मायबोलीचे मनोगत
आत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध
मुद्दे : मायबोली - मराठी - जुनी परंपरा - ज्ञानदेव - अमृताला पैजेवर जिंकण्याची प्रतिज्ञा - संस्कृत माता - शब्द भांडाराची समृद्धी - ज्ञानपीठ पुरस्कार - राजभाषा - योग्य सन्मान, स्थान नाही - शाळा - कॉलेजात 'आयटी' चा (माहिती तंत्रज्ञानाचा) व इंग्रजीचा वरचष्मा...
"मी आहे तुमची 'मराठी भाषा' म्हणजेच तुमची मायबोली किंवा मातृभाषा. माझी परंपरा जुनी आहे, प्राचीन आहे. सुमारे ९ व्या शतकापासून माझ्या अस्तित्वाच्या खुणा शिलालेखांवर उमटलेल्या दिसतात. साधारणता १३ व्या शतकात माझ्या एका सुपुत्राने - ज्ञानदेवाने - माझ्या मदतीने ' ज्ञानेश्वरी' हा महान ग्रंथ निर्माण केला आणि माझे जीवन कृतार्थ केले. यानंतरची माझी वाटचाल ही अखंडित आणि उज्वल आहे. ज्ञानेश्वरांना माझ्याबाबत केवढा अभिमान होता. ते सांगतात, माझी ही मायबोली कशी? तर अमृतालाही पैजेवर जिंकणारी! साऱ्या मराठी संत कवींनी मला आपल्या भक्तिभावनेने सजवले. ओवी, अभंगाची लयलूट केली आणि माझा देव्हारा आत्मतेजाने उजळून टाकला."
"संस्कृत ही प्राचीन गीर्वाण वाणी माझी माता. संस्कृत भाषेतील अवाढव्य शब्दकोशाने मला शब्दभांडार पुरवले व मला समृद्ध केले. संतकवीनंतर आलेल्या पंडितकवींनी संस्कृत भाषेतील कथाकाव्यांच्या आधारे माझा आख्यानकाव्याचा खजिना भरून टाकला. आपल्या महाराष्ट्रातील अनेक शुरवीर शाहिरांनी अनेक पोवाडे, लावण्या रचून वीर आणि शृंगार रसांची उधळण केली. इंग्रजांचे राज्य भारतात आले आणि माझ्या गुणी पुत्रांनी इंग्रजी भाषेतले वाघिणीचे दूध पिऊन पाश्चात्त्य साहित्यातील उत्तमोत्तम साहित्य माझ्या मदतीने मराठी बांधवांना उपलब्ध करून दिले."
"आज मला राजभाषेचा सन्मान दिला गेला आहे, पण माझे वास्तव स्वरूप लाजिरवाणी आहे, तर डोक्यावर राजमान्यतेचा सोनेरी मुकुट आणि अंगावरची वस्त्रे मात्र फाटकी! या पन्नास वर्षात माझे स्वरूप धेडगुजरी झाले आहे. माझ्या उच्चशिक्षित अशा सुपुत्रांना माझा उपयोग करताना कमीपणा वाटतो. ते पावलोपावली इंग्रजीचा उपयोग करतात. आपला पत्रव्यवहारही इंग्रजीतून करतात. आपल्या कच्च्या बच्च्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात. माझ्या लिखित स्वरूपाच्या शुध्दाशुद्धतेकडे तर ते मुळीच लक्ष देत नाही."
"आता शिक्षणक्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल होऊन विविध शाळा - कॉलेजमधून आयटी (माहिती तंत्रज्ञान) मला पर्याय शोधला आहे. मग माझी अवस्था काय होईल? काही दिवसांनी आपल्यावर लादलेल्या अनेक भाषांच्या भेंडोळ्यात 'माझे' म्हणजे 'मराठी भाषेतील शब्द' शोधावे लागतील. पण आता दुःख करून तरी काय उपयोग? अहो जेथे इंग्रजी भाषेतील 'ममी' च्या आगमनाने 'आई' हरवली आहे, तेथे मायबोलीला कोण पुसणार?"
Mysticism Autobiographical Essay / Essay on Autobiography
Points : MyBoli - Marathi - Old Tradition - Dnyandev - Promise to win Amrita on the page - Sanskrit Mother - Prosperity of Shabd Bhandara - Jnanpith Award - Official Language - Appropriate Honor, No Place - School - College of IT (Information Technology) and English .
"I am your 'Marathi language' i.e. your mother tongue or mother tongue. My tradition is old, ancient. Signs of my existence have been inscribed on the inscriptions since about 9th century. Created a book and made my life a success. My journey after this is unbroken and bright. How proud Dnyaneshwar was for me. Kelly and my Devhara lit up with self-confidence. "
"Sanskrit is the ancient Girvan Vani, my mother. The huge Sanskrit vocabulary provided me with vocabulary and enriched me. The British rule came to India and my virtuous sons drank the milk of Waghini in English language and made available the best literature of Western literature to the Marathi brothers with my help. "
"Today I have been honored with the official language, but my true nature is shameful, but the golden crown of royalty on my head and the robe on my body have been torn off! They do their correspondence in English. They send their raw children to English medium schools. They don't pay any attention to the accuracy of my writing. "
"Now with the radical change in the field of education, IT (information technology) from various schools and colleges, I have found an alternative. So what will happen to me? What good is a web site if it simply "blends in" with everything else out there?