महात्मा जोतीराव फुले - श्रेष्ठ मानवतावादी (चरित्रात्मक निबंध ) Mahatma Jotirao Phule - The Best Humanist (Characteristic Essay)

 महात्मा जोतीराव फुले - श्रेष्ठ मानवतावादी (चरित्रात्मक निबंध )

Mahatma Jotirao Phule - The Best Humanist (Characteristic Essay)

          उच्चकोरीचे मानवतावादी समाजसुधारक म्हणून महात्मा जोतीराव फुले यांच्या कडे पाहिले जाते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. जीवनामध्ये सत्याचा मूलमंत्र काया - वाचा मने जपणाऱ्या, जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली सातारा जिल्हयातील कटगुण येथील माळी समाजातील गोऱ्हे यांच्या घरात झाला. लहानपणा मध्येच आईचा मृत्यू झाल्याने आईचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी आईच्या प्रेमाने वाढवले. त्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत घातले. जोतीरावांना मात्र इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. शिक्षणाच्या या प्रवाहामध्ये त्यांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागले. तरीही या सर्व अडचणींवर समर्थपणे मात करून जोतीरावांनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले. वयाच्या फक्त तेराव्या वर्षामध्ये जोतीरावांचा सावित्रीबाई फुले यांच्याशी विवाह झाला होता. स्वतःचे प्राथमिक स्तरावरील शिक्षण पूर्ण झाल्यावर काही दिवस त्यांनी भाजी विकण्याचा व्यवसाय केला. पुढे त्यांनी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पुणे येथील स्कॉटिश मिशन च्या माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेतला. ते अतिशय हुशार आणि तल्लख बुध्दीचे असल्याने त्यांनी पाच ते सहा वर्षातच माध्यमिक अभ्यास पूर्ण केला. 
          'सर्व शक्तींमध्ये ज्ञान हि शक्ती महान आहे.' अशी स्वतःची ठाम श्रद्धा अथवा भूमिका बाळगणाऱ्या जोतीरावांनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबध्द पध्दतीने मांडला आहे. त्यांचे मते " विद्ये विना मति गेली| मती विना नीति गेली | नीति विना गति गेली | गती विना वित्त गेले || इतके अनर्थ एका अविद्येने केले." जोतिबा फुले हे 'कर्ते सुधारक' होते. ते करारी वृत्तीचे होते. समाजातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांना प्रचलित समाजाच्या दास्यातून मुक्त करायच्या हेतूने प्रेरित होऊन सर्वप्रथम त्यांनी स्वतःची पत्नी सावित्रीबाई यांना सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे मुलींच्या अध्यापनाचे महान कार्य सोपवले. जोतीराव आणि सावित्रीबाई यांचे ज्ञानदानाचे कार्य अखंडितपणे चालू राहिले. समाजातील सर्व मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे याकरीता पुण्यातील बुधवार पेठेमधील भिडे वाडयात त्यांनी मुलींची पहिली मराठी शाळा सूरू केली. या शाळेची सर्वस्वी जबाबदारी त्यांनी सावित्रीबाई यांच्यावर दिली होती. त्यानंतर शूद्र, अतिशूद्र समाजातील मुला - मुलींकरीता त्यांनी शाळा सुरू केली.
          पूर्वीच्या काळी हिंदू समाजातील उच्च जातीमध्ये विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह करणे निषिद्ध मानले जात होते. त्याकाळी ज्या स्त्रीने वपन केले नाही त्या विधवेला अपवित्र स्त्री मानली जात असे. जोतीरावांनी विधवांच्या केशवपनाची ही अमानुष रित बंद व्हावी म्हणून मोठी चळवळ उभी केली. त्याचबरोबर त्यांनी बालहत्या प्रतिबंधकगृहची स्थापना केली. जोतिबांनी स्त्रियांप्रमाणे अस्पृश्यांसाठीही बहुमोल सेवाकार्य केले आहे. सार्वजनिक पाणवठ्यावर समाजातील अस्पृश्य, दलित बांधवांचे होणारे अप्रचंड हाल पाहून त्यांनी त्यांच्यासाठी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद खुला करून दिला होता. 'सत्यशोधक समाजाची' स्थापना त्यांनी १८७३ मध्ये केली. सर्व धर्मांचे व जातीचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सभासद व्हावेत, अशी त्यांची आखणी होती. या सत्यशोधक समाजाचे मुख्य कार्य म्हणजे समाजामध्ये पसरलेली असमानता, विषमता आणि तळागाळातील समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणे हे होते. या समाजाची जेव्हा त्यांनी स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे खंबीर नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. त्यांच्याबरोबर ऐकोणीस स्त्रिया या समाजाचे कार्य पाहत होत्या. 
          जोतीराव फुले यांनी अनेक मौलिक विचारपर्वतक अशी पुस्तके लिहिली. आजूबाजूचच्या समाजातील पीडित श्रमिकांच्या विदारक आर्थिक स्थितीचा जोतीरावांनी सखोल अभ्यास करून त्यांचे उत्कृष्ट वर्णन त्यांनी आपल्या 'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकामध्ये रेखाटले आहे. यातून त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी अनेक विधायक उपाय ही सूचवले आहेत. अनेक वर्षापूर्वी जोतीरावांनी लिहिलेले हे मौलिक विचार वर्तमान स्थितीमधील ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतात. ही बाब जोतिबांच्या अलौकिक द्रष्टेपणाचे प्रमाण देते.
          जोतीराव फुले यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजाची सेवा करण्यासाठी वेचला.  म्हणूनच लोकांनी त्यांना 'महात्मा' या उपाधीने यथार्थपणे गौरवले आहे.


Mahatma Jotirao Phule - The Best Humanist (Characteristic Essay)

Mahatma Jotirao Phule is seen as a high level humanitarian social reformer.  He spent his whole life thinking only of human interest.  Jotirao was born on April 11, 1827 in the house of a cow belonging to the gardening community of Katgun in Satara district.  Govindrao Phule raised a child named Joti, who lost his mother's umbrella due to his mother's death at an early age.  Put them in school for education.  Jotirao, however, was obsessed with English education.  They had to face many difficulties in this stream of education.  However, overcoming all these difficulties, Jotirao completed his English schooling.  Jotirao was married to Savitribai Phule at the tender age of thirteen.  After completing his primary education, he started selling vegetables for a few days.  He later enrolled at the Scottish Mission Secondary School in Pune for secondary education.  He completed his secondary education in five to six years as he was very intelligent and brilliant.

 'Knowledge is the greatest of all powers.'  Jotirao, who has such a strong belief or role, has summarized his thoughts in a formulaic manner.  According to him, "Knowledge is gone without wisdom | Policy is gone without wisdom | Policy is gone without speed | Motion is gone without finance || So much mischief was done by an ignorant person."  Jyotiba Phule was a 'doer reformer'.  They were contractual.  Inspired to liberate the Shudras, Atishudras, farmers and women from the bondage of the prevailing society, he first educated his wife Savitribai and entrusted her with the great task of educating girls.  The enlightenment work of Jotirao and Savitribai continued uninterrupted.  In order to complete the education of all the girls in the society, he started the first Marathi school for girls at Bhide Wada in Budhwar Pethe, Pune.  He had given the entire responsibility of this school to Savitribai.  He then started a school for boys and girls from the Shudra, Atishudra community.

 In the past, remarriage of widows was considered taboo in the upper castes of Hindu society.  In those days, a widow who did not marry was considered an unclean woman.  Jotirao started a big movement to stop this inhuman practice of widow's haircut.  He also set up a juvenile detention center.  Jyotiba has done invaluable service to untouchables as well as women.  He had opened the water tank of his own house for the untouchable, Dalit brothers in the community.  He founded the Satyashodhak Samaj in 1873.  His plan was that citizens of all religions and castes should become members of this truth-seeking society.  The main task of this truth-seeking society was to spread the inequality, inequality and education to the lower castes.  When she founded this society, Savitribai was the strong leader of the women's section.  Nineteen women were watching the work of this society with him.

 Jotirao Phule wrote many such books.  In his book 'Shetkaryacha Asood', Jotirao has given an excellent account of the dire economic condition of the aggrieved workers in the surrounding society.  He suggested a number of constructive measures to improve the condition of farmers.  These fundamental ideas, written by Jotirao many years ago, also apply to the present day rural economy to a large extent.  This matter gives evidence of the supernatural vision of Jyotiba.

 Jotirao Phule chose every moment of his life to serve the society.  That is why people have truly glorified him with the title 'Mahatma'.