कारागृहाचे मनोगतआत्मवृत्तात्मक निबंध / आत्मनिवेदनपर निबंध
मुद्दे : तुरुंग बोलतो - गुन्हेगारांचा सदैव सहवास - कारागृह - सुधारशाळा - काही गुन्हेगार - स्वतःची प्रगती - गुन्हेगारांचे प्रकार - स्वातंत्र्यसंग्रामात मला महत्व - राजकीय कैद्यांना तुरुंगात हे 'प्रासाद' - कारागृहाला घाबरू नका - माणूस चुकणारा प्राणी - मानवतेचे मंदिर...
"आज सकाळी सकाळी वर्तमानपत्रामध्ये आलेली ती वार्ता / बातमी येथील एका कैद्याने अचानकपणे वाचली आणि माझे मन आनंदाने भरून आले. अत्यानंदाने आपल्या या वृद्ध भिंती कोसळणार तर नाहीत ना, असे मला वाटत होती. अरे हो! पण ती आनंदाची बातमी कोणती, ते मी तुम्हाला सांगितलंच नाही. अहो, आपल्या डॉ. किरण बेदी आहेत ना! त्यांना इंग्लंड मधून आमंत्रण आले आहे. कशासाठी? तर तेथील तुरूंगांची सुधारणा करण्यासाठी. पण मी कोण ते कळले का तुम्हाला? मी दिल्लीचा तिहार जेल - कारागृह - बोलतोय."
"आता आले ना लक्षात! अनेक देशी-विदेशी गुन्हेगार निरंतर माझ्या सहवासात असतात. त्यामुळे माझे नाव वृत्तपत्रांमधून वरचेवर गाजत असते. चोऱ्या, दरोडे, मारामाऱ्या, खून अशा शेकडो अपराधांचा शिक्का ज्यांच्या भाळी बसला आहे, त्यांना गुन्हेगार ठरवून तुम्ही माझ्या हवाली करता. कशासाठी? तर त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून."
"मित्रांनो, माझ्या येथे बंदिस्त करून ठेवण्यात येणारे सर्व जण अट्टल गुन्हेगार असतातच असे नाही. काहीजण तर निरपराधी असतात. गुना त्यांच्या माथी मारला जातो. काहींच्या हातून परिस्थितीमुळे गुन्हा घडतो. कोण समाजाकडून मिळणार्या निर्दयी वागणुकीमुळे ही माणसे गुन्हेगार बनतात. पण नेहमीच असे घडत नाही. येथे राहणाऱ्या कित्येकांनी अनेक परीक्षा देऊन विद्या संपादन केली आहे. उत्तम लेखन केले आहे. अनेक कला संपादन केल्या आहेत."
"तुम्हाला माहीतच आहे की, प्रत्यक्ष भगवंताने कृष्णावतारात बंदिखान्यात जन्म घेतला. स्वातंत्र्य संग्रामात अनेक राजकीय नेत्यांना माझ्या आणि माझ्या भाऊबंदांच्या सहवासात वास्तव्य करावे लागले होते. त्यांनी या बंदिशाळांना 'प्रासाद' मानले. 'गीतारहस्य' सारख्या अनेक मौल्यवान ग्रंथांचा जन्म कारागृहातच झाला आहे."
"तेव्हा जनहो! 'कारागृह' या शब्दाने घाबरून जाऊ नका. समाज आहे, गाव आहे, शहर आहे तेथे कारागृह असणारच. माणूस हा चुकणारा प्राणी आहे. त्याच्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी, त्याच्यातला माणूस जागा करण्यासाठी आम्ही आहोत. हे ध्यानात घ्या. म्हणजे बंदीशाळांचे रूपांतर मानवतेच्या मंदिरांत होईल."
The psyche of the prison Autobiographical Essay / Essay on Autobiography
Points : Prison speaks - always fellowship of criminals - prison - reformatory - some criminals - own progress - types of criminals - importance to me in freedom struggle
"The news / news that came in the newspaper this morning was suddenly read by a prisoner and my heart was filled with joy. No. Hey, you have Dr. Kiran Bedi! He has been invited from England. Why? To improve the prisons there. But who do you know? I am talking about Delhi's Tihar Jail.
"I don't remember now! Many local and foreign criminals are constantly in my company. That is why my name is often mentioned in the newspapers. So that they can improve. "
"Friends, not everyone who is being held captive by me is a hardened criminal. Some are innocent. Crimes are inflicted on them. Crimes are caused by circumstances at the hands of some. These people become criminals because of the cruel treatment they receive from society. But that is not always the case. Many of the people who live here have acquired knowledge by passing many exams. They have written well. They have acquired many arts. "
"As you know, the real God was born in a prison in Krishnavatar. During the freedom struggle, many political leaders had to live in the company of me and my brothers. They considered these prisons as 'palaces'.
"So people! Don't be frightened by the word 'prison'. There is a society, there is a village, there is a city. There must be a prison. Man is a wandering creature. Will be in the temples of humanity. "