मी करोडपती झाले तर...
If I became a millionaire ...
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमांच्या नवीन भागांची घोषणा दूरचित्रवाणीवरील ब्रेकिंग न्यूजमध्ये झाली. अमिताभजी यांच्या भारदार आवाजातील जाहिरात थोड्याच वेळात कानावर पडली. 'एक विलक्षण, अद्भुत खेळ...' बक्षिसांची रक्कम ही सात कोटी असणार आहे. हे सर्व ऐकून मी वेगळ्याच जगात विहार करू लागले.
प्रत्येकाची स्वप्ननगरी असलेल्या मुंबईमधील भल्या मोठया स्टुडिओमध्ये, हजारो प्रेक्षकांसमोर मी हॉट सीटवर अमिताभजींसमोर विराजमान झाले होते. सर्वकाही विलक्षण वाटत होत. नक्की मी जागी आहे कि स्वप्नात आहे हेच समजत नव्हते. समोर अभिनयाचा बादशहा अमिताभजी खेळाचे सर्व नियम एक एक करून मला सांगत होते. खेळामधील लाईफलाईन सुविधेचा वापर कसा करावा हे व्यवस्थित समजावून सांगत होते. करोडपतीच्या सेटवर आतापर्यंत झालेल्या सर्व एपिसोडमधील सर्व स्पर्धांमधील स्पर्धकामध्ये मीच वयाने लहान सर्धक होते. सातारा जिल्ह्यातील फलटणसारख्या अति ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावातील मी स्पर्धक होते. आता मी यशस्वी होणारच या दृढ आत्मविश्वासाने मी हॉटसीटपर्यंत पोहोचले होते. अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले होते.
मला आज कसल्याही परिस्थितीमध्ये यश संपादन करायचेच होते. महाराष्ट्र राज्याचे नाव सर्व देशात गाजवायचे होते. यासाठी माझे प्रिय आई-बाबा, माझे कॉलेज मित्र, माझे गुरूवर्य आणि माझा टुमदार गाव या सर्वांचे शुभाशिर्वाद माझ्या पाठीशी होते. अनेक मित्रांच्या शुभेच्छांची सोबत या पर्यंतच्या प्रवासात होती. म्हणूनच 'सप्तकोटी, महागुणी, अदभुत खेळ' मध्ये मी करोडपती होणारच या दृढ आत्मविश्वाने हॉटसीटवर बसून मी प्रत्येक प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक देत मी शेवटच्या प्रश्नापर्यंत नक्कीच पोहोचणार होते.
क्षणार्धातच त्या अनोख्या अशा खेळास प्रारंभ झाला. पहिला 'मनचाहा पडाव' मी कोणतीही लाईफलाईन न वापता पार केला. अमिताभजींनी माझे 'आप बहुतही उमदा खेल रही हो' असे म्हणून कौतुक केले. त्यांनी अनेक जीवन घडलेल्या चांगल्या वाईट घटनांवर खेळता खेळता माझ्याशी चर्चा केली. त्यामुळे काही काळ मी खेळाचे टेन्शन विसरत होते. आज समजल ते मधे मधे अशाप्रकारे स्पर्धकाला का बोलते करतात ते. समोर संगणक स्क्रीनवर बक्षिसाची रक्कम वाढत चालली होती. समोर येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूपही बदलू लागले. काही प्रश्नांनी तर मलाच नव्हे तर पूर्ण स्टुडिओमध्येच गंभीरता आणली. अनेकदा मिळालेली रक्कम घेऊन खेळ सोडावा असे मनामध्ये अनेकदा आले. परंतू आतील दृढ आत्मविश्वास असे करण्यास परवानगी देत नव्हता आणि शेवटी तो अभूतपूर्व क्षण आला... अभिताभजींनी माझ्या नावाची, मी चक्क सात कोटी रूपये जिंकल्याची घोषणा केली. सर्व स्टुडिओमध्ये प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. चारीबाजूंनी अनेक कॅमेर लखलखले. एक नवाच इतिहास रचला होतो मी, तो सुध्दा बारावीमधील विद्यार्थीनीने. सर्व देशात महाराष्ट्राचा, मराठी तरुणांचा जयघोष झाला. माझ्या आई -बाबांची छाती अभिमानाने उंचावली होती. प्रत्येकजण शुभेच्छा देऊन माझे कौतुक करत होते.
एका गरीब सामान्य कुटुंबातील मराठी मुलगी करोडपती बनली होती. स्वतःच्या बुद्धिकौशल्यावर तिने सात कोटी प्राप्त केले होते. तिचे अनेक दिवसांचे जिंकण्याचे स्वप्न साकार झाले होते. आता या पैशामधून समाजासाठी खूप काही करायचे होते. या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन मिळालेल्या या रक्कमेतून योग्य तो कर शासनास देऊन उरलेल्या रक्कमेतून अनेक कामे पूर्ण करायची आहेत. माझ्या बक्षिसाच्या या रक्कमेवर प्रथम हक्क माझ्या आई-बाबांचा आहे. त्यामुळे मिळालेला सात कोटींचा धनादेश प्रथम त्यांच्या चरणी अर्पण केला. यातील काही रक्कम मी त्यांना हक्काने देणार आहे. या प्रभूत्व पातळी पर्यंत मी त्यांच्या मुळेच पोहचले होते. यामागे त्यांच्या अपार कष्टाची मला जाणीव होती. त्याचबरोबर माझ्या कॉलेजमध्ये अनेक गोष्टांची कमतरता असल्याने कॉलेजला काही रक्कम देणार आहे. माझ्या खेडेगावात व्यवस्थित रोड नाहीत. पावसाळ्यात गावामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी काही रक्कम मला खर्च करायची आहे. गावामध्ये सर्वांसाठी मोफत वाचनालय सुरू करणार आहे. माझ्या तालुक्यातील गरजू, निराधार लोकांसाठी एक साहाय्यता केंद मला सुरू करायचे आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवायचा आहे. अस खूप खूप काही करायचे आहे. देवाच्या कृपेने आता पैसा ही जवळ आहे. तर चला सर्वजन एकत्र येऊन आपला गाव प्रगतीपथावर पोहोचवू या.
" वो मेरे सभी साथी हाथ बढाना,
वैसे तो एक अकेला जल्दी थक जायेगा
सब मिलकर एक दुसरे का साथ निभाना
वो मेरे सभी साथी हाथ बढाना"
चला तर मित्रांनो, याकरीता मला तुम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे. एवढ्यात आईने हाक मारली आणि वास्तवाचे भान आले.
English translation
If I became a millionaire ...
The new episodes of 'Kaun Banega Crorepati' were announced in the breaking news on television. The advertisement of Amitabhji's loud voice was heard in a short time. 'A fantastic, wonderful game ...' The prize money will be seven crores. Hearing all this, I started wandering in a different world.
In a nice big studio in Mumbai, everyone's dream city, in front of thousands of spectators, I was sitting on the hot seat in front of Amitabh. Everything seemed fantastic. I didn't know if I was awake or in a dream. The king of acting in front, Amitabhji, was telling me all the rules of the game one by one. He was explaining how to use the lifeline facility in sports. Of all the contestants in all the episodes that have taken place so far on the set of Millionaire, I was the youngest fan. I was a contestant from a small village in a very rural area like Phaltan in Satara district. I reached the hot seat with the conviction that I would succeed now. The dream he had seen for many years had come true.
I wanted to achieve success in any situation today. The name of the state of Maharashtra was to be proclaimed all over the country. For this, the blessings of my dear parents, my college friends, my guru and my beautiful village were with me. I was on this journey with the good wishes of many friends. That is why in 'Saptakoti, Mahaguni, Adbhut Khel', I was sure that I would become a millionaire.
In an instant, that unique game started. The first 'Manchaha Padav' I crossed without using any lifeline. Amitabhji complimented me as 'Aap bahuthi umda khel rahi ho'. He talked to me while playing on many good and bad events that happened in his life. So for a while I was forgetting the tension of the game. Today I understand why they sometimes speak to the contestant in this way. The prize money was growing on the computer screen in front. The nature of the questions also began to change. Some questions brought seriousness not only to me but to the entire studio. It often occurred to me to leave the game with the money I received. But my inner self-confidence did not allow me to do so and finally an unprecedented moment came ... Abhitabhaji announced my name, I won seven crore rupees. There was loud applause in all the studios. Several cameras flashed around. I had made a new history, also with a 12th standard student. Maharashtra and Marathi youth cheered all over the country. My parents' chests were raised with pride. Everyone was complimenting me with good wishes.
A Marathi girl from a poor ordinary family had become a millionaire. She had earned seven crores on her own intellect. Her dream of winning for many days had come true. Now there was a lot to be done for the society with this money. Many works are to be completed from the remaining amount by paying the appropriate tax to the government from the amount received from the competition. My parents are the first to claim this amount of my prize. The first check of Rs 7 crore was offered at his feet. I will claim some of this amount. It was because of them that I reached this level of mastery. I was aware of their immense hard work. Also my college is going to give some amount to the college as there is a lack of many things. There are no proper roads in my village. The rainy season causes many problems in the village. I want to spend some money for that. A free library will be started for all in the village. I want to start a support center for the needy, destitute people in my taluka. The problem of drinking water in the village has to be solved permanently. There is so much to do. By the grace of God, money is near. So let's all come together and make our village prosperous.
"All my fellow hands out,
By the way, one alone will get tired quickly
Playing with each other all together
All my friends raise their hands. "
Come on friends, I need your help for this. At that moment, the mother called and realized the truth.
कल्पनाप्रधाननिबंध