माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर... ( कल्पनारम्य निबंध / कल्पनाविलासात्मक निबंध) If the person loses the power to laugh...

 माणूस हसण्याची शक्ती गमावून बसला तर...

If the person loses the power to laugh...

          दूरचित्रवाणीवरील 'चला हवा येऊ दया' हा कार्यक्रम पाहात असताना त्या वेळी खरोखच मी खूप खूप हसलो. कार्यक्रमातील प्रत्येकाच्या संभाषणावर स्वाभाविकपणे हसू येत होते. या संपूर्ण कार्यक्रमात हास्याचा समुद्र मोठमोठ्या लाठा घेत जणू बाहेर पडत होता आणि हसता हसता अचानक माझ्या मनात एक विचार आला की, माणूस हसण्याची शक्तीच गमावून किंवा हरवून बसला तर...


          तसे पाहिले तर 'हसणे' हे  मानवाला लाभलेले जन्मजात वरदान आहे. माणूस जन्मला आल्यापासून त्याला भाषा किंवा बोलता येण्याच्या अगोदरपासूनच हसण्याची क्रिया सुरू होते. चार ते पाच महिन्यांच, बोलता हि न येणार बाळ हसूनच प्रतिसाद देत असतं ना! अशी हसणे किंवा हास्य ही मनुष्याची मूलभूत प्रवृत्ती आहे. आयुष्याचे वेगवेगळे पडाव जगत असताना, जीवनातील विविध प्रसंगांना तोंड देताना हास्य प्रवृत्तीची अत्यंत गरज आहे. परंतू मानव आपली हसण्याची शक्तीच गमावून बसला तर, आयुष्य जगणे कष्टाचे झाल्याशिवाय राहणार नाही.


          ' सदैव हसा आणि निरोगी राहा' असे नेहमीच सांगितले जाते. आयुष्याचा निखळ आनंद प्राप्त करण्यासाठी हसणे हे एक प्रभावी औषध आहे. हे औषध सर्वांजवळ मोफत उपलब्ध आहे. परंतू हास्याची शक्तीच गमावून बसलेल्या, गंभीर स्वभावाच्या माणसांनी मनसोक्त हसायला वेळ मिळू नये इतकं ते महाग करून ठेवल आहे. आयुष्यात प्रसंग आनंदी असो की दुःखी, काहींचा चेहरा आपला सदैव गंभीरच! दैनंदिन आयुष्यात हसण्याच्या कितीतरी संधी येत असतात, त्यावेळी प्रत्येकाने मनमोकळं हसावं ही अपेक्षा असते. तरीसुध्दा अनेकदा गंभीर चेहरा करून बसलेले हसत नाहीत. इतर लोकांच्या हसण्याचा संसर्ग ते स्वतःला कधीच होऊ देत नाहीत.


          जो माणूस स्वतःची हसण्याची शक्ती गमावून बसला आहे त्याला हे विविधरंगी जीवन उदासवाणे वाटेल. त्याला त्याच्या जीवनात सगळीकडे एक प्रकारची मरगळ जाणवेल. हेच विविधरंगी जीवन आनंदाने जगण्यासाठी गरज आहे ती हसण्याची. सतत हसा, मनसोक्त हसा. जीवनात आनंदी राहण्यासाठी हसणे फार महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा. हसण्यातूनच प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी ऊर्जा, स्फूर्ती मिळत असते. जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगाना सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा खळखळून हसा. कोणत्या तरी कवीने असे म्हटले आहे की, "जीवनात हसण्याची खूप संधी असून ही ते मात्र हसले नव्हते."


          मी माझ्या जीवनातील दुःख हासता हासता पचवले होते. दुःखावर जर मात करायची असेल तर हसणे फार महत्त्वाचे आहे. परमेश्वाराच्या कृपेने मिळालेल्या जगण्यावर प्रेम करायचे असेल तर मधून मधून हसण्याचे टॉनिक घेतलेच पाहिजे.


          आजच्या धकाधकीच्या दिनचर्येमध्ये स्वतःसाठी आनंदाचे काही क्षण मिळवण्यासाठी हसणे महत्त्वाचे आहे. विविध 'हसवण्याचे कार्यक्रम किंवा लाफ्टर शोज' सारखे कार्यक्रम आज सुध्दा घराघरात आनंदाने पाहिले जातात. मनसोक्त हसल्यामुळे उद्यासाठी एक नवीन शक्ती शरीरामध्ये अशा कार्यक्रमामुळे तयार होते. 'हसणे' ही प्रक्रीया फक्त मानवच करु शकतो त्यामुळे 'आपण मानव आहोत', याची जाणीव आपल्याला हसण्यामुळेच होणार आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या ठायी असलेली हसण्याची शक्ती कायम जागृत ठेवा आणि इतरांनाही हसवा.


          स्वतःमधील हसण्याची शक्ती गमावून जाऊ नये यासाठी आजकाल 'हास्य क्लब' ही संकल्पना विकसित झाली आहे. या क्लबचे महत्त्व केदार मेहेंदळे या कवीने पुढील कवितेतून सुंदर मांडले आहे.
"हसण्याची शक्ती आम्ही जाणतो
उत्तम उपचार म्हणून रोज आम्ही
नानाविध प्रकारांनी हसतो
सदैव हसण्यासाठी आम्ही
लाफ्टर क्लब जॉईन करतो."


          शेवटी एकच गोष्ट सिद्ध होते, 'हसण्यामुळे, हसता येते.' म्हणूनच मित्रांनो, सतत हसा. तुमच्यामधील हसण्याची शक्ती जागृत ठेवा. इतर मानवाच्या स्वभावातील विसंगती, विसराळूपणा जाणीवपूर्वक पाहा. जेथे हसणे हे नैसर्गिक आहे तेथे स्वाभाविकपणे बाहेर येऊ द्या. शेवटी काय, 'हमेशा हसता हुआ' असणारा माणूसच सिकंदर बनणार आहे. हसण्यामुळेच आपल्या आयुष्याचे गीत सुंदर होणार आहे. एखादाने सुंदर विनोद केला तर त्याला मनमोकळेपणाने हसून दाद दया. हसताना आपले 'दात दिसले' तरी चालेल, परंतु ओठातून सतत स्मित हास्यलहरी बाहेर येऊ दया. 'अरे हास, हास रे बाबा हास! जीवनात थोडा तरी हास!' असे ऐकण्याची वाईट वेळ हसण्याची शक्ती गमावून बसल्यावर प्रत्येकावर नक्कीच येईल हे लक्षात ठेवा.

English translation

If the person loses the power to laugh...

I really laughed a lot at that time while watching the program 'Chala Hawa Yeu Daya' on television.  Everyone at the event was naturally smiling at the conversation.  Throughout the event, the sea of ​​laughter was coming out with big sticks, and while laughing, suddenly a thought came to my mind that if a person loses or loses the power to laugh ...



 In that sense, 'laughing' is an innate human gift.  From the moment a person is born, he begins to laugh even before he can speak or speak the language.  After only four to five months, the baby who can't even speak responds with a smile!  Such laughter is a basic human tendency.  There is a great need for a sense of humor while facing different stages of life, living different stages of life.  But if a human loses the power to laugh, life will not be without its hardships.



 It is always said, 'Smile and be healthy.'  Laughter is an effective medicine to achieve the bliss of life.  This drug is available to everyone for free.  But people who have lost the power of laughter have made it so expensive that serious people do not have time to laugh heartily.  Whether the occasion in life is happy or sad, the face of some is always serious!  There are so many opportunities to laugh in daily life, everyone is expected to laugh freely.  Even so, owning one is still beyond the reach of the average person.  They never allow themselves to be infected by other people's laughter.



 For a person who has lost the power to laugh at himself, this variety of life will be depressing.  He will feel a kind of mirage everywhere in his life.  That's the decent thing to do, and it should end there.  Laugh constantly, smile heartily.  Remember that smiling is very important to be happy in life.  Laughter gives each person a different energy, inspiration.  Gains the strength to face any difficult situation in life.  So laugh out loud whenever the opportunity arises.  As one poet put it, "There is a great deal of laughter in life, but it is not."



 I had digested the sadness of my life with a smile.  Laughter is very important if you want to overcome grief.  If you want to love the life that is given by the grace of God, you must take the tonic of laughter from time to time.



 In today’s stressful routine it is important to smile to get a few moments of joy for yourself.  Even today, various programs like 'Laughter Shows' are happily watched at home.  Such a program creates a new energy in the body for tomorrow due to heartfelt laughter.  The process of 'laughing' can only be done by human beings, so remember that 'we are human' will be realized only by laughing.  So keep the power of laughter in you and make others laugh too.



 The concept of 'Comedy Club' has been developed nowadays so as not to lose the power of laughter in oneself.  The importance of this club is beautifully expressed by the poet Kedar Mehendale in the following poem.

 “We know the power of laughter

 Every day we as the best treatment

 Laughs in a variety of ways

 We always laugh

 Laughter joins the club. "



 In the end, the only thing that proves is, 'Laughing, laughing.'  So friends, smile constantly.  Awaken the power of laughter in you.  Consciously look at the inconsistencies, forgetfulness in the nature of other human beings.  Let laughter come out naturally where it is natural.  After all, the man who always smiles is going to be Alexander.  Laughter will make the song of your life beautiful.  If someone makes a beautiful joke, smile and appreciate it.  While smiling, your 'teeth can be seen', but let a smile come out of your lips.  'Hey Haas, Haas Re Baba Haas!  Laugh a little in life! '  Remember that the worst time to hear that is when you lose the power to laugh.