वीज बंद पडली तर...
If the power goes out ...
आजच्या प्रगत युगामध्ये विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा खुपच प्रसार झाला आहे. याच विज्ञानामुळे अनेक सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत. बाजारामध्ये तर विविध प्रकारच्या विजेवर चालणाऱ्या नानाविध कंपन्यांच्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये विविध कंपन्यांचे टेलिव्हिजन, पंखे, रेफ्रीजरेटर, म्युझिक सिस्टम, एअर कंडिशनर, स्वयंपाक खोलीतील नानाविध वस्तू, संगणक, इत्यादी अनेक वस्तूंचा समावेश होतो. मानवा त्यामुळे विविध तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्येकांच्या विविध गरजा आज पूर्ण होत आहेत.
पूर्वीच्या काळी मानवाला दिवसभर श्रमदान करून, कठोर कष्ट करून एकवेळचे जेवण मिळत असे. पूर्वीच्या काळातील माणसाला विविध गोष्टींच्या पूर्तीसाठी कोणत्याच वस्तू उपलब्ध नव्हत्या परंतू असे असले तरी त्यावेळची माणस सुखी, समाधानी आणि स्वावलंबी होती. स्वतःच्या कामासाठी कोणत्याही यंत्रावर अवलंबून न राहता ती स्वतःच करून सुखी जीवन जगत होती. मात्र आज त्याहूनही उलटी प्रक्रिया होताना दिसत आहे. आजचा माणूस कष्टाळू न राहता चैन विलासी, आळशी झाला आहे. आजकाल माणसं स्वतःच्या कामासाठी विजेच्या यंत्रांचा जास्तीत जास्त वापर करत आहेत.
जर का ही वीजच बंद पडली तर अनेकांचे अतोनात नुकसान होऊन अनेकांवर नानाविध संकटे ओढवली जातील. वीज बंद पडली तर माणसाच्या कोणत्याही गरजा पूर्ण होणार नाहीत. यामागील कारणेही तितकीच भयानक आहेत. विविध कारखान्यात काम करणारे खूप कामगार आहेत. देशात विविध भागात अनेक कारखाने कार्यरत आहेत. या सर्व कारखान्यातील यंत्रांना वीज लागते. जर ही वीजच बंद पडली तर हे सर्व कारखाने बंद पडतील. गोरगरीब कामगारांना, कारागीरांना मिळणारा रोजगार बंद पडेल. अनेकांचे संसार उघडे पडतील. अनेकांवर उपासमारीची वेळ येईल. त्याचबरोबर अनेकजणांना त्यांना त्यांच्या हव्या असणाऱ्या गरजा पूर्ण करता येणार नाहीत. त्यामुळे सर्वत्र बेकारी वाढेल.
आजचे प्रगत युग हे शैक्षणिक युग आहे. शिक्षण महर्षी यांच्या मोठमोठया शिक्षणसंस्था स्थापन झाल्या आहेत. या सर्व संस्थामधून, शाळांमधून वीज बंद पडली तर विद्यार्थ्यांना शिक्षण घेणेच अवघड होऊन जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुन्हा तेलांच्या दिव्याचा वापर करावा लागेल. सर्व संगणक बंद पडतील, सर्व विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागेल. या सर्व कारणांमुळे आपल्या देशाचा शैक्षणिक विकास इतर देशाहून कमी दर्जाचा होईल. देशाचा विकास होणार नाही. सर्व देशामध्येच अंधाराचे साम्राज्य निर्माण होईल. या अंधारात माणूस चाचपडत राहिल. जर वीज बंद पडली तर सर्वांनाच ते खूप महागात पडेल. आपल जीवन आनंदी जगणं, देशाला प्रगतीप्रथावर पोहचवन कठीण होईल. आज वीज ही प्रत्येकाचीच नित्याची गरज झालेली आहे. मानव या विजेचा गुलाम झाला आहे. हि वीजच देशाच्या विकासाचा आत्मबिंदू आहे. वीज बंद तर घरातील सर्व उपकरणे बंद आणि याची फक्त कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. उन्हाळ्यामध्ये साधी पंधरा मिनिटे वीज गेली तर अंगाची आग आग होते. प्रत्येक जण तिची आतुरतेने वाट पाहतो. संपूर्ण देशामध्ये पसरलेले आगगाडीचे जाळे वीज बंद पडली तर खंडित होईल. वाहतूक व्यवस्था बंद होऊन मालाची ने- आण बंद होईल. सर्व कारखाने, कंपन्या यामधील सर्व उत्पादने बंद होतील. हळूहळू प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला भारत देश पुन्हा अविकसित देशांच्या यादीत समाविष्ट होईल. इतक्या मोठ्या प्रमाणावर वीज ही आवश्यक झालेली आहे.
देशामध्ये चालू असलेली सर्व विकासाची कामे वीज ठप्प झाल्याने ठप्प होतील. आंतरजालच बंद पडल्याने जगात कुठे काय चालले आहे हे काहीच समजणार नाही. त्यामुळे वीज बंद होऊन चालणार नाही.
वीज नसल्यास पृथ्वीवरील सर्व झाडांची कत्तल पुन्हा सुरू होईल आणि आपली वसुंधरा ओसाड होईल. त्यामुळे सर्वत्र पाऊसपाणी, रोगराई, प्रदूषण अशा अनेक समस्या उभ्या राहतील. त्यामुळेच वीज अतिशय महत्त्वाची आहे. वीज बंद पडली तर देशाच्या विकासाला अडसर निर्माण होईल. त्यामुळे वेळीच सर्वांनी आज विजेबाबत ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याबाबत जागृत राहून वि जेची बचत केली पाहिजे. मित्रांनो, 'असेल प्रचंड प्रमाणात वीज तरच अनेक गोष्टींचे होईल चिज.'
English translation
If the power goes out ...
In today's advanced age, science and technology have certainly spread. This science has made many conveniences available. In the market, there are various types of electric products available. It includes televisions, fans, refrigerators, music systems, air conditioners, kitchen utensils, computers, etc. from various companies. Humans are therefore trying to develop themselves using various technologies. So the different needs of everyone are being met today.
In the past, human beings worked hard all day and worked hard to get a one-time meal. In the past, man did not have any means to fulfill various things, but even then, man was happy, content and self-reliant. She was living a happy life by herself without relying on any machine for her work. Today, however, the reverse process is taking place. Today's man has become lazy, lazy without being hardworking. Nowadays people are increasingly using electrical appliances for their own work.
If this power is cut off, many will be severely damaged and many will face various calamities. If the power goes out, no human needs will be met. The reasons behind this are just as frightening. There are a lot of workers working in different factories. There are many factories operating in different parts of the country. All these factory machines require electricity. If the power goes out, all these factories will shut down. The employment of poor workers and artisans will stop. The worlds of many will be opened. Many will experience a time of famine. At the same time, many will not be able to meet their needs. This will increase unemployment everywhere.
Today's advanced age is the educational age. Shikshan Maharshi's large educational institutions have been established. Out of all these institutions, if the power goes out from the schools, it will be difficult for the students to get education. Students will have to use oil lamps again to study. All computers will be turned off, all students will have to study in the dark. For all these reasons, our country's educational development will be inferior to other countries. The country will not develop. The kingdom of darkness will be created in all lands. In this darkness man will continue to stagger. If the power goes out, it will be very expensive for everyone. It will be difficult to lead a happy life and lead the country to progress. Today, electricity is a daily necessity for everyone. Humans are enslaved to this power. This power is the focal point of the country's development. When the power is off, all the appliances in the house are turned off and even if you just imagine it, you get a thorn in your side In summer, if the electricity goes off for a simple fifteen minutes, the limbs catch fire. Everyone is looking forward to it. The train network spread across the country will be cut off if the power goes out. Transportation will be closed and freight will be closed. All factories, companies, all these products will be closed. Our country, India, which is slowly moving towards progress, will again be included in the list of underdeveloped countries. Such a large amount of electricity is required.
All the ongoing development works in the country will come to a standstill due to power outage. With the Internet shut down, there is no understanding of what is going on in the world. Therefore, the power will not be switched off.
Without electricity, all the trees on earth would be cut down again and our planet would become desolate. Therefore, there will be many problems like rain water, disease, pollution everywhere. That is why electricity is so important. If the power goes out, it will create obstacles for the development of the country. Therefore, everyone should be aware of the problems that have arisen regarding electricity today and save VJ. Friends, 'If there is a huge amount of electricity, then many things will happen.'