गूड फ्रायडे : पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महा शुक्रवार, की काळा शुक्रवार...!
Good Friday: Holy Friday, Good Friday, Great Friday, or Black Friday ...!
गुड फ्रायडे म्हणजेच पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार. ख्रिश्चन धर्मामध्ये हा दिवस सुट्टीचा दिवस असतो. ईस्टरच्या अगोदरच्या शुक्रवारी संपूर्ण जगातील ख्रिश्चन समुदायामध्ये हा दिवस पवित्र सण म्हणून पाळला जातो. आपल्या देशामध्ये या दिवशी सर्व कार्यालये, शाळा, कॉलेजेस यांना सुट्टी असते. ख्रिश्चन धर्मातील जनसमुदयाच्या समजुतीप्रमाणे याच दिवशी येशू ख्रिस्त यांना क्रॉसवर चढवण्यात आले. या वाईट घटनेची आठवण म्हणून ख्रिश्चन लोक संपूर्ण जगात हा दिवस शोकदिवस म्हणून पाळतात. त्यामुळे या दिवसाला काळा शुक्रवार असेही संबोधले जाते. जगातील अनेक ख्रिश्चन पारंपारिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय शोक दुःखवट्याप्रमाणे मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे केले जात नाहीत. या दिवशी अनेक लोक चर्च मध्ये जाऊन येशू यांनी केलेल्या बलिदानाबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतात. परंतू काही लोकांना या दिवसाविषयी गैरसमज असल्याने अनेकजण या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा पाठवतात.
मग मनामध्ये प्रश्न निर्माण होतो तो, का लटकवलं असेल येशू यांना क्रॉसवर? ख्रिश्चन धर्मातील रितिरिवजाप्रमाण येशू ख्रिस्त हे साक्षात परमेश्वराचे पुत्र होते. अज्ञानाच्या काळ्या कुट्ट अंधारातून आपल्या समुदायाला शिक्षित करण्याचे पवित्र कार्य ते करत होते. हेच त्यांचे पवित्र कार्य त्यावेळच्या काही कट्टरपंथी लोकांना आवडले नाही आणि त्यांनी येशू ख्रिस्त यांना विरोध केला. याच कट्टरपंथी लोकांनी त्यावेळेचे रोमनचे गव्हर्नर पितालुसकडे त्यांच्याविरूध्द तक्रार केली. त्यामुळे रोमन मध्ये यहुदी लोकांनी आपल्या कार्यकाळात क्रांती करू नये, तसेच त्यांना खूश करण्यासाठी गव्हर्नर यांनी येशू ख्रिस्त यांना क्रॉसवर चढवून जीवे मारण्याचे आदेश दिले.
त्यांच्या या आदेशान्वये याच दिवशी रोमन शिपायांनी त्यांना क्रॉसवर लटकवून जीवे मारले होते. क्रॉसवर चढवल्यानंतर रोमन शिपायांपैकी एकाने त्याच्या छातीमध्ये भाला मारून ते खरच मृत झालेत की नाहीत याची खात्री केली होती. (संदर्भ-१९वे वचन२४ योहान अध्याय) मग असे असून ही जगभरातील ख्रिश्चन लोक या दिवसाला शुभ शुक्रवार किंवा गुड फ्रायडे अस का म्हणतात, याविषयी ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कारण पुरातन इतिहासातील येशू ख्रिस्त यांच्या जीवनाच्या सत्यकथेकडे जाण्याचा हाच दिवस परमोच्च बिंदू आहे. अनेक संदेष्टयांनी याच दिवशी येशू ख्रिस्तापूर्वी येशू ख्रिस्त यांच्या विषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली होती. कसल्याही प्रकारचे पाप न करता, कोणत्याही प्रकारची चूक न करता सुध्दा परमेश्वराच्या सुपुत्राला काही कट्टरपंथी लोकांनी सुळावर चढवले. असे असून ही हा दिवस शुभ शुक्रवार, गुड फ्रायडे कसा? याचे उत्तर आपल्याला मिळते ते बायबल या पवित्र ग्रंथातील नव करारातील चार शुभवर्तमानात.
येशू ख्रिस्त यांचे जे बारा शिष्य होते त्यापैकी मार्क, लुक आणि योहान यांनी येशूच्या मृत्यूनंतर व पुनरुत्थानानंतर अनेक वर्षानंतर येशूविषयी चरित्र लिहून ठेवले होते. त्यांनी लिहलेल्या माहितीनूसार येशू यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी त्यांचे सर्व शिष्य त्यांच्या मृतदेहाला सुंगधी मसाले लावण्यासाठी येशू यांच्या कबरी जवळ गेले तेव्हा त्यांना त्या कबरीमध्ये त्यांच्या त्यागाची वस्त्रे दिसली. त्याचक्षणी त्याठिकाणी उभ्या असलेल्या देवदूताच्या दिव्य आकृतीने त्यांना विचारले, 'तुम्ही येशूला शोधत आहात का? तुम्ही जिवंत असलेल्याचा शोध मेलेल्या मध्ये का करत आहात? मृत्यूपूर्वी वर्तवलेल्या भविष्यवाणीनूसार तो तुमच्या अगोदरच गालील गावामध्ये गेला आहे." ( संदर्भ : लुक २४वा अध्याय, वचन ५ व ६ - बायबल) येशू ख्रिस्त यांनी मृत्यला शांतपणे स्विकारून मृत्युवर विजय प्राप्त करून ते पुनरुत्थानित झाले ते याच दिवशी. म्हणून हा शुकवार शुभ शुक्रवार, पवित्र शुक्रवार म्हणून मानला जातो. म्हणून या शुक्रवारला 'गुड फ्रायडे' असे म्हणतात.
येशू ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानाच्या काहणीवर अनेक लोकांचा विश्वास बसत नाही. परंतू त्यांच्या पुनरुत्थानंतर त्यांच्या बारा शिष्यांसह त्यांनी सुमारे पाचशे पेक्षा जास्त लोकांना स्वतःच्या अस्तित्वाचा साक्षात्कार किंवा दर्शन दिले आहे. आपल्या भारतातील हिंदू धर्माचे प्रसारक योगी परमहंस योगानंद यांनीही या घटनेला साक्ष दिलेली दिसते. त्यांचे पुस्तक 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगा' याची प्रस्तावना डॉ. इव्हेरन्स वेन्टस् यांची आहे. याच ग्रंथाच्या मराठी आवृत्तीमधली प्रश्नामध्ये ६७८ व ६७९ या पान क्रमांक वर स्वामींनी स्वतःला भगवान येशू यांचे दर्शन झाल्याचा वृत्तांत दिला आहे.
त्याचबरोबर येशू ख्रिस्त यांच्या बारा शिष्यांपैकी त्यांचे एक शिष्य संत थॉमस यांनी येशू यांच्या पुनरुत्थाना संबधी संशय घेतल्याचा वृतांत बायबल या ग्रंथामध्ये आढळतो. येशू यांच्या पुनरुत्थानानंतर ज्यावेळी येशू यांनी त्यांच्या शिष्यांना एका खोलीत साक्षात्कार किंवा दर्शन दिले. त्यावेळी त्या खोलीमध्ये संत थॉमस हे शिष्य हजर नव्हते. ते खोलीत आल्यानंतर इतर शिष्यांनी येशू यांच्या दर्शनाचे वृत्त त्यांना सांगितले. तेव्हा ते इतर शिष्यांना म्हणाले, 'मी जेव्हा प्रत्यक्ष डोळ्याने त्यांना पाहिन तेव्हाच ते जिवंत आहेत यावर विश्वास ठेवेन.' या प्रसंगानंतर एके दिवशी एका बंद खोलीमध्ये संत थॉमससह इतर सर्व शिष्य प्रार्थना करत होते. त्याचवेळी अचानक येशू यांनी साक्षात्कार दाखवला. ते त्याठिकाणी प्रकट झाले. त्यावेळच्या येशू ख्रिस्त यांच्या आजूबाजूचे तेज आणि दिव्य प्रकाश पाहून सर्व शिष्य भयभीत झाले. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाले, 'सर्व शांत राहा.' त्यांनी थॉमस यांना स्वतःच्या जवळ बोलावले आणि रोमन शिपायाने त्याचा छातीमध्ये ज्याठिकाणी भाला मारला होता, त्याठिकाणी बोट लावण्यास सांगितले आणि थॉमसला विचारल, 'आतातरी विश्वास ठेवशील का?' त्यानंतर मात्र हळहळत, सद्गगधीत होत थॉमस म्हणाले, 'माझा प्रभू, माझा देव.' त्यावेळी माणसाच्या या संशयी वृत्तीला पाहून येशू आपल्या थॉमस या शिष्याला म्हणाले, 'आता तू मला प्रत्यक्ष पाहिलेस म्हणून विश्वास ठेवलास, पण जे मला न पाहता हि माझ्यावर विश्वास ठेवतात, तेच धन्य.'
येशू ख्रिस्त यांचे मृत अवस्थेमधून पुन्हा जिवंत अवस्थेमध्ये अनेकांना दर्शन देणे हे तर त्यांचे देवत्व व अमरत्व त्यांना प्राप्त झाल्याचे सिध्द करते. परंतू त्या पुढेही जाऊन या घटनेचे सत्य हा शुकवार 'सत्याचा असत्यावर झालेला विजय, प्रेमाने द्वेषावर मिळवलेला विजय' स्पष्ट करतो. कारण याच क्रॉसखांबावर आपल्या जीवनाची अंतिम घटीका सोसत असताना सुद्धा या दिव्य अशा महात्म्याने म्हटले होते, 'हे भगवंता या सर्वांना माफ कर, क्षमा कर. कारण हे काय करत आहेत हे यांनाच यावेळी कळत नाही आहे.' ( संदर्भ : अध्याय २३ वचन ३४ : लुक )
आजच्या कलयुगामध्ये दहशतवादाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला वेठीस धरले जात असताना, आपलीच हत्या करणारांना माफ कराव, क्षमा करावी याकरीता भगवंताकडे प्रार्थना करणारे येशू हे फक्त आकाशाच्या उंची एवढे न होता स्वर्गाच्याही उंची पेक्षा उंच होत आहेत.
येशू ख्रिस्त यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सर्व मानवजातीला जीवनाचे खरे सार समजावण्यात घालवले. इस्त्राईमधील ज्या जेरुसलेम मध्ये येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. त्याच जेरुसलेम येथील धर्मग्रंथामध्ये न्याय आणि शिक्षेबाबत लिहिले आहे की, कोणी कोणाचा जर डोळा फोडला तर त्याबदल्यात त्याचा डोळा फोडावा. कोणी कोणाचा हात किंवा पाय तोडला असेल तर त्याचा हात पाय तोडावा. परंतू याच भूमीमध्ये जन्म घेतलेल्या येशू ख्रिस्त यांनी आपल्या शिष्यांना उपदेश केला की, 'कधीही दृष्टांना अडवू नका, जर एखादा तुमच्या उजव्या गालावर मारत असेल तर त्याच्या पुढे डावा गाल करा. जर कोणी तुमचे सर्वच हिसकावून घेत असेल तर त्याला अडवू नका.' अशाप्रकारे सर्व विश्वामध्ये सुरू असलेल्या सूडचक्रामधून सर्व मानवजातीची सुटका करायची आहे. त्याचे कारण म्हणजे रागाने रागच वाढतच जातो तर द्वेषाने द्वेषच वाढत जातो. येशू नेहमी उपदेश करायचे, शत्रूवर नेहमी प्रेम करा, शेजाऱ्यावर अपार माया करा. असा वेगळा सल्ला कोणालाही पाळ्णे तसे कठीणच आहे. परंतू भगवंताने यासर्वामागची तर्क संगती समजावून सांगितली आहे. ते म्हणतात, 'ज्यांना आपण उसने म्हणून देता, त्याच्याकडून उसने परत मिळावे या हेतूने जर उसने दिले तर त्यामध्ये मोठेपणा तो काय?' पाप केलेले लोकच पाप करणाऱ्या लोकांना उसने देतात. परंतू आपण सर्वजण पाप पुण्याचा कधीही विचार न करता सर्वावर सारखे प्रेम करणारी प्रभूची लेकरे आहात ना? मग आपण प्रभूसारखे झाले पाहिजे. परमेश्वर कोणता ही भेदभाव न करता, चांगली आणि वाईट प्रवृत्ती असणाऱ्या दोन्ही लोकांच्या शेतावर समप्रमाणात पावसाचा वर्षाव करतो. दोघांनाही सम प्रमाणात सुख देऊ इच्छितो. जे आपला द्वेष करतात त्याच्यांवर प्रेम केले तरच ते खरे दिव्य प्रेम. नाहीतर आपल्यावरच प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करणे हा फक्त व्यवहार झाला.
आज अनेक लोक, असंख्य संस्था संपूर्ण जगातील दुःखी-कष्टी लोकांचे अश्रू पुसत आहेत, आजारी लोकांची सेवा करत आहेत, मृत्यूच्या दारापर्यंत पोहचलेले तसेच युध्दातील ज़खमी आणि भुकेलेले यांना अन्न पुरवत आहेत. त्यांची मनोभावे सेवा करत आहेत. या सर्वांच्य पाठीमागे दिव्यत्वाप्रमाणे उभे असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्त यांनी सकल मानव जातीच्या उद्धारासाठी केलेले क्रुसावरील दिव्य समर्पण. अशा या महान, मातृवासल्य, करुणामयी, भगवंतपुत्रास शतश: कोटी कोटी प्रणाम, शतशः नमन!
या सर्वावरून या दिवसाला गुड फ्रायडे म्हणजे पवित्र शुक्रवार, शुभ शुक्रवार, महाशुक्रवार, चांगला शुक्रवार म्हणून मानल जातो. जगभर साजरा केला जातो.
धन्यवाद....!
संकलन : श्री. दत्तात्रय महादेव घोरपडे
English translation
Good Friday: Holy Friday, Good Friday, Great Friday, or Black Friday ...!
Good Friday is Holy Friday. In Christianity, this day is a holiday. This day is celebrated as a holy festival in the Christian community all over the world on the Friday before Easter. In our country, all offices, schools, colleges have a holiday on this day. Jesus Christ was crucified on the same day, according to Christian beliefs. To commemorate this tragic event, Christians all over the world observe this day as a day of mourning. Hence this day is also called Black Friday. In many Christian traditional countries of the world, this day is considered as a day of national mourning. So no entertaining events are celebrated on this day. On this day many people go to church and express their heartfelt gratitude for the sacrifice Jesus made. But since some people have misconceptions about this day, many send greetings to each other through social media on this day.
Then the question arises in the mind, why did Jesus hang on the cross? According to Christian tradition, Jesus Christ was the Son of God. He was doing the sacred work of educating his community from the pitch black darkness of ignorance. That is why some fanatics at the time did not like their holy work and opposed Jesus Christ. These same extremists complained to Pilate, the Roman governor at the time. Therefore, in order to appease the Romans, the governor ordered that Jesus Christ be crucified and put to death.
On the same day, he was hanged on a cross by Roman soldiers. After ascending the cross, one of the Roman soldiers stabbed him in the chest with a spear to make sure he was not really dead. (Reference 19th verse 24 John chapter) So it is important to know why Christians around the world call this day Good Friday or Good Friday.
Because this is the culmination of the ancient history of Jesus Christ's life. The prophecies of many prophets about Jesus Christ were fulfilled on the same day. The Son of God was crucified by some fanatics without any sin, without any wrongdoing. Even so, how is this day, Good Friday, Good Friday? We find the answer in the four Gospels of the New Testament in the Bible.
Of the twelve disciples of Jesus Christ, Mark, Luke, and John wrote a biography of Jesus many years after his death and resurrection. According to their account, on the third day after Jesus 'death, all his disciples went to Jesus' tomb to put spices on his body. At that moment the divine figure of the angel standing there asked them, 'Are you looking for Jesus? Why are you searching for the living in the dead? He has already gone to Galilee before you, as prophesied before his death. "(Reference: Luke chapter 24, verses 5 and 6 - Bible) Jesus Christ accepted death peacefully and was resurrected on the same day. So this Friday is Good Friday, Holy Friday. It is considered as Friday, so this Friday is called 'Good Friday'.
Many people do not believe in the story of the resurrection of Jesus Christ. But since his resurrection he has revealed his own existence to more than five hundred people, including his twelve disciples. Yogi Paramahansa Yogananda, the propagator of Hinduism in India, also seems to have witnessed this incident. The preface to his book 'Autobiography of a Yoga' was written by Dr. It belongs to Everns Vents. In the question in the Marathi version of the same book, on pages 678 and 679, Swami has given the news that Lord Jesus himself appeared.
The Bible also tells us that St. Thomas, one of Jesus Christ's twelve disciples, had doubts about Jesus' resurrection. After Jesus' resurrection when Jesus appeared to his disciples in a room. The disciple St. Thomas was not present in that room at the time. As they entered the room, other disciples told them about Jesus' appearance. Then he said to the other disciples, 'I will believe that they are alive only when I see them with my own eyes.' One day after the incident, all the other disciples, including Saint Thomas, were praying in a closed room. At the same time, Jesus suddenly appeared. It appeared there. All the disciples were terrified when they saw the bright and divine light around Jesus Christ at that time. Then the Lord Jesus Christ said to them, 'Be quiet.' They called Thomas to their side, and the Roman soldier asked him to put his finger on the spot where the spear had pierced his chest, and asked Thomas, 'Do you believe now?' After that, Thomas said, shaking, sighing, 'My Lord, my God.' Seeing this skeptical attitude of the man at that time, Jesus said to his disciple Thomas, 'Now you believe because you have seen me, but blessed are those who believe in me without seeing me.'
The reappearance of Jesus Christ from the dead to the living again proves that he has received his divinity and immortality. But going even further, the truth of this incident on Friday explains 'the victory of truth over untruth, the victory of love over hatred'. Because even while suffering the last moment of his life on this cross, this divine Mahatma had said, 'O God, forgive all of them, forgive them. Because they don't know what they are doing at the moment. ' (Ref: Chapter 23 Verse 34: Luke)
In today's Kalyuga, when the whole world is being held hostage by terrorism, Jesus, who prays to God to forgive his own killers, is rising not only to the heights of heaven but also to the heights of heaven.
Jesus Christ spent his entire life explaining the true meaning of life to all mankind. Jesus Christ in Jerusalem, Israel. The same scripture in Jerusalem says about justice and punishment, that if someone breaks his eye, he should break his eye in return. If someone has broken someone's arm or leg, his arm and leg should be broken. But Jesus Christ, who was born in this land, exhorted his disciples, 'Do not be blind, for if someone strikes you on the right cheek, put the left cheek next to him. If someone snatches everything from you, don't stop him. ' In this way, all mankind wants to be freed from the cycle of revenge that is going on all over the world. The reason is that anger only increases anger and hatred only increases hatred. Jesus always preached, always loved the enemy, loved the neighbor immensely. It is difficult for anyone to follow such a different advice. But God has explained the reasoning behind all this. They say, 'If you lend with the intention of getting back what you lend, what is the greatness of it?' Only sinners lend to sinners. But we are all children of the Lord who love everyone equally without ever thinking of sinfulness, aren't we? Then we must become like the Lord. The Lord sends down rain on the fields of both good and bad people without any discrimination. I want to give both of them equal amount of pleasure. Only if you love those who hate you, that is true divine love. Otherwise, it was just a matter of loving those who love us.
Today, many people, countless organizations around the world are shedding tears for the suffering, serving the sick, reaching the brink of death, and feeding the wounded and the hungry. Their spirits are serving. Behind all this is the divine dedication on the cross made by the Lord Jesus Christ for the salvation of all mankind. Hundreds of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores of crores!
From all this, this day is considered as Good Friday, Holy Friday, Good Friday, Good Friday, Good Friday. Celebrated all over the world.
Thanks ....!
Compilation: Mr. Dattatraya Mahadev Ghorpade
सणसमारंभ