निवडणूक - एक सोहळा ( वर्णनात्मक निबंध)

 निवडणूक - एक सोहळा 

(वर्णनात्मक निबंध)


मुद्दे :  लोकशाही राज्यात निवडणूक  अटळ - निवडणुका जाहीर झाल्या की पक्षाक्षांत, नेत्यांत खळबळ उडते - पक्ष बदल - उमेदवार निवडीसाठी मुलाखती - जाहिरातबाजी - प्रचाराचे विविध प्रकार - मार्ग -  प्रचारांचा जल्लोष - रथयात्रा - पदयात्रा - लोकप्रिय अभिनेत्यांचा राजकारणात प्रवेश - एक आगळावेगळा सोहळा...

          आजच्या लोकशाही युगात निवडणुका या अटळ आहेत. लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, साखर कारखाने, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये...  सगळीकडे निवडणूका या अपरिहार्य ठरतात. सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी तर कित्येक दिवस अगोदरच त्यांची चाहूल लागते. विविध पक्षांचे पुढारी, नेतेमंडळी यांच्या बोलण्यातून निवडणुका जवळ आल्याचे सूतोवाच होत असते. निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात इच्छुक उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चे बांधू लागतात. आयाराम - गयारामांची दंगल उडते.

          अशा या गदारोळात या काळात वातावरणात विविध पक्षांच्या कार्यक्रमात इच्छुक उमेदवार व त्यांचे चाहते यांची तोबा गर्दी उसळते. उमेदवारांच्या निवडीसाठी मुलाखती सुरू होतात. असतील नसतील तेवढे गुण उमेदवारांना चिकटवले जातात. प्रसंगी वेगवेगळे पक्ष 'युती' करून विरुद्ध उमेदवाराशी मुकाबला करण्यासाठी सिद्ध होतात. आपले गुण, कार्य यांविषयी बोलण्यापेक्षा प्रतिपक्षावर आरोप करण्याची वृत्ती अधिक आढळते.

          'निवडणुका म्हणजे जाहिरातबाजी आणि प्रचार' असे समीकरण आहे. अलीकडच्या निवडणुकीत मात्र निवडणूक आयुक्तांनी या बाबतीत कडक धोरण स्वीकारले आहे.  त्यांनी प्रचार खर्चावर नियंत्रण आणले आहे. नाहीतर यापूर्वी निवडणुकांच्या दिवसांत जाहिरातबाजी आणि प्रचार यांची एकच धमाल उडत असे.

          निवडणुकांचे उमेदवार आणि त्यांच्या निशाण्या ठरल्या की, मग प्रचाराचा एकच जल्लोष उडायचा. व्याख्याने, चर्चा, परिसंवाद, भाषणबाजी यांचा  रतीब पडायचा. सभांना गर्दी जमावी म्हणून तमाशा, चित्रपट आणि मनोरंजनाचे इतर कार्यक्रम यांची रेलचेल असायची. उमेदवार व त्याचा पक्ष यांच्या गुण वर्णनाला पूर यायचा आणि मतदारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटी, आश्वासने यांचा वर्षा व्हायचा. निवडणुकांच्या दिवसातील  ही धमाल शेवटी एवढ्या पराकोटीला जात असे की, वैतागलेला मतदार म्हणायचा, 'मत घ्या, पण प्रचार आवरा.' नभोवाणी, कॅसेट, दूरचित्रवाणी ही माध्यमे प्रचाराचा धुमाळीत आणखी भर घालतात.

          अलीकडच्या निवडणुकी मात्र हे दृश्य दिसले नाही. या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदाराला त्याचे छायाचित्र असलेले एक ओळख पत्र मिळाले. जाहिरातींचे फलक तुरळक ठिकाणी होते. उमेदवार निवडक सहकाऱ्यांबरोबर आपल्या विभागात पदयात्रा काढत फिरत होते. मतदारांना प्रत्यक्ष भेटून 'मलाच मत द्या, मी तुमचे प्रश्न नक्की सोडवीन,' असे सांगत होते. अलीकडच्या निवडणुकात प्रचारासाठी चित्रपटातील अभिनेते किंवा अभिनेत्री यांनाही उतरवले गेले होते. यामागचा हेतू एकच - गर्दी जमवण्याचा. निवडणुकांच्या दिवसाचा एकंदर चेहरामोहराच आता पार बदलून गेला आहे.

Election - a ceremony
(Descriptive essay)

Points : Elections are inevitable in a democratic state - When elections are declared, there is excitement in the party, among the leaders.

 In today's democratic age, elections are inevitable.  Lok Sabha elections, Vidhan Sabha elections, Municipalities, Zilla Parishads, Gram Panchayats, Sugar Factories, Co-operative Societies, Schools, Colleges ... Elections are inevitable everywhere.  At the time of the general election, they are expected several days in advance.  From the speeches of the leaders of various parties, it is said that the election is near.  Election dates are announced. Interested candidates start marching to get their candidature.  Ayaram - The riots of Gayaram fly.

 In such a tumultuous atmosphere, the repentant crowd of aspiring candidates and their fans in various party programs rises in the atmosphere during this period.  Interviews begin for the selection of candidates.  Candidates are affixed as many marks as they can or may not have.  Occasionally different parties form 'alliances' to fight against the opposite candidate.  There is more to blaming the opposition than talking about your merits and demerits.

 The equation is 'election is advertising and propaganda'.  In the recent elections, however, the Election Commissioner has adopted a strict policy in this regard.  They have brought control over campaign spending.  Otherwise, earlier on election days, there was only one wave of advertising and propaganda.

 Once the election candidates and their targets were decided, then a single campaign flare-up would take place.  Lectures, discussions, seminars, speeches were arranged.  Meetings were packed with spectacles, movies, and other entertainment.  The character of the candidate and his party would be flooded and voters would be showered with direct and indirect visits and promises.  At the end of the election day, the commotion was so extreme that an annoyed voter would say, 'Vote, but stop campaigning.'  Radio, cassette and television add to the hype.

 The recent elections, however, have not seen this scenario.  For this election, every voter received an identity card with his photograph.  Advertising boards were in sparse places.  Candidates were marching in their constituencies with selected colleagues.  He was meeting the voters and saying, 'Vote for me, I will solve your problems for sure.'  Actors or actresses in the film were also fielded for campaigning in the recent elections.  The only purpose of this is to gather a crowd.  The whole face of election day has changed.