वृद्धाश्रमातील आजोबांचे मनोगत (आत्मनिवेदनपर निबंध / आत्मवृत्तात्मक निबंध )

 वृद्धाश्रमातील आजोबांचे मनोगत
आत्मनिवेदनपर निबंध / आत्मवृत्तात्मक निबंध

 

मुद्दे : प्रस्तावना - भेट - वय - जीवनात यशस्वी होण्यासाठी घेतलेले कष्ट - तत्वांविषयाची, विचारांविषयीची निष्ठा - कसोटीचे क्षण - कर्तबगारीचे प्रसंग - वृद्धाश्रमात येण्याचे कारण - वास्तव्य सुखात - दिनक्रम - कार्यक्रम - शांतीचा वानप्रस्थाश्रम...


     मुंबई ते पुणे प्रवास करत असताना मुद्दामच गाडी वळवून खोपोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घेतली, कारण 'आश्रय' या वृद्धाश्रमाला भेट द्यायची होती. या वृद्धाश्रमाबद्दल बरेच वाचले होते, ऐकले ही होते. त्यामुळे मनामध्ये खूप कुतूहल होते. वृद्धाश्रमाच्या आजूबाजूचा परिसर अतिशय रम्य आणि सुंदर होता. तेथील बागेमध्ये वावरणारी वृद्ध माणसे अतिशय प्रसन्न दिसत होती. आम्ही तेथे पोचलो तेव्हा नुकतीच जेवणाची वेळ झाली होती. त्यामुळे सर्वांनी आम्हाला जेवणाचा आग्रह केला. प्रार्थनेनंतर भोजनाला सुरुवात झाली. गप्पा मारता मारता भोजन संपले आणि सर्व मंडळी पांगली. तेव्हा आम्हाला घेऊन तात्या तेथीलच ग्रंथालयात गेले. तात्यांची आणि आमची ओळख जरी आताच झाली असली, तरी पण मनाला जाणवत होते की आमची फार जुनी ओळख आहे.


     तात्यांनी सहजपणेच आम्हाला विचारले, " कसा वाटला हा 'आश्रय' वृद्धाश्रम?" आणि पुढे तेच सांगू लागले, '' मी आता गेली आठ वर्ष येते आहे. अगदी आनंदात, सुखात आहे. येथे असणाऱ्या बहुतेक जणांची हीच वृत्ती आहे. मी निवृत्त आहे. मला पेन्शन मिळते. आर्थिकदृष्ट्या मी स्वावलंबी आहे. माझी दोन्ही मुले परदेशामध्ये स्थायिक झाली आहेत. मी जाऊन आलो. मुलांनी त्यांच्याकडेच कायम राहण्याचा खूप आग्रह केला, पण माझे मन काही रमेना. म्हणून मी परत आलो. येथील सर्व पसारा आवरला. पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे एकटाच आहे. तडक याठिकाणी आलो. प्रकृती उत्तम असल्यामुळे आश्रमाची काही कामे ही करतो."


     "येथे आलेल्यांपैकी प्रत्येकाची अशीच कथा आहे. कोणी आपण होऊन आलेत, तर कुणाला आणून सोडले आहे. पण भूतकाळ आम्ही विसरलो आहोत. भविष्यकाळाचा आम्ही विचार करत नाही. आम्ही फक्त वर्तमानात जगतो. आला दिवस आनंदात घालवतो. सणवार, राष्ट्रीय दिन या ठिकाणी साजरे करतो. दूरचित्रवाणी, विविध चित्रपट पाहतो. जमतील ते खेळ खेळतो. ग्रंथालयातील आवडीच्या लेखकांची विविध पुस्तके वाचतो, विविध विषयांवर चर्चा करतो तसेच वेगवेगळ्या सामाजिक मुद्दयांवर व्याख्यानेही आयोजित करतो. मुख्य म्हणजे एकमेकांना मदत करतो. एखाद्याला त्याच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत वेळेवर मिळत नसेल, त्यामुळे त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली तर जमेल तसे त्याच्यासाठी सर्वजण मदतीचा हात पुढे करतात."


     "तुमच्या पिढीतील लोकांना वाटते की हे वृद्ध म्हणजे थकलेले, खंगलेले जीव! येथे असणार रडकथा, कण्हणे, उसासेच. पण तसे नाही. आमच्या जीवनात येणारा प्रत्येक नवीन दिवस हा आम्ही ईश्वराच्या आशिर्वाद रूपाने मिळालेले जीवनातील बक्षीस मानतो आणि तो आनंदाने घालवतो."


     "आता एखादे दिवशी आमच्यातील एखादी व्यक्ती जगाचा निरोप घेते, मग आम्ही तिच्यासाठी प्रार्थना करतो. वृद्धाश्रमचालक तिच्या नातेवाईकांना कळतात. परंतू काही कारणास्तव नातेवाईक नसले वा दूर असले, तर तेच स्वतः त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करतात. आम्ही सर्वजण त्या दिवशी एक दिवसाचे  मौनव्रत पाळतो व उपोषण करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू. कारण सर्वांनाच हे माहीत आहे की, प्रत्येकाच्या जीवनामध्ये या वाटेवरून जाण्याचा क्षण केव्हा ना केव्हा तरी येणार आहे."


     "येथील सर्व काम करण्यासाठी अनेक नोकर आहेत, परंतू असे असले तरीही येतील प्रत्येक वयोवृद्ध आपल्याला आवडते ते काम करतात. कोणी बागकाम करतात, कोणी स्वयंपाक घरात काम करतात, तर कुणी वृद्धाश्रमाच्या कचेरीत काम करतात. भांडण-तंटे होत नाही, कारण आम्ही खरोखरच राग लोभाच्या पलीकडे गेलो आहोत. असा हा आम्हा सर्वांचा सुखशांतीचा, सुखा-समाधानाचा वानप्रस्थाश्रम आहे."


     तात्या मनमोकळेपणाने भरभरून बोलत होते, त्यांचे आत्मनिर्भरपर विचार ऐकून आम्ही भारावून गेलो, पुन्हा येण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला...



The mindset of the grandfather in the old age home

 Essay on Autobiography / Autobiographical Essay


 Points : Introduction - Visit - Age - Effort taken to succeed in life - Loyalty to principles, Thoughts about thoughts - Moments of testing - Occasions of duty - Reasons to come to the old age home - Rejoicing - Routine


 While traveling from Mumbai to Pune, he deliberately turned the car on the road leading to Khopoli, as he wanted to visit the old age home 'Ashray'.  I had read and heard a lot about this old age home.  So there was a lot of curiosity in the mind.  The surroundings of the old age home were very picturesque and beautiful.  The old men in the garden looked very happy.  By the time we got there, it was just dinner time.  So everyone urged us to eat.  After the prayer, the meal began.  The meal ended, and the whole congregation dispersed.  Then Tatya took us to the library.  Even though Tatya and I got to know each other only now, the mind was realizing that we have a very old acquaintance.


 Tatya simply asked us, "How did you feel about this 'shelter' old age home?"  And then he started saying, "I've been here for the last eight years.  Even in bliss, bliss.  This is the attitude of most of the people here.  I am retired.  I get a pension.  Financially, I am self-sufficient.  Both my children have settled abroad.  I went.  The kids insisted on staying with them, but my mind raced.  So I came back.  All the passes here are covered.  He is alone after the death of his wife.  Suddenly we came here.  He also does some ashram work as he is in good health. "


 "Everyone who has come here has a similar story. Someone has come and gone. But we have forgotten the past. We don't think about the future. We just live in the present. We spend the day happily.  He watches television, watches movies, plays games, reads books by his favorite authors in the library, discusses various topics and also gives lectures on various social issues. The main thing is to help each other.  If possible, everyone will lend a helping hand. "


 "People of your generation think that this old man is a tired, emaciated creature! There will be tears, groans, sighs. But it is not like that. Every new day in our life is a blessing from God and we spend it happily."


 "Now one day one of us says goodbye to the world, then we pray for her. The old age home operators know her relatives. But if for some reason they are not relatives or far away, they arrange all the funerals for that person themselves. We all observe a day of silence that day.  Fasting. The next day, all the events resume as usual. Because everyone knows that there will come a moment in everyone's life to go down this path. "


 "There are a lot of servants to do all the work here, but even so, every old person who comes here does what they love. Some work in gardening, some work in the kitchen, some work in the old age home office.  We have gone beyond that. This is the Vanprasthashram of peace, happiness and contentment for all of us. "


 Tatya was talking freely, we were overwhelmed to hear her self-reliant thoughts, we said goodbye promising to come again ...