सर्कशीतील हत्तीचे आत्मकथन
आत्मनिवेदनपर / आत्मवृत्तात्मक निबंध
मुद्दे : जन्म - निसर्गाचे सानिध्य - मुक्त विहार - अनेक मित्रांचा सहवास - खाण्यापिण्याची मोज - सर्कशीत जाण्याचा प्रसंग - गुलामगिरीचे जीवन - माहुताचे प्रेम - इतर प्राणी व अनेक कलाकारांचे विविध खेळ - सर्वात आवडता खेळ - प्रेक्षकांकडून स्तुती - म्हातारपण - शेवट...
"ऐका, मी सर्कशीतला एक वृद्ध हत्ती बोलतोय. या वार्धक्यात माझ्यापुढे हा केवढा प्रश्न उभा राहिला आहे! मी आता कुठे जाऊ? ना घर का ना घाट का, अशा प्रकारची वेळ माझ्यावर आली आहे! तुम्हाला माझ्या जीवनात घडलेली सर्व कथा मी आता सांगतो."
"शरावती खोऱ्यातील अभयारण्यात माझा जन्म झाला. अतिशय निसर्गसंपन्न असे हे अरण्य होते. हिरव्यागार रानात खेळताना किती मजा येत होती! काही काळ आई-वडिलांन बरोबर राहिल्यावर मी समवयस्क मित्रांबरोबर रमू लागलो. पाण्यामध्ये डुंबणे आणि सोंडेणे पाणी उडवणे हा माझा सर्वात आवडता खेळ होता. अरण्यात खाण्यापिण्याची चंगळ होती. मस्त पाण्यात डुंबायचे, रानातील आवडणारी झाडे मनसोक्त खायची आणि मग निळ्याशार आकाशाखाली गाढ झोपायचे. कधी कधी रात्रीच्या वेळी झोप येत नाही मग अशावेळी आकाशातील चंद्र व चांदण्या यांचा लपंडाव पहात रहायचे. असे होते ते मस्त जीवन! पण माझ्या वाट्याला फारच थोडे दिवस हे सुख आले, कारण एके दिवशी मी पकडला गेलो. त्यालाही कारण माझा डुंबण्याचा छंद होता."
"आजही मला तो दिवस आठवतो. आम्ही सर्व दोस्तमंडळी पाण्यात डुंबत होतो. काही वेळानंतर माझ्या बरोबरचे मित्र पाण्याबाहेर गेले, पण माझी हौस फिटली नव्हती. मी एकटाच पोहोत दूर गेलो. मला कळले सुध्दा नाही की मी अभयारण्यापासून इतक्या दूर आलो आहे. पोहताना एका ठिकाणी माझे पाय अडकले. मला वाटले शेवाळ असेल. पण छे! पाय सुटेनात. कारण ते शेवाळ नव्हते, तर जाळे होते. थोड्याच वेळात काही लोक आले. त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन मला भल्यामोठ्या दोरखंडात जखडले आणि माझी वरात शहराकडे निघाली."
त्या क्षणापासून गुलामी सुरू झाली. स्वातंत्र्य हरपले होते. एका सर्कशीत माझी वर्णी लागली. भली मोठी सर्कस होती ती! भरपूर प्राणी आणि तेवढेच कसरतपटू, सकाळपासून सराव चाले. सर्कशीमधील सर्वात लहान म्हणून माझ्या वर सर्वजण प्रेम करत त्यामुळे माझे खूप कौतुक होत असे. मला सांभाळणारा माहूतही 'बच्चा बच्चा' म्हणून माझे खूप प्रेमाने लाड करी. मी लहान असल्याने त्यावेळी मला अजिबात काम नसे. त्याचबरोबर अजून तरी माझ्या पायात गुलामगिरीचा साखळदंडही पडला नव्हता. म्हणून मी त्या जगण्यातही रमून गेलो."
"मात्र मी मोठा होऊ लागलो आणि माझा अभ्यासक्रम सुरू झाला. माझ्यातील हुडपणा कमी होत नव्हता. मग अनेकदा चाबकाचे फटके बसू लागले. अंकुशाची टोचणी सहन करावी लागली. शेवटी मला कळून चुकले की आता आपल्याला येथेच राहावयाचे आहे. हुडपणा करून काही उपयोग नाही. हे लक्षात आल्यावर मात्र मी खेळाचे सर्व प्रकार पटपट शिकून घेतले. रिंग मास्टरचा प्रत्येक शब्द मी ऐकू लागलो."
"मित्रांनो, आजही सर्कशीच्या तंबूतला माझा पहिला दिवस आणि पहिला खेळ मला आठवतो. त्या दिवशी मला खास सजवण्यात आले होते. माझ्या अंगावर रंगीबेरंगी मखमली वस्त्र व चमकणारे चांदीचे दागिने घालण्यात आले होते. माझा रिंगमास्तर मला 'बाहुबली' म्हणून हाक मारत असे. त्याचे माझ्यावर अपार प्रेम असल्याने मोठ्या आदराने त्याने स्वतः मला रिंगणात नेले आणि त्याच्या आज्ञेनुसार मी एकापाठोपाठ एक खेळ केले. माझी कामगिरी पाहून माझा मास्तर एवढा आनंदी झाला की परत आल्यावर त्याने मला पुडाभर पेढे चारले."
"अशी कित्येक वर्षे मी सर्कशीत काढली. माझ्या सर्व खेळांतील 'गणेशपूजे' चा खेळ मला विशेष आवडे. प्रेक्षक खूप टाळ्या वाजवत, मग मी पण देहभान विसरून काम करी. आता अरण्यातील स्वातंत्र्याचा विसर पडला होता. मी म्हातारा झालो होतो. त्यांतच भर म्हणजे मुक्या प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या संस्थेने सर्कशीतील प्राण्यांच्या खेळांवर भूतदयेने आक्षेप घेतला. मला मुक्त करण्यात आले. आता इतक्या वर्षांनी मी अरण्यातही जाऊ शकत नाही. म्हणून या शिवालयाबाहेर कसेतरी दिवस काढत आहे. पूर्वीचा रुबाब नाही की पूर्वीची चैन नाही!"
Autobiography of a circus elephant
Autobiographical / autobiographical essay
Points : Birth - Proximity to nature - Free outings - Fellowship with many friends - Eating and drinking - Circus going on - Life of slavery - Love of mahouts - Various games of other animals and many artists - Favorite game - Praise from spectators - Old age - The end ...
"Listen, I'm talking about an old elephant in a circus. What's the question for me in my old age? Where should I go now? Why a house or a ghat? It's time for me! I'll tell you all the stories of my life."
"I was born in a sanctuary in the Sharavati valley. It was a very beautiful forest. It was fun to play in the green forest! After living with my parents for some time, I started playing with my peers. It was good to eat and drink. I used to dive in cool water, eat my favorite forest trees and then sleep in the dark under the blue sky. It was a pleasure, because one day I was caught.
"I still remember that day. We were all drowning. After a while my friends went out of the water, but I was not satisfied. I swam away alone. The legs got stuck. I thought it was moss. But hey! The legs didn't move. Because it wasn't moss, it was a net. Soon some people came.
From that moment on, slavery began. Freedom was lost. My character got into a circus. It was a big circus! Lots of animals and just as many athletes, practice since morning. Everyone loved me as the youngest in the circus so I was very appreciative. The mahout who took care of me also pampered me very much as a 'baby baby'. Since I was young, I didn't have much work at that time. At the same time, the shackles of slavery had not yet fallen on my feet. So I got used to it. "
"But as I got older and started my course, my hood was not diminishing. Then there were the frequent whippings. When I arrived, however, I learned all the tricks of the game. I began to hear every word of the ring master. "
"Friends, I still remember my first day in the circus tent and my first game. I was specially decorated that day. I was dressed in colorful velvet and glittering silver ornaments. My ringmaster used to call me 'Bahubali'. With great respect for love, he took me into the arena himself and I played one game after another at his behest.
"I have been circling for so many years. I especially like the game of 'Ganesh Puja' in all my games. The audience applauded a lot. Then I also forgot my consciousness. "I was released. After so many years, I can't even go to the wilderness. So I'm spending some days outside this Shivalaya. There is no rubab of the past, no chain of the former!"