आळसे कार्यभाग नासतो (सुभाषितपर निबंध) Laziness spoils all work

 आळसे कार्यभाग नासतो (सुभाषितपर निबंध)

Laziness spoils all work



          माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आळस होय. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी पूर्ण करण्याचे माणसे संकल्प करतात. परंतू आळसी वृत्तीमुळे त्यांचे अनेक संकल्प अल्पावधीतच विरून जातात. भारतीय लोकांमधील आळस हा तर फार मोठा दोष आहे. तसे पाहिले तर आपल्या देशात प्रचंड मनुष्यबळ आहे. प्रत्येक माणसाने जर आपली पूर्ण कार्यक्षमता योग्य पद्धतीने वापरण्याचे ठरवले, तर खूप मोठी कार्यशक्ती आपण सहजपणे उभारू शकू.

          अनेक मुले विद्यार्थी दशेत असताना आळसाला कवटाळतात. त्यामुळे लहानपणापासून अनेकांनी पाहिलेली विविध स्वप्ने कधीच पूर्ण होत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी निराशेच्या खाईमध्ये जातात. अनेकजण माध्यमिक शिक्षण जोमाने पूर्ण करतात. परंतू जेव्हा करिअर घडविण्याची वेळ येते तेव्हा अनेकजण आळसाला आपला मित्र बनवतात. आजकाल कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता आरामशीर सर्व साध्य करण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्यामुळे अनेक तरूण मुले नको त्या मार्गावर चालू लागतात. पुढे पुढे ते अनेक वाईट संगती मध्ये अडकतात आणि स्वतःच्या भविष्याचा विनाश करून घेतात.

          आपल्या पूर्वजांनाही या गोष्टी कल्पना असावी. म्हणूनच सुभाषितकार नेहमी सांगतात, 'अलसस्य कुतो विद्या?' आळशाला विद्या मिळणार तरी कोठून? विद्या प्राप्त करायची असेल, तर मेहनत, कष्ट करावे लागतात. एखाद्या व्यक्तीने स्वतःचे बालपण आळसात घालवले, तर त्याला विद्या कशी बरे प्राप्त होणार? आळशी माणसाचे जीवन ही एक शोकांतिकाच असते. जगामध्ये अनेक नामांकित, प्रसिद्ध व्यक्तींचा जीवनप्रवास आपण पाहिला तर आपल्याला त्याच्या कष्टाची जाणीव होते.

          आळशी माणूस आज करायचे काम नेहमी उद्यावर ढकलतो आणि त्याचा तो उद्या कधीच उगवत नाही. आळसामुळे तो आपले कोणतेच काम वेळेवर करत नाही. त्यामुळेच तो कायमच अपयशी व दुःखी ठरतो. या उलट सतत उद्योगी असणारा व्यक्ती जीवनात नेहमी यशस्वी होतो. त्या व्यक्तीला नेहमी वैभव प्राप्त होते.

          आळशी लोक ही अनेक वेळा आपल्या आळसावर पांघरूण घालण्यासाठी देवाचा आधार घेतात. आमच्या नशिबातच हे नाही, असे त्यांचे सततचे पालुपद असते. 'असेल माझा हरी तर तो देईल मला खाटल्यावरी' असे मनाचे समाधान करून तो आरामशीर जगत असतो. 'आळशी मन हे अनेक सैतानाची कार्यशाळा असते' अशा अर्थाचे एक इंग्रजी वचन आहे. निरूदयोगी मानवाच्या मनामध्ये अनेकदा वाईट विचार येतात व तो दुष्कर्मालाही प्रवृत्त होण्याचा धोका संभवतो. उद्योगमग्न असणाऱ्या माणसाच्या मनात सतत उद्योगाचाच विचार असतो व त्यामुळे अपप्रवृत्तीची जोपासना होऊ शकत नाही. तो कार्यशील असल्याने त्या कामाविषय विविध विचार त्याच्या मनात घोळत असतात. त्यामुळे विघातक, वाईट विचार करण्यास अशा व्यक्तींजवळ कधीच वेळ नसतो.

          खर पाहता विविध कामे करण्याची, विविध कृती करण्याची परिपूर्ण क्षमता मानवामध्ये असताना सूध्दा अंगातील आळसामुळे तो विविध कामे किंवा कृती पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अंगातील आळस घालवण्यासाठी प्रत्येकाने रात्री लवकर झोपावे. सकाळी लवकर उठून थोडा व्यायाम किंवा योगा करावा. रात्री उशीरा झोपल्याने सकाळी लवकर उठू वाटत नाही आणि त्यामुळे दिवसभर शरीरामध्ये आळसाचे वास्तव्य राहते. त्यामुळे कोणतेच काम योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. अशा व्यक्तीच्या हातामधून अनेक चुका होतात. त्या चुका कमी होण्याऐवजी वाढतच जातात. त्यामुळे अशी माणस जीवनात नेहमी चिडचिड करतात. ती कोणतीच कार्यसिध्दी प्राप्त करू शकत नाहीत.

          वैयक्तिक जीवनात आळस जेवढ्या प्रमाणात घातक आहे, तेवढ्याच प्रमाणात तो सामाजिक जीवनातही घातक आहे. प्रत्येक देशातील समाज कष्टाळू नसेल तर त्या समाजाचा विकास होणार नाही. त्याचबरोबर त्या देशाचा सुध्दा विकास होणार नाही. आजकाल आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची स्तोत्रे गाण्यात गुंतलेल्या भारतीयांनी आता स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर आपण भारतीय पुढे पुढे जगाच्या मागे पडत जाऊ. देशाच्या संरक्षण क्षेत्रातील आळस हा सर्वात घातक आहे. परकीय देशाचे आक्रमण झाले तर आळशी, बेसावध माणस त्यांचा प्रतिकार करू शकतील का? याकरीताच समर्थ रामदास स्वामी सांगतात, 'आळसे कार्यभाग नासतो.'

Laziness spoils all work

Man's greatest enemy is laziness.  People are determined to accomplish many things in life.  But due to lazy attitude, many of their resolutions go away in a short period of time.  Laziness is a big fault of Indians.  In that sense, our country has a huge manpower.  If every man decides to use his full potential in the right way, we can easily build a huge workforce.

 Many children embrace laziness when they are students.  So the various dreams that many have seen since childhood are never fulfilled.  So many students fall into the abyss of despair.  Many are quick to complete their secondary education.  But when it comes to making a career, many people make laziness their friend.  Nowadays, everyone has a tendency to achieve everything comfortably without any effort.  As a result, many young children go astray.  Later on, they become entangled in many bad associations and ruin their own future.

 Our ancestors should also have an idea of ​​these things.  That is why the proverbs always say, 'Alasasya kuto vidya?'  Where can a lazy person get knowledge?  If you want to acquire knowledge, you have to work hard.  If a person spends his childhood in idleness, how will he get knowledge?  The life of a lazy man is a tragedy.  If you look at the lives of many famous people in the world, you are aware of their hardships.

 The lazy man always pushes the work to be done today and it never grows tomorrow.  He does not do any of his work on time due to laziness.  That is why he always fails and is miserable.  On the contrary, a person who is constantly industrious always succeeds in life.  That person always gets glory.

 Lazy people often rely on God to cover their laziness.  This is not our destiny.  He lives comfortably with the satisfaction of saying, 'If it is my green, he will give it to me when I go to bed'.  There is an English saying that means 'lazy mind is a workshop of many devils'.  Bad thoughts often enter the mind of a helpless human being and he is also in danger of inciting evil.  The mind of a person who is engaged in business is constantly thinking of industry and therefore malpractice cannot be nurtured.  Since he is active, various thoughts about that work are mixed in his mind.  So such people never have time to think negatively.

 In fact, even though a human being has the perfect ability to perform various tasks, due to laziness in the body, he cannot perform various tasks or actions.  So everyone should go to bed early at night to get rid of laziness.  Get up early in the morning and do some exercise or yoga.  Sleeping late at night does not make you feel like waking up early in the morning and therefore makes the body lazy throughout the day.  So no work can be done properly.  Many mistakes are made by such a person.  Instead of trying to recover, they wallow in their sadness and thus, experience more failure.  So such a man is always irritated in life.  They can't achieve anything.

 As much as laziness is dangerous in personal life, it is also dangerous in social life.  If the society in every country is not hardworking, that society will not develop.  At the same time, the country will not develop.  Nowadays, Indians who are engaged in singing the hymns of their forefathers need to focus on their own progress.  Otherwise, we Indians will continue to fall behind the world.  Laziness in the country's defense sector is the most dangerous.  Can a lazy, unconscious man resist a foreign invasion?  This is why Samarth Ramdas Swami says, 'Lazy work escapes.'