कोजागिरीची रात्र (वर्णनात्मक निबंध) Night of Kojagiri (Descriptive Essay)

 कोजागिरीची रात्र (वर्णनात्मक निबंध)


मुद्दे: अश्विन महिन्यातील पौर्णिमा-  निसर्गात झालेले बदल -   निरभ्र आकाश -   पिठूर चांदणे -  शास्त्रीय सत्य वेगळे -  चांदण्यांचे सौंदर्य लोकांनी लुटावे म्हणून लक्ष्मीची कथा जोडली -  चांदण्याला दुग्धपान व  सुरेल गान  यांची जोड -  कवी, साहित्यिक यांचा  कल्पनाविलास...

          अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही कोजागरी म्हणून ओळखली जाते.   शरद ऋतुच्या या काळात आकाशातील काळे मेघ हद्दपार झालेली असतात.  पावसाची रिपरिप संपलेली असते.  आकाश निरभ्र झाले असते.  त्यामुळे पौर्णिमेचा चंद्र आपले वैभव गगनात उधळून देतो. 'पिठूर चांदणे' म्हणजे काय, हे पाहायचे असेल, तर कोजागिरीच्या रात्रीचे चांदणे अनुभवावे.  त्यात भर म्हणून जर विजेचे दिवे लखलखत नसतील, तर या कौमुदीचा शुभ्र विलास अधिक स्पष्टपणे आपल्या दृष्टीला भिडतो.

          चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.  त्याला स्वतःचा प्रकाश नाही.  तो सूर्यापासून प्रकाश घेऊन परावर्तित करतो. हे शास्त्रीय सत्य आपल्याला माहीत असते.  पण कोजागिरीच्या रात्रीचे ते नेत्रदीपक वैभव आपल्याला या भौगोलिक सत्याचा विसर पाडते आणि आकाशातील तो चंद्रमाच केवळ सत्य आहे, स्वयंप्रकाशित आहे, असे भासू लागते.  'स्वप्नांचा सौदागर' असे कवी कुसुमाग्रजांनी त्याला संबोधले आहे.  ते म्हणतात, "चंद्र सुंदर स्वप्ने वाटत फिरतो. मग एखादे मातीचे पडके घर वा शेवाळ आलेली भिंतही ताजमहालाचे सौंदर्य धारण करते."

          कोजागिरीच्या रात्री स्वर्गीय सौंदर्याचा महापूर ओसंडत असतो.  चतुर माणसाने याला एका सुंदर कथेची जोड दिली आहे. कोजागिरीच्या रात्री बारा वाजता लक्ष्मी देवता घराबाहेर पडते आणि जे लोक त्यावेळी जागे असतात त्यांना आपले वैभव वाटत जाते. आपले दैनंदिन व्यवहार जरा दूर ठेवून कोजागिरीच्या रात्रीची ही मजा माणसाने लुटावी म्हणून अशी कथा सांगितली जाते. लोकांनी लक्ष्मीच्या आशेने जागे राहावे आणि शरदाचे चांदणे लुटावे हाच ही गोष्ट  रचणाऱ्याचा हेतू असावा.

          कोजागिरीच्या शुभ्र चांदण्यात बरोबर रसिकांनी धवल, केसरी दुधाची सांगड घातली. त्यामुळे कोजागिरीच्या रात्री दुग्धपानाचे कार्यक्रम होत असतात.  या दिवशी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांतून केशरी दुधाच्या सोबत सुरेल संगीताचीही जोड दिली जाते. कवीजणांची प्रतिभा अशा चंदेरी वातावरणात अधिकच उत्फुल्ल होते.  मग बा. भ. बोरकरांसारखा श्रेष्ठ कवी समुद्रावर पडलेले चांदणे पाहून म्हणतो, 'माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी.' या कोजागिरीच्या रात्रीचे चांदणे कवीच्या नजरेतून आपण प्राशन करतो आणि पुनवेचा आनंद मनसोक्त लुटू शकतो.


Night of Kojagiri (Descriptive Essay)

The full moon of the month of Ashwin - Changes in nature - Clear sky - Pithur Chandane - Classical truth is different - The beauty of the moon is added so that people can spoil it - Adding milk to the moon and singing melodious songs

 The full moon in the month of Ashwin is known as Kojagari.  During this time of autumn, the black clouds in the sky are banished.  The drizzle of rain is over.  The sky would have been clear.  So the full moon scatters its glory in the sky.  If you want to see what 'Pithur Chandane' means, you should experience the night moon of Kojagiri.  In addition, if the electric lights are not flashing, then the white luxury of this Kaumudi catches our eye more clearly.

 The moon is the satellite of the earth.  He has no light of his own.  It reflects light from the sun.  We know this classical truth.  But the spectacular splendor of the night of Kojagiri makes us forget this geographical truth and the moon in the sky seems to be the only truth, self-illuminated.  Poet Kusumagraj has called him a 'merchant of dreams'.  He says, "The moon revolves around beautiful dreams. Then a mud house or a wall with moss also captures the beauty of the Taj Mahal."

 On the night of Kojagiri, there is a flood of heavenly beauty.  The clever man has added a beautiful story to it.  At twelve o'clock on the night of Kojagiri, Goddess Lakshmi comes out of the house and those who are awake at that time feel their glory.  Such a story is told so that a person can enjoy this night of Kojagiri by keeping his daily activities away.  The intention of the creator should be that people should stay awake in the hope of Lakshmi and loot the autumn moon.

 In the white moonlight of Kojagiri, the audience mixed white and orange milk.  Therefore, milking programs are held on the night of Kojagiri.  Public events on this day are accompanied by musical music along with orange milk.  The genius of the poets was more enthusiastic in such a silvery atmosphere.  Then a great poet like Borkar sees the moon falling on the sea and says, 'Silver plays in the sea in my land of Goa.'  We see the moonlight of this Kojagiri night through the eyes of the poet and we can enjoy the joy of Punve.