यशस्वी कलावंताचे आत्मवृत्त (आत्मनिवेदनपर निबंध / आत्मवृत्तात्मक निबंध)

 यशस्वी कलावंताचे आत्मवृत्त
आत्मनिवेदनपर निबंध / आत्मवृत्तात्मक निबंध


मुद्दे : प्रेक्षकांना उद्देशून मायबाप - खरा कलावंत तृप्त नसतो - लहानपणी नकला करायला आवडायचे- आई वडिलांकडून प्रोत्साहन - अभिनय कलेचे शिक्षण घेतले - अनेकांच्या अभिनयाचे निरीक्षण - प्रायोगिक, व्यावसायिक नाटकात कामे - आई-वडिलांचे संस्कार - व्यसनापासून दूर - नव्या पिढीविषयी आशावादी दृष्टिकोन...


     "रसिक प्रेक्षकहो, मायबापहो... हो! तुम्ही आम्हा कलावंतांचे मायबाप आहात. तुम्ही सर्वांनी मला प्रत्येकवेळी विविध पध्दतीने मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिलेत म्हणून तर मी आज या अत्युच्च शिखरावर येऊन पोचलो आहे. मात्र या स्थानाला मी 'शिखर' म्हणणार नाही. कारण ज्याच्या नसानसांमध्ये कला भरभरून वाहत आहे अशा खऱ्या कलाकाराला शिखर प्राप्त झाले, असे कधीच वाटत नाही. अजूनही आपल्याला काही तरी नवीन शिकायचे आहे. काही अभिनयाने ओसांडणाऱ्या उत्कृष्ट भूमिका करायच्या आहेत, असेच खऱ्या कलावंताला नेहमी वाटत असते. आज आपण सर्वानी अभिनयक्षेत्रातील एक यशस्वी कलावंत म्हणून माझा गौरव केलात, पण मी खरच अजून माझ्या यशाबाबत तृप्त झालेलो नाही."


     "लहानपणापासूनच विविध छोटया - मोठ्या कार्यक्रमामध्ये मला सतत दुसऱ्याची नक्कल करायला खूप आवडायचे. मी साधारणता पाच ते सहा वर्षाचा असतानाच माझ्या आईला एकदा तिचीच नक्कल करून दाखवली आणि तिला चकित केले. माझे आई-वडील उत्तम रसिक होते. त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. या सर्व कारणामुळे शाळा-कॉलेजमध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असताना माझ्या अभिनयकलेचाही विकास झाला. शाळा-कॉलेजात असताना प्रत्येक सुट्टीत मी नाट्य प्रशिक्षण शिबिरात सामील होत असे. मी अभिनयाची पारितोषिकेही मिळवली. सतत नाटके पाहिली. अनेक यशस्वी कलावंतांचा अभिनय डोळ्यात आणि मनात साठवला. त्यातून माझ्यातील अभिनेता विकसित होत गेला."


     "पदवी मिळवल्यावर मी पुणे येथील 'अभिनय नाट्य प्रशिक्षण महाविद्यालयात पुढील विविध कलांच्या अभ्यासाकरीता प्रवेश घेतला. या ठिकाणी अभिनय कलेच्या विविध प्रशिक्षणाबरोबरच नाट्यकलेतील ही अनेक बाबींचे शिक्षण घेतले. त्यामुळे अनेक प्रायोगिक धरतीवरील तसेच व्यवसायिक क्षेत्रातील नाटकांमधून मी अभिनय केले. गेली चाळीस वर्षे रंगभूमीवर मी वावरत आहे आणि त्याच बरोबर यशस्वी कौटुंबिक जीवन सुद्धा जगत आहे.  आज मला जे यश संपादन झाले आहे त्यामध्ये माझ्या कुटूंबातील सर्वांच्या प्रोत्साहनाचा फार मोठा वाटा आहे.'व्यसनाधीनता' हा कलाक्षेत्राला मिळालेला एक शाप आहे. त्यापासून मी कटाक्षाने दूर राहिलो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लहानपणापासून आई-वडिलांनी माझ्या मनावर बिंबवलेला हा संस्कार होता."


     "माइया मायबाप हो, या अभिनय कलेच्या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीविषयी मी मनोमन समाधानी आहे. ही सर्व नवोदित मंडळी वर्तमानात खूप चांगली नाट्यचळवळ करत आहेत. आता जीवनाचा उर्वरित प्रवास पूर्ण करत असताना मी नाट्यकलेचा इतिहास लिहिणार आहे व नवोदितांना अभिनयाबाबत मार्गदर्शन करणार आहे. तुमच्या शुभेच्छा या उत्तम कार्यामध्ये मला सदैव प्रोत्साहित करतीलच. त्याचबरोबर हे सर्व करत असताना कलेची देवता नटेश्वराचा मला आशीर्वाद लाभावा, हीच माझी मनोकामना आहे."


Autobiography of a successful artist

 Essay on Autobiography / Autobiographical Essay


 Points : Addressing the audience My parents - True artist is not satisfied - I like to imitate as a child - Encouragement from parents - Learned acting skills - Observation of acting by many - Experimental, professional drama works - Parents' culture - Away from addiction

 "Funny audience, my father ... yes! You are the father of us artists. All of you have guided and encouraged me in different ways each time, so I have reached this very high peak today. But I will not call this place 'Shikhar', because in whose breath  A true artist who is full of art never thinks that he has reached the pinnacle, he still wants to learn something new, he always wants to play some great roles, today you all glorify me as a successful artist in the field of acting.  , But I'm not really satisfied with my success yet. "

 "Ever since I was a child, I have always loved to imitate others in various big and small shows. When I was about five or six years old, I used to imitate my mother once and amaze her. My parents were very funny. They encouraged me from time to time.  Due to this, my acting skills developed while completing my education in school-college. During school-college, I used to attend drama training camps every holiday. I also won acting awards. I watched dramas continuously.  It's happening. "

 After graduation, I enrolled in the Abhinaya Natya Prashikshan Mahavidyalaya in Pune for further studies in various arts. Along with various training in acting, I also studied drama in various fields.  At the same time, I am living a successful family life. The success I have achieved today is due to the encouragement of everyone in my family. 'Addiction' is a curse on the art world.  -This was the rite that my father instilled in my mind. "

 "My dear father, I am very happy with the new generation in the field of acting. All these newcomers are doing a great job in the field of drama now.  I will always be encouraged to do good deeds. At the same time, while doing all this, I wish to be blessed by the God of Art, Nateshwar, that is my wish. "