चांदण्या रात्रीची सहल (वर्णनात्मक निबंध).Moonlit Night Trip (Descriptive Essay)

 चांदण्या रात्रीची सहल (वर्णनात्मक निबंध)

          आमच्या मित्रांपैकी कोणीतरी सुचवले की, आपण 'चांदण्या रात्रीची सहल' काढू या.  एकदा एखादी कल्पना मनात पटली की, ती अमलात आणायला आमच्या मित्रांना वेळ लागत नाही.

          सहलीसाठी मे महिन्यातील वैशाखी पौर्णिमाचा दिवस निश्चित करण्यात आला. रात्री दहानंतर आम्ही निघालो. पौर्णिमेच्या त्या रात्री आकाश पांढरे शुभ्र, विलोभनीय व निरभ्र होते.  डोंगराकडे जाणारा रस्ता माळरानावरुन जात होता.  तेव्हा माळरानावरुन जाणाऱ्या त्या पायवाटनेच डोंगर गाठायचा, असे आम्ही ठरवले.

          सारे गाव पांढऱ्या शुभ्र आकाशाची चादर पांघरून शांतपणे झोपले होते.  रात्र पौर्णिमेची असल्याने आज रस्त्यावरचे दिवे लावले गेले नव्हते की काय,  कोण जाणे! मात्र त्यामुळे चांदण्यांचे सौंदर्य आम्हाला उमगले. चांदण्याला 'पिठूर' म्हणणारी व्यक्ती खरोखरच कविमनाची असावी!

          मे महिन्याचे दिवस असूनही शीतल चंद्र प्रकाशामुळे हवेतील सौम्य गारवा मनाला सुखावत होता. त्यामुळे सहलीची लज्जत अधिकच वाढली होती. बागांतून  फुललेल्या रातराणी मुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते.  अशा प्रसन्न वातावरणात  शब्द मुके न झाले तर नवलच!  चांदण्यात न्हाऊन निघत असताना  आम्ही डोंगर माथ्यावर केव्हा पोहोचलो,  ते कळले देखील नाही.

          डोंगर माथ्यावरील दृश्य विलोभनीय होते.  दिवसा ओक्याबोक्या दिसणाऱ्या  डोंगरांनी रुपेरी शाल पांघरली होती.  करवंदांच्या जाळयांवर  जणु चांदीची फुले फुलली होती.  मातीचा स्पर्श ही  मुलायम वाटत होता.  धरतीवर चांदण्यांच्या जणू सरी पडत होत्या.  आकाशातील पूर्ण चंद्राला कवी कुसुमाग्रजांनी 'स्वप्नांचा सौदागर' असे का संबोधले असावे, ते उमगले.

          मी माझ्या मित्रांना हे सांगितले, तेव्हा त्यांच्याही मनात काही कवितांच्या ओळी दाटून आल्या.  कुणाला कवी बोरकरांची 'माझ्या गोव्याच्या भूमीत येईल चांदणे माहेरा'  हि आोळ आठवली,  तर कुणाला कवी महानोरांच्या  'कोणती पुण्ये अशी येती फळाला  जोंधळ्याला चांदणे लखडून जावे'  या पंक्ती आठवल्या आणि मग चांदण्या संबंधीच्या गाण्यांचा पूर लोटला.  आमचा मित्र दुर्गेश यांने  'पुनवेचा चंद्रमा आला घरी, चांदाची किरणं दर्यावरी' हे गाणे सुरेल आवाजात म्हटले.

          रात्री करवंदांच्या जाळीत शिरणे धोक्याचे असल्याने  'डोंगरावरची काळी मैना' दुरुनच पाहावी लागेली,  पण त्यामुळे भुकेची आठवण झाली.  आमच्या दोस्तांनी फराळाच्या बाबतीतही रसिकता दाखवली होती.  रुपेरी चांदण्यात खाण्यासाठी निवडलेले पदार्थही तसेच होते. पांढरी स्वच्छ मलईची बर्फी, पांढरीशुभ्र हलकी-फुलकी इडली आणि मस्त मऊ दहीभात!

          चांदण्यात रात्रभर विहरत असताना दुःख, द्वेष, असूया, चिंता हे सारे विकार विरून गेले होते. ही सारी किमया होती त्या धवल चांदण्यांची!  चांदीच्या  रसात जणू चराचर न्हात होते.  यापूर्वी आम्ही सर्व मित्रांनी मिळून अनेक सहली काढल्या होत्या, पुढेही अशा अनेक सहली काढू, पण चांदण्या रात्रीच्या त्या सहलीची मौज अगदी वेगळीच!


Moonlit Night Trip (Descriptive Essay)

Someone from our friends suggested that we take a 'moonlit night trip'.  Once an idea comes to mind, it doesn't take long for our friends to implement it.

 The day of Vaishakhi full moon in the month of May was fixed for the trip.  We left after ten at night.  On that full moon night, the sky was white, alluring and clear.  The road to the mountain was passing through Malrana.  So we decided that the only way to reach the mountain was through Malrana.

 The whole village was sleeping peacefully in a blanket of white sky.  As the night was full moon, the street lights were not turned on today, who cares!  But it also made us realize the beauty of the moon.  The person who calls Chandanya 'Pithur' should be really poetic!

 Even though it was the day of the month of May, the soft moonlight in the air was soothing to the mind.  This made the trip even more embarrassing.  The whole atmosphere was fragrant due to the night flowers blooming from the gardens.  In such a pleasant atmosphere, if the words are not silenced, then it is new!  We don't even know when we reached the top of the mountain while bathing in the moonlight.

 The view from the top of the hill was breathtaking.  During the day, the mountains were covered with silver shawls.  It was as if silver flowers were blooming on the nets of the tax collectors.  The touch of clay felt soft.  It rained like the moon on the earth.  I wondered why the poet Kusumagraj called the full moon in the sky 'the merchant of dreams'.

 When I told this to my friends, some lines of poetry came to their minds.  Someone remembered the poet Borkar's line 'Chandne Mahera will come to my Goa land', while someone remembered the poet Mahanoor's line 'Which virtue should come, let the moon shine on the fruit' and then a flood of songs related to the moon flooded.  Our friend Durgesh sang the song 'Punvecha Chandram Aala Ghari, Chandachi Kiran Daryavari' in a melodious voice.

 It is dangerous to enter the tax net at night, so you have to see the 'black myna of the mountain' from a distance, but it reminded me of hunger.  Our friends also showed interest in Farala.  The same goes for the food chosen to eat in the silver moon.  White clean creamy ice cream, white light idli and cool soft curd!

 While wandering in the moonlight all night, all the disorders of sorrow, hatred, envy, anxiety were gone.  It was all alchemy of white moons!  It was as if he were bathing in silver juice.  Earlier we had taken many trips together with all our friends, we will take many more such trips in the future, but the fun of that trip on a moonlit night is very different!