अभयारण्यातील फेरफटका (वर्णनात्मक निबंध) Sanctuary Tour (Descriptive Essay)

 अभयारण्यातील फेरफटका (वर्णनात्मक निबंध)

मुद्दे : सहल कोणत्या अभयारण्यात? -  का? -  वन्य प्राणी नष्ट होऊ नयेत म्हणून शिकारीला बंदी -  अभयारण्याची निर्मिती -   प्रवास, मुक्काम -  वास्तव्य -  अरण्यात  हिंडण्यासाठी वाहन -  वॉच टॉवर्स - वनस्पतीतील वैविध्य -  अभयारण्याची निर्मिती ही माणसाच्या नतद्रष्ट वृत्तीला आळा बसावा म्हणून - ही खेदाची गोष्ट - जगा आणि जगू द्या...'

          आजवर मी अनेक सहलींना गेलो आहे, पण या सर्व सहलीतील कॉर्बेटच्या अभयारण्यातील आमची सहल मला संस्मरणीय वाटते.  एके दिवशी बाबांच्या वाचनात आले - जगातील सर्व प्राण्यात अतिशय देखणा आणि स्वच्छ म्हणून ओळखला जाणारा वाघ हा प्राणी हळूहळू नामशेष होत आहे. पृथ्वीवरील वाघांच्या एकूण आठ जातींपैकी तीन जाती तर केव्हाच नष्ट होऊन गेल्या आहेत आणि उरलेल्या पाच जातीही कश्याबश्या तग धरून जगत आहे. बाबांनी लगेच ठरवले, 'चला, आपण वाघोबा यांच्या भेटीला जायचे.'  त्यांनी सर्व माहिती मिळवली आणि 'जिम कॉर्बेट पार्क' ला जाण्याची आमची तयारी झाली.

          भारतीय उपखंडातील सर्वात जुना म्हणून ओळखला जाणारा हा पार्क ६ ऑगस्ट १९३६ रोजी निर्माण केला गेला.  त्यावेळी त्याचे नाव होते, 'नॅशनल पार्क.' पण नंतर जिम कॉर्बेट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९५७  साली या पार्कचे नाव झाले, 'जिम कॉर्बेट पार्क.' हौशी शिकारी व वाघाच्या कातड्यांना येणारी प्रचंड किंमत यामुळे या पार्कमधील बऱ्याच वाघांची शिकार झाली, तेव्हा १ एप्रिल १९७२ रोजी वाघाच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आणि हे 'अभयारण्य' साकार झाले.

          आम्ही नवी दिल्लीहून अभयारण्याकडे गेलो. तेथील टायगर रिझर्वच्या लॉजमध्ये उतरलो. दुसऱ्या दिवसापासून आम्ही अभयारण्याच्या सफारीला निघालो. हत्तीच्या पाठीवर बसून पार्क पहाण्यात एक वेगळीच मौज आम्ही अनुभवली. सतत चार दिवस आम्ही त्या अभयारण्यात हिंडलो, पण तरीही खूप काही पाहायचे राहून गेले.  कारण या पार्कचा विस्तार १३१८ चौरस किलोमीटरचा आहे. या उद्यानाच्या मुख्य दरवाजावर जिम कॉर्बेट या थोर व्यक्तीचा पुतळा आहे आणि त्याच्या वापरातल्या वस्तूंचे संग्रहालयही आहे.

          या जंगलात केवळ वाघांचे वास्तव्य नाही, तर सुळे असलेल्या जंगली हत्तींचे कळप, चितळ, काळ्या तोंडांची माकडे, सांबर, कोल्हे, सुसरी, मगरी आणि अनेक प्रकारचे पक्षी आहेत. किती पहावे आणि काय, काय पहावे, हेच उमगत नव्हते. अनेक झाडांवर निरीक्षणासाठी 'वॉच टॉवर' ही उभारण्यात आले आहेत.  हत्तीवरून फिरताना जंगलात खूप आत जाता येते आणि शेवटी या भ्रमंतीत आपणही त्या जंगलाचाच एक भाग होतो.

          या अभयारण्यातील निसर्ग प्रसन्न आहे. नाना तऱ्हेची वृक्षवल्ली येथे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सुखात बहरत आहे. ती विविधता पाहूनही मन दिङ् मूढ होते.  पण त्या अभयारण्याचा निरोप घेताना माझे मन मात्र काहीसे लज्जित झाले. हे अभयारण्य त्याच्या प्रवेशासाठी कडक नियम आणि एवढा कडेकोट बंदोबस्त का करावा लागला? या माणसाच्या नतद्रष्ट स्वभावामुळेच ना! सहलीच्या आनंदाबरोबरच या विचाराने अस्वस्थ होऊन बाहेर पडलो. 'जगा आणि जगू द्या' हे सत्य माणूस केव्हा स्वीकारणार? 


Sanctuary Tour (Descriptive Essay)

Points : In which sanctuary?  - Why?  - Prohibition of hunting so that wild animals are not destroyed - Creation of sanctuaries - Travel, stay - Habitat - Vehicles for walking in the forest - Watch Towers - Diversity of plants - Creation of sanctuaries to curb the unseen attitude of man - This sad thing - Live and let live ...  '

 I’ve been on many trips to date, but all of these trips make our trip to the Corbett Sanctuary seem memorable to me.  One day Baba came to the reading - the tiger, the most beautiful and clean animal in the world, is slowly becoming extinct.  Of the eight species of tigers on earth, only three are extinct, and the other five survive.  Baba immediately decided, 'Come on, we want to visit Waghoba.'  They got all the information and we were ready to go to Jim Corbett Park.

 Known as the oldest park in the Indian subcontinent, it was built on August 6, 1936.  At that time it was called, 'National Park.'  But later, in 1957, the park was renamed 'Jim Corbett Park' in memory of Jim Corbett.  Due to the high cost of amateur hunters and tiger skins, many tigers were hunted in the park, and on April 1, 1972, tiger hunting was banned and the sanctuary was established.

 We went to the sanctuary from New Delhi.  We landed at the Tiger Reserve lodge.  The next day we went on a safari to the sanctuary.  We had a different kind of fun watching the park sitting on the back of an elephant.  We walked in the sanctuary for four days in a row, but there was still a lot to see.  Because the area of ​​this park is 1318 square kilometers.  At the main entrance to the park is a statue of Jim Corbett and a museum of his use.

 The forest is home not only to tigers, but also to wild elephant herds, chitals, black-faced monkeys, sambars, foxes, squirrels, crocodiles, and many more.  I didn't know how much to watch and what to watch.  Watchtowers have been erected on several trees for observation.  Walking on an elephant, you can go deep into the forest and eventually you become a part of that forest.

 The nature of this sanctuary is pleasant.  Nana is blossoming in each other's arms at Vrikshavalli.  I was stunned to see that diversity.  But as I said goodbye to the sanctuary, I felt a little embarrassed.  Why did this sanctuary have to have strict rules and regulations for its entry?  Not because of the unseen nature of this man!  Along with the joy of the trip, we got upset and went out.  When will man accept the truth of 'live and let live'?