वादळग्रस्ताचे मनोगत (आत्मनिवेदनपर निबंध / आत्मवृत्तात्मक निबंध)

 वादळग्रस्ताचे मनोगत
आत्मनिवेदनपर निबंध / आत्मवृत्तात्मक निबंध

मुद्दे : सुट्टीत मामाच्या गावी - मामाने वादळाविषयी सांगितले - निसर्गाचा कोप - विज्ञानाची प्रगती - निसर्गापुढे मानव अगतिक - मानवी जीवनाची क्षणभंगुरता - सरकारी यंत्रणा कोलमडणे - स्वयंसेवी संघटनांची मदत - देश-विदेशातून मदतीचा ओघ - किडलेल्या मनोवृत्तीचे दर्शन - रक्षकच भक्षक बनले - सत् प्रवृत्तीचे ही दर्शन घडले - अपेक्षा...


     सुट्टीत मामाच्या गावी गेलो होतो. रात्री गप्पा मारता मारता वादळाचा विषय निघाला. पाच वर्षापूर्वी गावाला बसलेल्या वादळाच्या तडाख्याविषयी मामा सांगू लागला, "जून महिन्याचा पहिला आठवडा उजाडला तरी पावसाचा पत्ता नव्हता. रोज पावसाळी हवा होती, पण थेंब टपटपत नव्हते. मात्र अचानकपणे एके दिवशी वारा सुटू लागला अन् उन्हाळ्यातील कडक उन्हाच्या तडाख्याने ग्रासलेल्या सर्वांना हायसे वाटले. पण ते नेहमीचे वारे नव्हते. क्षणाक्षणाला वाऱ्याचा वेग वाढत होता. त्याच्या वाहण्याला निश्चित दिशा नव्हती. अंगात आल्यासारखा वारा घुमत होता. तेव्हाच मनात आले की, ही वावटळ असावी. मिनिटागणिक वाऱ्याचा जोर वाढत होता. वाऱ्याचा वाढता वेग पाहून लक्षात आले की, हे साधेसुधे वारे नाही. हे वादळ आहे. तब्बल चार तास धुमाकूळ चालू होता. वाऱ्याचा सोS सोS आवाज चारही बाजूंनी घुमत होता. घराबाहेर पडणे अशक्य झाले होते. रस्ते निर्मनुष्य झाले होते. जीव मुठीत धरून माणसे कुठे ना कुठेतरी आश्रयाला गेली होती. घरात आलेली माणसे बाहेर गेलेल्यांची काळजी करत होती."


     "माणूस स्वतःला कितीही हुशार, प्रगत समजत असला किंवा त्याने स्वतःच्या हुशारीचा कितीही गर्व केला तरी शेवटी त्याला निसर्गापुढे नतमस्तक व्हावेच लागते. निसर्ग अत्यंत लहरी आहे. माणसामध्ये निर्माण झालेल्या हुशारीच्या अहंकाराचा गर्वशाली फुगा तो फोडतो आणि त्याला जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव करून देतो."


     "रात्र संपली आणि वादळही संपले. झुंजूमुंजू झाल्यावर माणसे घाबरत घाबरत बाहेर पडू लागली. प्रचंड पडजड झाली होती. माझ्या बागेतील निम्म्यापेक्षा जास्त झाडे जमीनदोस्त झाली होती मोठ्या हौसेने लावलेली कलमे उन्मळून पडली होती. महिनोन् महिन्यांचे कष्ट मातीमोल झाले होते. पण गावातली इतर पडझड पाहून मी माझे दुःख विसरलो. कित्येक लोकांची घरे पडली होती. घरावरचे पत्रे उडून काही जण जखमी झाले होते. नशिबाचा भाग म्हणजे कुणी दगावले नव्हते. काही गुरे मात्र मृत्युमुखी पडली होती. संपूर्ण गावाचे अतोनात नुकसान झाले होते."


     "जिल्हाधिकारी गावात येऊन पोहोचण्यासच चार दिवस गेले. वादळाच्या तडाक्यामध्ये ज्यांचे संसार तुटून पडले अशांच्या मदतीचा विचार करण्यासाठी गावपातळीवर अनेक कमिटया नेमल्या गेल्या, योजना आखल्या गेल्या, आश्वासने दिली गेली. पण प्रत्यक्ष मदत गरजवंतापर्यंत पोहोचलीच नाही. पुढे जाऊन भविष्यात जर का ती मदत आली तरी ती ग्रामपंचायतीच्या मंडळींनी स्वतःतच वाटून घेतली. त्यांच्या घरावर नवीन कौले चढवली."


     "गावकऱ्यांची दुःखे गावकर्‍यांनीच जाणली. वादळामुळे घराचा आसरा हरपलेल्याना प्रथम देवळात, धर्मशाळेत ठेवण्यात आले. पहिले काही दिवस तर समाज मंदिरामध्ये सामुदायिक जेवणाची सोय करण्यात आली. मग गावकऱ्यांनी एकत्र येऊन 'सेवा मंडळ' काढले. पैसा उभा केला. ज्यांना आर्थिक मदत देणे शक्य नव्हते अशा लोकांनी उपयोगी वस्तू दिल्या. गावातून बाहेर चाकरीला प्रदेशात वा स्वदेशात इतरत्र गेलेल्यांना गावाची अवकळा कळली. तेव्हा त्यांच्याकडून भरघोस मदत आली. सेवा मंडळाच्या सहकार्याने वादळामध्ये उद्वस्थ झालेले गाव पूर्ववत उभे करण्यात आले. सारे गाव कामाला लागले. वादळामध्ये माझी पडलेली झाडे, कलमे उभी होण्यास काही काळ लागेल. मात्र याच काळात गावाचा विकास करणारे कोण? गावचे खरे हितचिंतक कोण? याची मात्र कसोटी लागली." 


The mindset of the storm victims

 Essay on Autobiography / Autobiographical Essay


 Points : Mama's vacation in the village - Mama told about the storm - Nature's wrath - Science's progress - Human vulnerability to nature - The ephemerality of human life - The collapse of the government system - The help of NGOs - The flow of help from home and abroad -  Happened - Expected ...


 I had gone to my uncle's village on holiday.  The subject of the storm came up while chatting at night.  About the storm that hit the village five years ago, Mama said, "Even though the first week of June dawned, there was no sign of rain. It was raining every day, but the drops were not dripping.  It was not the usual wind, it was blowing fast, it had no definite direction, it was blowing like a whirlwind, it was just a whirlwind.  It was a storm for four hours, the wind was blowing in all directions, it was impossible to get out of the house, the roads were deserted, the people had taken refuge somewhere, the people in the house were taking care of those who had gone out.  . "


 "No matter how smart, advanced or proud a person may be, in the end he has to bow down to nature. Nature is very capricious. The proud bubble of ego created in man bursts and makes him aware of the ephemerality of life."


 "The night is over, and the storm is over. The people are fleeing in panic. There was a huge downpour. More than half of the trees in my garden were uprooted.  I forgot my grief. Many people's houses had collapsed. Some people were injured when letters flew over their houses. Fortunately, no one was betrayed. Some cattle were killed. The whole village was badly damaged. "


 "It took four days for the district collector to reach the village. Many village level committees were appointed, plans were made and assurances were given to help those whose lives were shattered in the storm. But the actual help did not reach the needy.  The gram panchayat congregations divided themselves. They built new houses on their houses. "


 "The grief of the villagers was felt by the villagers themselves. Those who lost their homes due to the storm were first housed in temples and Dharamshalas. For the first few days, community meals were arranged at the Samaj Mandir. Then the villagers came together and formed 'Seva Mandal'.  People donated useful things, those who went out of the village for service in the region or in other parts of the country came to know the difference of the village, so much help came from them.  But who is developing the village during this period? Who is the real benefactor of the village?