विजयस्तंभाची आत्मकथा (आत्मनिवेदनपर / आत्मवृत्तात्मक निबंध)

 विजयस्तंभाची आत्मकथा
आत्मनिवेदनपर / आत्मवृत्तात्मक निबंध

मुद्दे : स्थळ - क्रांतिकारकाचे स्मारक - दुर्लक्षित - मोडकळीस आलेला फलक - क्रांतिकारकाची कामगिरी - फितुरी - अटक होण्यापूर्वी आत्मबलिदान - आजच्या तरुणाची वागण्याची रीत- चिड आणणारी - वेदनादायक...


     एकदा प्रवासात आम्ही अलाहाबाद मधील आल्फ्रेड पार्कला भेट दिली. तेव्हा आमच्या कानावर पुढील शब्द आले, "मुसाफिरांनो, तुम्ही एका महत्त्वाच्या स्मारकापाशी आला आहात. तुम्ही एका वीराच्या विजयस्तंभाला भेट देत आहात. मित्रांनो, या विजयस्तंभाला, म्हणजे मला भेटा आणि त्या थोर क्रांतीकारकांच्या स्मृती पुढे नतमस्तक हवा. या पार्क मध्ये मोकळ्या हवेत भटकण्यासाठी शेकडो माणसे दररोज येतात. पण या भल्यामोठ्या पिंपळाखाली माझे वास्तव्य असताना फारच थोड्यांचे लक्ष माझ्याकडे जाते.'


     "तुम्हाला माहित आहे का, मी कशाचे स्मारक आहे ते? फार पूर्वी येथे एक फलक लावलेला होता. उन्हापावसात तो फलक मोडून पडला. माझ्या पायथ्याशी कोरलेली अक्षरे ही अस्पष्ट झाली आहेत. त्या मोठ्या क्रांतिकारकाच्या विजयाचे स्मारक आहे. नीट पहा, येथे एक बलदंड 'हात' दाखवला आहे. त्या हातात 'क्रांतीचा ध्वज' आहे. या ध्वजासाठी त्या क्रांतिकारकाने आपल्या प्राणाची आहुती दिली होती. कोण होता तो क्रांतिकारक? 'चन्द्रशेखर आजाद!'


     "लहानपणापासूनच या मुलाच्या मनात देशाच्या स्वातंत्र्याची ओढ होती. 'भारतमाता की जय' ही घोषणा देणाऱ्या या मुलाला पकडून पोलिसांनी न्यायाधीशापुढे उभे केले. तेव्हा न्यायाधीशाने विचारले, 'तुझं नाव काय?' या मुलाने ताडकन उत्तर दिले, 'आझाद.' तेव्हापासून हा चंद्रशेखर तिवारी चंद्रशेखर आझाद झाला."


     "अवघे पंचवीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या युवकाने स्वप्न पाहिले ते फक्त आझादीचे, श्वास घेतला तो आझादीचा आणि प्राण दिले तेही आझादीसाठीच! पहिल्या शिक्षेच्या वेळी पोलिसांनी दिलेल्या फटक्यांमुळे ते पुढे दहशतवादी बनले. पुढे काकोरी कट, लाहोर कट, पंजाब बँकेवरील दरोडा, साँडर्स या पोलीस अधिकाऱ्यावरील हल्ला.... अशा अनेक क्रांतिकारी चळवळीमुळे आझादांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो केले होते. त्यावेळच्या इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते."


     "आझाद ब्रिटीश सरकारच्या हाती लागत नव्हते. पण दमून थकून आल्फ्रेड पार्कमध्ये बसलेल्या आझादांबद्दलची खबर कुणीतरी पोलिसांना दिली. पोलिसांच्या संपूर्ण तुकडीने बागेला वेडा दिला. एकटे आझाद अनेक पोलिसांचे निकराने लढत होते. पण आता आपली सुटका होत नाही, हे लक्षात आल्यावर त्या पराक्रमी वीराने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी व सत्त्वरक्षणासाठी आत्मसमर्पण केले. त्या अलौकिक घटनेचे, त्या स्वाभिमानी क्रांतिकारकाचे मी स्मारक आहे. सन १९३१ मध्ये २७ फेब्रुवारीला ही घटना घडली. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी मला येथे उभारले."


     "मित्रांनो, आज या पार्कमध्ये येणारे तरुण जेव्हा चित्रपटांची गाणी म्हणतात, चित्रपटातील नट-नट्या यांच्याबद्दल गप्पा मारतात. तेव्हा माझ्या या जीर्ण शरीराचा दाह होतो आणि त्यांचे कान पकडून त्यांना विचारावेसे वाटते, अरे, नाही का कोणी तुमच्यात एखादा आझाद?"


Autobiography of Vijayasthambha
 Autobiographical / autobiographical essay


 Points : Venue - Monument of the Revolutionary - Neglected - Moderated plaque - Performance of the Revolutionary - Fituri - Self-sacrifice before being arrested - Behavior of today's youth - Irritating - Painful ...


 Once on the trip we visited Alfred Park in Allahabad.  Then the following words came to our ears, "Travelers, you have come to an important monument. You are visiting the Victory Pillar of a hero.  They come every day, but when I live under this big pimple, very little attention goes to me. '


 "Do you know what a monument I am? A long time ago there was a plaque here. It broke in the rain. The letters engraved on my feet are obscured. It is a monument to the victory of that great revolutionary. Look, here is a strong hand."  It is shown. In that hand is the 'flag of revolution'. The revolutionary had sacrificed his life for this flag. Who was the revolutionary? 'Chandrasekhar Azad!'


 "The boy has been obsessed with the independence of the country since his childhood. The police arrested the boy who was chanting 'Bharatmata Ki Jai' and brought him before the judge. The judge then asked, 'What is your name?'  The boy quickly replied, 'Azad.'  Since then, Chandrasekhar Tiwari has become Chandrasekhar Azad. "


 The young man, who lived to be only 25 years old, dreamed only of freedom, he breathed his last for freedom and he gave his life for freedom!  The attack ... Azad had fled the British government due to many such revolutionary movements. The then British government had announced a reward of Rs. 10,000 for his capture. "


 "Azad did not fall into the hands of the British government. But someone reported to the police that Azad was sitting in Alfred Park exhausted. The whole police force drove the garden crazy.  I swear and surrender for the freedom and self-preservation of the country. I am the memorial of that supernatural event, of that self-respecting revolutionary. It happened on February 27, 1931. After that, his friends raised me here. "


 "Friends, the young people who come to this park today, when they sing movie songs, talk about movie-goers, my old body gets inflamed and I want to grab their ears and ask them, 'Oh, isn't there one of you Azad?'