आमचे शेजारी (व्यक्तिचित्रणात्मक निबंध किंवा शब्द चित्रात्मक निबंध)

 आमचे शेजारी 

(व्यक्तिचित्रणात्मक निबंध किंवा शब्द चित्रात्मक निबंध)



मुद्दे : चाळीचे वर्णन - अनेक बिऱ्हाडे -  विविध जाती, धर्म, पंथाचे लोक - विविध भाषिक - स्वभावातील विविधता - शेजाऱ्यांचे विविध अनुभव - काही तऱ्हेवाईक, परोपकारी - सहकार्य भावना - सर्व जाती, धर्म,  उत्सव एकत्रित - सुख-दुःख प्रसंगात मदत - राष्ट्रीय एकात्मतेचे छोटे स्वरूप...


      एकविसाव्या शतकातील या महासंपन्न महा मुंबईला अजिबात न शोभणारी आमचीही 'विधाता चाळ' आता थोड्याच दिवसांची साथीदार आहे. गगनचुंबी मजली भव्य इमारतीच्या गर्दीत अशी चाळ फार विसंगत दिसते. तिच्या सलग नव्वद वर्षाच्या सततच्या प्रवासात ती आता अगदी जराजर्जर आणि खिळखिळी झाली आहे. पण या चाळीमध्ये राहणाऱ्या साध्या, सरळ, मनमिळावू, प्रेमळ लोकांच्या मनात तिच्याबाबत अनेक कडू-गोड आठवणींचा कल्लोळ आहे. चाळ नाहीशी होणार, पण तिच्या बरोबर आपण आणि आपले हे प्रेमळ शेजारी पांगणार ही बोचक जाणीव सर्वांना व्यथित करते.


      विसाव्या शतकातील पहिल्याच दशकात ही चाळ बांधली गेली, तेव्हा तिचा रुबाब केवढा होता! आज येथे राहणारे काहीजण सुरुवातीपासून येते आहेत. त्या सर्वांची तिसरी पिढी म्हणजे नातवंड आता या चाळीच्या गॅलरीत खेळत आहे. काहीजण कारणपरत्वे चाळ सोडून गेले. कोण ब्लॉक मध्ये राहावयास गेले, तर कोण उपनगरात स्वतःच्या बंगल्यात गेले. पण हे आमचे सोडून गेलेले शेजारी आज सुध्दा चाळीत येतात, जुन्या आठवणी काढतात आणि काही काळ सुखावतात.


      आज आमच्या चाळीतील विविध शेजाऱ्यांमध्ये विविध जाती, धर्माचे व पंथाचे लोक एकत्रित राहत आहेत. जॉन चुकता दर रविवारी चर्चमध्ये जातो. अब्दुलच्या घरातील वडीलांप्रमाणे दिवसातून पाच वेळा नमाज पडतात. दर सुट्टीत केरळ ला जाणारा  वालन सर्वांसाठी केळ्यांचे वेफर्स घेऊन येतो आणि मालवण ला जाऊन येणारे बाबुल काका सर्वांसाठी केरसुण्या सुपे, फणसाचे गरे घेऊन येताते. आम्ही सर्वजण एकाच कनिष्ठ मध्यमवर्गातील आहोत. येथे राहणाऱ्या सर्वांच्या अडीअडचणी, सुख, दुःख ही सारखीच आणि अशा वेळी मदतीला धावून जाण्याची वृत्ती ही सारखीच.


      गेल्यावर्षी रमणिकभाईंना हृदय विकाराचा झटका आला. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रात्रीच त्यांना रुग्णालयात नेऊन पुढील उपचार करावे लागले. पंधरा मिनिटात आवश्यक रक्कम जमली. रमणिकभाईंनी ही घरी आल्यावर सर्वांचे पैसे फेडून टाकले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. नंदकुमार आणि सुनिता यांचा सुपुत्र भरत बारावीच्या परीक्षेत बोर्डात पहिला आला, तेव्हा त्याच्या यशाने सारी चाळ आनंदली. चाळीवर विद्युत रोषणाई केली गेली तेव्हा केलेल्या सत्यनारायण पूजेच्या आरतीला हसन, युसुफ, जॉन सर्वजण हजर होते. कारण मणी त्यांचे पण लेकरू आहे.


      आमच्या या चाळीत सर्व धार्मिक सण आणि राष्ट्रिय सण मोठ्या आनंदाने साजरे होतात. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन असे राष्ट्रीय सण तर एकत्र येऊन साजरे करतो. त्यादिवशी ' सहभोजना'  ची दंगल उडते. अशा प्रकारे आमची ही छोटीशी चाळ राष्ट्रीय एकात्मतेचे महान प्रतीकच आहे.


      आता मात्र थोड्याच दिवसात हे सारे संपणार आहे. कारण काही दिवसापूर्वीच महानगरपालिकेने आमची चाळ धोकादायक, राहण्यास अनकूल नसल्याची जाहीर केली आहे. ती आता जमिनदोस्त केली जाणार म्हणजे आमचे हे शेजारी एकमेकांच्या प्रेमळ शेजाराला मुकणार. पण या इतक्या वर्ष गुण्यागोविंदाने एकत्र जीवन जगल्याच्या गोड आठवणी मात्र ते केव्हाही विसरणार नाहीत, हे नक्की.



Our neighbors

 (Characteristic essay or word pictorial essay)



 Points : Description of Chali - Many Birhads - People of different castes, religions, sects - Different languages ​​- Diversity in temperament - Different experiences of neighbors - Some kind, philanthropic - Cooperative spirit - All castes, religions, festivals together - Help in times of happiness and sorrow - National unity  Small format ...


 Our 'Vidhata Chaal', which did not adorn this magnificent 21st century Mumbai, is now a companion for a few days.  Such a move seems very inconsistent in the crowd of a skyscraper grand building.  In her continuous journey of ninety years in a row, she is now very shabby and clumsy.  But in the minds of the simple, straightforward, affectionate, loving people who live in this chali, there are many bitter-sweet memories about her.  Chaal will disappear, but the realization that you and your loving neighbor will scatter with her bothers everyone.


 When this chawl was built in the first decade of the twentieth century, what a rubab it was!  Some of the people who live here today are coming from the beginning.  The third generation of grandchildren is now playing in this gallery.  Some left the chawl for a reason.  Who went to live in the block, while who went to their own bungalow in the suburbs.  But even today, our departed neighbors come to visit, reminisce, and soothe for a while.


 Today, people of different castes, religions and sects live together in different neighborhoods.  John Chukta goes to church every Sunday.  Like his father in Abdul's house, he prays five times a day.  Valan, who goes to Kerala every holiday, brings banana wafers for everyone and Babul Kaka, who goes to Malvan, brings Kersunya soup and chanterelles for everyone.  We are all from the same lower middle class.  Everyone who lives here has the same difficulties, joys, sorrows and the same attitude of rushing for help at such times.


 Last year, Ramanikbhai suffered a heart attack.  He was rushed to a nearby hospital for treatment.  The required amount was collected in fifteen minutes.  When Ramanikbhai came home, he paid everyone's money.  There were tears of gratitude in his eyes at that time.  When Bharat Kumar, the son of Nandkumar and Sunita, came first on the board in the Class XII examination, the whole chal was happy with his success.  Hasan, Yusuf, John were all present at the Satyanarayana Pooja Aarti when the chali was electrified.  Because Mani is their child.


 All the religious festivals and national festivals are celebrated with great joy in our chali.  We celebrate national festivals like Independence Day and Republic Day together.  On that day, there is a riot of 'Sahabhojana'.  Thus, this small trick of ours is a great symbol of national unity.


 But in a few days it will all be over.  Because a few days ago, the corporation has declared that our chawl is dangerous and not suitable for living.  It will now be demolished so that our neighbors will leave each other's loving neighbors.  But they will never forget the sweet memories of Gunya Govinda's life together for so many years.