्रत्येकाने व्यायाम करावा. सकाळी लवकर उठून योगासन करणारा व्यक्ती दिवसभर उत्साही आणि प्रसन्न राहतो. सूर्यनमस्काराचा तर शरीराला खूपच चांगला लाभ होतो. नदी, विहीर अथवा तरणतलावामध्ये पोहणे हा सुध्दा एक चांगला व्यायाम आहे. सकाळी किंवा रात्री जेवणानंतर पायी फिरण्याचे अनेक फायदे आहेत.
आजच्या युगात 'फिटनेस' या नविन संकल्पनेमुळे सर्व सोयीयुक्त अशा 'जीम' तयार झाल्या आहेत. त्यामधील शास्त्रशुद्ध प्रशिक्षणामुळे अनेकांना त्याचा फायदा होत आहे. व्यायाम केल्याने प्रत्येकाचे शरीर व मन कार्यक्षम बनते. जीवनात नेहमी उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. उत्साही मन आणि पिळदार, जीमदार शरीर 'आरोग्य' संकल्पनेत अभिप्रेत आहे. आपले मन, आपले आरोग्य योग्य व्यायामाद्वारे उत्तम राखणे हे आपल्याच हातात आहे. 'शरीर सुखी असेल तरच मन सुखी होईल' या तत्त्वानुसार कोणतेही बौध्दिक काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मनाची प्रसनता व सुदृढ निरोगी शरीर आवश्यक आहे. या सर्व गोष्टी व्यायामामुळेच शक्य होणार आहेत. उत्तम आरोग्य प्राप्ती करता, सळसळता उत्साह प्राप्त करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. तरुण पिढीला स्वामी विवेकानंद नेहमी सांगता की, 'ज्यांची शरीरे खचलेली आहे, ज्यांची मनगटे पिचलेली आहेत, अशा तरुणांकडून काहीच होणार नाही.' यासाठी व्यायामाद्वारे शरीर सक्षम बनवणे गरजेचे आहे. बलोपासनेचे महत्त्व विशद करता करता समर्थ रामदासांनी शक्ती - उपासनेचा मार्ग सांगितला आहे. ते त्यांच्या उपासनेच्या महत्त्वामध्ये शक्तिशाली व्हा. शरीर व मन बळकट, सशक्त करण्यासाठी व्यायाम नियमित करा. ज्या व्यक्ती सामर्थ्यशाली आहेत अशाच व्यक्ती जीवनातील विविध संघर्षांना समर्थपणे तोंड देऊ शकतात. कारण व्यायामाच्या घरी सदैव आनंद तरंग असतात.
English translation
The importance of exercise in life
We always hear that 'health is the key to life'. 'Health is superior to any wealth. I think so. Body wealth is better than immense wealth. Wealth can be regained in life. Can be edited. But regaining physical wealth is very difficult and very urgent. This is why exercise is required from childhood. Wealth is often inherited automatically. But physical wealth, healthy living has to be obtained by oneself. This requires regular exercise. At least one of the twenty-four hours of the day in life should be given to your own body. Right from the daily busy life, at least some time should be done to do different types of body exercises. This eliminates premature fatigue. It creates a desire to do every task with enthusiasm. Irritability caused by various physical ailments disappears.
To keep your body healthy, the exercise of performing all the organs related to the body according to various rules is called 'exercise'. Exercise is necessary for one's own health over time. Getting proper exercise on a regular basis helps maintain the balance of your body. Curvy, beautiful, shapely build means beauty. Some people today think that fat bodies are good for them. The body thickness increases. Fat accumulates in different parts of the body and then various solutions are found to reduce the same thickness. Often these measures alone are detrimental to some. Many suffer from life-threatening pain while undergoing these remedies. It costs a lot.
Exercise is the key to a happy and healthy life. In today's stressful life, everyone wants to take proper care of their body and mind. Exercise is started with enthusiasm for it. But we do not know what happens next. Don't do it today, do it tomorrow, then a week, then sometime such an exercise train starts moving forward. One day the train stops completely. Again laziness takes place in the body and the body begins to invite various ailments.
Today's advanced machine age has made human beings very happy. The machines came into the service of man. As a result, his labor became less and less, and his body became prone to new diseases. As a result, everyone's immune system is slowly weakening. People with good health never have any disease. This makes it necessary to take some time off and exercise to get better health. So everyone should exercise at least half an hour every day. A person who gets up early in the morning and does yogasana stays energetic and happy throughout the day. The sun mask is very good for the body. Swimming in a river, well or swimming pool is also a good exercise. There are many benefits to walking in the morning or after dinner.
In today's age, the new concept of 'fitness' has created all such 'gyms'. Many are benefiting from his scientific training. Exercise makes everyone's body and mind efficient. Exercise is needed to always be energetic and happy in life. Enthusiastic mind and toned, jimdar body is meant in the concept of 'health'. It is up to you to keep your mind and health healthy through proper exercise. According to the principle of 'the mind will be happy only if the body is happy', the mind is happy and a healthy body is necessary to carry out any intellectual work properly. All this is possible only through exercise. In order to achieve good health, it is necessary to exercise to achieve smoothness and enthusiasm. Swami Vivekananda always tells the younger generation, 'Nothing will happen to young people whose bodies are worn out, whose wrists are crushed.' This requires empowering the body through exercise. Explaining the importance of force worship, Samarth Ramdas has explained the path of Shakti-worship. Be strong in the importance of their worship. Exercise regularly to strengthen your body and mind. Only those who are strong can cope with the various struggles of life. Because there are always waves of joy at the exercise house.