एका झाडाचे आत्मवृत्त किंवा जुन्या वटवृक्षाचे मनोगत (आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध)

एका झाडाचे आत्मवृत्त
किंवा
जुन्या वटवृक्षाचे मनोगत
आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध



मुद्दे : प्रस्तावना - जंगल तोड - वृक्षाला होणारे दुःख - पुराणपुरुष - सामर्थ्य तेच - गावाचा संरक्षक - पूर्वी आधाराची भावना - पूजन - आयुष्यभर गावाची सेवा - स्त्रिया, मुलांची भावना - वरुणराजाला आवाहन - जुनी झाडे तोडू नका, नवी झाडे लावा...


     "माझ्या गावात कारखाना वसवण्यासाठी जंगलतोड सुरू होती. एकामागून एक झाडे तोडत सुटलेले काही लोक अखेर एका वटवृक्षाजवळ आले आणि काय नवल! तो वृक्ष मोठ्या आवाजात बोलू लागला, "माझ्यापासून लांब व्हा कृतघ्न करंट्यांनो, निर्दयी माणसांनो!" क्षणात वृक्षतोड करणारे थबकले. सर्वांनी आश्चर्याने कान टवकारले. पुन्हा तो घनगंभीर आवाज कानी आला.


     "लोकहो, मी या गावाचा पुराणपुरुष आहे. आजपर्यंत शेकडो पावसाळे मी पाहिले. भूमातेकडून होणारे लालनपालन आणि वरुणदेवतेचा आशीर्वाद यामुळे मी अंगोपांगांतून सतत बहरत राहिलो आणि आता या माझ्या वृद्धापकाळात मी जुनापुराना झालेलो नाही. माझे सामर्थ्य तसूभरही कमी झालेले नाही."


     "मित्रांनो, मी केवळ एक जुना वटलेला वृक्ष नसून या गावाचा पुरातन काळापासूनचा संरक्षक आहे, हितकर्ता आहे. या गावाची निर्मिती, या गावाचा आधुनिक विकास, या गावाचे सध्याचे समृद्ध स्वरूप या साऱ्यांचा मी एक मूक साक्षीदार आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबे येथे राहावयाला आली. पण गावात प्रवेश करण्याअगोदर त्यांनी प्रथम माझे भक्तीभावाने आणि आदरयुक्त पूजन करून प्रवेश केला. गावामध्ये कोणत्याही नवीन कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत असत. ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालू राहिली."


     "मी आयुष्यभर गावासाठी खपलो. आधीपासून गावात वास्तव्य करणाऱ्या सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या बाहेरगावच्या पाहुण्यांना, श्रान्त पांथस्थांना माझ्या शीतल सावलीत आसरा दिला. अनेक पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांद्यावर खेळत असतात आणि रात्री माझ्या खांद्यांवर विसावतात. गावातील सारी मुले सूरपारंब्या खेळण्यासाठी येथे जमतात. प्रत्येक वर्षी वटपौर्णिमा या सणाला प्रत्येक घरातील सुवासिनी माझी पूजा करून अखंड सौभाग्याची मागणी करतात. अशा तऱ्हेने माझा हा सगळा आसमंत म्हणजे गावाचे एक तीर्थक्षेत्र बनला आहे."


     "या गावकऱ्यांविषयी मला विलक्षण जिव्हाळा वाटतो. म्हणून उंच उंच गेलेल्या आणि दूरवर पसरलेल्या माझ्या फांद्यांनी मी वरुणराजाला सदैव कळकळीचे आवाहन करत असतो. त्यामुळे या गावाला दुष्काळातील विविध समस्या कधीच भेडसावत नाही. लोकहो, तुम्ही गावाचा कायापालट करत असताना येथील सर्व जुन्या वृक्षांची कत्तल करून एक प्रकारे अवर्षणालाच आमंत्रण देत आहात. यापेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा." इतके बोलून तो घनगंभीर आवाज बंद झाला आणि काय चमत्कार! वृक्ष तोडण्यासाठी आलेले सर्व लोक दूर झाले, ते अधिक झाडे लावण्याच्या निर्धारानेच!



Autobiography of a tree
 Or
 The mind of the old banyan tree
 Autobiographical Essay / Essay on Autobiography



 Points : Introduction - Deforestation - Trouble to the tree - Puranpurusha - Strength is the same - Guardian of the village - Feelings of past support - Worship - Lifelong service to the village - Women, children's feelings - Appeal to Varun Raja - Don't cut down old trees, plant new ones ...


 The deforestation was going on in my village to set up a factory. One by one, some people who had escaped by cutting down trees, finally came to a banyan tree and what a surprise! The tree began to shout,  Then he heard a loud voice.


 "People, I am the legend of this village. I have seen hundreds of rains till today. Due to the upbringing of Bhumata and the blessings of God Varuna, I have continued to grow from limbs and now in my old age I am not old. My strength has not diminished in the slightest."


 "Friends, I am not only an old deciduous tree but also the protector and benefactor of this village since ancient times.  But before entering the village, they first entered the village with my devotional and reverent worship. They used to bless me before starting any new work in the village. This practice has been going on for generations. "


 "I spent my whole life in the village. Sheltered all the villagers already living in the village and the visitors coming from outside the village, the weary Panthas in the cool shade. Many birds regularly play on my shoulders and rest on my shoulders at night.  On this festival, the Suvasinis of every household worship me and ask for uninterrupted good fortune.


 "I am very fond of these villagers. Therefore, with my branches which have gone high and spread far and wide, I am always appealing to Varun Raja. Therefore, this village will never face various problems of drought.  You are inviting drought. Plant more trees to create a beautiful village. "  After saying so much, that loud voice stopped and what a miracle!  All the people who came to cut down the trees went away, only with the determination to plant more trees!