विनंतीपत्र / मागणीपत्र : पत्रलेखन - उपयोजित लेखन कृती आराखडा क्र. २ - विषय : मराठी
१. विनंतीपत्र
उत्तर :
दिनांक : २७ फेब्रुवारी २०२१
प्रति,
माननीय श्री. अच्युत पालव
संस्थापक,
अक्षर सुलेखन संस्था,
गांधी रोड,
दादर, मुंबई - ४०००७५
विषय : शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुलेखन कार्यशाळा घेण्याबाबत.
महोदय,
मी अ.ब.क., ज्ञानप्रबोधनी हायस्कूलची कलाप्रमुख म्हणून आपणांस हे पत्र लिहित आहे. आताच काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये आलेली आपल्या संस्थेची 'अक्षर' ही जाहिरात वाचली. या जाहिराती मध्ये विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारण्यासाठी आपण अनेक उपक्रम राबणार असे नमूद केले आहे. आमच्या हायस्कूलच्या पालकप्रतिनिधींची सभा घेऊन त्यामध्ये या कार्यशाळेविषयी चर्चा केलेली आहे. पालकांना ही विद्यार्थ्यांच्या अक्षरा बाबत चिंता असल्याचे दिसून आले. त्यांनी सुध्दा या कार्यशाळेचे आयोजन शाळेत करावे अशी विनंती केली आहे. त्यामुळे संस्थां कमिटीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन आम्हीही आमच्या शाळेत आमच्या विद्यार्थांकरीता अशीच दोन दिवसीय सुलेखन कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविले आहे. या क्षेत्रातील तुमचे कौशल्प सर्वांच्याच परिचयाचे आणि अतिशय वाखानणीय आहे.
त्यामुळे आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण अक्षरांचा नव्याने परिचय करून द्यावा, अशी आमची मनोमन इच्छा आहे. त्यामुळे आपण या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आमच्या शाळेत करावे, ही आपणास आमची आग्रहाची विनंती आहे. आमच्या शाळेतील अंदाजे ९० विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये भाग घेतील. या कार्यशाळेसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या संस्थेमार्फत उपलब्ध करणार असाल, तर त्यासंबंधीची लागणारी रक्कम आपल्या वेळेनुसार, वेळेवर संस्थेला पोच करण्यात येईल. त्याकरिता साहित्यासाठी लागणारी रक्कम समजली तर बरे होईल.
त्यामुळे आपणास विनंती आहे की, आपल्या सोईचे दोन दिवस आणि वेळ, तसेच या कार्यशाळेसाठी आपले मानधन आम्हांला अवश्य कळवा. आमच्या शाळेतील विद्यार्थी तुमची सुलेखन कला अवगत करून घेण्यास उत्सुक आहेत. आम्ही आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत. स्विकारून योग्य ते सहकार्य करावे, हि विनंती.
कळावे,
आपली कृपाभिलाषी,
अ.ब.क.
(कलाप्रमुख)
ज्ञानप्रबोधनी हायस्कूल,
टिळक पथ,
बोरीवली, मुंबई ४०००६६
२. मागणीपत्र
दिनांक : २५ मार्च २०२१
प्रति,
माननीय रमेश मोरे
विक्री विभाग प्रमुख,
अक्षर सुलेखन संस्था,
गांधी रोड,
दादर, मुंबई - ४०००७५
विषय : सुलेखन साहित्याची मागणी करण्याबाबत.
महोदय,
मी अ.ब.क. ज्ञानप्रबोधिनी हायस्कूलची कलाप्रमुख या नात्याने आपणास हे मागणीपत्र लिहीत आहे. या वर्षी आमच्या शाळेमध्ये दिनांक १६ व १७ एप्रिल २०२१ रोजी आपल्या संस्थेमार्फत दोन दिवसीय सुलेखन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेविषयी आपल्या संस्थेचे सन्माननीय संस्थापक श्रीयुत अच्युत पालव यांच्याशी योग्य ती बातचित आमच्या शाळेच्या वरिष्ठांमार्फत पूर्ण झालेली आहे.
या सुलेखन कार्यशाळेसाठी लागणारे सर्व जरूरीचे लेखन साहित्य आपल्या संस्थेकडून उपलब्ध होणार असल्याचे कळल्याने संबंधित वस्तूंसाठी मागणीपत्र पाठवत आहे. कार्यशाळेसाठी लागणाऱ्या संबंधित सर्व साहित्याची यादी या पत्रासोबत जोडली आहे. हे सर्व साहित्य आपल्या मार्फत दिनांक १२ एप्रिल २०२१ पर्यंत आमच्या शाळेमध्ये वेळेत पाठवल्यास खुप सोईचे होईल. कृपया सोबत या सर्व साहित्याचे बिलही पाठवावे जेणेकरून साहित्य शाळेत पोहचल्या बरोबर त्याच दिवशी रक्कम आपणास सुपूर्द करता येईल.
हि कार्यशाळा आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांकरीता आयोजित केलेली आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थी हे गरीब परिस्थितील असल्याने शाळेला मिळणाऱ्या फि चे प्रमाण फारच कमी प्रमाणत आहे. या सर्व गोष्टींचा आपण योग्य तो विचार करून या साहित्यावर योग्य अशी सवलत आपण द्याल अशी मला खात्री आहे. स्विकारून योग्य ते सहकार्य करावे, हि विनंती.
साहित्याची यादी :
क्रमांक वस्तू नग
१. काळ्या शाईच्या बाटल्या (१००मिली) ११० नग
२. आलेख कागद ३००
३. चित्रकला वह्या १५०
४. सुलेखन पेन १५०
५. नीबचा संच १५०
कळावे,
आपली कृपाभिलाषी,
अ.ब.क.
कलाप्रमुख
पत्ता
ज्ञानप्रबोधनी हायस्कूल,
टिळक पथ,
बोरिवली, मुंबई - ४०००६६