मी राष्ट्रध्वज बोलतोय
किंवा
राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त
(आत्मनिवेदनपर निबंध / आत्मवृत्तात्मक निबंध)
मुद्दे : प्रस्तावना - ध्वजारोहन - मातृभूमीचे प्रतीक - अनेक आपत्ती साहिल्या - अठराशे सत्तावन च्या लढ्यात माझे अस्तित्व - काळाच्या ओघात रूपात बदल - १९२० नंतर तिरंगा - राष्ट्रध्वज झाल्यावर चरख्याच्या जागी अशोक चक्र - धजातील रंगाची प्रतीकात्मता - स्वातंत्र्यदिनी महत्व - स्वतंत्र राष्ट्राचा प्रतिनिधी - माझा सन्मान, देशाचा सन्मान....
स्वातंत्र्यदिनाला शाळेच्या मैदानावर आम्ही झेंडावंदन केले. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा दिमाखाने फडकत होता. मी एकटक त्याच्याकडे पाहत होतो, तोच त्याचे शब्द माझ्या कानी आले -
"तू माझ्याकडे मोठ्या आदराने पाहतोस हे स्वाभाविकच आहे," राष्ट्रध्वज बोलत होता... "मी तुझ्या मातृभूमीचे प्रतीक आहे. मी म्हणजे भारत! मला दिलेला सन्मान हा भारताचा सन्मान आहे. माझ्यामागे माझा उज्वल इतिहास आहे. आजचे हे रूप, आजचे हे स्थान सहजासहजी मला लाभलेले नाही. त्यासाठी मला फार मोठ्या आपत्तीतून जावे लागले आहे. त्यावेळी माझ्या शूर सुपुत्रांची साथ मला सदैव लाभली."
"१८५७ च्या उठावा पासूनच भारतीय लोकांनी आपल्या पायातील गुलामीचे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. इंग्रज सरकारच्या फार मोठ्य सैन्यशक्तीशी ते प्राणपणाने टक्कर देत होते. तेव्हा मी त्यांना सदैव साथ व प्रेरणा देत होतो. माझा रंग तेव्हा हिरवा होता आणि चारही बाजूंना बारीक सोनेरी पट्टीची सजावट होती. त्यापुढील प्रत्येक स्वातंत्र्य आंदोलनात मी अग्रभागी असे. विद्रोही पासून माझे रक्षण करण्यासाठी अनेक शुरवीरांनी आपल्या रक्ताचा सडा या धरतीवर शिंपला. त्यांची स्मृती म्हणून मी माझ्या अंगावरील सोनेरी पट्टीऐवजी केशरी रंग धारण केला. काळाच्या ओघात माझा चेहरामोहरा वेळोवेळी बदलत गेला. हिरव्या व केसरी रंगांमध्ये पांढरी पट्टी आली. कधी माझ्यावर 'वंदेमातरम्' ही अक्षरे लिहिली गेली. तर कधी सूर्य, कधी चंद्र, कधी कमळ अशी चित्रे देखील काढली गेली. १९२० नंतरच्या काळात माझे केशरी, हिरवा आणि पांढरा रंग झाले त्यामुळे मी तिरंगा बनलो व त्याकाळी स्वदेशप्रेमाचे प्रतीक असलेला चरका माझ्या छातीवर अभिमानाने मिरवू लागलो. आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळाल्या नंतरच्या काळानंतर मला 'राष्ट्रध्वज' होण्याचे सौभाग्य लाभले, तेव्हा चरख्याची जागा अशोकचक्राने घेतली."
"माझ्या अंगावरील तीन रंगापैकी केशरी रंग हा देशभक्ती, शौर्य आणि त्याग यांचे प्रतीक आहे. तर माझा हिमधवल असा पांढराशुभ्र असा रंग चारित्र्य, शांतता आणि मांगल्य यांचा सूचक आहे आणि हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निळे चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, हे राष्ट्र धर्म, नीती आणि प्रगती यांच्याच मार्गावर अखंड गतीमान राहील."
"१४ ऑगस्टच्या १९४७ च्या मध्यरात्रीनंतर भल्यापहाटे मी जेव्हा ध्वजस्तंभावर डौलाने विराजमान झालो तेव्हा कोट्यावधी डोळ्यांचे पारणे फिटले. तेव्हापासून माझ्या सुपुत्रांनी माझी शान राखली आहे. जसा मी रणांगणावर फडकलो, तसाच क्रीडांगणावर ही विजय वार्ता फडकवत वावरलो. हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर फडकत राहिलो, त्याच प्रमाणे अंटार्किटकावरही फडकत राहिलो. परदेशातही मला आता मानाचे स्थान आहे, कारण मी एका स्वतंत्र राष्ट्राचा प्रतिनिधी आहे."
"बाळा, तू एवढ्या उत्कंठतेने, प्रेमाने, मायेने, अभिमानाने व कुतूहलाने माझ्याकडे बघत आहेस म्हणूनच मी तुझ्याशी मोकळेपणाने बोललो. माझा सन्मान म्हणजे भारतभूमीच - पर्यायाने तुम्हा सर्वांचा - सन्मान आहे."
पाहता पाहता आवाज बंद झाला. मी डौलाने फडकत असलेला ध्वज पाहून मनोमनी सुखावलो होतो. नतमस्तक होऊन ध्वजाला वंदन करून मी मूकपणे घराकडे वळलो.
I am speaking of the national flag Or Autobiography of the National Flag (Essay on Autobiography / Autobiographical Essay)
Points : Introduction - Flag hoisting - Symbol of motherland - Many calamities - My existence in the battle of 1857 - Changes in the course of time - After 1920, tricolor Honor of the country ....
On Independence Day, we saluted the flag on the school grounds. The tricolor was fluttering against the backdrop of the blue sky. I was just looking at him, his words came to my ears -
"It is natural that you look at me with great respect," the national flag was saying ... "I am the symbol of your motherland. I am India! The honor bestowed on me is the honor of India. I did not benefit. I had to go through a great calamity for that. At that time, I always had the support of my brave sons. "
"Since the uprising of 1857, the Indian people have been trying to get rid of the yoke of slavery on their feet. There were decorations. I was at the forefront of every subsequent freedom movement. Many knights spilled their blood on this earth to protect me from the rebels. There was a white stripe, sometimes with the letters 'Vandemataram' written on it, sometimes with the sun, sometimes with the moon, sometimes with the lotus. I was proud to be the 'National Flag' of our motherland after independence. Vha Charkha was replaced by Ashoka Chakra. "
"Of the three colors on my body, orange is a symbol of patriotism, bravery and sacrifice. My snow-white color is a symbol of character, peace and well-being and green is a symbol of prosperity. The blue circle on me indicates to the world that this nation Religion, ethics and progress will continue unabated. "
"When Daula sat on the flagpole in the wee hours of the morning on August 14, 1947, millions of eyes widened. Since then, my sons have maintained my dignity. I still have a place of honor abroad, because I am a representative of an independent nation. "
"Baby, you are looking at me with such curiosity, love, affection, pride and curiosity that is why I spoke to you openly. My honor is the land of India - alternatively all of you - honor."
The sound stopped as I watched. I was relieved to see Doula waving the flag. Bowing down and saluting the flag, I silently turned towards the house.