वर्गाचे आत्मवृत्त (आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध)

 वर्गाचे आत्मवृत्त
आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध



मुद्दे : निरोप समारंभाचा दिवस - मन अस्वस्थ - वर्ग बोलू लागला - विद्यार्थ्यांची व माझी ताटातूट नेहमीची - असंख्य आठवणी - विद्यार्थ्यांच्या सहवासात वेळ कसा जातो हे कळत नाही - लहान-मोठ्या सुट्टीत नकोसे होते - विद्यार्थ्यांसाठीच जीवन - सारे साहिले - फळा, बाके, टेबल-खुर्ची यांचा सहवास - काही मुले प्रेमळ - काही विध्वंसक - काही नेहमी सजवतात - सुवचने - तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा...!


     आज शाळेत निरोप समारंभ झाला. मन उदास झाले होते. कार्यक्रम संपल्यावर आम्ही विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना विनंती केली, " सर, आम्ही थोडावेळ आमच्या वर्गात बसू का?" सर लगेच म्हणाले, " जा ना! खुशाल बसा आपल्या वर्गात." इतके दिवस या वर्गात बसताना विशेष काही वाटत नसे. पण आज मात्र मनाला अनामिक अस्वस्थता जाणवत होती. आम्ही चिडीचूप होतो. इतक्यात एक धीरगंभीर आवाज आला.


     "मुलांनो, अरे एवढे गंभीर का झालात? नेहमीचा गडबड गोंधळ का करत नाही? अरे, मला माहित आहे की आता तुम्ही या शाळेत येणार नाही. मला भेटणार नाही. पण तुमच्या मनात आले तर केव्हाही येऊन तुम्ही तुमच्या शाळामातेला व मला भेटू शकता!"... आमचा वर्ग आमच्याशी बोलत होता.


     "मित्रांनो, मी नंतर तुम्हाला भेटणार नाही या विरहाचे दुःख आज तुम्हाला होत आहे ना! अरे मला तर तसे दुःख दर वर्षी सोसावे लागते. ' अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती' हे अगदी खरे आहे. आजवर हजारो विद्यार्थी माझ्या सहवासात राहून गेलेत आणि त्यांच्या सहवासातील असंख्य आठवणी माझ्या मनात रेंगाळत आहेत. किंबहुना त्या आठवणी हाच माझ्या जीवनातील विरंगुळा ठरला आहे. छोट्या-मोठ्या सुट्टीत तुम्ही शाळेत येत नाही. तेव्हा याच आठवणीत मी रमलेलो असतो."


     "बाळांनो, माझे जीवन तुमच्यासाठीच आहे. जेव्हा ही इमारत उभारली गेली तेव्हा सिमेंट, विटा, वाळू यांच्याबरोबर ही बाके, फळा यांनीच माझ्या जीवनाची जडण-घडण झाली. हे सारे तुमच्यासाठीच आहे. पण काही मुले हे विसरतात आणि धारदार ब्लेड वा इतर काही धारदार वस्तूंनी बाकांवर चरे काढतात, स्वतःची नावे कोरतात. हा काचेचा फळा खास तुमच्यासाठीच आहे. काही द्वाड मुले यांचीसुद्धा मोडतोड करतात. तेव्हा वाईट वाटते."


     "याउलट तुमच्यापैकी अनेकजण आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम किंवा समारंभाच्या वेळी माझी किती सुंदर सजवट करता. तेव्हा माझ्या मनाला किती आनंद होतो! तुम्ही फळ्यावर लिहिलेली सुवचने माझ्या मनात ठसलेली आहेत. माझ्या सहवासातील तुमचा काळ सुखाचा व्हावा यासाठीच माझी सारी धडपड असते."


     " विद्यार्थ्यांनो, आता होत असणाऱ्या वार्षिक परीक्षेमध्ये तुमच्या उत्तम यश मिळो आणि तुमच्या भावी आयुष्यातही तुम्हाला भरभरून सुयश लाभो, हेच माझे तुम्हाला शुभाशीर्वाद. पण तुम्ही कितीही मोठे झालात, जगात कोठेही गेलात तरी मला व तुमच्या शाळेला विसरू नका हं!"


     आवाज बंद झाला आणि आम्ही भानावर आलो. उदास मन आता उल्हासित झाले होते.


Class autobiography

 Autobiographical Essay / Essay on Autobiography


 Points : Farewell Ceremony Day - Mind Restless - Class Speaking  Chair companionship - Some children are loving - Some are destructive - Some always decorate - Suggestions - Good luck to you for the exam ...!


 Farewell ceremony was held at the school today.  The mind was depressed.  At the end of the program, we students requested the headmaster, "Sir, shall we sit in our classroom for a while?"  Sir immediately said, "Go away! Sit comfortably in your classroom."  There was nothing special about sitting in this classroom for so many days.  But today, the mind was feeling anonymous discomfort.  We were irritated.  Just then a calm voice came.


 "Boys, why are you so serious? Why don't you make the usual fuss? Hey, I know you won't come to this school now. You won't see me. But you can come and see your school mother and me anytime you want!"  .. Our class was talking to us.


 "Friends, I am not going to see you again. You are suffering today because of this loss. Oh, I have to suffer the same grief every year."  There are countless memories lingering in my mind. In fact, those memories are the only ones in my life. You don't come to school on holidays, big or small.


 "Baby, my life is for you. When this building was erected, my life was made up of cement, bricks, sand, beads and fruit. It's all for you. But some children forget it and use sharp blades or other sharp objects."  They draw grass on the benches, engrave their own names. This glass fruit is especially for you. Some dwarfs break it too. It feels bad then.


 "On the other hand, many of you make beautiful decorations for me at cultural events or ceremonies at your school. What a joy it is for me! The words you have written on the board are imprinted on my mind.


 "Students, I wish you the best of luck in the upcoming annual exams and your future life. But no matter how old you are, no matter where you go in the world, don't forget me and your school!"


 The noise stopped and we came to our senses.  The sad mind was now exhilarated.