ग्रहण लागलेला चंद्र बोलू लागलाआत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध
मुद्दे : चांदोबा - आवडता चंदामामा - ग्रहण लागलेला चंद्र - ग्रहणाचे भौगोलिक कारण - ग्रहणाबद्दल अंधश्रद्धा - अशुभ काळ - दानाची प्रवृत्ती = माणूस चंद्रावर पोचला - वैज्ञानिकांचा अभ्यास - पुढील काळात मानववस्ती शक्य - अडचणींनी गोंधळायचे नाही - त्यातून मार्ग काढायचा - आपल्याजवळ जे चांगले आहे ते इतरांना द्यायचे, त्यात भेदभाव करायचा नाही...
"मुलांनो, मी तुमचा लाडका चंदामामा. माझ्याकडे पाहून प्रश्न पडला आहे ना! बरोबर आहे. माझे हे रूप पाहून तुम्हाला नवल वाटते ना? अरे, मला ग्रहण लागले आहे. ग्रहण म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत आहे ना! तुम्ही आपल्या भूगोलाच्या पुस्तकातून 'चंद्रग्रहण' कसे लागते, याची माहिती घेतली आहे ना? मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की मला स्वतःला प्रकाश नाही. सूर्याकडून मी प्रकाश घेतो आणि पृथ्वीताईला मी हा प्रकाश देतो. पण कधीतरी मी आणि सूर्यदादा यांच्यामध्ये पृथ्वीताई येते. तिची सावली माझ्यावर पडल्याने तुम्ही माझा काही भाग पाहू शकत नाही आणि मग तुम्ही म्हणता की,' चंद्राला ग्रहण लागले आहे.'
"मुलांनो, जोपर्यंत हे भौगोलिक सत्य उघड झाले नव्हते तोपर्यंत माझ्या या ग्रहणाबद्दल लोकांच्या फार विपरीत कल्पना होत्या. ग्रहणकाळ अशुभ मानला जाई. या काळात जवळजवळ सर्व व्यवहार थांबवले जात. या काळात काही खाणेपिणे निषिद्ध मानले जाई. ग्रहण संपल्यावर घरातील सर्व गोष्टी धुऊन घेतल्या जातात. मला राहू - केतूने ग्रासले आहे, असे सर्वांना वाटत असे आणि ग्रहणाचा काही दोष आपल्याला लागू नये, म्हणून सर्वजण दान करतात."
"मुलांनो, तुम्हाला मी आवडतो. तुमचे काही प्रतिनिधी माझ्याकडे येऊन गेले. तुमच्यातील वैज्ञानिकांनी, संशोधकांनी माझ्या रुपाचा, माझ्या प्रकृतीचा अधिक बारकाईने अभ्यास केला आहे. मला हे ऐकून आनंद वाटतो की, माझ्यातील त्रुटी दूर करून पृथ्वीवरील माणसे येथे वास्तव्याला येण्याचा विचार करत आहेत."
"मुलांनो, ग्रहण लागलेला हा चंदामामा आज तुम्हाला काही सांगू इच्छितो. बाळांनो, लक्षात ठेवा कि, आपल्या जीवनक्रमात ग्रहणासारख्या काही अडचणी आल्या तरी घाबरायचे नाही. अडचणी, आपत्ती या यायच्याच. त्यांच्यावर मात करून पुढे जायचे. समजा काही काळ आपल्याला अपयश आले, आपण आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोचलो नाही तरी नाउमेद व्हायचे नाही. सतत प्रयत्न करत राहायचे. मी जसे माझे चांदणे साऱ्या जगाला देतो तसे तुम्ही तुमच्या सद्गुणांनी, सद्विचारांनी व सत्कृत्यांनी साऱ्या मानवी जीवनात चांदणे फुलवा."
The eclipsed moon began to speak Autobiographical Essay / Essay on Autobiography
Points : Chandoba - Favorite Chandamama - Eclipse Moon - Geographical cause of eclipse - Superstition about eclipse - Ominous time - Tendency to donate = Man reached the moon - Scientists study - In the future human habitation is possible - Don't get confused by difficulties - Give it, don't discriminate ...
"Children, I am your darling Chandamama. Looking at me, I have a question, isn't it? That's right. Are you surprised to see this look of mine? Oh, I'm eclipsed. You know what an eclipse is, you know! Do you know how it feels? Children, you know that I myself have no light. I take light from the sun and I give this light to the earth. But sometimes the earth comes between me and Suryadada. Can't and then you say, 'The moon is eclipsed.'
"Children, people had very different ideas about the eclipse until this geographical truth was revealed. The eclipse was considered inauspicious. Almost all transactions were stopped during this period. Some food and drink were considered forbidden during this period. Everything in the house is washed after the eclipse." Everyone thought that I was consumed by Ketu and that we should not be blamed for the eclipse, so everyone donated. "
"Children, I love you. Some of your representatives have come to me. Scientists and researchers among you have studied my appearance, my nature, more closely.
"Children, this eclipse of Chandamama wants to tell you something today. Babies, remember that even if there are some problems like eclipse in your life, don't be afraid. Difficulties, calamities will come. You do not want to be frustrated if you cannot get the right pitch so invest in a good capo.