एक संस्मरणीय सहल किंवा गोष्ट आमच्या सहलीची (वर्णनात्मक निबंध ) A Memorable Trip or Story of Our Trip (Descriptive Essay)

 एक संस्मरणीय सहल किंवा गोष्ट आमच्या सहलीची (वर्णनात्मक निबंध)

          आत्तापर्यंत शालेय जीवनातील अनेक सहलींना मी जाऊन आलो, पण लक्षात राहिली ती चौथीतील 'अर्नाळ्याची' सहल.

          चौथीत आम्ही सगळेजण अजाण होतो.  आपले कुटूंब आणि त्यातल्यात्यात आई -बाबा तर माझे जीव की प्राण, त्यामुळे त्यांच्यापासून जास्त वेळ दूर राहण्याची सवय नव्हती. पण सहलीला जाण्याचा आनंद काही औरच असतो. केवढे बेत केले होते आम्ही सर्व बाळगोपाळांनी!

          एकदाचा सहलीचा दिवस उजाडला. भल्या पहाटे आम्ही शिरा, पुरी, बटाट्याची भाजी, पाण्याची बाटली, बिस्किटे, गोळ्या, खेळायला पत्ते आणि सागरगोटे अशा सर्व सामग्रीनिशी शाळेच्या आवारात जमलो. सर्वांचे पालक हजर होत. त्यामुळे खूप गर्दी जमली होती. पण आम्हाला घेऊन जाणाऱ्या बसचा पत्ताच नव्हता. त्यामुळे सारेजण हिरमुसले होते.

          सहल येथेच होणार की काय, अशी भीती वाटत असतानाच बस आली. आई-बाबांचे निरोप घेता घेता बस केव्हा सुटली, हे कळलेही नाही.  बसमध्ये आमचा आनंद ओसंडून वाहत होता.  गाणी, गोष्टी, चेष्टामस्करी यात आम्ही  दंग होतो.  रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरव्यागार केळीच्या झाडांच्या बागा दिसायला लागल्या तेव्हा सहलीचे ठिकाण जवळ आल्याचे उमगले. गाडीत बाईंनी एवढा खाऊ दिला की, आम्ही आणलेला खाऊ काढण्याची वेळच आली नाही.

          आम्ही अर्नाळ्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उतरलो. वाळूतून धावण्याची मजा वाटत होती. आजूबाजूला  कोळ्यांची घरे होती. बांबूनी बांधलेल्या सांगाड्यांवर  त्यांनी मासे वाळत टाकले होते. आम्ही किल्ला पाहण्यासाठी गेलो. किल्ल्याचे भग्नावशेष तेवढे उरले होते. त्यावरून एकेकाळी तेथे नांदत असलेल्या वैभवाची कल्पना येत होती.

          खूप भटकून आल्यावर सगळ्यांनी आपापले डबे उघडले. सहभोजनामुळे जेवणाला वेगळीच लज्जत आली होती. दुपारी खेळांना मोठी रंगत चढली होती. एका देवळात आम्ही उतरलो होतो. मंदिरापुढे मोठे अंगण होते. माझा आवडता लपाछपी खेळाचा डाव खूप रंगात आलेला असतानाच बसमध्ये  काहीतरी बिघाड झाल्याची बातमी आली. सर्वांचे चेहरे उतरले. आई काळजी करील,  या विचाराने  मीही घाबरून गेलो.

          काळोख पडला. आम्ही सर्वजण देवळात बसलो होतो. बसची दुरुस्ती चालू होती.  दुसऱ्या दिवशी सकाळीच परत जायचे, असे ठरले.  पोटात कावळे ओरडू लागले. तेवढ्यात बरेचसे गावकरी देवळात आले. त्यांनी भरपूर भाकऱ्या, भात व गरमागरम खमंग असे पिठले आणले होते. पत्रावळीवर आम्ही तो गरमागरम भात व खमंग असे पिठले भाकरीबरोबर खाल्ले.  गावातील एका व्यापाऱ्याने सतरंज्या, जाजमे,  चादरी पाठवल्या होत्या.  गावातील मुलांशी गप्पा मारता मारता आम्हाला केव्हा झोप लागली, हे कळलेच नाही.

          सकाळी बाईंनी हाका मारल्यावर जाग आली.  गावकऱ्यांनी  दिलेला चहा, बटर घेऊन बसमध्ये बसलो. आमच्या अडचणीच्या वेळी गावातील अनेकांनी केलेल्या प्रेमळ पाहुणचारामुळे  आमची सहल संस्मरणीय ठरली.

A Memorable Trip or Story of Our Trip (Descriptive Essay)

So far, I've been on school trips many trips, but I remember the fourth 'Arnalya' trip.

 In the fourth we were all ignorant.  My life and soul from my family and my parents in it, so I was not in the habit of staying away from them for long.  But the joy of going on a trip is something else.  What a plan we all had as babysitters!

 Once the day of the trip dawned.  Early in the morning we gathered on the school premises with all the ingredients like shira, puri, potato veg, water bottle, biscuits, pills, playing cards and Sagargote.  Everyone's parents were present.  So there was a lot of crowd.  But there was no sign of the bus taking us.  So everyone was hilarious.

 The bus arrived just when I was worried about the trip.  It is unknown at this time what he will do after leaving the post.  Our happiness was flowing in the bus.  We were amazed at the songs, the stories, the jokes.  As the banana orchards of green bananas appeared on both sides of the road, it became clear that the place was near.  The woman in the car gave us so much food that it was not time to remove the food we had brought.

 We landed on the beach of Arnal.  It was fun to run through the sand.  There were spider houses all around.  They were drying fish on bamboo skeletons.  We went to see the fort.  There were so many ruins of the fort.  From it came the idea of ​​the splendor that once rejoiced there.

 After wandering around a lot, everyone opened their boxes.  The meal tasted different because of the meal.  The afternoon games were in full swing.  We landed in a temple.  There was a large courtyard in front of the temple.  While my favorite game was in full swing, news broke that something was wrong with the bus.  Everyone's faces fell.  I was terrified at the thought that my mother would take care of me.

 It was dark.  We were all sitting in the temple.  The bus was being repaired.  It was decided to go back the next morning.  The crows began to howl in his stomach.  At that time many villagers came to the temple.  They had brought a lot of bread, rice and hot flour.  On the plate, we ate it with hot rice and delicious bread.  A merchant from the village sent satranjya, jajme, chadri.  While chatting with the children in the village, we did not know when we fell asleep.

 I woke up in the morning when the left shouted.  We took the tea and butter provided by the villagers and sat in the bus.  Our visit was made memorable by the loving hospitality extended by many in the village during our difficult times.