... आणि पिंजऱ्यातील वाघ बोलू लागला! किंवा पिंजऱ्यातील वाघाचे मनोगत (आत्मनिवेदनपर / आत्मवृत्तात्मक निबंध)

 ... आणि पिंजऱ्यातील वाघ बोलू लागला!
किंवा
पिंजऱ्यातील वाघाचे मनोगत
आत्मनिवेदनपर / आत्मवृत्तात्मक निबंध



मुद्दे : पिंजऱ्यातील वाघ भेटीचे स्थान - सर्कशीतील वाघाचे काम आवडणे - वाघाचे मनातील विचार - बालपणही तुरुंगात - जंगलातील स्वच्छंदी वातावरणाचा अनुभव नाही - सर्कशीतील गुलामगिरीचे जीवन - पारतंत्र्याचे दुःख - स्वातंत्र्याची, स्वच्छंदी जीवनाची ओढ - स्वातंत्र्याचा हव्यास....


     काही दिवसांपूर्वीच आम्ही सर्कस पाहायला गेलो होतो. सर्कशीतील विविध कला प्रकार पाहून आम्ही थक्क झालो. सर्व क्रार्यक्रमानंतर माझ्या आवडीचा वाघांचा खेळ सुरू झाला, तेव्हा माझ्याबरोबरच सारे प्रेक्षक श्वास रोखून ते पहात होते. वाघांचे पिंजरे रिंगणात येऊन उघडले गेले. अंगावर पिवळेधमक सोनेरी रंगांचे ठिपके व काळ्या रंगांचे लांबसडक पट्टे असणारे वाघ मोठ्या डौलत फिरत होते. सर्कशीचा खेळ संपल्यावर मी वाघांच्या पिंजऱ्याजवळ गेलो. तेथला एक वाघ गर्जना करू लागला. आश्चर्य म्हणजे, मला त्याची भाषा समजू लागली. तो गर्जत म्हणाला, "मित्रा, थांब. माझी व्यथा मी आज तुझ्या समोर मांडत आहे."


     "तुम्ही सर्वजण मला मोठ्या अभिमाने आणि कौतूकाने आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून संबोधता, तेव्हा बरे वाटते. पण माझा जन्म झाला तो या सर्कशीच्या तंबूतच! माझे आई-बाबाही येथेच सर्कसमध्ये होते. आयुष्यभर त्यांनी सर्कसमध्ये तीच तीच कामे केली. हि सर्व कामे करण्यासाठी त्यांना अनेक वेदना, धोके सहन करावे लागले, वेळप्रसंगी कित्येकदा चाबकाचे फटकारेही खावे लागले. माझे लहानपण मात्र मोठ्या कौतुकात गेले होते. या सर्कशीचा धनी आणि त्यांचा पुत्र दोघेही माझे खूप लाड करत. खूप खायला-प्यायला घालत व झोपायला मऊ मऊ अंथरून देत. मी लहान असताना मात्र त्यांनी कधीही मला चाबकाचे फटकारे दिले नव्हते. त्यामुळे त्यावेळी मी मोठ्या मजेत होतो. पण-"


     "जसजसे माझे बालपण सरत गेले तसतसा माझा हा आनंदनही लुप्त होत गेला आणि मी जसा तरूण झालो तसे माझ्या समोरील जीवन अधिकच कठीण होत गेले. सर्कसमध्ये काम करण्याचा मला कंटाळा येऊ लागला. अंगावर चाबकाचे फटकारे सपासप बसू लागले. स्वच्छंदपणे धावावे, हिंडावे असे सारखे वाटत असे, पण भोवताली होता अजस्त्र पिंजरा, त्याला होते भले भक्कम कुलूप! मला माझ्या पारतंत्र्याची जाणीव तीव्रतेने होऊ लागली होती. गुलामी मनाला वेदना देत होती. आजूबाजूला झाडावर मुक्तपणे विहार करणाऱ्या कावळा - चिमणी सारख्या पक्षांचाही मला हेवा वाटू लागला. अनेक वेळा तुमच्यासारखी लहान मुले सर्कशीतील शिकारखाना बघायला येतात, तेव्हा तर मी फार उदास होते, माझे मन भरून येते आणि त्यामुळे मोठ्या निराशेने त्यांच्याकडे पाठ फिरवून बसतो."


     "या सर्कशीच्या मालकाबरोबर मी अनेक लहान मोठ्या गावात, शहारात व देशोदेशी हिंडलो आहे. सारे जग पाहिले आहे. मला येते भरपूर खायला मिळते. तरीही मी येथे दुःखी आहे. आमचं सर्व जीवनच इतरांचे मनोरंजन करण्यात जाते, या सर्कसवाल्यांसाठी राबतो, मग आमच्या भवितव्याचे काय? मुक्तपणे बागडण्याचे भाग्य आम्हाला कधी लाभेल का? मित्रा, पुन्हा केव्हा भेटू सांगता येणार नाही. आम्ही आता दूरदेशी जाणार आहोत... वाघ असुनही गुलामीचे दर्शन घडवण्यासाठी!" इतके बोलून वाघाने पाठ फिरवली. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. हे पाहून मला खूपच वाईट वाटले.


... and the tiger in the cage started talking!

 Or

 The mind of a tiger in a cage

 Autobiographical / autobiographical essay

 Points : Tiger meeting place in the cage - Loving the work of the tiger in the circus - Thoughts in the mind of the tiger - Childhood is also in prison - No experience of relaxed environment in the forest - Life of slavery in circus - Sorrow of slavery


 A few days ago we went to see the circus.  We were amazed at the variety of circus art forms.  When my favorite tiger game started after all the events, all the spectators with me were holding their breath and watching it.  Tiger cages were opened in the arena.  Tigers with yellowish golden spots on their limbs and long black stripes were moving around in a big wave.  When the circus was over, I went to the tiger cage.  There a tiger roared.  Surprisingly, I began to understand his language.  He roared, "Friend, wait. I'm presenting my pain to you today."


 "It feels good to all of you proudly and appreciatively refer to me as the national animal of our country India. But I was born in this circus tent! My parents were in the circus here too. They did the same thing all their lives in the circus.  I had to endure many pains, dangers, and occasional whippings. My childhood was greatly appreciated. Both the owner of this circus and his son used to pamper me a lot.  But they never gave me a whip. So I was having a lot of fun at the time.


 As my childhood progressed, so did my joy, and as I got younger, my life became more and more difficult. I got bored of working in the circus.  There was an ajastra cage around him, he had a good strong lock! I was acutely aware of my dependency. Slavery was hurting my mind.  When they come to see me, I am very sad, my mind is full and I turn my back on them with great frustration. "


 "I have traveled with the owner of this circus in many small and big villages, cities and countries. I have seen the whole world. I get a lot of food. I am still miserable here. Our whole life is spent entertaining others.  Will we ever have the good fortune to roam free? Friend, we can't say when we will meet again.  After saying so much, the tiger turned its back.  There were tears in his eyes.  I was so sorry to see that.